दहि भल्ले म्हणजे दहिवडे नाहित .हा एक चाट प्रकार आहे.यासाठी लागणारे साहित्य खालिल प्रमाणे.
साहित्य :- १वाटी उडदाची डाळ, १पाकिट पाणिपुरिच्या पुर-या, १वाटी चिंचेची चटणी, १ टेबल स्पून चाट मसाला ,१ चमचा लाल तिखट, १ चमचा जिरे पावडर ,१ चमचा धने पावडर ,१/२ लिटर दुघाचे दही, मीठ ,१वाटी पिठी साखर,१/२ हिरव्या मिरच्या
१ वाटी बारीक चिरलेली कोथिंबिर.
कृती :-उडदाची डाळ ४/५ तास भिजत घालावी. नंतर पाणि काढुन टाकुन त्यात २ हिरव्या मिरच्या घालुन मिक्सर मधुन वाटुन घ्यावी . वाटलेली डाळ एका भांड्यात काढुन त्यात मीठ घालुन ढवळुन घ्यावे. नंतर दहि वड्यासाठी जसे वडे करतो त्याप्रमाणे वडे तळुन घ्यावे . ५ मिनिटे पाण्यात टाकुन नंतर त्यातिल पाणी काढुन टाकावे. वडे तयार झाले.
चिंचेच्या चटणीसाठी १वाटी चिंचेचा कोळ, १०/१२ खजुराच्या बिया , १ चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ , १चमचा जिरे पावडर . खजुरातील बिया काढुन मिक्सरमधे वाटुन घ्यावा.वाटलेला खजुर,चिंचेचा कोळ, तिखट,मीठ,जिरे पावडर सर्व एकत्रकरुन चटणी तयार करुन घ्यावी.
दही घुसळुन त्यात पिठीसाखर आणि मिठ घालुन गोडसर दही तयार करावे.
एका खोलगट प्लेट मधे पाणी पुरिच्या पुर्या वरुन थोद्याशा फोडुन ठेवाव्यात. त्यात रगडा घातो त्याप्रमाणे वड्याचे छोटे छोटे तुकडे घालावेत. लाल तिखट,धने जिरे पावडर चाट मसाला १/१ चिमुट घालावा .
वरुन गोड दही घालावे. नंतर चिंचेची चटणी घालावी . सजावटिसाठि बारिक चिरलेली कोथिंबिर घालावी . दहिभल्ले खाण्यासाठि तयार.
प्रतिक्रिया
23 Apr 2012 - 10:00 am | पियुशा
वॉव !
आय लव्ह दहीभल्ले :)
23 Apr 2012 - 10:16 am | प्रचेतस
सॉल्लिड.
आजच जावे म्हणतोय आता चाट खायला.
23 Apr 2012 - 10:45 am | चिंतामणी
घरी बनवुन खाणे असे आहे.
घरी बनवा आणि इष्ट मित्र,मैत्रीणींना बोलवा स्वाद घ्यायला.
23 Apr 2012 - 10:52 am | प्रचेतस
अहो इथे साधा चहा बनवताना मारामार, दही भल्ले कसले बनवतोय घरी.
23 Apr 2012 - 12:34 pm | ५० फक्त
सोपी आयडिया, साधा चहा बनवायच्या भानगडी करुच नका तुम्ही, डायरेक मसाला / स्पेशल / कटिंग / मारामारी वगैरे असले प्रकार करत जा.
23 Apr 2012 - 12:06 pm | परिकथेतील राजकुमार
#$%$#^$%#&$%&^%(&^(*&$#$#^$*
तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे !!
मला वाटलेच होते की तुमच्या घरी हे उद्योग चालू आहेत. तरी मी विचारत होतो की कसला वास येतो आहे. पण तुम्ही उडवा उडवीची उत्तरे दिलीत.
असो...
23 Apr 2012 - 12:58 pm | नेहरिन
कशाचा ??? कुणाचा ?? आणि कुणाबद्दल ??? निषेध..अजिबातच कळले नाहि
23 Apr 2012 - 1:19 pm | चिंतामणी
बोलवल्यावर फोन बंद करून लगेच यायचे सोडुन बयादी किती सांगतोस. पुढच्यावेळी लक्षात ठेव. फोनवर ये म्हणले की निघायचे.
23 Apr 2012 - 3:11 pm | बिपिन कार्यकर्ते
माझा नंबर आहे ना तुमच्याकडे? चेक करा बरं! आणि हो, मी उपास वगैरे करत नाही कधीच. ;)
23 Apr 2012 - 1:13 pm | स्मिता.
या असल्या पाकृ आणि त्यांचे फोटो बघून निव्वळ जळजळ होते.
दही भल्ले प्रचंड टेम्टिंग दिसत आहेत.
23 Apr 2012 - 1:31 pm | गणपा
लकवरच करुन चाखणेत येईल.
