दुधपोहे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in पाककृती
21 Apr 2012 - 1:30 am

आंतरजालावर "दुधपोहे" (किंवा "दुध पोहे" ) असे शोधले असल्यास काहीच मिळाले नसल्याने ही पाककृती देत आहे.

तसे "दही पोहे" बनवतात पण त्यासाठी लागणारे जिन्नस जसे- दही, मसाला, कोथंबीर आदी बॅचलर असलेल्यांकडे उपलब्ध असेलच असे नाही.

झटपट नाश्टा बनवण्यासाठी व भुक भागविण्यासाठी दुधपोहे उत्त्तम पर्याय आहे.
(लहाणपणी 'मला काहीतरी खायला दे' असली माझी भुणभुण ऐकून माझी आई मला 'दुधपोहे' झटकन बनवून देत असे हे लख्ख आठवतेय! असो.)

जेव्हा तुम्ही घरी एकटे असतात व नाश्टा बनविण्याचा कंटाळा येतो तेव्हा दुधपोहे करणे फारच सोपे असते.

पाककृती:
१) मोठ्या आकाराच्या वाटीत कप-दिड कप दुध घ्या.

२) मुठभर पातळ पोहे घ्या.

३) चवीनुसार साखर घालून चमच्याने ढवळा. पोहे पातळ असल्याने लगेच एकजीव होतात.

दुधपोहे खाण्यासाठी तयार आहेत.
(फोटो आंतरजालावरून साभार)
पुर्वप्रकाशीत

प्रतिक्रिया

सुनील's picture

21 Apr 2012 - 1:53 am | सुनील

झटपट नाश्टा बनवण्यासाठी व भुक भागविण्यासाठी दुधपोहे उत्त्तम पर्याय आहे.

कॉर्नफ्लेक्सचा कंटाळा आला तर त्यावर हा राइसफ्लेक्सचा पर्याय चांगला आहे!

मात्र पातळ पोह्याऐवजी जाड पोह्याचे (आधी थोडा वेळ भिजवून घ्यावेत) दुघ-पोहे चांगले होतात असा स्वानुभव आहे.

पाककृतीत काही शब्द राहून गेले आहेत. दुधपोहे करण्याच्या अद्ययावत पायर्‍या याप्रमाणे:
१) मोठ्या आकाराच्या वाटीत कप-दिड कप दुध घ्या.
२) मुठभर पातळ पोहे त्यात टाका.
३) वरील दुधपोह्यांत चवीनुसार साखर घालून चमच्याने ढवळा. पोहे पातळ असल्याने लगेच एकजीव होतात.
दुधपोहे खाण्यासाठी तयार आहेत.

सुनील's picture

21 Apr 2012 - 2:26 am | सुनील

दीड कप पोहे आणि मूठभर दुध, असा बदल केल्यास कसे लागेल?

पाषाणभेद's picture

21 Apr 2012 - 2:31 am | पाषाणभेद

झोपेचा अंमल दुसरं काय!

लेख टाकल्यानंतर काही काळतरी स्वसंपादनाबाबत काहीतरी करता येईल काय? माझ्यामते vBulletin मध्ये तशी सुविधा आहे.

त्याचप्रमाणे मिपाचा ईडीटर गंडला आहे काय? मी ज्या हायपरलिंक व फोटो लि़ंक टाकत होतो त्या Line 1 मध्ये जात होत्या.

पैसा's picture

21 Apr 2012 - 8:28 am | पैसा

अख्खी पाकृ च राहिली होती की हो! असो. यात पातळ पोह्यांऐवजी "धुतलेले जाड तांबडे पोहे" आणि साखरेऐवजी गूळ असा बदल केला तर फरच छान लागतात असा स्वानुभव आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Apr 2012 - 3:11 pm | परिकथेतील राजकुमार

फटूतले पोहे तर जाड पोहेच दिसत आहेत.

