पुन्हा बालभारतीच्या शाळेत शिकायचं आहे?

सागर's picture
सागर in काथ्याकूट
29 Feb 2012 - 2:06 pm
गाभा: 

नमस्कार मित्रांनो,

तुम्हाला बालभारतीच्या कविता आठवतात?
खूप नॉस्टेल्जिक व्हायला होते ना?

तुम्हाला परत शाळेत शिकायचे आहे?
अगदी तोच अभ्यासक्रम नसेल पण सध्याचा अभ्यासक्रम वाचूनही तुम्ही शाळेत शिकल्याचा अनुभव घेऊच शकाल.

तर आपल्या आवडत्या बालभारतीने पहिली ते आठवीपर्यंतची सर्व पुस्तके पीडीएफ स्वरुपात आणि तेही सर्व माध्यमांतील (मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, इत्यादी) उपलब्ध करुन दिलेली आहेत. आहे की नाही मज्जा? :)

येथे टिचकवा आणि हवी ती शाळेतील पुस्तके उतरवून घ्या

मी सध्या आठवीचे बालभारती वाचतो आहे ;)

तुम्ही???

बालभारती

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

29 Feb 2012 - 2:14 pm | प्रचेतस

मस्त रे मित्रा.
एकदम सहीच लिंक दिलीस. अगदी शाळेत गेल्यासारखं वाटलं.

विसरभोळा गोकुळ, चिमणराव, प्रेमाचा गुलकंद, निर्झरास अशी काही गद्य, पद्य आठवली.
वाचेन आता सवडीने.
मागे तू चांदोबाची पण लिंक दिली होतीस त्याचे वाचन सुरुच असते मधून मधून.

चांदोबाची लिंक मला सांगाल का ?

अत्रुप्त आत्मा's picture

29 Feb 2012 - 4:42 pm | अत्रुप्त आत्मा

@चांदोबाची लिंक मला सांगाल का ?>>>
ही घ्या - http://www.chandamama.com/

आयला.. काय बरं शैक्षणिक धागा आहे बघू असं म्हणत धागा उघडला तर खजिनाच निघाला..

लव्हली... अनेकानेक धन्यवाद..

सही सही.. सागरा शतशः धन्यवाद. आता खजिना लुटायला मी मोकळा.. ;)

- (पुस्तक पायरेट) पिंगू

सागर's picture

29 Feb 2012 - 2:37 pm | सागर

नक्की हा खजिना लुटा मित्रांनो :)

या पानावर टेक्स्ट बुक लायब्ररी हा पर्याय आहे त्यावर टिचकवा आणि सर्व पीडीएफ फुकट उतरवून घ्या

विवेक मोडक's picture

29 Feb 2012 - 2:49 pm | विवेक मोडक

धन्यवाद मित्रा!!!

उदय के'सागर's picture

29 Feb 2012 - 2:51 pm | उदय के'सागर

खुप खुप खुप खुप धन्यवाद.... माझी मनापासुन इच्छा होती खुप दिवसांपासुन कि हे शालेय पुस्तकं असे जालावर कुठेतरी उपलब्ध असावेत आणि आज हा धागा पाहुन ते स्वप्न पुर्ण झालंय... खुप छान वाटतय ते चित्रं, प्रतिज्ञा, लेखकांची महिती वगैरे वाचुन ... (क्युबिकल मधे न बसता जणु शाळेच्या बेंच वर बसलोय असंच वाटतय)

किती सांगु मी सांगु कुणाला आज आनंदी आनंद झाला :D

मोदक's picture

29 Feb 2012 - 2:54 pm | मोदक

खूप खूप आभार मित्रा... :-)

धन्यवाद, यात शंकर पाटलांच्या शिरगणती धड्यातलं गाववाल्याच्या तंगडीवर खापर फेकुन मारणा-या माकडाचं चित्र पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

सगळं बदललंय..

माझ्या वेळची पुस्तकं नाहीत.. (बबन घर बघ. कमल नमन कर.)
भूगोल पाहिला तर कंटेंट सगळाच बदललेला.. फोटो बिटो आहेत चक्क..

