वर नावातच आहे "तुम्हाला हवा तसा" तर
नानव्हेज मंडली साठी तुम्हाला आवडेल ते उदा. पापलेट्,सुरमई,हालवा,रावस,चिकन मटन ई.
व्हेज मंडली साठी तुम्हाला आवडेल ते उदा. बटाटा, पनिर, रताळे, बेबीकॉर्न ई.
मी पापलेट घेतला आहे.
पापलेट आख्खा घ्या किंवा फोडी करुन घ्या. स्वच्छ धुवुन त्याला लिंबु , हळद व मिठ लावुन बाजुला ठेवा.
आता चटणी साठी लाल ओल्या मिरच्या + लाल वाळलेल्या मिरच्या + आल + लसुण् + चिचेचा कोळ अथवा अमसुल + मिठ (सगळ्यांचे प्रमाण तुमच्या आवडी प्रमाणे + तब्येती प्रमाणे) हे सगळ मिक्सर मधुन हे अस वाटुन घ्या.
अजुन चट्पटीत हवे असल्यास ह्या तयार चटणीत तंदुर मसाला(रेडीमेड्)+थोडी धणे जिरे पुड+थोडी बडीशेप पुड्+आमचुर/चाट मसाला +गरम मसाला पुड +रेडीमेड मीट मसाला +दही+अवश्यकते नुसार पाणी मिसळुन पेस्ट करा.
त्या बाजुला ठेवलेल्या पापलेटला पुढ्यात घ्या आणि तयार चट्णी/ पेस्ट त्याला फासा ही अशी
(चट्णी/ पेस्ट फासताना पापलेटच्या आतील बाजुस घट्ट चट्णी/पेस्ट फासा. वरुन थोडी पातळ असली तरी चालेल.)
पापलेटला साधारण दिड दोन तास मुरुद्यावे.
तुमच्या आवडी प्रमाणे कोळश्याचा शेगडीवर/ओव्ह्नमधे/ ग्रिल /रोस्ट्/टोस्ट्/शेलोफ्राय/डीप फ्राय करा
आणि हाणा.
(शेलोफ्राय/डीप फ्राय कराणार असाल तर रवा/तांदुळ पिठी/ब्रेडक्रम्पस मधे घोळवा)
चट्णी जास्त झाली तरी काळजीच कारण नाही. फ्रिज मधे चांगलीच टिकते. भेळमधे/सेंडविचमधे किंवा नुसतीच जेवताना तोंडी लावण्यास फक्कड लागते. ह्या चटणीच्या कोटींग मधे बटाटे अफलातुन लागतात. तसेच कोणताही रस्सा करताना कांदा परतुन झाल्यावर ही चटणी त्यात परतुन घ्यावी. रस्श्याला वेगळी लज्जत येते.
प्रतिक्रिया
29 Jan 2012 - 7:30 pm | पाषाणभेद
तुझा रे पापलेट भारी हाय
बघून लाळ तोंडात मावत नाय
दिसतोय मस्त.
बाकी शाकाहारी असल्याने कधी चाखला नाही पण वेळ आली तर खाईन.
29 Jan 2012 - 8:26 pm | गणपा
अत्याचार.
31 Jan 2012 - 11:33 am | प्रास
बघा बघा कोण बोलतंय हे.....
श्रीमान् गणपा जी, आपण आपल्या धाग्यांवर काय वेगळं करत असता?
बाकी, आम्ही तुमचे त्या विषयातले एकलव्यी शिष्य आहोत हे वे. सां. न. ;-)
29 Jan 2012 - 8:45 pm | जाई.
तोँपासू
29 Jan 2012 - 8:52 pm | पक पक पक
पाककॄती लयच भारी हाय..तोंडाला पार पाझर फोड्ला..पण.
आता चटणी साठी लाल ओल्या मिरच्या + लाल वाळलेल्या मिरच्या + आल + लसुण् +
तेलाची वाटी विसरलात काय....;)
29 Jan 2012 - 9:47 pm | सानिकास्वप्निल
कसला चविष्ट दिसत आहे पापलेट :)
चटणी तर मस्त लाले-लाल , झणझणीत दिसत आहे
+१ :)
29 Jan 2012 - 10:31 pm | अत्रुप्त आत्मा
देवा मला पुढच्या जन्मी पॉपलेट कर...आणी अशीच तन्दूरं...मुक्ति दे... म्हणजे मला सुखाचे मरण अनुभवाला येइल...
30 Jan 2012 - 8:46 am | मराठमोळा
वा वा वा...
जयपाल शेट सुद्धा स्वयंपाक घरात का? ;)
बाकी पाकृ झकास.. शेवटला फटु तर जीवघेणाच.. :)
30 Jan 2012 - 8:56 am | प्रभाकर पेठकर
सर्व स्पर्षी, सर्व समावेशक आणि जो जे वांच्छिल तो ते लाभो अशी ही पाककृती वेगळीच, सहिष्णू भावाने ओथंबलेली आणि पाकशास्त्रात अरक्तरंजित क्रांती घडविणारी आहे. अभिनंदन.
30 Jan 2012 - 12:09 pm | रमताराम
पार्टी बदल? फटू ऐवजी पाकृ? काय 'सेंकंड इनिंग' चा विचार चालू हाय काय, आं?
बाकी पापलेट या नावावरच आपण सांडतो. ती चटणी पाहून तर ब्रह्मानंदी टाळीच लागली आहे. ह्ह्हाय का मस्त दिसतोय स्साला तो शेवटचा पापलेट, अम्म अम्म्म आहा.
30 Jan 2012 - 2:14 pm | सुहास झेले
एकदम जबरदस्त आणि झणझणीत ....आयला आता जेवून आलो आणि ही पाकृ बघतोय, पार भूक लागलीय ;)
30 Jan 2012 - 2:37 pm | मोहनराव
असले जीवघेणे धागे बंद करावेत हि विनंती!
30 Jan 2012 - 4:09 pm | Solapurkar
एकदम जबरदस्त :-) तोँपासू
चटणी तर मस्त, साहेब जरा थोडि द्या ना आम्हाला पाटवुन :-)
30 Jan 2012 - 4:18 pm | गवि
लाजवाब....
31 Jan 2012 - 1:24 pm | सुहास..
जीवघेणे !!
31 Jan 2012 - 9:18 pm | रघु सावंत
मी पापलेट घेतला आहे.
पापलेट आख्खा घ्या किंवा फोडी करुन घ्या. स्वच्छ धुवुन त्याला लिंबु , हळद व मिठ
लावुन बाजुला ठेवा
सायबा जयपाल
लावुन बाजुला ठेवा ......... बाजुला ठेववंत नाही रे. दुसरं काहितरी सांग.
1 Feb 2012 - 2:01 am | शुचि
शेवटचे ३ फोटो .... खतरनाक.
2 Feb 2012 - 7:06 am | इन्दुसुता
जयपाल भौ शाकाहारी लोकांसाठी पनीर व बटाट्याचे पर्याय दिल्याबद्दल धन्यवाद... पाकृ जरूर करून बघेन
लाल चटणीमुळे मोह आवरणार नाही... :)
2 Feb 2012 - 4:17 pm | पैसा
चटणी इतर बर्याच ठिकाणी वापरण्याजोगी आहे. पाकृ आवडली.