साहित्यः
गव्हाचे पीठ - १ वाटी
हळद - १ चमचा
लाल तिखट - ४ चमचे
पाव-भाजी मसाला - १ चमचा
चाट मसाला - ४ चमचे
कसुरी मेथी - १ चमचा
तुप - ४ चमचे
मिठ - ३ चमचे
कृती:
१. गव्हाच्या पीठामधे हळद, २ चमचे लाल तिखट, पावभाजी मसाला, २ चमचे चाट मसाला, कसुरी मेथी, २ चमचे तुप व चवीनुसार मीठ टाकुन निट मिक्स करुन घ्यावे.
२. सर्व निट मिक्स करुन झाल्यावर, त्याचे पीठ मळुन घ्यावे व १/२ तास झाकुन ठेवावे.
३. १/२ तासाने पीठाचे छोटे गोळे करुन घ्यावे व त्याच्या पापडा एवढ्या पातळ पोळ्या लाटुन घ्याव्या.
४. ह्या पोळ्या आधी दोन्ही बाजुनी अर्धवट भाजुन घ्याव्यात.
५. प्रत्येक पोळी भाजुन झाल्यावर ताटलीत काढावी. त्याला थोडे तुप लावावे व वरतुन चाट मसाला भुरभुरावा.
६. अशा प्रकारे सर्व पोळ्या भाजुन घ्याव्या व ४-५ तास तशाच ठेवाव्या.
७. ४-५ तासाने १ पोळी घ्यावी. तव्यावर ही पोळी टाकावी. मंद आचेवर हि पोळी फडक्याने दाबत दोन्ही बाजुनी कडक होई पर्यंत भाजुन घ्यावी.
८. तो पर्यंत एका वाटीत १ चमचा मिठ, २ चमचे लाल तिखट व १ चमचा चाट मसाला मिक्स करुन घ्यावा.
९. पोळी कडक झाल्यावर ताटलीत काढावी. त्याला वरतुन तुप लावावे व चाट मसाल्याचे मिश्रण भुरभुरावे.
१०. खाकरे थंड झाल्यावर air-tight डब्यामधे भरुन ठेवावे.
प्रतिक्रिया
25 Apr 2012 - 3:14 am | Pearl
खाकर्याच्या पा.कृ. बद्दल धन्यवाद. मला एकदा करून पहायचेच होते.
आणि फोटो तर जबरा.... फोटोतले खाकरे उचलून खावेसे वाटत आहे :-)
25 Apr 2012 - 10:15 am | पियुशा
खाकरा मस्तच :)
पण एक शंका :
१ वाटी गव्हाच्या पीठात ४ चमचे लाल तिखट ?
खाकरा जास्ती तिखट तर नाही ना होणार ?
25 Apr 2012 - 4:52 pm | Mrunalini
पीठ मळताना त्यात फक्त २ चमचे लाल तिखट घातले आहे आणि उरलेले २ चमचे तिखट शेवटी वरतुन टाकायला वापरले. :)
25 Apr 2012 - 11:13 am | निवेदिता-ताई
मलाही करुन पहायचे होते.....मस्त झालेत ह....:)
25 Apr 2012 - 4:39 am | पाषाणभेद
खॅक...खॅककककक...
25 Apr 2012 - 6:57 am | पाषाणभेद
असे खाकरे किती दिवस टिकू शकतात? म्हणजे ७/८ दिवसांच्या प्रवासाची बेगमी करता येईल इतपत टिकतात काय?
25 Apr 2012 - 7:15 am | रेवती
सहज टिकतात. ७ ते ८ दिवसांपेक्षा जास्त टिकतात.
फोटू चांगला आलाय मृ.
पण माझा या पदार्थाला पास.
खूप पेशन्सचे काम आहे असे ऐकले आहे.
25 Apr 2012 - 9:04 am | प्रचेतस
असे जबरदस्त खाकरे कितीही दिवस टिकू शकत असले तरी त्यासाठी ते शिल्लक राहायला हवेत ना?
एकाच दिवसात फस्त होऊन जातील.
25 Apr 2012 - 4:54 pm | Mrunalini
खाकरे भरपुर दिवस टिकतात. त्यामुळे प्रवासात न्यायला एकदम मस्त. :)
25 Apr 2012 - 8:06 am | चिंतामणी
जिवघेणा फोटो आहे खाक-याचा.
25 Apr 2012 - 10:03 am | प्रभाकर पेठकर
खाकरे भारी आवडतात. पण त्याची पाककृती जरा जास्तच क्लिष्ट वाटते आहे. पण तेवढाच नवनिर्मितीचा आनंद मोठा.
प्रयत्न करून पाहिन.
25 Apr 2012 - 10:05 am | ५० फक्त
जाम पेशन्सचं काम आहे, जमेलच ही शक्यता कमी. पण कधी कधी खाकरा खायला जाम कंटाळा येतो, पण मग त्यावेळी ब्रेड आणुन खाकरा सँडविच करुन खातो, मस्त लागतं ते.
25 Apr 2012 - 4:56 pm | Mrunalini
पेशन्सच काम आहे हे खर... मला पण स्वतःला एवढा कंटाळा आला होता शेवटी, पण पुर्ण केले.
25 Apr 2012 - 10:19 am | सविता००१
खूप छान खाकरे आणि फोटो पण तितकाच सुंदर आहे. आता करून पहायलाच हवेत.
25 Apr 2012 - 10:30 am | जागु
मस्तच.
25 Apr 2012 - 12:06 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या विकांताला काय प्रयोग करावा ह्याची चिंता मिटली.
इकडे कसुरी मेथी शोधणे आले आता. बहूदा इंडिया मार्ट मध्ये मिळून जाईल.
25 Apr 2012 - 12:12 pm | सानिकास्वप्निल
नक्की करुन बघणार खाकरा...मला खूप आवडतो :)
मस्त पाकृ मृणाल :)
25 Apr 2012 - 12:46 pm | गणपा
क्या बात है.
असे करतात होय खाकरे ?
दुकानात आयते मिळत असल्याने करण्याच्या वा पाकृ शोधण्याच्या भानगडीत कधी पडलो नाही.
29 Apr 2012 - 4:27 pm | स्वाती दिनेश
तुझं बरं आहे बाबा गणपा, आयते दुकानात मिळतात..
खाकरे करणे म्हणजे जाम पेशन्सचे काम आहे पण आता फोटोत पाहून करावेसे वाटू लागले आहेत,
स्वाती
25 Apr 2012 - 1:21 pm | धनुअमिता
ह्या रेसिपीसाठी. बरेच दिवस शोधत होते ही रेसिपी.
खुपच जबरदस्त दिसतायेत खाकरे. आवडल्या गेल्या आहे.
( तुम्ही प्रत्येक स्टेपचे फोटो काढत नाही का?)
25 Apr 2012 - 3:32 pm | स्मिता.
खाकरे खूप आवडतात. पण वेळखाऊ म्हणून कधी करून बगितले नाहीत. पण आता फोटो बघून पुन्हा इच्छा होतेय :)
25 Apr 2012 - 4:57 pm | Mrunalini
सगळ्यांचे धन्यवाद. :)
25 Apr 2012 - 5:02 pm | जयवी
एकदा करून बघायला हवे.
बाकी फोटू एकदम खतरा !!