कोकोनट मार्बल केक

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
20 Apr 2012 - 5:26 am

.

साहित्यः

१-३/४ वाटी मैदा
१ वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस (डेसीकेटेड कोकोनट)
१ वाटी साखर
१/२ वाटी बटर (फ्रिजमधून १/२ तास आधी बाहेर काढून ठेवणे)
२ अंडी (फ्रिजमधून १/२ तास आधी बाहेर काढून ठेवणे)
१-१/२ वाटी दूध
२ टीस्पून बेकिंग पावडर
१/२ टीस्पून खायचा / बेकिंग सोडा
१ टीस्पून व्हॅनिला एसेन्स
२-३ थेंब खायचा गुलाबी रंग
२-३ टेस्पून कोको पावडर

.

पाकृ:

प्रथम मैदा, बेकिंग पावडर व खायचा / बेकिंग सोडा एकत्र ३ वेळा चाळून घ्या.

.

दूसर्‍या भांड्यात दूध व खोबर्‍याचा कीस एकत्र करुन भिजवून ठेवावे.

.

एका मिक्सिंग बाऊल मध्ये (भांड्यात) बटर व साखर फेटून घेणे.

.

आता त्यात एकावेळी एक अंडे घालून मिश्रण चांगले फेटून घेणे.

.

आता त्यात एकदा दूध , एकदा मैद्याचे मिश्रण थोडे -थोडे घालून फेटणे. व्हॅनिला एसेन्स घालून फेटणे.

.

तयार मिश्रणाचे ३ भाग करावे. एक भाग तसाच राहु द्यावा. दुसर्‍या भागात खायचा गुलाबी रंग घालून एकत्र करणे. तीसर्‍या भागात कोको पावडर चाळून घालणे. (मार्बल केक करायचा नसल्यास तयार मिश्रण थेट ओव्हनला बेक करण्यासाठी ठेवावे.)

.

तूपाचा हात फिरवलेल्या केकटीन मध्ये आधी पांढरे मिश्रण ओता, त्यावर चमच्याने गुलाबी रंगाचे मिश्रण घाला. मग कोको पावडरमिश्रीत मिश्रण घाला.

.

त्यानंतर सुरी मिश्रणावर फिरवा. (मी फोटो काढायला विसरले :( ) तयार केकटीन प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये १८० डिग्रीवर ३०-३५ मिनिटे भाजायला (बेक) करायला ठेवा.
केक तयार झाला की कुलिंग रॅकवर काढून ठेवावा.

.

.

केक पूर्ण थंड झाला की वरचा खडबडीत भाग सुरीच्या मदतीने कापून काढा व केकेचे स्लाईस करा व त्यावर थोडे डेसीकेटेड कोकोनट भुरभुरा.

कोकोनट मार्बल केक तयार आहे :)

.

प्रतिक्रिया

सकाळी सकाळी पाककृती वाचून खपलो.. आता इथे मार्बल केक कुठून आणायचा?

- (विचारमग्न) पिंगू

माझं घर ४ डि थिएटर असल्याचा भास होतोय मला, वर पिंगु म्हणतोय तसं आता इथं कुठुन आणणार मार्बल केक .

प्रचेतस's picture

20 Apr 2012 - 9:37 am | प्रचेतस

झक्कास.

रुमानी's picture

20 Apr 2012 - 9:54 am | रुमानी

फक्कड !

पियुशा's picture

20 Apr 2012 - 10:39 am | पियुशा

वॉव!!!!! मस्त
४ दिवसांपासुन नविन पाक्रु. ची वाट पाहत होते मी :)
चला पाक्रु विभागाचा उपवास संपला तुझ्या केकच्या निमित्ताने ;)
ही घे चॉकलेट्स तुला माझ्यातर्फे ;)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Apr 2012 - 11:18 am | अत्रुप्त आत्मा

शेवटच्या फोटुमधे उडी मारायची सोय हवी होती...

परिकथेतील राजकुमार's picture

20 Apr 2012 - 11:21 am | परिकथेतील राजकुमार

आणि वास देखील छान सुटला आहे.

सकाळी सकाळी हे असले काही बघितले की फार त्रास होतो जीवाला.

बाकी ते चिझ चिली टोस्ट चे काय झाले ग तै ?

कवितानागेश's picture

20 Apr 2012 - 2:22 pm | कवितानागेश

च्यायला!
आणि वास देखील छान सुटला आहे>>
कुठल्या कोषातून घेतला हो वास तुम्ही, परावर्तक गुरुजी?

सुहास झेले's picture

20 Apr 2012 - 11:23 am | सुहास झेले

लैच भारी.... !!

प्यारे१'s picture

20 Apr 2012 - 11:29 am | प्यारे१

त्रास त्रास त्रास....!

अवांतरः ही पाकृ अंडं..... इ.इ. ?

