!! पेढे !!

मराठमोळा's picture
मराठमोळा in पाककृती
6 Nov 2011 - 6:41 am

नमस्कार मंडळी,

गोडघाशा मिपाकरांसाठी ही एकदम सोपी पण वेळखाऊ पाककृती आमच्या सौंकडून साभार. ईकडे खवा मिळत नाही, त्यामुळे ह्या प्रकारे पेढे बनवले.

चला तर मग घ्या साहित्य.

१. रिकोटा चीज (२५० ग्रॅम)
२. स्वीटनड् कंडेंसड् मिल्क (१५० ग्रॅम)
३. बदाम ७-८ (पावडर करुन)
४. वेलची (३-४ बारीक वाटून)
५. स्कीम मिल्क पावडर ४ मोठे चमचे (नाही टाकली तरी चालेल)

यात साखर घालण्याची अजिबात गरज नाही. :)

रिकोटा चीज आणि कंडेंस्ड मिल्क

कृती:

१. एका कढईमधे रिकोटा चीज आणि कंडेंसड मिल्क एकत्र करुन घ्या.
२. गॅस शन्क्य तितका कमी ठेवा. आणि अधून मधुन मिश्रण ढवळत रहा. म्हणजे खाली लागणार नाही. थोडं जरी जळालं तरी पेढ्यांना जळका वास येतो, त्यामुळे काळजी घ्या.

३. साधारण तासभर लागेल मिश्रण चांगलं एकजीव आणि घट्ट व्हायला. मिश्रण घट्ट होत आलं की यात बदाम, वेलची, केसर, आणि स्किम मिल्क पावडर घाला.

४. पुन्हा एकदा चांगलं एकजीव करुन घ्या.
५. मिश्रण घट्ट झालं की गॅसवरुन खाली उतरवून घ्या. हे असं दिसेल.

६. हाताला थोडं तुप लावून हव्या त्या आकारात पेढे बनवा. अतिशय सुंदर आणि रवाळ पेढ्यांचा आस्वाद घ्या.

आपला,
मराठमोळा

प्रतिक्रिया

फोटू छान आलेत.
मायक्रोवेव्हची पेढे पाकृ माहित आहे काय?
नऊ मिनिटात होतात पण हे असे रवाळ नाहीत. तुळतुळीत होतात.;)
तुम्ही केलेले दिसायला जास्त चांगले वाटताहेत.

मराठमोळा's picture

7 Nov 2011 - 5:07 am | मराठमोळा

>>मायक्रोवेव्हची पेढे पाकृ माहित आहे काय?

हो रेवती ताई, ती रेसेपी माहित आहे, पण ही जरा वेगळ्या पद्धतीने करुन पाहिली.
चांगले लागतात हे "लाडु" कम पेढे ;)

असो, शेवटचा फोटो खुपच क्लोज अप मधे घेतल्याने आकार मोठा वाटत आहे. :)

पैसा's picture

6 Nov 2011 - 7:54 am | पैसा

मस्त दिसतायत! वेगळी साखर न घातल्यामुळे चांगले लागत असणार.

पिवळा डांबिस's picture

6 Nov 2011 - 9:09 am | पिवळा डांबिस

पेढे म्हणून काढलेला धागा लाडवात संपलेला बघून खेद झाला!!!
बाकी रिकोटा चीज + कन्डेन्सड मिल्क = खवा या समीकरणाचाच खेद झाला....
:(
बाकी "इथे" ही होल मिल्क आणून त्याचा खवा बनवता येतो. फक्त वेळ, श्रम आणि निष्ठा आवश्यक असतात, इतकंच!!!! :)

सॉरी ममो! काहीतरी पॉझिटिव्ह लिहावं म्हणूनच हा वनितामंडळ धागा उघडला होता, पण निराशा झाली........
पुलेशु....

निवेदिता-ताई's picture

6 Nov 2011 - 3:53 pm | निवेदिता-ताई

असेच म्हणते.....

मराठमोळा's picture

6 Nov 2011 - 4:32 pm | मराठमोळा

पिडा,

सगळं एक्स्प्लेनेशन/प्रत्त्युत्तर दिले असते पण धाग्याचा खरडफळा नको म्हणून फक्त धन्यवाद म्हणून थांबतो.बाकी "वनितामंडळ धागा" यातच सगळ आलं.
असो,
सगळ्या भावना पोहोचल्या आणि त्या इतरांच्याही लक्षात आल्या असतीलच.

