सावधान ! मसाला आला आहे

आशु जोग's picture
आशु जोग in काथ्याकूट
21 Apr 2012 - 11:37 am
गाभा: 

वळू, विहीर, देऊळ अशा अति उत्कृष्ट कलाकृतींनंतर

गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी आपल्यासाठी घेऊन आले आहेत
चित्रपट 'मसाला'.

वळू, विहीर, देऊळ या चित्रपटांनी मराठी रसिकांना मनमुराद आनंद दिला आहे.

विशेषतः गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी , अमृता सुभाष या टीमचे कौतुक
यासाठी की त्यांनी मराठीमधे उत्तम अशा ग्रामीण चित्राची मालिका पुन्हा सुरू केली.

त्यांची अचाट गुणवत्ता पाहूनच कधी अमिताभ बच्चन कधी सुभाष घई
असे लोक उमेश गिरीशच्या मागे उभे राहीले.

असो

जाता जाता सांगतो याचा दिग्दर्शक आहे संदेश कुलकर्णी.

'सखाराम बाइंडर' चे दिग्दर्शन
'माकडाच्या हाती शांपेन' मधील अप्रतिम रोल संदेशच्या नावावर आहे .

त्यामुळे संदेश कुलकर्णीचे दिग्दर्शन ही 'मसाला'ची एक सर्वात मोठीच जमेची बाजू असणार आहे.

तर करुया चर्चा मसाल्याची......

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

21 Apr 2012 - 11:42 am | परिकथेतील राजकुमार

जुन्याकाळी म्हणे चित्रपटाच्या जाहिरातीची पँप्लेट वाटायला पोरं यायची झांजे वैग्रे वाजवत. त्याची आठवण झाली.

बाकी ह्या माहितीपूर्ण आणि अप्रतिम धाग्याबद्दल आपणास एक छोटीशी भेट :-

आशु जोग's picture

21 Apr 2012 - 11:43 am | आशु जोग

चला सुरुवात तर छान झाली

परिकथेतील राजकुमार's picture

21 Apr 2012 - 11:47 am | परिकथेतील राजकुमार

आता फक्त कुणी प्रतिसादखेचर फेकून मारले नाही म्हणजे झाले.

स्पा's picture

21 Apr 2012 - 11:55 am | स्पा

जोग साहेब.. मनापासून धन्यवाद सदर चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल
हल्ली इथे मराठी चित्रपटांची माहिती समजत नाही , ती समजली म्हणून परत एकदा धन्यवाद
असेच उत्तमोत्तम लिखाण करत राहा

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Apr 2012 - 4:07 pm | बिपिन कार्यकर्ते

आमचेही!

अवांतरः च्यायला! मला वाटलं मसालाचं परीक्षण वैग्रे असेल!

स्पा's picture

21 Apr 2012 - 4:10 pm | स्पा

अवांतरः च्यायला! मला वाटलं मसालाचं परीक्षण वैग्रे असेल!

छ्या तुमच्या ब्वा कै च्या कै अपेक्षा

अगदी आश्चर्यकारकरीत्या हा चित्रपट काल बघण्याची संधी मिळाली. चित्रपट ठीकठाक आहे. पण गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, हृषीकेश जोशी यांनी आपापल्या वाट्याला आलेल्या भुमिका खणखणीतपणे सादर केल्या आहेत. मसाल्याचे कथा-पटकथा-संवाद लेखक कोण आहे ह्याचा मुद्दाम शोध घेण्याची गरज भासतच नाही, तो 'गिरीश कुलकर्णीच' ही बाब चित्रपट पाहतानाच सतत जाणवत राहते. चित्रपटात काही लूज एन्डस् नक्कीच आहेत. तसेच, चित्रपट पाहताना देऊळशी सतत तुलना होत राहते. पण उमेश-गिरीशसाठी ही गोष्ट कानाआड करून चित्रपट एकदा तरी पाहण्यास हरकत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2012 - 6:13 pm | अत्रुप्त आत्मा

@मसाल्याचे कथा-पटकथा-संवाद लेखक कोण आहे ह्याचा मुद्दाम शोध घेण्याची गरज भासतच नाही, तो 'गिरीश कुलकर्णीच' ही बाब चित्रपट पाहतानाच सतत जाणवत राहते.>>> +१०१

@ही गोष्ट कानाआड करून चित्रपट एकदा तरी पाहण्यास हरकत नाही.>>> http://www.misalpav.com/node/21459

विकास's picture

21 Apr 2012 - 6:24 pm | विकास

चर्चेचा विस्तार केल्यास रंगत वाढेल, नाहीतर...

गोंधळी's picture

22 Apr 2012 - 12:16 pm | गोंधळी

वळू, विहीर, देऊळ अशा अति उत्कृष्ट कलाकृतींनंत???????????????????????

असहमत.

तिमा's picture

22 Apr 2012 - 5:30 pm | तिमा

'अशा बर्‍या कलाकृतींनंतर', हे वास्तववादी वाटताय का ?

सर्वसाक्षी's picture

22 Apr 2012 - 10:03 pm | सर्वसाक्षी

कर्नाटकात मराठी आणि मराठी माणसाला संपवायची मोहिम असताना या चित्रपटात कानडी शब्द असलेले गीत आहे आणि चित्रपटवाले मोठ्या कौतुकाने त्याचा प्रचार करत आहेत याचे वाइट वाटले.

कलेला बंधन नसते वगैरे वाक्ये टाळ्या घ्यायला ठिक आहेत पण कर्नाटकातल्या महाराष्ट्र आणि मराठी विरोधी धोरणाचा स्थानिकांनी निषेध करुन 'असु द्या की मराठी शाळा, असु द्या की बेळगावातल्या दुकानांवर मराठी पाट्या' असे म्हटल्याचे ऐकीवात नाही. कानडीच्या पाठीराख्यांनी मराठीचा द्वेष केला म्हणून आपण कानडीचा द्वेष करावा असे नाही, पण निदान कौतुक तरी करु नये.

आशु जोग's picture

23 Apr 2012 - 8:54 pm | आशु जोग

हा मुद्दा बरोबरच आहे

निदान कौतुक तरी करु नये.>> का ही ही.
रेवण-सारीका सोलापुरात असतानाचा काळ त्या गाण्यामधून दाखवलेला आहे. कानडीमिश्रीत मराठी भाषा दाखवली नसती तरच नवल!
हिंदी चित्रपटात मुंबई-पुण्यातील प्रसंग असेल आणि पात्रांच्या तोंडी मराठी भाषा दाखवली असेल तर लगेच 'वा वा' होते, मग मराठी चित्रपटात कानडी भाषा दाखवली तर लगेच प्रांतीय वाद उकरून का काढायचा?

चैतन्य दीक्षित's picture

24 Apr 2012 - 8:11 am | चैतन्य दीक्षित

डोक्यात जाते..
त्यामुळे हा चित्रपट बाकी कितीही भारी वगैरे असला आणि गिरीश कुलकर्णीचं काम आवडत असलं तरी केवळ ती अमृता सुभाष आहे म्हणून पाहण्याची शक्यता खूप कमी.