कमी बिया असलेली मध्यम किंवा मोठी वांगी.
तांदळाचे पिठ २ ते ३ चमचे
चवीपुरते मिठ
हळद पाव चमचा
मसाला १ चमचा
तळण्यासाठी तेल
१) वांगी धुवून त्याच्या गोल थोड्या पातळ चकत्या पाडायच्या.
२) चकत्यांवर मिठ, हळद, मसाला टाकायचे.
३) थोडेसे पाणी शिंपडून जिन्नस चांगले कापांवर एकजीव करायचे.
४) एका डिश मध्ये तांदळाचे सुके पिठ घेऊन त्यात हे काप घोळवायचे.
५) तवा चांगला तापवून, तेल सोडून हे काप मध्यम आचेवर तळायचे.
६) हे लगेच शिजतात त्यामुळे ३-४ मिनीटांनी उलट करून परत थोडे तेल तव्याभोवती सोडायचे व थोडा वेळ शिजून द्यायचे.
झाले तय्यार तळलेल्या वांग्याच्या तुकड्या :हाहा: म्हणजे वांग्याची भजी हो.
अधिक टिपा:
तांद्ळ्याच्या पिठाच्या ऐवजी बेसनही वापरतात.
तेल आधीच जास्त घालू नका कारण तांदळाचे पिठ तेल लगेच शोषून घेते.
भाकरी व चपाती बरोबर एकदम छान.
लहान मुलांना आवडतात
प्रतिक्रिया
3 Dec 2011 - 2:28 am | चिंतामणी
कमी बिया असलेली मध्यम किंवा मोठी वांगी.
हिरव्या सालीची लाब वांगी मिळाली तर ती सगळ्यात चांगली
२) चकत्यांवर मिठ, हळद, मसाला टाकायचे.
३) थोडेसे पाणी शिंपडून जिन्नस चांगले कापांवर एकजीव करायचे.
जरूरी नाही पाणी शिंपडायची. वांगी ताजी असतील तर पाणी सुटते.
भाकरी व चपाती बरोबर एकदम छान.
हा हा हा. अजून काही गोष्टींबरोबरसुद्धा फारच छान लागते. (किंवा असे म्हणू शकता "ह्या बरोबर इतर काही गोष्टीसुद्धा छान लागतात.;) ;-) :wink:)
आता माझी भर घालतो. बेसन वापरु नये. त्या पेक्षा थालिपीठाची भाजणी वापरावी. जास्त खूसखूशीत आणि चवीष्ट होतात
3 Dec 2011 - 2:44 am | प्राजु
हो
त्या पेक्षा थालिपीठाची भाजणी वापरावी. जास्त खूसखूशीत आणि चवीष्ट होतात>>>
आणि रव्यामध्ये घोळवली तर कुरकुरीतहि होतात.
3 Dec 2011 - 12:30 pm | सानिकास्वप्निल
आणी ज्वारीच्या पीठात घोळवली तर चुरचुरीत होतात :)
बाकी काप एकदम सही दिसत आहे जागुतै :)
3 Dec 2011 - 4:18 am | गणपा
आमच्या घरी आई थोडं हिरवं वाटण आणि मीठ मसाला लावते. वरुन तांदळाचं पीठ ते नसल्यास रव्यात घोळवून तळते.
मी मात्र शक्यतो कसलही आवरण लावायचं टाळतो. मसाल्यात मुरवलेली वांगी सरळ थोड्या तेलावर शॅलो फ्राय करतो.
भात + दह्याची कढी + सोबतीला वांग्याचे काप (लिंबू मारके) + दुपारची डुलकी = स्वर्ग. :)
3 Dec 2011 - 9:06 am | चिंतामणी
अरे हो. माझ्या प्रतिसादात हे लिहायचे विसरलो होतो.
लिंबु पिळल्याने पाण्याची गरज पडत नाही असे लिहायचे होते.
आठवण केल्याबद्दल धन्यु.
3 Dec 2011 - 4:22 am | सुहास झेले
मस्त !!!
माझी आई वांग्याला हलका मसाला लावून तव्यावर असंच शिजवते... कोथिंबीर, शेंगदाणे, मिरची/लाल तिखट, आलं-लसणाची पेस्ट आणि बेसन असा मसाला असतो.
पोळीसोबत खाताना जबरा लागतात :) :)
3 Dec 2011 - 10:00 am | प्रभाकर पेठकर
अत्यंत आवडते काप....
माझ्या व्यक्तिगत आवडीनुसार हळद, तिखट, मीठ आणि चिंचेचा कोळ एवढेच जिन्नस वापरून काप अर्धा तास मुरवायचे.
नंतर तांदूळाचे पिठ लावून कमी तेलावर परतायचे.
गरम गरमच खायचे.
3 Dec 2011 - 12:10 pm | पिंगू
माझा अतिशय आवडता पदार्थ. जरा शिळी भाकरी आणि वांग्याचे तळलेले काप म्हणजे स्वर्गीय खादाडी...
- पिंगू
3 Dec 2011 - 12:47 pm | जागु
अरे वा मलाही बर्याच टिप्स मिळाल्या. धन्यवाद सगळ्यांचे.
3 Dec 2011 - 2:50 pm | इरसाल
जागुताई मस्त चविष्ट. हे करून पाहावे लागेल.
पण मला मात्र बेसनात घोळवून तळलेली वांगी भजीच आवडते.
3 Dec 2011 - 6:01 pm | jaypal
सुरण अथवा बटाट्याचे काप देखिल चविष्ट लागतात. ;-)
3 Dec 2011 - 7:19 pm | यकु
पाकृ अत्यंत आवडल्या गेली आहे.
:) :) :)
3 Dec 2011 - 8:07 pm | इंटरनेटस्नेही
आय सुपरलाईक.
3 Dec 2011 - 10:27 pm | निवेदिता-ताई
मस्तच ग ताई
3 Dec 2011 - 10:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्तच.
-दिलीप बिरुटे
3 Dec 2011 - 11:31 pm | अत्रुप्त आत्मा
पहिला वांग्याचा फोटो पाहुनच मन काय प्रसन्न झाले...आणी पुढे तर..नहेले पे देहेला. वाह लाजवाब :-)
4 Dec 2011 - 2:13 am | रेवती
सगळ्यांचा आवडता पदार्थ.
सुरणाचे किंवा लाल भोपळ्याचेही काप करतात असे ऐकून आहे.
सगळा स्वयंपाक झाल्यावर, पोळ्या झाल्यावर तव्यावर आई हे काप भाजते.
बाकीची आवराआवर होईपर्यंत ते चांगले भाजले जातात.
हे दृष्य डोक्यात पक्के बसले आहे.
4 Dec 2011 - 3:33 am | Mrunalini
माझी आवडती पाकृ... :) मस्त दिसतायत भजी...
4 Dec 2011 - 10:03 am | जाई.
मस्त
6 Dec 2011 - 1:22 pm | गौरी१२
माझा सगळ्यात आवडता "काप" प्रकार म्हणजे वांग्याचे काप ..... :)
आमच्या घरी रोज काप प्रकरण चालू असते .... मी बर्याच भाज्या खात नाही म्हणून आई भाज्यांचे काप बनवते .... बटाट्याचे, वांग्याचे, सुरणाचे, कारल्याचे, दुधीचे आणि केळयाचे.... :) मस्त चविष्ठ लागते !!!