नमस्कार,
भारतीय राज्यघटनेनुसार कलम १९ (१) डी - to move freely throughout the territory of India चा आधार घेत नजिकच्या काळात आमचे काही कामानिमित्त कोल्हापुराला जाणे होणार आहे. तसे पाहता खिशात पुरेसे पैसे असले म्हणजे कोणत्याही ठिकाणी राहण्या-खाण्याची सोय होऊ शकते, परंतु हीच सोय जर आपल्या माहितीच्या ठिकाणी झाली तर अधिक बरे, या हेतूने आम्ही हा चौकशी-धागा लिहीत आहोत.
चौकशी क्र १)
कोल्हापूर लोहमार्गीय स्थानकाच्या जवळपासच्या एखाद्या चांगल्याश्या परंतु त्यातल्या त्यात स्वस्तातल्या लॉजसंबंधी कुणी काही माहिती देऊ शकेल का? सध्या थंडी असल्यामुळे तेथे गरम पाणी मिळाल्यास बरे होईल. आमची ऐपत रु ५०० च्या आसपास.
चौकशी क्र २)
कोल्हापुराच्या मिसळीविषयी बरेच ऐकले आहे. चोरगे, खासबग मैदान, फडतरे इत्यादी नावे ऐकली आहेत. यापैकी सर्वात उत्तम मिसळ कुठे मिळते? त्याचप्रमाणे कोल्हापूर लोहमार्गीय स्थानकापासून ही स्थाने किती दूर आहेत?
चौकशी क्र ३)
आमचे काम आटपून आम्हाला काही वेळ मिळणार आहे, त्या वेळात आम्ही अंबाबाईचे दर्शन घेऊ इच्छितो. तरी कृपया मंदीराच्या वेळा, दर्शनासाठी साधारणपणे लागणारा वेळ (रांग वगैरे). अर्थात, आम्ही कोल्हापुरात जाऊ तो दिवस रविवार नसेल.
चौकशी क्र ४)
कोल्हापुरातील किमान एक किंवा दोन खानावळींची माहिती, जिथे उत्तम प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी जेवण मिळू शकेल. चांगल्या जेवणाकरता आम्ही शंभर रुपायापर्यंत खर्च करण्यास तयार आहोत. तरी कृपया अशा खानावळींची माहिती द्यावी.
येथील काही मिपाकर कोल्हापूर किंवा आसपासचे तसेच कोल्हापुरचे माहीतगार आहेत असा आमचा समज आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून या धाग्याला उत्तर मिळेल आणि आमचा कोल्हापूर दौरा सोयीचा होईल अशी आमची अपेक्षा आहे.
कृपया सहकार्य करावे. उत्तराच्या अपेक्षेत,
-- कॉमॅ.
प्रतिक्रिया
16 Jan 2012 - 12:18 pm | मराठी_माणूस
कामानिमित्त जायला ह्या कलमाच्या आधाराची गरज काय ?
16 Jan 2012 - 12:22 pm | स्पा
काल्लिंग अन्या दातार (बांगलादेशी )
16 Jan 2012 - 12:22 pm | गवि
रंकाळ्याचं केंदाळ
मिसळीचा जाळ,
गुळाचं गुर्हाळ,
कोल्हापूर..
विटांची भट्टी,
पापाची तिकटी,
तंबाखूची भुकटी
कोल्हापूर..
अंबाबाईंचं,
ताराबाईंचं,
नसीमाताईंचं,
कोल्हापूर..
आख्खा मसूर
गंगेत सूर,
गोवर्यांचा धूर,
कोल्हापूर..
खेबूडकर,
लताचे स्वर
भालजींचं घर,
कोल्हापूर..
दाराशी म्हशी
धान्याच्या राशी,
दक्षिण काशी,
कोल्हापूर..
मटणथाळी,
माती काळी
शहाण्णवकुळी,
कोल्हापूर..
16 Jan 2012 - 12:38 pm | स्वाती दिनेश
कोल्हापूरावरची कविता आवडली,
स्वाती
16 Jan 2012 - 1:05 pm | किसन शिंदे
मस्त कविता!