पुन्हा एकदा धन्यवाद!!!!

( पुर्ण विचार केल्याशिवाय लगेच सहमतीची मेंढरं का येतात मागे?)

शिल्पा ब's picture

7 Nov 2011 - 10:55 am | शिल्पा ब

तुझ्या बायकोने नै ना वाचला धागा अजुन? ;)

मराठमोळा's picture

11 Nov 2011 - 2:53 pm | मराठमोळा

वाचला ना.. अगदी आवर्जून..
तिला मिपा प्रकार माहित नाही ना.. म्हणाली की पुन्हा पाकृ प्रकाशित करु नकोस.

आता काय बोला

शेवटुन दुसरा फोटोच जास्त बरा आहे, आता इथं घोडकेंकडं जाणं आलं नाईलाजानं.

इंटरनेटस्नेही's picture

6 Nov 2011 - 2:17 pm | इंटरनेटस्नेही

चला आता इथे रिकोटा चीज कुठे मिळतं ते शोधणं आलं.... ;)

-
(मी मुंबईकर) इंट्या.

किचेन's picture

6 Nov 2011 - 5:11 pm | किचेन

पेढे नाहि लाडु वाटतायत!
पण जिभ चाळवलीत.

सुहास झेले's picture

6 Nov 2011 - 5:36 pm | सुहास झेले

सही... !!

कोणी लाडू म्हणो का कुणी पेढे. आपल्याला जाम आवडलीय ही रेसीपी.

रिकोटा चीज वापरण्यामागे काही खास कारण? दुसरं कुठलं चीज नाही का चालणार? नसेल तर रिकोटा चीज शोधावं लागेल ;-)

मराठमोळा's picture

7 Nov 2011 - 5:10 am | मराठमोळा

सुहास,
रिकोटा हे ईतर चीज सारखं नसतं, हे वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं
अधिक माहिती विकिपेडियवर बघता येईल - http://en.wikipedia.org/wiki/Ricotta

:)

सुहास झेले's picture

7 Nov 2011 - 10:21 am | सुहास झेले

व्वा व्वा... धन्स ममो :) :)

मी-सौरभ's picture

6 Nov 2011 - 11:11 pm | मी-सौरभ

आम्हा पुण्या मुंबईकडच्या लोकांना रिकोट्टा शोधाव लागत नाही हे कित्ती चान चान आहे ना ;)

घोडके, मिश्रा, चितळे आहेत ईथे

मायला पुण्यामुंबईत रिकोटा चीज शोधताहेत लेकाचे. अस्सल खवा सोडून रिकोटाच्या मागे धावायचे कारणच काय..

बाकी ममो पाककृती आवडली.

- पिंगू

मराठी_माणूस's picture

7 Nov 2011 - 9:02 am | मराठी_माणूस

अस्सल खव्याची हमी काय ? म्हणून शोधत असतील

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 Nov 2011 - 2:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे

दुध विकत आणून बनवता येईल की खवा. आत्ता दुध अस्सल असेल याची हमी काय असे विचारलं तर ममोला पेढ्यांसाठी गोठ्यापासून सुरुवात करावी लागेल ;-)

ममो, एक बेसिक प्रश्न, रिकोटा वापरले त्यात काही गैर नाही, पण खवा पण तयार करू शकला असतास की. हे लक्षात नाही आले की कंटाळा केलास ? :-)

मराठमोळा's picture

11 Nov 2011 - 2:45 pm | मराठमोळा

>> रिकोटा वापरले त्यात काही गैर नाही, पण खवा पण तयार करू शकला असतास की. हे लक्षात नाही आले की कंटाळा केलास ?

विमे,
एक बेसिक प्रश्न? तसे तर मग पेढे तयार पण मिळतात.
खवा तयार करायचे कष्ट कशाला उपसायचे?

घरात चपाती/पोळी बनवण्यासाठी गहू आपण लगेच पेरायला घेत नाही ना. ;)
एखादी रेसिपी नव्या पद्धतीने करुन बघण्यास काय हरकत आहे?

