समीकरणे

यश पालकर's picture
यश पालकर in जे न देखे रवी...
22 Dec 2011 - 4:50 pm

सोडवत आहे एकरेषीय समीकरणे
प्रतलावरती मांडुनी सुखदु:खाचे अक्ष
स्थापिला बिंदू स्वःतचा
सोबतिला जरी असतिल अनेक

बिंदूमधील अंतरे नात्याची
काही जवळ तर काही दूरची
निघाल्या रेषा कापण्यास ही अंतरे
सुखदु:खाच्या अक्षांना छेदीत

बदलत्या नशीबासोबत बिंदूही सरकत आहे
कधी पुढे-मागे कधी वरती-खालती
असेच करता करता सुटतील समीकरणे
उरतील हाती सुखदु:खाच्या किंमती

यशवंत

सुभाषिते

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

22 Dec 2011 - 5:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

बदलत्या नशीबासोबत बिंदूही सरकत आहे
कधी पुढे-मागे कधी वरती-खालती
असेच करता करता सुटतील समीकरणे
उरतील हाती सुखदु:खाच्या किंमती

हे छान जमले आहे. पण कां कुणास ठाऊक, अपुरी वाटते ती कविता!!

मलाही तसेच वाटले होते
पुन्हा एकदा थोडा बदल करून
सूचनेबद्दल धन्यवाद ...

सोडवत आहे एकरेषीय समीकरणे
प्रतलावरती मांडुनी सुखदु:खाचे अक्ष
स्थापिला बिंदू स्वःतचा
सोबतिला जरी असतिल अनेक

बिंदूमधील अंतरे नात्याची
काही जवळ तर काही दूरची
निघाल्या रेषा कापण्यास ही अंतरे
सुखदु:खाच्या अक्षांना छेदीत

गवसतील तेव्हा रेषांना
कधी कोन काटकोन त्रिकोण
आणि बदलून जाईल नशीब
मिळेल जेव्हा नवी दिशा नवा दृष्टीकोन

बदलत्या नशीबासोबत बिंदूही सरकत आहे
कधी पुढे-मागे कधी वरती-खालती
असेच करता करता सुटतील समीकरणे
उरतील हाती सुखदु:खाच्या किंमती

यशवंत

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

22 Dec 2011 - 5:28 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आता पूर्ण वाटतेय.
मस्त झालीये रचना.
पु.ले.शु.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Dec 2011 - 5:30 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या कवितेचे सुगम मराठी भाषांतर कुठे वाचायला मिळेल ?

यश पालकर's picture

22 Dec 2011 - 6:24 pm | यश पालकर

ह्या कवितेचे सुगम मराठी भाषांतर कुठे वाचायला मिळेल ?
म्हणजे काय समझल नाही

इंटरनेटस्नेही's picture

22 Dec 2011 - 6:32 pm | इंटरनेटस्नेही

सदर कविता वाचुन मी इयत्ता दुश्ली - अ वर्ग- आय. ई. एस. मराठी माध्यम शाळा, पवई येथे पुन्हा एकदा अ‍ॅडमिशन घेण्यासाठी चाललो आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Dec 2011 - 10:49 pm | अत्रुप्त आत्मा

:-)