पातळ पोहे असे दिसतात. :-

निवेदिता-ताई's picture

21 Apr 2012 - 10:51 pm | निवेदिता-ताई

हो जाड पोहेच वापरावेत..चव चांगली लागते,
आणी साखरे पेक्षा गुळ घालून पण खावू शकता...एकदम चव झकास

दूधपोहे हे खरंतर सोप्प आणि डाएटींगवाल्यांचं खाणं म्हणून मान्यता पावायला हवं.
मी साखरेऐवजी गूळ वापरते एवढाच काय तो बदल.
बाकी दही पोह्यांचीही आठवण करून दिलीच आहेत तर लगेच करते.
तळणीची मिरची किंवा हि. मिरची, कोथिंबीर घालून.;)
मिपाचे स्वयंपाकघर बर्‍याच पाकृंनी समृद्ध आहे.
बॅचलरांनी (किंवा थोडेफार बॅचलर असणार्‍यांनी, उदा. कुंदनभाऊजी ;) ) आता दही, मिरची, कोथिंबीरीसारख्या वस्तू फ्रिजात ठेवावयास हरकत नाही असे सुचवते. ;)

सोप्प आणि डाएटींगवाल्यांचं आणि आळशांचे खाणं म्हणून मान्यता पावायला हवं.

चांगले पदार्थ खायचे म्हणजे ते करण्यासाठी थोडी तरी मेहनत करणे भाग आहे असे आमचे मत आहे.
दुध पोह्यांपेक्षा मला नेहमीचे कांदा-पोहे जास्त आवडतात.

रेवती's picture

22 Apr 2012 - 12:44 am | रेवती

काय गं बाई! यांचं आपलं वेगळच...

जाड पोहेच वापरावेत.
आणि गूळ छान लागतो यात.
असेच साध्या ज्वारीच्या लाह्या सुद्धा.. दूध-गूळ आणि लाह्या... असा फर्मास बेत असतो आमच्याकडे. :)

शिल्पा ब's picture

21 Apr 2012 - 5:31 am | शिल्पा ब

मस्त. एकदम लहानपणीची आठवण झाली. उद्या सकाळी लेकीला देउन बघते.

होय रेवती आजै म्हणते तसं दुध गुळ पोहे हे एक आदर्श डायट आहे,

सूड's picture

21 Apr 2012 - 2:51 pm | सूड

ही अशी अनवट रेसिपी दिल्याबद्दल अभिनंदन !! झकासच !! कौतुक करावं तितकं कमी.

अजितजी's picture

21 Apr 2012 - 4:24 pm | अजितजी

जाडे पोहे मायक्रोवेव मध्ये तीन चार मिनिटे हाय वर भाजायचे आणि नंतर मिक्सर मध्ये बारीक दळायचे . ते पोहे दुध गुळ घालून खायला जास्त खमंग लागतात ---अजित जी

जयंत कुलकर्णी's picture

21 Apr 2012 - 10:11 pm | जयंत कुलकर्णी

कृपया हा पदार्थ अंडे वापरून कसा करावा हे सांगता येईल का ?
:-)

कोणत्या पक्ष्याचं अंडं वापरणार ते सांगितलं तर त्यांना उत्तर देणं सोपं जाईल बहुधा.

बंडा मामा's picture

25 Apr 2012 - 6:56 am | बंडा मामा

डायनोसोरचे अंडे

पाषाणभेद's picture

22 Apr 2012 - 12:11 am | पाषाणभेद

अहो मायबापहो! ही रेसेपी कमीतकमी वस्तू/ जिन्नस वापरून करण्यासाठीची सोपी पाककृतीच ठेवा. उगाच मालमसाला वापरून का उगा या रेसेपीला पंचतारांकीत करताय?

जास्त पदार्थ वापरलेतर "पोह्यांची ओली गोड भेळ" होईल ती. त्यासाठी वेगळा धागा काढा.

छायाचित्रे आंतरजालावरून उचललेली असल्याने त्यात निवड करणे अवघड होते. आणि तसेही पोहे जाड असो पातळ असो पोटात भुक लागल्यानंतर कसली आलीय निवड!

झटपट नाष्टा उपलब्ध असणे ही काही वेळा शरीराची गरज असते. आपली जीभही त्यास परवानगी देते व आहे त्यात साजरे करणे महत्वाचे ठरते. त्यावेळी केवळ कमीतकमी जिन्नस घेवून पोटपुजा करणे योग्य असते. तसे पात्र सजवायचे झाल्यास काहीही पदार्थ टाकून, भर घालून सजवू शकतो यात वाद नाही.

प्रभाकर पेठकर's picture

23 Apr 2012 - 1:49 am | प्रभाकर पेठकर

दूधात भिजवलेले जाड पोहे घ्यायचे. त्यावर गरम गरम दूध ओतायचं आणि आईचं लक्ष नाहीसं पाहून चांगली जाड साय ओढून घ्यायची पोह्यांवर. आईने बघितलंच तर 'च् च् च्.....चुकुन पडली' असं चेहरा पाडून म्हणायचं. अहाहा..! रम्य ते बालपण.

