आज सकाळीच सभासद झाले. पहिलाच प्रयत्न आहे समजून घ्यावे ही विनंती.
विचार केला मिपाच्या लेखनाचा शुभारंभ मिसळ पावाच्या पाककृतीने करुया.
--------------------------------------------------------
साहित्य-
मटकी + वाटाणा - ३ वाटी
कांदे - २
लसुण आले पेस्ट - १/२ टे स्पून
१ टोमेटो पेस्ट
गरम मसाला - १ टे स्पून
लाल तिखट - १ टे स्पून
हळद - अर्धा टी स्पून
तेल - फोडणीसाठी
मीठ - चवीनुसार
कोथिंबीर
सजावटीसाठी:
फरसाण
बारीक चिरलेले २ कांदे
कोथिंबीर
लिंबू
कृती:
तेलावर जिरे मोहरी घालून फोडणी करावी. त्यावर चौकोनी चिरलेले दोन मोठे कांदे घालून चांगले तांबुस होईपर्यंत परतावे. थोडे मीठ, हळद, लाल तिखट व गरम मसाला घालावा. १-२ मिनीटे चांगले परतावे. त्यावर मटकी + वाटाणा घालून चांगले परतावे. त्यावर टोमेटो पेस्ट घालून खमंग वास सुटेपर्यंत चांगले परतावे. ५ वाटी पाणी घालून झाकून शिजवावे. मटकी व वाटाणा शिजल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
सर्व्ह करतांना मिसळवर फरसाण, कांदा व कोथिंबीर घालून पावाबरोबर वाढावे. सोबत लिंबाची फोडही द्यावी.
प्रतिक्रिया
11 Jun 2008 - 11:48 am | पक्या
योगिता ताई तुमचे मिपा वर स्वागत.
रेसिपी छान आहे पण मिसळपावाची मजा वाढवणारी तर्री कुठाय? तर्री ला विसरलात वाटते?
11 Jun 2008 - 11:58 am | योगिता_ताई
तर्री आपोआप येते, तेल जास्त घातल्यानंतर....
11 Jun 2008 - 12:42 pm | पक्या
>>तर्री आपोआप येते, तेल जास्त घातल्यानंतर.
नाही हो..तेलाचा तवंग या अर्थी मी तर्री नाही म्हटलं.
तर्री म्हणजे मिसळीबरोबर किंवा मिसळी वर ओतून खाण्यासाठी वेगळ्या वाटीत एक लालभडक रस्सा देतात. त्याला तर्री म्हणतात.
>>सर्व्ह करतांना मिसळवर फरसाण, कांदा......
मटकी , वाटाणा शिजून जे तयार होते ती उसळ . मिसळ नव्हे. या उसळी त फरसाण , कांदा वगैरे मिसळला की ती झाली मिसळ .
11 Jun 2008 - 1:53 pm | विसोबा खेचर
अरे वा!
पहिलीच पाकृ मिसळीची! :)
असो, मिसळपाव परिवारात मनापासून स्वागत...! :)
तात्या.
11 Jun 2008 - 2:01 pm | मदनबाण
ताई मिपा परिवारात तुमचे स्वागत आहे.....
तुम्ही तुमच्या लेखनाचा शुभारंभ मिसळ पावाच्या पाककृतीने केलेलाच आहे...अजुनही झकास पाककृती येऊन ध्या..
(कोल्हापुरी मिसळीचा चाहता)
मदनबाण.....
11 Jun 2008 - 2:03 pm | मनस्वी
योगिताताई मिपावर स्वागत आहे..
येउद्यात नवीन नवीन पाककृती.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
11 Jun 2008 - 6:06 pm | स्वाती राजेश
मिपावर स्वागत...
छान छान रेसिपी येऊदेत...वाट पाहात आहे..
12 Jun 2008 - 3:03 pm | प्रिती करन्दिकर
नमस्कार ,
मी मिसळ पावची चाहती आहे ......
आता मिसळीसारख झणझणीत लिहायला मजा येइल, तशी मधुन मधुन पावासारखी मऊ सुद्दा लिहीते मी (पाव कडक भजला नसेल तर) ........
.....
तसे तात्या मला ओळ्खुन अहेत......(काय हो तत्या ओळखलत ना मला?)...
अता तुम्हा सर्वान्ची पण ओळ्ख होइल हळुहळु.
प्रिती
12 Jun 2008 - 3:45 pm | नारदाचार्य
तसे तात्या मला ओळ्खुन अहेत......
काय सांगताय काय?
13 Jun 2008 - 7:50 am | विसोबा खेचर
......(काय हो तत्या ओळखलत ना मला?)...
हो, ओळखलं की! तू पुण्याची ना? :)
(जुना मित्र) तात्या.
14 Oct 2008 - 1:13 pm | टारझन
ओळखलं तर मग प्रश्न का ?
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
14 Oct 2008 - 12:36 pm | दिप
आज च मेम्बर झाले.........छान वेब आहे
14 Oct 2008 - 1:45 pm | घासू
आपण दिलेली रेसीपी अत्य॑त सोपी आहे. आमच्या सारख्या नवख्या व स्वय॑पाक माहीत नसलेल्या परन्तु मिसळप्रेमी माणसा॑साठी
ही रेसिपी करणे सोपे आहे. ही मिसळ पावाच्या पाककृती टाकल्याबद्दल धन्यवाद.
मिसळप्रेमी
घासू