अत्रुप्त आत्मा's picture

20 Apr 2012 - 11:34 am | अत्रुप्त आत्मा

@अवांतरः ही पाकृ अंडं..... इ.इ. ? >>> खा कि मेल्या कधितरी... ते विंजेक्शनचं अंड पिल्लु जन्माला न घालणारं,म्हणजे मानवता वादी क्याट्यागरीत फुटतं कि नै... ;-)
ते बघ कसं... व्हेजही नाही आणी नॉनव्हेजही नाही... शादि का लड्डु सारखं...हाण कि कधितरी ;-)

मी कस्तुरी's picture

20 Apr 2012 - 11:39 am | मी कस्तुरी

वाह!!! सही आहे :)

उदय के'सागर's picture

20 Apr 2012 - 11:44 am | उदय के'सागर

सनिका ताई तु 'अमेझींग' आहे... झकास पाकृ!!!

तुझ्या पा़कृ मधे नेहमीच किती निट-नेटकेपणा आणि स्वच्छता असते... बाकि सादरीकरण आणि फोटोग्राफि बद्दल वेगळं सांगायला नकोच :)

धनुअमिता's picture

20 Apr 2012 - 12:18 pm | धनुअमिता

मस्तच.

खुपच सुंदर.

आता आणखी विशेषणांची शोधाशोध करवी लागणार.

ही पाकृ अंड न घालता कशी करावी.

केककृती आवड्ल्या गेली आहे. :)

sneharani's picture

20 Apr 2012 - 1:22 pm | sneharani

सुंदर दिसतोय केक. पटकन खावासा वाटतोय.
:)

मदनबाण's picture

20 Apr 2012 - 1:31 pm | मदनबाण

आहाहा... आहाहा... आहाहा !
(देवकी पंडीत मोड ऑन)
पण...
जरा...
ताई माई अक्का विचार करा पक्का अड्यांला मारा धक्का अन् फक्तस्त बिनअड्यांच्या केकवर मारा शिक्का ! ;)

आता आज्जेचा सल्ल्या प्रमाणे विचारतो...
मिपा नियमाप्रमाणे 'ही पाकृ अंडे न घालता करता येईल काय?' असे विचारातो. ;)
(काय आज्जे वाचतेयस ना ! ;) )

तो इंटुकला पिंटुकला चमचा लयं आवडला बघा ! :)

(केक प्रेमी) ;)

रेवती's picture

20 Apr 2012 - 7:25 pm | रेवती

वाचले हो, तरीही तुझ्या धाग्यांना मी प्रतिसाद देणार नाही. बघच आता तू!.;)
तुझ्या प्रतिसादांना आत्ता दिलाय तसा उपप्रतिसादही देणार नाही.;)

मदनबाण's picture

20 Apr 2012 - 10:14 pm | मदनबाण

काय गो रागावलीस की काय ! ;)

स्मिता.'s picture

20 Apr 2012 - 1:36 pm | स्मिता.

केक छान, सुंदर, इ.इ. नेहमीच्या प्रतिक्रिया आहेतच, पण सोबत एक प्रश्न आहे.

आता त्यात एकावेळी एक अंडे घालून मिश्रण चांगले फेटून घेणे.

याला काही खास कारण आहे का? की फक्त दोन अंडी एकत्र घातल्याने एकदम सरबरीत होवून फेटायला जरा त्रास होईल म्हणून ही टिप?

सानिकास्वप्निल's picture

20 Apr 2012 - 8:48 pm | सानिकास्वप्निल

एकावेळी एक अंडे घालून फेटले तर केक अधिक हलका होतो व चांगला फुलतो :)
बटर-साखर एकत्र फेटल्यामुळे त्यात हवा निर्माण झालेली असते ती रीटेन (मराठे?) करण्यासाठी एकावेळी एक अंडे घालून फेटावे इतकचं :)

पीजे: अरे माझं नाव कोणी घेतलं म्हणून बघायला आलो... पण तुम्हाला 'मराठी' असं म्हणायचं होतं म्हणून रिटेन आय मीन रिटर्न जातो!
बाय द वे - रिटेन = साठवून/धरून ठेवणे ?

सानिकास्वप्निल's picture

20 Apr 2012 - 9:43 pm | सानिकास्वप्निल

हो हो मला "मराठी" असेच म्हणायचे होते :)
धन्यवाद :)

वाचनखुणेत साठवला आहे. नक्की करून बघणार

ज्योति प्रकाश's picture

20 Apr 2012 - 3:30 pm | ज्योति प्रकाश

फोटो व पाककृती अप्रतिम.लवकरच करुन बघण्यात येईल.

रेवती's picture

20 Apr 2012 - 7:23 pm | रेवती

केकृ आवडली. मी केला तर बिनरंगी करीन असे वाटते.
यावेळी हिरवा मिक्सिंग बोल आवडला.

सानिका...... अगदी केकच्या तयारीपासून सगळं जाम आवडलं. किती निगुतीने करतेस गं सगळं !!
गुणाचीये हो आमची सानिका :)

साबु's picture

25 Apr 2012 - 4:53 pm | साबु

ही बाइ अशक्य आहे...आणि हीचे मिस्टर आणि मुले भाग्यवान...
दन्डवत स्वीकारा....

सानिकास्वप्निल's picture

25 Apr 2012 - 8:00 pm | सानिकास्वप्निल

साबुभौ मिस्टारंपर्यंत ठिक आहे तुम्ही तर पार पुढचा विचार केलात :P
धन्यवाद :)

रुस्तम's picture

6 Feb 2013 - 6:46 pm | रुस्तम

फोटू दिसत नाहीत ...