"इकडे" - परा म्हणतो त्याप्रमाणे "ईकडे" म्हणावं लागतयं खरं पण इकडे दुधाला साय पण येत नाही, त्याचा खवा तो काय बनणार?
असो,
एकदा ये आणि पेढे खाऊन पहा.. मग हे असं बोल. ;)

सुहास झेले's picture

7 Nov 2011 - 9:59 am | सुहास झेले

मायला चितळे किती दिवस पुरणार आपल्याला...आपली सोय स्वतः करायला नको काय? ;) :D

मदनबाण's picture

7 Nov 2011 - 10:43 am | मदनबाण

पेढे असो वा लाडू... किंवा लाडू कम पेढा... किंवा पेढा उर्फ लाडू... जे काय हाय ते आपल्याला आवडलं. ;)

(रबडी प्रेमी) ;)

चिरोटा's picture

7 Nov 2011 - 7:13 pm | चिरोटा

मस्त पाकृ. गोड पदार्थांच्या पाकृ नेहमीच मस्त असतात. रिकोटा चीज मुळचे ईटालियन हे कळले.
भारतिय पदार्थ परदेशी घटक वापरुन बनवले तर असे हे होते! पेढ्याचा लाडू. म्हणून अस्सल भारतिय पदार्थच बरे.
(सोनियाप्रेमी) चिरोटा

स्पंदना's picture

8 Nov 2011 - 6:37 am | स्पंदना

एक तास ?? म्हणजे दोघांनी मिळुन केले असावेत.

धन्य हो तुमची मालकिन.

मराठमोळा's picture

11 Nov 2011 - 2:49 pm | मराठमोळा

अपर्णा ताई,
हे तुमच्या साठी बनवले होते हो ;)

आता तुम्हीच सांगा.. पेढे होते की लाडू? :)

ममो.. या रेसिपीचे पेढे सुंदर होतात. मी केले आहेत. मात्र यात स्किम्ड् मिल्क पावडर न घालता साधीच मिल्क पावडर घातली होती.

तुझ्या पेढ्यांचा रंगही छान आला आहे.
सुंदर!! :)

तिमा's picture

10 Nov 2011 - 5:07 pm | तिमा

लोकांच्या बोलण्यावर जाऊ नका हो. मी एक उचलून खाऊन बघितला. मस्त चव आहे!

परिकथेतील राजकुमार's picture

10 Nov 2011 - 6:54 pm | परिकथेतील राजकुमार

तू खाल्लेना आनंदाने ? झाले तर मग :)

ते जे काय दिसतय ते लै भारी दिसतय. आपल्याला आवडले बॉ !

ईकडे खवा मिळत नाही

हे एखाद दिवशी तू लिहीशील असे वाटले नव्हते.

असो...

भारत माता की जय ;)

मराठमोळा's picture

11 Nov 2011 - 2:47 pm | मराठमोळा

>>तू खाल्लेना आनंदाने ? झाले तर मग

हे तर खरंच रे परा.

>>हे एखाद दिवशी तू लिहीशील असे वाटले नव्हते.
काळ बदलतो, आपणही बदलावं. ;)

मिपा नाही का बदललं? ;)

भारत माता की तर नेहमीच जय!!

परिकथेतील राजकुमार's picture

11 Nov 2011 - 4:43 pm | परिकथेतील राजकुमार

काळ बदलतो, आपणही बदलावं.

मिपा नाही का बदललं?

अतिशय भिकारचोट प्रतिसाद ;) येवढ्यात पुप्याला भेटला होतास का काय ? ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

12 Nov 2011 - 11:33 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>मिपा नाही का बदललं?
बदलले तर. काही नवीन सभासद आले. काही जुने सोडून गेले. काही सोडून जाणार असा डांगोरा पिटून पण इथेच आहेत ;-)

रीकोटा चिझ पेक्षा ही ताज्या पनीर चे पेढे छान होतात. दूधात विनेगर घालून केलेले पनिर छान बनते.
इथे हि खवा मिळत नसल्याने आमच्या घरी इथली रेसिपी वापरली जाते -
http://www.youtube.com/watch?v=D3cDZAVeeak रीकोटा पेढ्यांपेक्षा ह्याची चव खूपच छान आहे.
देवाला पेढ्यांचा नैवेद्य दाखवायचा असेल आणि त्यामुळे प्रसादात प्राणिज पदार्थ चालत नसतील तर रिकोटा चिझ वापरू नये. कारण त्यात रिनेट (renet) असते.