१९८०-८८ दरम्यानची पुस्तकं आता गायब झाली असणार.. :(

आजकाल 'कमल नमन कर' च्या ऐवजी 'कमल गूगल कर' असं असतं म्हणे !

क्काय सांगता क्काय मराठे.. खरच की काय?
काही सन्माननिय सदस्यांना परत पहिलीत बसवावे की काय असे वाटुन गेले. ;)

पाषाणभेद's picture

1 Mar 2012 - 1:41 am | पाषाणभेद

>>> १९८०-८८ दरम्यानची पुस्तकं आता गायब झाली असणार..

खरे आहे.
सदर धाग्यातली पुस्तके नव्या अभ्यासक्रमाची आहेत पण एकदा जुन्या काळात जाता येते.

खुप खुप वर्षांपुर्वी (१० वर्षे तरी) मी नवनीत प्रकाशनाने पुनःप्रकाशित केलेले अगदी जुन्या अभ्यासक्रमाचे मराठीचे पहिली की बिगारीचे पाठ्यपुस्तक विकत घेतले होते. (आता ते माझ्याकडून गहाळ झालेले आहे. )
पण त्या पुस्तकात जुन्या काळातल्या कविता अन धडे होते जसे की:-
वाहवा वाहवा चेंडू हा - मिस मेरी भोर

अगदी जुने पुस्तक जसे छापले होते त्याच टायपात अन चित्रांत ते पुस्तक प्रकाशित केले होते. अर्थात तो अभ्यासक्रम माझा नव्हता तरी देखील खुप वाचनीय होते हे नक्की.

कुणीतरी नवनीत प्रकाशनाशी संपर्क करून त्याचे मुद्रण पुन्हा करायला सांगू शकतात.

सागर भौ, छान लिंक, अन वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Pearl's picture

1 Mar 2012 - 10:19 am | Pearl

+१
माझ्या वेळची पण नाहीत :-(

१)
शिरा मिळाला चिव चिव चिव
वडा मिळाला चिव चिव चिव

२) घाटातली वाट, काय तिचा थाट..

३) घडयाळबाबा टिक टिक करतात...

४) भुइनळ्याचे झाड फुलांचे भिडे निळ्या आकाशी रे
आली उजळीत हासत खेळत नवी नवी दिवाळी रे

५) केळीच्या बागा मामाच्या, पिवळ्या घडांनी वाकायच्या

६) ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा..
..
..
पाण्यात पडला बेडूक बेडूक तो ओरडला डराव डूक
वगैरे वगैरे....
मला माझं पहिलीचं बालभारती हवं आहे :-( नाहितल मी ललनालं ;-)

पियुशा's picture

1 Mar 2012 - 12:49 pm | पियुशा

अम्म..... पर्ल तै ...
ललु नतो ....;)
ही घे
ये रे ये रे पावसा ,तुला देतो पैसा"
पैसा झाला खोटा ,पाऊस आला मोठा"
ये ग ये ग सरी ,माझे मडके भरी"
सर आली धावुन मड्के गेले वाहुन " ;)

घाटातली वाट काय तिचा थाट
मुरकते गिरकते लवते पाठोपाठ
निळी निळी परडी कोणी केली पालथी
पानं फुलं सांडली वरती आणि खालती
खाली खोल दरी ,वर उन्च कडा
भला मोठा नाग जणु फणा काढुण उभा :)

बस क्या ? ;)

कॉमन मॅन's picture

29 Feb 2012 - 3:08 pm | कॉमन मॅन

छान धागा :)

प्रशांत उदय मनोहर's picture

29 Feb 2012 - 4:25 pm | प्रशांत उदय मनोहर

तुम्ही काकुवर धागा काढला होता, जो काही क्षणांपूर्वी संचालकांनी उडवलेला दिसतोय. त्यामुळे इथेच प्रतिक्रिया.

योग्य पर्यय निवडा :

प्रश्न - बालभारतीच्या मुखपृष्ठावरील चित्रावरून नेमका काय बोध होतो?

पर्याय -
(अ) ताई दोन-तीनदा परीक्षेत आपटल्यामुळे भावासह पुनः तेच पुस्तक वाचते आहे

(ब्) ताई भावाचा अभ्यास घेते आहे.

