साहित्य - चार-पाच कोवळ्या शेवगा शेंगा, एक चमचा तेल, फोडणी साहित्य, एक चमचा शेंगदाणे कूट,
मिठ चवीनुसार, गोडामसाला एक छोटा चमचा, अर्धा चमचा साखर.
कॄती -- शेंगाचे छोटे छोटे तुकडे करुन घ्या, पाच ते सात मिनिटे उकडत ठेवा,त्यावेळी त्यात मिठ घाला.
चवदार होतात.
शक्यतो लोखंडी कढई किंवा तव्यात फ़ोडणी करा त्यातच गोडा मसाला घाला, आता शेंगातील पाणी काढून टाका, त्या शेंगा फ़ोडणीत टाका, त्यावर मिठ व साखर घालून चांगल्य़ा परतून घ्या, व
आता त्यात शेंगदाणे कूट घालून परत चांगले परतून घ्याजास्त कोरडे वाटल्यास आपण शेंगा उकडत ठेवल्या होत्या त्यातील थोडे पाणी घाला.ते पटकन आटून जाईल.
( मी काय केले आधी भाकरी केल्या व त्याच लोखंडी तव्यात भाजी केली, खमंग होते.)
ह आता गॅसवरचा पसारा पाहू नका ह ...फक्त भाजी पहा....;)
ही घ्या भाजी ---- करा फ़स्त ....
प्रतिक्रिया
11 Apr 2012 - 10:51 pm | निवेदिता-ताई
कॄपया फ़ोटो कुणीतरी अपलोड करावेत --
जो करेल त्याला धन्यवाद.
11 Apr 2012 - 11:42 pm | अन्या दातार
फोटो क्र. १