16 Jan 2012 - 1:39 pm | sneharani
मस्त कविता, आवडली!!
16 Jan 2012 - 2:25 pm | नगरीनिरंजन
लई भारी!
16 Jan 2012 - 4:00 pm | विशाखा राऊत
मस्त आहे कविता एकदम
16 Jan 2012 - 10:06 pm | गणेशा
मस्त कविता !
16 Jan 2012 - 12:32 pm | कॉमन मॅन
विचारलेल्या प्रश्नांची कुणी नेमकी माहिती दिल्यास वा त्यासंबंधी भाष्य केल्यास मिसळपाव हे एक संवेदनशील संकेतस्थळ असून येथे असंबद्धता आढळत नाही असे आम्हाला अभिमानाने म्हणता येईल..!
16 Jan 2012 - 1:26 pm | गवि
: बजेट जरा कमी आहे. पण इतक्या बजेटमधे गोकुळ आणि सह्याद्रि या दोन लॉजेसमधे नॉन एसी रूम मिळण्याची शक्यता आहे. फारतर १००-२०० इकडेतिकडे. पण जागा सेफ आहेत. अन्यथा अगदी २०० मधेही मिळणारे अगदी बोर्डिंग टाईप आहेत पण बकाल असू शकतात.
फडतरे मिसळीला यंदाचे एनडीटीव्ही फूड अवॉर्ड (सर्वोत्कृष्ट धाबा कॅटेगरीचे मिळाले आहे.) भवानीमंडपाजवळच उत्तम मिसळीची काही ठिकाणे आहेत. तिथेच चोरगे मिसळ आहे अशी माझी आठवण आहे.
दिशादर्शन आणि नेमकी दुकानांची नावे आता आठवत नाहीत पण महालक्ष्मी मंदिरापासून कोणीतरी नक्की मार्गदर्शन करतील.
देवळाला टाईमिंग असल्याचे ठावूक नाही. पण दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी गेलो आहे (पहाटे चार किंवा रात्री दहा अशा वेळी नव्हे.. डेलाईट टाईमिंगमधे) आणि कधीही बंद दिसलेलं नाही. तरीही काही तास बंद रहात असेल तर कल्पना नाही.
महेंद्र कुलकर्णींची ही लिंक पहा. याबाबतीत सर्व प्रश्न मिटेल. या लेखात सुरुवातीला कोल्हापूरच्या वाटेवरच्या खादाडीची माहिती आहे पण नंतर पूर्ण कोल्हापूर कव्हर केलं आहे. अगदी मिसळ ते मटणताटं.. :)
वेंजॉय..
16 Jan 2012 - 2:10 pm | अन्या दातार
१. निवासः सह्याद्री व गोकुळ बरोबरच एसटी स्टँडजवळ काही लॉजेस आहेत, जि कॉमन मॅन यांच्या बजेटमध्ये बसू शकतात.
२. मिसळ मंदिरे:
२अ. फडतरे मिसळः वाय.पी.पोवार नगर, रेल्वेस्थानकापासून अंदाजे ४ किमी. बसने जाणे टा़ळावे. त्या भागात फारश्या बसेस जात नाहीत रे.स्था.पासून. रिक्षा अगदी बरोबर ठिकाणी सोडेल याची खात्री.
२ब. चोरगे मिसळः महालक्ष्मी मंदीरापासून ५ मिनिटे चालत चालण्याइतके अंतर. महाद्वार रोडलगत आहे. रे.स्थापासून अंदाजे अंतर ६-७ किमी
२क. खासबाग मिसळः महालक्ष्मी मंदीराजवळच, रे.स्थापासून अंदाजे अंतर ६ किमी. या दोन ठिकाणी जाण्यासाठी रे.स्थापासून के.एम.टी. बसेसची सोय आहे. शाहू मैदान/भवानी मंडपकडे जाणार्या बसेस पकडणे.
२ड. करवीर मिसळः महाद्वार रोड, देवीच्या देवळाच्या आधी. कसे जायचे हे वरती सांगितल्याप्रमाणेच.
