सोल्ट डो वॉल हेन्गिंग आणि क्ले आर्ट!!

पूनम ब's picture
पूनम ब in कलादालन
9 Nov 2011 - 10:40 pm

काल सोल्ट डो पासून वॉल हेन्गिंग बनवले. आधी या पद्धती बद्दल माहिती नव्हती. इंटरनेट वर या पद्धतीची माहिती मिळाली.ख्रिसमस साठी सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी याचा उपयोग करता येतो असे कळले. त्यातून मला वॉल हेन्गिंग ची कल्पना सुचली. :) कणिक बनवणे खूपच सोपे आहे आणि सोल्ट डो वर काम करायला खरेच खूप मजा येते.


मी वापरलेले प्रमाण:
२ कप गव्हाचे पीठ
१ कप मीठ
१ कप पाणी
कणिक घट्ट माळून घ्यावी आणि बनवलेल्या वस्तू ओव्हन मध्ये १५०-२०० डिग्री फेरेनाएत वर ३-४ तास बेक करावे. थंड झाल्यावर अक्रालिक रंगानी रंग द्यावा.

ओवेन मध्ये बेक करण्याआधीचे वॉल हेन्गिंग..

वेलकम वॉल हेन्गिंग

फोटो फ्रेम

रंगीत मातीपासून काही डॉल बनवल्या..पहिलाच प्रयत्न होता..त्यामुळे एवढ्या सुबक नाही बनल्या..समजून घ्या.. ;)

कला

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

9 Nov 2011 - 11:09 pm | अन्या दातार

तुम्हाला वेळ कधी मिळतो हो हे सगळे प्रकार (पक्षी उपद्व्याप ;) ) करायला? इथे साधा चहा करुन प्यायचेही जीवावर येते माझ्या.

मला खूप आवडते हो अशा गोष्टी बनवायला.. त्यामुळे जमेल तसा वेळ काढते मी..:)

पियुशा's picture

10 Nov 2011 - 10:42 am | पियुशा

ए पुनम तै
मला पण अशा वस्तु बनवायला आवड्तील ,माझ्याकडे कलर्स आहेत पण
बेक करायला ओव्हन नाहिये मग बेक करन्याकरिता काही दुसरे ऑप्शन आहे का?
प्लिज सान्ग :)

प्रचेतस's picture

10 Nov 2011 - 10:55 am | प्रचेतस

भट्टी लावा.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Nov 2011 - 2:10 pm | अत्रुप्त आत्मा

@-भट्टी लावा.
--^-- --^-- --^--

बेक करण्यासाठी मला दुसरा ऑप्शन सुचत नाही आहे :( पण तुम्ही रंगीत माती पासून अशा कलाकृती बनवू शकता..मातीला आकार देणे हि सोपे जाते आणि वेळ पण कमी लागतो..:)

वपाडाव's picture

10 Nov 2011 - 11:38 am | वपाडाव

एखाद्या भांड्यात ठेवुन तंदुरमध्ये सोडुन द्या....
अर्ध्या तासात मस्त बेक होउन बाहेर येतील....
तंदुर ही प्रत्येक कोपर्‍यावरच्या हाटेलात असते....

५० फक्त's picture

10 Nov 2011 - 2:51 pm | ५० फक्त

ओ नगरच्या ना तुम्ही मग हुरड्याला लावतेत तसली आगटी टाका की एखादी, तुमच्या पॅक्टरीत असेलच की एकादी भट्टी.

@ ५० फक्त
तुमच्या पॅक्टरीत असेलच की एकादी भट्टी.

नै ओ भट्टी असायला ही काय फॉण्ड्री नाय ,चकाचक एक्ष्पोर्ट कुम्पनि हाय
हुरड्याला लावतेत तसली आगटी लावायला टाईम हाये अजुन ;)
@ वल्ली अन व प्या धन्स बर्र का ;) लय मोलाची माहिती दिलीत

व्हाल काय माय करो मध्ये भाजता का काय मग ?

बरं उग अवांतर नको, ते हुरडा पार्टीचं कधी जमवताय ते बोला. उगा गमजा नको.

अवांतर - हुरडा पार्टीला प्रत्यक्ष बोलवावे, उगा बॅचलर हुर्डा असले धागे काढु नयेत ही न मर विनंती.,

रेवती's picture

10 Nov 2011 - 12:05 am | रेवती

मला नवरीमुलगी आवडली.

सुहास..'s picture

10 Nov 2011 - 3:58 pm | सुहास..

मला नवरीमुलगी आवडली. >>

कोणासाठी ?

ओव्हनचा नविनच उपयोग शिकलो आज. धन्स पूनमताय.

बाकी ओव्हनचा उल्लेख फक्त पाककृतीमध्येच बघायचो..

