खुप दिवसांपासुन पॅनकेक खाण्याची व (त्याहिपेक्षा) बनवण्याची इच्छा होती , शेवटी ह्या विकांताला बनवण्याचा योग आला.
साहित्य : (साधारण ५-६ पॅनकेक च्या हिशोबाने)
पॅनकेक :
१. मैदा - १ वाटी
२. गव्हाचे पीठ - १ वाटी
३. ताक - २ वाटी
४. दुध - १ वाटी
५. अंड - १
६. बटर - ५० ग्रॅम
७. बेकिंग पावडर - २ चमचे
८. बेकिंग सोडा - अर्धा चमचा
९. पीठीसाखर - ३ चमचे
१०. मीठ - चवीनुसार
११. फ्रेश-क्रिम - सर्व्हिंगनुसार
स्ट्रॉबेरी सिरप :
१. स्ट्रॉबेरी - १०
२. साखर - ५-७ चमचे
३. पाणी - ३ वाटी
कृती :
पॅनकेक :
१. मैदा, गव्हाचे पीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, पीठीसाखर व मीठ व्यवस्थीत एकत्र करुन घ्यावे (कोरडे मिश्रण).
२. एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग (एग व्हाईट) व ताक एकजीव करुन घ्यावे.
३. दुसर्या भांड्यात २-३ चमचे बटर(शक्यतो गरम पाण्यावर वा वाफेवर थोडे वितळुन घ्यावे) व अंड्याचा पिवळा बलक एकत्र फेटुन घ्यावे.
४. अता ताक्+एग व्हाईट व बटर+पिवळा बलक ह्यांचे मिश्रण (वरील क्र.२ व ३) एकत्र करुन घ्यावे.
५. ह्या मिश्रणा मधे कोरडे मिश्रण (वरील क्र. १) हळूहळू ओतावे आणि मिश्रण सतत हलवत रहावे, गुठळ्या-रहित.
६. हे मिश्रण डोश्याच्या मिश्रणाप्रमाणे घट्ट/सैल ठेवावे, अति-घट्ट वाटल्यास सैल करण्यासाठी दुध टाकावे. मिश्रण साधारण १०-१५ मिनीटांसाठी झाकुन ठेवावे.
७. अता मध्यम आचेवर, पॅनवर थोडे बटर टाकुन ते सर्व बाजुस फिरवुन पेनकेक चे मिश्रण पॅन वर डावाने किंवा वाटीने टाकावे/पसरावे (डोश्याप्रमाणे डावाने वा वाटीच्या बुडाने पसरु नये, कारण पॅनकेक जाडच असलेला चांगला लागतो व 'sponge' होतो).
८. पॅनकेक दोन्हि बाजुने व्यवस्थीत परतुन घ्यावा (बेक करावा). सोनेरी/गोल्डन ब्राउन होईपर्यंत बेक करावा.
पॅनकेक तयार :) अश्या ह्या पॅनकेक वर फ्रेशक्रिम पसरावे. पण 'सिरप' शिवाय पॅनकेक ला 'काय मजा नाय..' :)
म्हणुन ...
स्ट्रॉबेरी सिरप :
१. स्ट्रॉबेरीज बारीक चिरुन व थोडे क्रश करुन घ्यावे.
२. पाण्यामधे साखर व (वरील) क्रश स्ट्रॉबेरी टाकुन त्याचा एकतारी पाक होईपर्यंत ते मध्यम आचेवर ठेवावे व नंतर व्यवस्थीत गाळुन घ्यावे कि झाले झटपट स्ट्रॉबेरी सिरप :)
गरमा-गरम पॅनकेक मस्तं स्ट्रॉबेरी सिरप बरोबर सर्व्ह करावे ( चांगले ओतावेच ते सिरप त्या पॅनकेक वर :) )
प्रतिक्रिया
10 Jan 2012 - 1:55 pm | विश्वनाथ मेहेंदळे
iHOP आठवले आणि तिथे ज्यांच्या बरोबर जायचो ते मित्रही :-)
हे नक्की करून बघेन. कधी जमते ते बघू.
13 Jan 2012 - 2:30 pm | बबलु
मेहेंदळे साहेब... लेक ताहो मधील iHOP आठवतंय ना ?? :)
पॅनकेक वर तुटून पडलो होतो.
10 Jan 2012 - 2:07 pm | स्पा
वा झकास
10 Jan 2012 - 2:17 pm | पियुशा
झक्कास ,जबरदस्त !
या विकान्ती करुन पाहीला जाइन :)
@ स्पावड्या घाबरु नको रे पाक्रु लोडवनार नाही याची ;)
10 Jan 2012 - 8:50 pm | मदनबाण
आहं... :)
10 Jan 2012 - 8:54 pm | जाई.
छान
10 Jan 2012 - 9:00 pm | गणपा
स्वारी खुसपटं नाही काढत पण पॅनकेक फुलला नाही का नीट, थोडा आक्रसलेला दिसतोय.
स्ट्रॉबेरी सिरप उत्तम दिसतय, पण मुदलातलं स्ट्रॉबेरीच आवडत नसल्याने त्यावरच्या ह्या व्याजाला पास.
पुपाप्र.
10 Jan 2012 - 10:32 pm | सानिकास्वप्निल
थोडा आक्रसलेला दिसत आहे पॅनकेक पण तुमच्या मेहनतीला १०० % दाद
अशाच पुढच्या पाकृ येऊ द्यात :)
स्ट्रॉबेरी सिरप खुपच मोहक दिसत आहे (एकदम इन्व्हायटिंग) :)
मेपल सिरप किंवा मध + थोडी पिठीसाखर भुरभुरून ही खायला छान लागेल :)
10 Jan 2012 - 11:10 pm | उदय के'सागर
@गणपा : अहो 'स्वारी' काय त्यात .. तुम्हि म्हणताय ते अगदी खरयं .. पॅनकेक हा 'टिपीकल पॅनकेक' साऱ़खा फुगला नव्हताच... खुप प्रयोग करुनहि शेवट्पर्यंत फुगतच नव्हता मग शेवटी म्हटंलं ह्या प्रयोगांमधे मी गरम - गरम पॅनकेक खाण्याचं मिस करतोय... पण पुढच्या वेळेस नक्कि करेन 'टम्म' फुगलेले पॅनकेक :) .....
धन्यवाद मनमोकळा / खरा प्रतिसाद दिल्याबद्दल :)
@ सानिकास्वप्निल : दाद दिल्याबद्दल आणि 'मध + पिठीसाखर भुरभुरण्याच्या' सजेशन बद्दल धन्यवाद :) पुढच्या वेळेस नक्कि करुन बघेन..
10 Jan 2012 - 9:06 pm | निवेदिता-ताई
छानच.........
11 Jan 2012 - 12:53 pm | सुहास झेले
लई भारी... :) :)
11 Jan 2012 - 8:25 pm | प्राजु
पॅन केक बसला वाट्टं.
सिरप छप्पर्फाड एकदम!! :)
मॅक डी मध्ये ब्रेकफास्ट केक मध्ये मेपल सिरप सोबत देतात पॅन केक्स ते आठवले.
मी घरी सरळ बेट्टी क्रॉकर चे पॅन केक मिक्स आणून पॅन केक करते आणि मेपल सिरप सोबत खाते. :)