२इ. विजय मिसळः राजारामपुरी ६ वी गल्ली. रे.स्थापासून अंदाजे ३ किमी. बसपेक्षा रिक्षाने जाणे उत्तम.
एक सूचना: मिसळ मंदीर क्र. २अ, २क, २ड व २इ इथे फक्त आणि फक्त सकाळीच मिसळ उपलब्ध असते. चोरगे मिसळ हा अपवाद आहे. अन्यथा कोल्हापुरात कुठेही दुपारी १ नंतर मिसळ मिळत नाही
३. देवळाच्या वेळा: देऊळ दिवसभर खुले आहे. अर्थातच सकाळी ८-१० च्या दरम्यान व संध्याकाळी ५ पासून ९ पर्यंत जास्त गर्दी असते. पूर्वी मंगळवार-शुक्रवारी जास्त गर्दी असायची, आता शनिवार-रविवारी असते.
४. खानावळी: देवळाजवळची ठिकाणे:
४अ. करवीर भोजनालय (इथेच वर सांगितलेली मिसळ मिळते)
४ब. सुरुची भोजनालय- महाद्वार रोडच्या तोंडापाशीच आहे.
इतर ठिकाणे-
अर्थातच महेंद्र कुलकर्णी रेकमंडेड हॉटेल ओपल, बस स्टँडजवळ असलेले नाईक फूड कॉर्नर (हे अत्यंत साधे, पण सुरेख चवीचे जेवण मिळण्याचे ठिकाण), शाहुपुरीतले वामन गेस्ट हाऊस (मत्स्यप्रेमींचे आवडते ठिकाण), पद्मा गेस्ट हाऊस (ओपलपेक्षा सरस तांबडा-पांढरा मिळण्याचे शहरातील ठिकाण)
अजुन जर काही शंका असल्यास आमची खव आहेच. :)
16 Jan 2012 - 2:15 pm | प्रचेतस
वरील मिसळीच्या पर्यांयामधली सर्वोकृष्ट मिसळ कोणती शिवाय काही ठिकाणी रस्श्यात शिळा मटण रस्सासुद्धा घातला जातो असे ऐकिवात आहे. तेव्हा खात्रीशीर शुद्ध शाकाहारी मिसळ कुठली?
16 Jan 2012 - 2:17 pm | गवि
खेरीज खात्रीशीर शिळा मटणरस्सा घातला जाणारी ठिकाणेही सांगावीत ही विनंती..
16 Jan 2012 - 2:32 pm | दादा कोंडके
हा हा.. :)
16 Jan 2012 - 2:21 pm | अन्या दातार
वरील पैकी एक खासबाग सोडल्यास बाकी तिन्ही मिसळी खात्रीशीरपणे शुद्ध शाकाहारी आहेत. क्रमवारी करायची झाल्यास १. फडतरे, २. विजय, ३. खासबाग, ४. करवीर
16 Jan 2012 - 2:55 pm | मोदक
आणि खात्रीशीर शिळा मटणरस्सा घातला जाणारी ठिकाणे..?
17 Jan 2012 - 2:31 pm | मालोजीराव
वल्लीशेठ...तीच तर खरी मिसळ ;)
-मालोजीराव
16 Jan 2012 - 2:22 pm | मोदक
मासे आवडत असतील तर -गजाली - राजारामपुरी ९ वी गल्ली.
त्यानंतर राजाबाळ पान मंदिर - राजारामपुरी बहुदा ९ वी गल्लीच पण मेन रोड- (पत्ता कोणीही सांगेल)तिथे मँगो मसाला आणि हैदराबादी पान (शिल्लक असेल तर!) जरूर ट्राय करा. लहान मुलांचा खास विचार करून राजाभाऊ कडे चिल्ड्रन भेळ व राजाबाळ कडे चिल्ड्रन पान पण मिळते.