(क) ताई अभ्यास करतेय आणि तिच्याकडून मोटिव्हेशन मिळून धाकटा भाऊ अभ्यासाला लागतोय.

(ड) भावाला अभ्यास करताना काहीतरी न समजल्यामुळे त्याने ताईचा सल्ला घेतला.

(ई) ताईच्या पुस्तकात एक सुरेखसं चित्र आहे आणि ते ती भावाला दाखवते, भाऊ ते चित्र पाहून आनंदित होतो.

(फ) इतर (प्लीज एक्स्प्लेन बर्का!)

अन्या दातार's picture

29 Feb 2012 - 4:28 pm | अन्या दातार

तुम्ही काकुवर धागा काढला होता, जो काही क्षणांपूर्वी संचालकांनी उडवलेला दिसतोय. त्यामुळे इथेच प्रतिक्रिया.

खाजवणं, खरुज इ. इ. आठवलं

सागर, खुप खुप आभार रे. :)
Now we can feel the nostalgia.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Feb 2012 - 3:15 pm | अत्रुप्त आत्मा

पहिल्यांदा हा धागा काढल्याबद्दल शतशः धन्यवाद आणी ...हा विषय कितिदातरी मनात येऊन जायचा...अता मला हवी असलेली ही कविता मी पहिल्यांदा शोधणार, ''आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे,निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे'' ही कविता कितविला असतांना होती,वगैरे काहीही अठवत नाहीये...पण मिळेल अता,हे मात्र नक्की...बघू अता या अलीबाबाच्या गुहेत काय काय सापडतं ते... :-)

http://charudatta-patil.blogspot.com/2011_02_01_archive.html

आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेसफुलांचे सफ़ेद शिंपित वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे

मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतो
त्या वेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

दर्यावरची रंगीत मखमल उचलुन घेते कुणी
कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी

दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता घरी जायला हवे

- कुसुमाग्रज

नावातकायआहे's picture

29 Feb 2012 - 3:20 pm | नावातकायआहे

धन्यवाद मित्रा! वाचनखुण साठवली आहे!

१ लीला असताना 'छान छान गोष्टी' हे पुस्तक होत. त्यात बकासुराची , मीडास राजाची गोष्ट होती..ते पुस्तक नाहीए :-( मी तेच पुस्तक शोधत होते.अगदी कवर सकाट पुस्तक आठवतय मला ते

सागर's picture

29 Feb 2012 - 5:10 pm | सागर

मनीमाऊ,

मला वाटते छान छान गोष्टी हे पुस्तक अभ्यासक्रमाच्या बाहेरचे आहे म्हणून तिथे नाहिये.
पण हे पुस्तक उपलब्ध असेल तर कोणत्या तरी अक्षरधारा व तत्सम ग्रंथप्रदर्शनात मिळू शकेल.

ऑनलाईन खरेदीसाठी बुकगंगावर ही ३ पुस्तके सापडली आहेत.

पण त्यातले नेमके हवे असणारे त्यात आहे की नाही ते माहिती नाही. ;)

मनीमाउ's picture

1 Mar 2012 - 10:21 am | मनीमाउ

धन्यवाद सागर, माझयया माहितीप्रमाणे ही अभ्यासक्रमातच होती...असो...या दुव्या बद्दल आभार :-)

वपाडाव's picture

29 Feb 2012 - 4:18 pm | वपाडाव

मला 'फिटे अंधाराचे जाळे' त्याच पुस्तकात वाचायची आहे... बघुयात मिळते का ते?