23 Apr 2012 - 2:35 pm | खादाड
खूप वेळा गाडी वर लिहिलेले वाचले होते !! गाडीवाल्याजवळ तो प्रकार नव्हताच !!आणि तो सांगुही शकला नाही ते काय असतं! आज तुमच्यामुळे कळलं !!
धन्यवाद !! वेळ मिळताच पुढचा प्रयोग हाच !! :)
23 Apr 2012 - 2:55 pm | नेहरिन
:D
23 Apr 2012 - 3:47 pm | विशाखा राऊत
एकदम मस्तच
23 Apr 2012 - 3:58 pm | निश
नेहरीन जी, अतिशय जबरदस्त रेसिपी.....
मस्त लवकरच करुन बघण्यात येइल.
23 Apr 2012 - 4:23 pm | यकु
हा वेगळाच प्रकार दिसतोय.
आमच्या औरंगाबादला गोमटेश मार्केटमधला 'मथुरावासी' (येथे कांदा-लसूण घातलेले कोणतेही पदार्थ मिळणार नाहीत!) कचोरीपेक्षा थोडा मोठा एकच भल्ला देऊन गार करतो!
23 Apr 2012 - 4:47 pm | चिंतामणी
हे निमंत्रण आहे की दम भरत आहेस???
बादवे औरंगाबाद तुझे कधी झाले? इंदुरला सोडचिठ्ठी दिली?????????
23 Apr 2012 - 4:51 pm | यकु
नाय, नाय.. दम नाय.. हे भल्ले पाहून औरंगाबादच्या अगडबंब आणि गरमागरम भल्ल्यांची आठवण झाल्याने अंमळ हळवा झालो.
इंदुरला सोडचिठ्ठी नाही दिली.
आणि औरंगाबाद पहिल्यापासूनच माझे हो :)
23 Apr 2012 - 4:53 pm | चिंतामणी
दम नाय हे ऐकुन हायसे वाटले.
म्हणजे हे निमंत्रण आहे.
कधी येउ?????
23 Apr 2012 - 4:58 pm | यकु
हाहाहा
कधीही या हो काका.. :)
23 Apr 2012 - 5:14 pm | सानिकास्वप्निल
वाह! तोंपासू :)
23 Apr 2012 - 5:26 pm | अमृत
प्रतिक्रीया पूर्ण टंकून प्रकाशित करताना नेट गंडल्याबद्दल :-(
चाकृ(चाटकृती) छानच. येत्या विकांताचा प्रश्न सुटला.
अमृत
23 Apr 2012 - 5:32 pm | इरसाल
कालच संध्याकाळी आलूटिक्की व तत्सम पदार्थांवर व्यवस्थितरित्या ताव मारल्यामुळे त्रास झाला नाही.
23 Apr 2012 - 6:00 pm | स्वाती दिनेश
दहीभल्ले टॉप!!
स्वाती
23 Apr 2012 - 6:13 pm | निवेदिता-ताई
मस्त, मस्त, मस्त.........तो. पा. सु.
23 Apr 2012 - 6:44 pm | पैसा
मस्त पाकृ आणि फोटो!
23 Apr 2012 - 7:26 pm | रेवती
अर्रेच्या! असे असतात काय?
मला दही भल्ले म्हणजे दहीवडेच वाटायचे.
बाकी पाकृ, फोटू वगैरेंबद्दल काय बोलायचे?
भारी.
23 Apr 2012 - 11:06 pm | पिंगू
मार डाला, मार डाला.. दही भल्लों ने मार डाला.
- पिंगू
24 Apr 2012 - 3:42 pm | गेंडा
मिपाकरांचे काय खरे नाही. सानीकास्पनील, गणपा, ........, ............, इत्यादी छान छान खाण्यास उद्युक्त करीत असतातच.
या अजून एक भर झाली.
मिपा संपादक मंडळाला "डायेट" " वेट लॉस" अशी सदरे सुरू करावी लागणार. ;)
25 Apr 2012 - 4:54 pm | जयवी
ओह.......हे दहीभल्ले असे असतात होय.......... मला वाटलं भय्या लोक आपल्या दहीवड्यांना दहीभल्ले म्हणतात ;)
खरंच तोंडाला पाणी सुटलं.
26 Apr 2012 - 11:43 pm | दिपाली पाटिल
मलापण हेच वाटायचं, तो संजीव कपूर ने पण उडीद + मूग डाळीच्या दहीवड्यांना दहीभल्ले म्हणून दाखवलं होतं.
27 Apr 2012 - 12:43 am | चिंतामणी
:o
27 Apr 2012 - 11:13 am | नेहरिन
तो संजीव कपुर पदार्थांची नावे बदलत असतो . पहिल्यांदा जेव्हा मी त्याची पाल़क पनीर च्याकोफत्यांची रेसिपि पाहिली तेव्हा त्याचे नाव सांज सवेरा असे होते . तिच रेसिपि पुन्हा दाखवलि तेव्हा त्याचे नाव पालक पनीर कोफ्ते असे होते आता अजुन एक तिसरेच नाव त्याने ठेवले आहे .