बाकी गजालीची भेट, राजाभाऊ ची भेळ (स्पेशल,साधी, मालवणी, भेवडा, टी टाईम) सोळंकीचे दूध कोल्ड्रींक आणि राजाबाळचे पान या अत्यावश्यक भेटींशिवाय माझी कोल्हापूर वारी होत नाही. :-)
बजेट तेवढे वाढवा बुवा. ;-)
16 Jan 2012 - 2:37 pm | अत्रुप्त आत्मा
@बाकी गजालीची भेट, राजाभाऊ ची भेळ (स्पेशल,साधी, मालवणी, भेवडा, टी टाईम) सोळंकीचे दूध कोल्ड्रींक आणि राजाबाळचे पान या अत्यावश्यक भेटींशिवाय माझी कोल्हापूर वारी होत नाही.>>>
<<< व्वा व्वा मोदका,,, तुझ्या सह कोल्हापूर एकदा झालच पाहिजे..
कारण कोल्हापुरच्या बाबतीत आंम्ही अजुन
16 Jan 2012 - 2:50 pm | मोदक
एखादा कट्टा करूया का तिकडे..?
सकाळी लवकर पुण्यातून निघून वाटेतली नाष्ट्याची ठिकाणे भेट देत देत १० / ११ पर्यंत कोल्हापूर.
अंबाबाई चे दर्शन घेवून १२ / १ वाजता गजाली / पद्मा गेस्ट हाऊस. (दोन्ही गोष्टी एकाच वाक्यात मांडल्याबद्दल स्वारी)
दुपारी पन्हाळा / न्यु पॅलेस / अन्या सुचवेल तो टाईमपास + सोळंकी
संध्याकाळी ६ /७ वाजता राजाभाऊ कडे भेट देवून पुण्याकडे प्रयाण. कोल्हापूरहून निघाल्यानंतर ४५ KM अंतरावर MK धाबा. अख्खा मसूर, रोटी आणि जिरा राईस नंतर साधे पान (कलकत्ता / बनारस पानाचे नव्हे तर साध्या पानाचे) खावून पुणे.
मुक्काम असेल तर जास्ती मजा येईल. :-) दोन दिवसात बघण्यासारख्या बर्याच गोष्टी आहेत.
16 Jan 2012 - 3:42 pm | अत्रुप्त आत्मा
येनार येनार लै वेळा येनार...तुमच्या संगाट कोलापूरला भ्येट देनार... !

लै मज्जा येइल राव..तिकडं कट्टा झाला तर
17 Jan 2012 - 8:50 am | प्रचेतस
भटजी कोल्हापूरला हाटेलात बसून तांबडा, पांढरा रस्सा ओरपताहेत हे दृश्य डोळ्यांसमोर आले आणि डोळे पाणावले.
18 Jan 2012 - 1:26 pm | अत्रुप्त आत्मा
भटजी कोल्हापूरला हाटेलात बसून तांबडा, पांढरा रस्सा ओरपताहेत हे दृश्य डोळ्यांसमोर आले आणि डोळे पाणावले. >>>अं अचं का चिडवलं...?..आमी नै ज्जा...!
अत्रुप्त आत्मा
नशीब माझं "कोंबडी चावतानचं दृष्य डोळ्यासमोर आलं आणी देह ओलाचिंब जाहला" असे नै म्हणालात ;-)
(कोंबडी फक्त स्वप्नातच चावणारा)
17 Jan 2012 - 9:17 am | चिंतामणी
दुपारी पन्हाळा?????????
दुपार पुरेशी होत नाही. आणि पन्हाळ्या दुपारी जाउन
>>>>संध्याकाळी ६ /७ वाजता राजाभाऊ कडे भेट देवून पुण्याकडे प्रयाण
म्हणजे काय भोज्जाला शिवायला जायचे आहे काय???????
>>>कोल्हापूरहून निघाल्यानंतर ४५ KM अंतरावर MK धाबा. अख्खा मसूर, रोटी आणि जिरा राईस नंतर साधे पान (कलकत्ता / बनारस पानाचे नव्हे तर साध्या पानाचे) खावून पुणे.
पण जेवणाबरोबर दही मागवायचे. दही फार मस्त असते तेथले.
(गुरवार ते शनीवार पन्हाळा मुक्कामी राहीलेला MK धाबा आणि इतर गोष्टींचा आस्वाद घेतलेला) चिंतामणी
17 Jan 2012 - 10:38 am | मोदक
पन्हाळा... कितपत जमेल तो पण मोठ्ठा प्रश्न आहे...!