किसन शिंदे's picture

29 Feb 2012 - 5:04 pm | किसन शिंदे

'दमडी' आठवली. :)

किसन शिंदे's picture

29 Feb 2012 - 5:12 pm | किसन शिंदे

प्र.का.टा.आ

किसन शिंदे's picture

29 Feb 2012 - 5:05 pm | किसन शिंदे

'दमडी' आठवली. :)

किसन शिंदे's picture

29 Feb 2012 - 5:07 pm | किसन शिंदे

'दमडी' आठवली. :)

तीनदा आठवली?
दमडीवर भारीच प्रेम रे तुझं.
ती बघ शेव खायचं स्वप्न बघत, तिला नारळाचा तुकडा चघळत, सैनिकांच्या संगिनी बघत बसली आहे.. ;-)

किसन शिंदे's picture

29 Feb 2012 - 5:14 pm | किसन शिंदे

सर्वरचा घोळ आहे रे काहीतरी... ४ वेळा प्रतिसाद आला. :(

निवेदिता-ताई's picture

29 Feb 2012 - 5:13 pm | निवेदिता-ताई

खरच छान ,,,....धन्यवाद....:)

मी-सौरभ's picture

29 Feb 2012 - 5:13 pm | मी-सौरभ

ही कथा आहे का ते बघतो...

अमृत's picture

29 Feb 2012 - 5:35 pm | अमृत

म्हणता आहात का तुम्ही? तो धडा १०वीत होता. आनंद यादवांचा बहुदा.

अमृत

गणामास्तर's picture

29 Feb 2012 - 8:24 pm | गणामास्तर

आनंद यादवांचा नव्हे भास्कर चंदनशिव यांचा होता तो धडा..अजून हि आठवतोय, खूपच सुंदर कथा आहे ती..
कुणाला मिळाला दुवा तर कृपया डकवा इथे.

"अरे व्हायमाल्या!!! उठून आरड की ह्यांद्र्या!!!!!!!!!!!"

आठवले.. :)
खूप सुंदर कथा आहे..
टॉमेटो चे पीक खूप आल्यामुळे बाजारात काहीच भाव मिळत नसतो.. त्या बाजारात आपला माल खपविण्यासाठी प्रयत्न करणा-या बाप-लेका ची कथा.

अमृत's picture

29 Feb 2012 - 5:32 pm | अमृत

पण खूप खूप धन्यवाद. आनंद शब्दात सांगता येणार नाही.

अमृत

"माझा खाऊ मला द्या" गोष्ट आठवते का कुणाला? जिचा मतीतार्थ होता केर (कागदी बोळे वगैरे) केराच्या बादलीत टाका :)

लिंकेबद्दल धन्यवाद.
सध्या अ आ इ ई इतपत मराठी येणार्‍या माझ्या मुलाला 'कमल नमन कर' सारखी पुस्तके वाचायची गरज आहेच.
बालभारतीच्या पहिल्या यत्तेच्या पुस्तकात मोठ्या टाईपमध्ये साध्या कविता, गोष्टी आहेत असे वरवर पहाता दिसले.
मोठी सोय झाली माझी. धन्यवाद.

कौशी's picture

1 Mar 2012 - 1:16 am | कौशी

माझ्या मुलांसाठी फार उपयोग होणार,

हा आमच्या वेळचा अभ्यासक्रम नाही. :(

सगळ्यांना लहानपणीचा खजीना दिल्याबद्दल शतशः आभार! __/\__ :)

नेटवरती फिरताना ही लिन्क सापडली आणि खूप आवडली.

http://sureshshirodkar.blogspot.com/

इथे माझ्या वेळच्या खूप खूप कविता मिळाल्या. काही काही कवितांमधल्या ओळी वेगळ्या वाटल्या.
पण ओव्हर ऑल खजिना मस्तच आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Mar 2012 - 11:12 pm | अत्रुप्त आत्मा

@इथे माझ्या वेळच्या खूप खूप कविता मिळाल्या. काही काही कवितांमधल्या ओळी वेगळ्या वाटल्या.
पण ओव्हर ऑल खजिना मस्तच आहे. >>> आणी ++++ ११११

आवडतो मज अफाट सागर...बद्दल तर धन्यवादच...पण या लिंकबद्दल अजुन एकदा थँक्यू,कारण इथे-''मी शूर शिपाई आहे..'' ही पण मला अनेक दिवस हवी असलेली कविता मिळाली

अशोक पतिल's picture

1 Mar 2012 - 6:16 pm | अशोक पतिल

धन्यवाद मित्रा!!! खुप खुप माहीतीपुर्ण धागा. मिपा वर कधी कधी हाती खजिना लागतो तो असा !