निश's picture

23 Apr 2012 - 4:10 pm | निश

पेठकर सर, एकदम सहमत.

खुप सारी जाड साय+गरम दुध + साखर /गुळ +जाड पोहे.

अप्रतिम चव. मी तर कधी कधी साखरे ऐवजी मध पण घालतो एकदम अप्रतिम चव लागते.

मला तर हा प्रकार नविनच आहे , मी कधीही असे पोहे खाल्लेल्ले नाहीत आजपर्यंत !
एकदा ट्राय मारायला हवे आता :)

प्रभाकर पेठकर's picture

23 Apr 2012 - 2:29 pm | प्रभाकर पेठकर

किती दुर्दैवी जीव आहे हा.....!

खरोखरच ओ काका, आणि तुम्ही वर केलेलं साय घेण्याचं वर्णन वाचुन पुन्हा भुक लागली आहे.

पियुशा's picture

23 Apr 2012 - 4:20 pm | पियुशा

कोण मी का ? पेठ़कर काका ?
पण आता पाक्रु पाहीलिये ना ,
मग मी देखील जाड जाड पोह्यावर गरम दुध घालुन वर जाड साय अन गुळ घालुन असा आडवा हात मारते अन तुमच्या सुदैवी क्याटेगरीत येते :) कसे ;)

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2012 - 2:08 am | प्रभाकर पेठकर

हा:..हा:...हा:... राग मानू नकोस पियुशा.

पण जाड पोहे, दूध, साखर आणि वर जाड जाड साय....काय वर्णावे ते सुख. पोह्यावर दूध आणि आवडीनुसार साखर असेल तर साय जेवढी जाड तेवढे सुख अधिक. असो.

चला आता इथे पोहे, दूध आणि साखर कुठे मिळते ते शोधणे आले ;-)

हो यक्कू.

इथेही जवळ मिळत नाही. इथेही प्रॉब्लेमच आहे. पण जी-बी फ्रीवेवरुन सेव्हन्थ एक्झिट घेतल्यावर एक इंडियन ग्रोसरी स्टोअर आहे, तिथे पोहे, गूळ साखर वगैरे मिळेल असं वाटतं.

या वीकेंडला ग्रोसरीच्या वेळी नक्की आणेन.

पण जी-बी फ्रीवेवरुन सेव्हन्थ एक्झिट घेतल्यावर एक इंडियन ग्रोसरी स्टोअर आहे, तिथे पोहे, गूळ साखर वगैरे मिळेल असं वाटतं.

गवि, नक्की पहा आणि मिळाली तर माझ्यासाठीही आठवणीने आणा ;-)
इकडे एकही इंडीयन दुकान नाही.

गवि's picture

23 Apr 2012 - 2:36 pm | गवि

वा वा.

बादवे,

हे पाहून ब्याचलरीतले, विशेषतः बिनमेसच्या हॉस्टेललाईफातले बनकेळे, बिस्कीटखीर, पापड सँडविच वगैरे पदार्थ आठवून अं. ह. झा.

सुधीर's picture

24 Apr 2012 - 10:40 pm | सुधीर

"धुतलेले जाड तांबडे पोहेच" छान वाटतात. पण आजकाल बाजारात सगळीकडे पांढरे पोहेच असतात. पूर्वी तांबडे पोहे कोकणात गावी लावलेल्या तांबड्या भातापासून घरीच बनवले जायचे. पण आजकाल गावी सुद्धा "तांबडे तांदुळ" हद्दपार झालेत आणि त्याबरोबर तांबडे पोहे (अन तांबड्या तांदळाची पेज).

धन्यवाद रे सच्या !!

अरे बाबा , ते मुक्तीधाम च्या शेजारच्या मिसळीच्या ठिकाणाविषयी लिहीणार होतास , त्याचे काय लोणचे घातलेस का ? ;)

बंडा मामा's picture

25 Apr 2012 - 6:59 am | बंडा मामा

ह्यावर एक खमंग पेढा चुरुन घालावा..आहाहा

मि एन आर आइ's picture

27 Apr 2012 - 8:15 pm | मि एन आर आइ

अमेरिकेत दुधाला जाड साय येत नाहि :(
आत्ता काय करु?