राजाभाऊं कडे १ तास भरपूर झाला.. बापूंच्या डाव्या हाताची जागा एकदा पटकावली की हव्या त्या "आडरी" लगेच मिळतात.
छोट्या लोटक्यामधले दही छान असते. जर तिथे तुमची खास ओळख असेल तर जिरा राईस "डबल फ्राय" करून मिळतो. :-)
मोदक
16 Jan 2012 - 7:11 pm | पक पक पक
मोदक ,
मला देखील न्या तुम्च्या बरोबर.......
16 Jan 2012 - 1:25 pm | गवि
डुकाटाआ
16 Jan 2012 - 2:07 pm | ५० फक्त
प्रकाटाआ माहित होतं हे डुकाटाआ कोल्हापुरी प्रकरण दिसतंय,
16 Jan 2012 - 4:05 pm | उदय के'सागर
हे "डुकाटाआ" काय आहे? खुपच उत्सुकता "लागुन र्हायलीये"... सांगा ना लवकर
16 Jan 2012 - 4:10 pm | प्रास
डुप्लिकसी काढून टाकली आहे.
16 Jan 2012 - 4:13 pm | गवि
धन्यवाद प्रासदादा.. :)
16 Jan 2012 - 4:13 pm | गवि
धन्यवाद प्रासदादा.. :)
16 Jan 2012 - 4:14 pm | उदय के'सागर
धन्यवाद प्रास :)
16 Jan 2012 - 6:46 pm | पक पक पक
नमस्कार,
भारतीय राज्यघटनेनुसार कलम १९ (१) डी - to move freely throughout the territory of India चा आधार न घेता नजिकच्या काळात आमचे काही कामानिमित्त मध्य पुर्व आफ्रिकेतील हुळूलुळूलुंबा येथे जाणे होणार आहे. तसे पाहता खिशात पुरेसे पैसे असले म्हणजे कोणत्याही ठिकाणी राहण्या-खाण्याची सोय होऊ शकते, परंतु हीच सोय जर आपल्या माहितीच्या ठिकाणी झाली तर अधिक बरे, या हेतूने आम्ही हा चौकशी-धागा लिहीत आहोत.
चौकशी क्र १)
मध्य पुर्व आफ्रिकेतील हुळूलुळूलुंबा जलमार्गीय स्थानकाच्या अथवा वायु मार्गीय स्थानकाच्या जवळपासच्या एखाद्या चांगल्याश्या परंतु त्यातल्या त्यात स्वस्तातल्या लॉजसंबंधी कुणी काही माहिती देऊ शकेल का? सध्या थंडी असल्यामुळे तेथे गरम... रम, व्हिस्की मिळाल्यास बरे होईल. देशि पण चालेल . आमची ऐपत रु ५०० च्या आसपास.
चौकशी क्र २)
मध्य पुर्व आफ्रिकेतील हुळूलुळूलुंबा इथे मिळ्णार्या जेवणा विषयी (कच्चे मांस ,चित्र विचित्र फळे ,जंगली वनस्पती)बरेच ऐकले आहे. चुंगा रेस्टॉरन्ट, बूंगा फोरेस्ट, इत्यादी नावे ऐकली आहेत. यापैकी सर्वात उत्तम खाण्या लायक जनावर कुठे मिळते? त्याचप्रमाणे मध्य पुर्व आफ्रिकेतील हुळूलुळूलुंबा जलमार्गीय स्थानकाच्या अथवा वायु मार्गीय स्थानकापासुन ही स्थाने किती दूर आहेत?
चौकशी क्र ३)
आमचे काम आटपून आम्हाला काही वेळ मिळणार आहे, त्या वेळात आम्ही येथील जंगलात भटकुन घेऊ इच्छितो. तरी कृपया इथल्या जंगलातील जनावरांच्या जंगलात भटकण्याच्या वेळा,ते साधारण शिकार केव्हा करतात ,तसेच त्यांना बघण्याच्या सुरक्शीत वेळा,जंगल भ्रमंती साठी साधारणपणे लागणारा वेळ (घाबरल्यावर होत अस्लेल्या विधिं साठी असलेल्या रांगेत लागणारा वेळ ग्रूहीत धरुन वगैरे). अर्थात, आम्ही आफ्रिकेत जाऊ तो दिवस जंगली श्वापदांच्या सूट्टीचा नसेल.