दहिभल्ले म्हणुन तु सांगितलेलि रेसिपि त्याचिच, मी वर दिलेलि रेसिपिआणि मी खाल्लेले चाट यालाहि दही भल्लेच म्हणतात . आणि अशिच रेसिपि त्याने झी टि वी वर दाखवलि होति त्याचे नाव हि दहिभल्लेच. सगळ्याची कॄती थोडि वेगळि नाव सारखिच . तुला अजुन एक उदाहरण सांगते
खस्ता कचोरि" त्याची रेसिपि http://www.sanjeevkapoor.com/khasta-kachori-marwari-cooking.aspxइथे बघ. आणि कालच एक त्याचि खस्ता कचोरी चाट म्हणुन रेसिपि बघितलि .त्यात खस्ता कचोरी म्हणुन नुसतिच कडक पुरी दाखवलि आणि ती फोडुन त्यात मोड आलेले मुग उकडलेल्या बटाट्यच्या फोडि त्यावर हिरवी चटणी , चिंचेची चटणी, दही शेव कोथिंबीर . झाल .आता खस्ता कचोरी म्हट्ल्यावर खस्ता कचोरिच दाखवलि पाहिजे ना??का साधि पुरी दाखवायची आणि त्याला खस्ता कचोरी म्हणायच??? शेवटि त्या त्या ठिकाणी लोकं त्या पदार्थाला जे नाव देतिल तेच आपण द्याव अस मला वाटत.
27 Apr 2012 - 10:50 am | इरसाल
तुम्ही दिलेले दही-भल्ले-चाट आहे.
दही-भल्ल्यात पाणीपुरी कुठुन आली बरं?
दुसर्या फोटोच्या वरपर्यंत कृती ठीक नंतर चाट सुरु होतेय.
27 Apr 2012 - 12:14 pm | नेहरिन
प्र.का.टा.आ.
27 Apr 2012 - 12:15 pm | नेहरिन
प्र.का.टा.आ.
27 Apr 2012 - 11:22 am | नेहरिन
गफलत वगैरे काहि झालेली नाहि . जस बनवताना बघितलं, खाल्लं त्याचीच कॄती दिली आहे.
मी लिहिलेले सुरुवाती पासुनचे नीट वाचा . "दहिभल्ले" म्हणजे दहिवडे नाहित हा एक चाट प्रकार आहे .
तुम्हि नावा प्रमाणेच आहात ...."इरसाल".
27 Apr 2012 - 12:15 pm | नेहरिन
प्र.का.टा.आ.
27 Apr 2012 - 12:16 pm | नेहरिन
प्र.का.टा.आ.
27 Apr 2012 - 12:17 pm | नेहरिन
प्र.का.टा.आ.
27 Apr 2012 - 11:43 am | इरसाल
गरजेचे आहे काय.
इरसाल असलो तरी १ दा सांगितले की समजते हो. तुम्ही पण ना !!!!!!!!!!
बरं ते राहु द्या पाणीपुरी काब्र टाकली त्याच्यात.
हे बघा बरं .....
http://www.indianfoodforever.com/holiday-recipes/holi/dahi-bhalle.html
http://festivals.iloveindia.com/holi/dahi-bhalle.html
http://www.khanapakana.com/recipe/2f78eea1-c648-4e4a-9f58-9426324e5690/d...
http://punjabirecipes.gurudwara.net/recipedetail.aspx?id=49
(पक्का दिल्लीकर ) इरसाल
27 Apr 2012 - 12:06 pm | नेहरिन
४ वेळा सांगितलेले कळत असते ते पुन्हा पुन्हा तेच विचारले नसतेत.
27 Apr 2012 - 12:11 pm | इरसाल
लिंक नाही पाहिल्या वाट्टं ?
27 Apr 2012 - 12:40 pm | परिकथेतील राजकुमार
कोर्टच भरवले तुम्ही जणू. ;) पुरावे काय आन काय काय...
अहो बामणाकडचे दही भल्ले असेच असतात. कधी कळायचे तुम्हाला ?
27 Apr 2012 - 12:47 pm | इरसाल
परासाहेब आणी नेहरिन म्याडम चुकी झाल्यासारखं वाट्टयं
27 Apr 2012 - 11:45 am | प्रीत-मोहर
ओ मावशी, मी शनवार रैवार मोकळीच असते व माझे कसलेही उपवास नसतात!!!!
27 Apr 2012 - 11:48 am | इरसाल
नेम चुकला काय ?
27 Apr 2012 - 11:54 am | प्रीत-मोहर
नै हो. अज्जीबात नै
27 Apr 2012 - 11:59 am | नेहरिन
तुमचा नेम चुकला ना ...... अगदि बरोबर बोललात .
30 Oct 2012 - 3:40 pm | प्रियाकूल
बऱ्याच पाकृ दिसतच नाहीत मला.असे का होतेय??शिवाय कमेंट्सही दिसत नाहीत.
30 Oct 2012 - 4:15 pm | गवि
ही पाकृ दिसेलशी केली आहे.