फोटो क्र. २

फोटो क्र. ३

फोटो क्र. ४

सकाळ पेपरपेक्षा तुमचा टेबलक्लॉथ जास्त चांगला दिसला असता ;)
12 Apr 2012 - 1:42 am | रेवती
छानच गं.
दहा पंधरा वर्षांपूर्वी अशी भाजी खाल्ली होती.
त्या शेंगा कोवळ्या नसाव्यात असा अंदाज आहे.
मला इथे कधीतरी नक्की मिळतील आणि अशी भाजी करू शकेन.
आधी भाकरी केल्या
भाकर्या न म्हटल्याबद्दल भारी वाटले.:)
13 Apr 2012 - 10:37 pm | सखी
भाजी व फोटु पण छानच, आम्ही पण रस्सा भाजी करतो. या विकेंडलाच आता भाकरी भाजी करते.
रेवती इंडियन ग्रोसरमध्ये फ्रोजन शेंगा चांगल्या मिळतात (माझ्या सा.बां.नी सांबार केले त्याचा व शेंगांचा मस्त वास सुटला होता). म्हणजे कोवळ्या शेंगांची सर त्याला येणार नाही (मी एकेकाळी १००-१५० शेंगा झाडावरुन काढलेल्या आहेत :( ) पण अगदीच न मिळण्यापेक्षा आणि इथल्या ताज्या भाज्या असतात त्यातल्या शेंगापेक्षा चांगल्या - कारण त्या तर इतक्या वाळलेल्या असतात की ते लाकुडच वाटते कधी कधी.
24 Apr 2012 - 1:13 am | रेवती
येस्स. आता आणते भारतीय दुकानातून शेंगा.:)
12 Apr 2012 - 3:37 am | गणपा
व्हेज नळ्या. :)
नुसत्या शेंगा कधी खाल्या नाहित. शक्यतो इतर भाजींत, वरण-सांबरमध्ये वा कोलंबी-सुक्या मध्ये घालुनच खाल्यात आजवर.
ही टीप भारी. :)
12 Apr 2012 - 11:44 pm | चिंतामणी
>>>ह आता गॅसवरचा पसारा पाहू नका ह ...फक्त भाजी पहा....
त्याच बरोबर ही सुचना सुद्धा भारी आहे.
घरी शेवग्याचे झाड आहे का????
12 Apr 2012 - 5:53 am | प्राजु
फारच सुंदर लागते ही भाजी.
:)
12 Apr 2012 - 9:28 am | इरसाल
किती भारी लागते म्हणुन सांगु.
माझ्या लेकीची आवडती भाजी आहे.
अवांतर : रश्याची आणी मसाल्याची कधी बनवलीय काय? ती पण जाम भारी.
12 Apr 2012 - 11:50 pm | चिंतामणी
तोंडाला पाणि सुटेल असे बोलू नका.
पाकृ ठेवा इथे.
12 Apr 2012 - 10:10 am | अरुणा
करुन पाहायला पाहिजे .. :) कोवळ्या शेवगा शेंगा म्हणले कि लगेच तोन्डाला पाणी सुटले ....
12 Apr 2012 - 12:50 pm | प्यारे१
>>>कोवळ्या शेवगा शेंगा म्हणले कि लगेच तोन्डाला पाणी सुटले ....
अरुणा हा स्त्री आयडी आहे का?
असल्यास हा प्रतिसाद फाऊल म्हणून धरावा का?
नसल्यास हा प्रतिसाद अम्मळ अश्लील म्हणून आयडीच्या ख व मध्ये मोर्चा काढावा का? ;)
- चवळीच्या नि शेवग्याच्या शेंगा आवडणारा प्यारे :)
12 Apr 2012 - 12:34 pm | पिंगू
शेवग्याच्या शेंगा म्हणजे चव कसली सॉल्लिड असते..
मला तरी नेहमी शेवग्याच्या शेंगांची भाजी खायला मिळते. कारण मावशी नेहमीच गावावरुन पाठवते.
- पिंगू
12 Apr 2012 - 12:41 pm | परिकथेतील राजकुमार
आजकाल मंडईत कोवळ्या भेंड्या, गवारी आणि कोवळ्या शेवग्याच्या शेंगा असे सगळेच मिळणे दुर्मीळ होत चालले आहे.
भेंडीप्रेमी
परा
12 Apr 2012 - 2:49 pm | अत्रुप्त आत्मा
ही शेवग्याची नविन श्टाइल कळ्ळी... :-)
@आजकाल मंडईत कोवळ्या भेंड्या, गवारी आणि कोवळ्या शेवग्याच्या शेंगा असे सगळेच मिळणे दुर्मीळ होत चालले आहे.>>> या मंग कदीतरी आमच्या मार्केटयार्डाच्या किरकोळ बाजारात, थित कवळं/जून सगळच भेट्टं...! ;-)
13 Apr 2012 - 9:26 am | ऋषिकेश
अरे आजकाल त्या मॉलमधे दिसतात म्हणे!
12 Apr 2012 - 5:29 pm | योगप्रभू
धन्यवाद.
माझी आवडती भाजी.
कोवळ्या शेंगांचे अन आपले काय जमत नाय. गर खायला मिळत नाही त्यात.
पण बाजारात शेवग्याची नवी जात मिळते. जाडसर गरयुक्त आणि साल एकदम मऊ.
ही भाजी खाणे म्हणजे सुख. :)
12 Apr 2012 - 8:47 pm | सानिकास्वप्निल
छान दिसत आहे भाजी :)
12 Apr 2012 - 9:00 pm | पैसा
आमटी भाताबरोबर पण चांगली लागेल. मी नेहमी रसभाजी करते किंवा शेंगा आमटी, सांबार कशाततरी घालते. आता अशी करून बघेन.
12 Apr 2012 - 11:22 pm | जागु
छान भाजी. आम्ही अशी चिंच गुळातील रस्सा करतो शेंगांचा.
12 Apr 2012 - 11:47 pm | चिंतामणी
पाकृ टाक लगेच.
13 Apr 2012 - 12:06 am | बिपिन कार्यकर्ते
नुकतंच ऐकलं होतं या भाजी बद्दल. आज लगेच पाकृही मिळाली. कोणी करून घालेल का?
13 Apr 2012 - 12:21 pm | कवितानागेश
हो ऽऽऽऽऽऽऽऽऽ :)
18 Apr 2012 - 1:41 am | हरकाम्या
या शेंगा सगळ्या खायच्या की आतला गर फक्त खायचा. आतला गर खायचा तर या भाजीसाठी केलेली मेहनत फुकट
जायची.
18 Apr 2012 - 3:00 am | पिवळा डांबिस
शेंगांची भाजी छानच दिसतेय हो ताई.
पण ते फोटोंमधी "युवतीच्या...झोपेत असतांना...." काय घटना घडली ते सांगा ना!
उगाच भुंगा घुसून राहिलाय मघापासून डोचक्यात!!!!
:)
24 Apr 2012 - 2:56 pm | यकु
>>>पण ते फोटोंमधी "युवतीच्या...झोपेत असतांना...." काय घटना घडली ते सांगा ना!
उगाच भुंगा घुसून राहिलाय मघापासून डोचक्यात!!!!
----- शमत आहे! माझ्यापण.
=)) =)) =)) =)) =))
=)) =))
=))
18 Apr 2012 - 6:44 pm | प्रियाकूल
ह्या शेन्गाचे वरनही छान होते.
24 Apr 2012 - 2:55 am | पाषाणभेद
शेवग्याच्या शेंगा उकडवून ताकात भिजत घाला अन ते ताकाचे पाणीही फोडणीला वापरा. एक वेगळीच चव येते शेंगांना. गावाकडे आमच्या घराजवळ एक शेवग्याचे झाड होते. तेथले काका न सांगता वानोळा द्यायचे.