चौकशी क्र ४)
मध्य पुर्व आफ्रिकेतील हुळूलुळूलुंबातील किमान एक किंवा दोन खानावळींची माहिती, जिथे उत्तम प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी जेवण मिळू शकेल.( आम्ही स्वतः कोणाच्याही उदरनिर्वाहाची सोय न होता.उ.दा जंगली श्वापद अथवा माणसे .) चांगल्या जेवणाकरता आम्ही शंभर रुपायापर्यंत खर्च करण्यास तयार आहोत. तरी कृपया अशा खानावळींची माहिती द्यावी.
येथील काही मिपाकर मध्य पुर्व आफ्रिकेतील हुळूलुळूलुंबातील किंवा आसपासचे तसेच आफ्रिकेतील जंगलाचे माहीतगार आहेत असा आमचा समज आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून या धाग्याला उत्तर मिळेल आणि आमचा मध्य पुर्व आफ्रिकेतील हुळूलुळूलुंबातील दौरा सोयीचा होईल अशी आमची अपेक्षा आहे.
कृपया सहकार्य करावे. उत्तराच्या अपेक्षेत,
16 Jan 2012 - 8:00 pm | कॉमन मॅन
भारतीय राज्यघटनेची 'to move freely throughout the territory of India' अशी तरतूद आहे. यात मध्य-पूर्व अफ्रिकेचा समावेश नाही. असो, तरीही विडंबन मात्र छान! :)
गवि आणि अन्या दातार यांचे विशेष आभार.
16 Jan 2012 - 8:02 pm | पक पक पक
आधार न घेता.......
17 Jan 2012 - 7:17 am | ५० फक्त
अहो, ते सध्या जिथं कुठं आहेत तिथुन कोल्हापुर सारख्या ठिकाणी लोहमार्गावरुन जाणार आहेत, गरम पाण्यानं आंघोळ करणार आहेत, मिसळ खाणार आहेत याच्या आनंदात नाही त्यांना नसेल दिसला एखादा शब्द मग, लगेच चिडता काय हो एवढे ३(पक)
17 Jan 2012 - 6:07 pm | पक पक पक
हे असं होत नेहमी , आम्ही सल्ला मागीतला कि तो कोणीच देत नाही.वरती भल्त्याच विषयांना फाटे फोड्ले जातात .सध्या आम्ची गरज काय आहे ते लक्शात घ्या हो......
17 Jan 2012 - 10:42 am | कॉमन मॅन
३ पकजी,
नजरचूक झाली, क्षमा असावी.
17 Jan 2012 - 8:06 am | चिंतामणी
यासाठी गणपाला व्यनी करावा. :p :-p :tongue:
17 Jan 2012 - 11:45 pm | प्रशु
शाकाहारी जेवणार असाल तर राजपुरुष मध्ये नक्की जा....
18 Jan 2012 - 11:56 am | कॉमन मॅन
कृपया विस्तृत पत्ता सांगता का? की रिक्षावाल्याला नुसतं 'राजपुरुष' असं सांगून तो बरोबर तेथे सोडेल..?
18 Jan 2012 - 12:04 pm | सुमो
मधून बाहेर पडा ..रस्ता ओलांडा...आणि उजवीकडे पहात एक मिनिट चालला की मोठ्ठा बोर्ड दिसेल..
राजपुरुष.
18 Jan 2012 - 1:25 pm | मोदक
छशामट = छत्रपती शाहू महाराज टर्मीनस.
सदाशिव अमरापूरकरचा एखादा फोटो दिसतो का ते पण बघा हॉटेल मध्ये, २००८ साली एका दुपारी आम्ही दोघे तिथे (वेगवेगळ्या टेबलावर ;-)) जेवलो आहोत.
मोदक.