- पिंगू

मदनबाण's picture

10 Nov 2011 - 8:47 am | मदनबाण

पिंगूशी सहमत... :)

प्रीत-मोहर's picture

10 Nov 2011 - 10:12 am | प्रीत-मोहर

मस्तच ग... पिंगु न मबा शी सहमत

परिकथेतील राजकुमार's picture

10 Nov 2011 - 11:35 am | परिकथेतील राजकुमार

कला आहे हो पोरीच्या हातात :)

आवडल्या गेले आहे एकदम.

अवांतर :- ख्रिसमस साठी सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी ज्याचा उपयोग करता येतो, त्याचा उपयोग करून गणेशभक्ती करताना तुम्ही इतरधर्मीयांच्या भावना दुखावल्यात असे तुम्हाला वाटत नाही का ?

परा फर्नांडीस

वपाडाव's picture

10 Nov 2011 - 11:38 am | वपाडाव

ये अलीबाबा की पोटली मे से क्या क्या निकलरेला बावा !!!
लैच कलाकार बै तुम्ही...
काहीतरी नविन घेउन येताव...
आपल्या मेहनतीला, संयमाला सलाम.....
(च्यायला किती फुकट आहे ही !!! ;) )

सुहास झेले's picture

10 Nov 2011 - 11:42 am | सुहास झेले

सुंदर... अप्रतिम कलाकृती आहेत :) :)

मोहनराव's picture

10 Nov 2011 - 2:51 pm | मोहनराव

तुमच्या कलेला आपला सलाम!!

गणेशा's picture

10 Nov 2011 - 4:07 pm | गणेशा

अप्रतिम ....

पैसा's picture

10 Nov 2011 - 7:56 pm | पैसा

पण ३-४ तास बेक करावे म्हटल्यावर जरा.....

वाहीदा's picture

10 Nov 2011 - 8:05 pm | वाहीदा

अग्गोबाई, कित्ती गोड आहे ग तुझी कला !
पहातचं रहावसं वाटते :-)
परत एकदा लहान होऊन तुझ्या कडे भातुकली खेळायला यावसं वाटतंय ....
(कधी येऊ ?? )

परिकथेतील राजकुमार's picture

10 Nov 2011 - 8:07 pm | परिकथेतील राजकुमार

परत एकदा लहान होऊन तुझ्या कडे भातुकली खेळायला यावसं वाटतंय ....
(कधी येऊ ?? )

तुला वेगळे लहान व्हायची गरज आहे का ?

कुंदन's picture

10 Nov 2011 - 11:06 pm | कुंदन

बाहुल्या आवडल्या.
चला विकांताला दातारांकडुन कणीक घेउन येतो.

पूनम ब's picture

10 Nov 2011 - 11:18 pm | पूनम ब

धन्यवाद :) वॉल हेन्गिंग आणि फोटो फ्रेम फक्त कणिके पासून बनवली आहे..बाकी बाहुल्या मात्र रंगीत मातीपासून बनवल्या आहेत.. :)

सविता००१'s picture

13 Nov 2011 - 1:18 am | सविता००१

पूनम, सगळ्याच कलाकृती आवडल्या. मस्तच..:)

शिल्पा ब's picture

13 Nov 2011 - 5:24 am | शिल्पा ब

छान आहेत. मी सुद्धा काल दोन जोड कानातले बनवले. :)

वपाडाव's picture

14 Nov 2011 - 11:29 am | वपाडाव

फटु द्या... कोरडं वाटतंय....

अत्रुप्त आत्मा's picture

13 Nov 2011 - 2:17 pm | अत्रुप्त आत्मा

छान आहेत कलाक्रुती...आपल्याला अजुन १ कल्पना सुचवतो.खडु पासुनही असे बरेच काही करता येइल.एखाद्या मोठ्या प्लेस्टिकच्या मग मधे खडुंचा लगदा करुन भरला अणी त्याची मोठ्ठी मुद पाडली तर त्यात कोरीवकाम करुन,नंतर स्प्रे पेंटींग केलं,वरतुन पुन्हा ब्रश वापरुन रंग दिले तर तेही १ नंबर होइल ...जमल्यास करुन पहा

पूनम ब's picture

14 Nov 2011 - 1:42 am | पूनम ब

छान कल्पना आहे..नक्की करून पाहीन..:)

मीनल's picture

13 Nov 2011 - 6:58 pm | मीनल

खालून दूसरी- जाळीदार ओढणीवाली आवडली.

आत्मशून्य's picture

14 Nov 2011 - 5:06 am | आत्मशून्य

क्लेअ‍ॅनीमेशन बघायला जिवावर यायचं, थॅग्वाड आता थ्रीडीने त्याची जागा घेतली ते, पण आपण केलेलं सगळ मस्त दीसतय.

चित्रा's picture

14 Nov 2011 - 5:19 am | चित्रा

फार गोड जमल्या आहेत.

प्राजु's picture

14 Nov 2011 - 8:28 am | प्राजु

क्लास!