Ginger चिकन

मराठमोळा's picture
मराठमोळा in पाककृती
2 Nov 2011 - 3:33 pm

नमस्कार मंडळी,

दिवाळी संपली, फराळही संपला. म्हंटल एखादी झणझणीत आणि आवडती डिश हाणुया. :) आता गणपा महाराजांसारखा स्टेप बाय स्टेप पाककृती समजावण्याईतका माझा पेशंस नाही, पण तरी एक छोटासा प्रयत्न करतोय.
जिंजर चिकन ड्राय हा माझा फार आवडता प्रकार आहे.

साहित्यः
१. लाल तिखट - सकाळी ऑफिसला जायचे आहे की नाही त्याप्रमाणे.
२. तेल - पोटाच्या घेरानुसार
३. मीठ - ब्लड प्रेशर नुसार
४. कांदा मध्यम - शक्यतो पांढरा (कमी उग्र असतो म्हणून, शक्य तितका बारीक चिरून)
५. आले - खालच्या चित्रावर फुटपट्टी लावून ईंच मोजुन घ्या. सढळ हस्ते वापर करा.
६ गरम मसाला - खुप गरम पडणार नाही याचा विचार करुन त्यानुसार (खडा मसाला नको)
७. बोनलेस चिकन - पाव किलो
८. सुके खोबरे - ऑप्श्नल (मला आवड्तं म्हणून टाकतो)
९. पुदीना - ऑप्शनल

कृती:
१, कढईत तेल तापवून घ्या.
२. तेल तापले की चिमुटभर हिंग टाकून कांदा परतायला घ्या. ("हिंग डाला जाता है, तेल का जायका बढाने के लिये, तेल डाला जाता है प्याज का जायका बढाने के लिये, और प्याज डाला जाता है खाने का जायका बढाने के लिये" - ओळखा हे वाक्य कोणत्या सिनेमातलं आहे ते?)
३. कांदा चांगला परतला गेला की त्यात लाल तिखट आणि गरम मसाला टाकून घ्या. यातच आले, खोबरे, पुदीना टाका. आले किसुन टाका, पेस्ट किंवा वाटलेले आले नको.
४. मंद आचेवर थोडा वेळ परता, आता यात चिकनचे बारीक केलेले तुकडे टाका. (त्या भिकारड्या हॉटेलवाल्यांसारखे आधी कुकरमधुन शिजवुन त्यातल सुप पिऊन उरलेला चोथा टाकु नका.)

५. मीठ घाला. बोनलेस आणि बारीक तुकडे असल्याने लवकर शिजेल चिकन. हवेतर थोडं पाणी घालून शिजवा.
६. शक्य तितके कोरडे बनवण्याचा प्रयत्न करा.
७. सजावट करा आणि आपल्या आवडत्या पेयाबरोबर आस्वाद घ्या. ;)

आपला,
मराठमोळा

प्रतिक्रिया

पियुशा's picture

2 Nov 2011 - 4:15 pm | पियुशा

मस्त मस्त :)

चैत्रपालवी's picture

2 Nov 2011 - 4:36 pm | चैत्रपालवी

मस्त आहे जिन्जर चिकन. यम्मी दिसतंय

गणपा होण्याच्या मार्गावर अजून एकजण निघाला आहे.;)
(एखाद्याचा 'गणपा' होणे म्हणजे बल्लव होणे हे समजण्यास अवघड जाऊ नये.)
साहित्य हे डॉक्टरांनी दिलेल्या पथ्यपाण्याच्या लिष्ट सारखे वाटते आहे.
शेवटचा फोटू छान पण आम्ही शाखारी.;)

जाई.'s picture

2 Nov 2011 - 6:31 pm | जाई.

मस्त

सोना-शार्वील's picture

2 Nov 2011 - 7:06 pm | सोना-शार्वील

लगेच करुन बघते

स्वाती२'s picture

2 Nov 2011 - 7:08 pm | स्वाती२

यम्मी! लेकाला करता येइल.

कच्ची कैरी's picture

2 Nov 2011 - 7:39 pm | कच्ची कैरी

रेसेपी मस्त आहे
ती बाजुला भाजी कापण्याची सुरी का ठेवली आहे ?

पूनम ब's picture

2 Nov 2011 - 7:48 pm | पूनम ब

खूपच छान..आज च करून बघते :)

पैसा's picture

2 Nov 2011 - 9:13 pm | पैसा

हा पदार्थ क्रिस्प व्हायला सुरुवात झालीय!

(परवाचे पेढे सुद्धा लक्षात आहेत. त्यांची कृती कधी?)

मराठमोळा's picture

4 Nov 2011 - 3:39 pm | मराठमोळा

>>परवाचे पेढे सुद्धा लक्षात आहेत. त्यांची कृती कधी?)

नक्की.. पुन्हा करणार आहे त्यामुळे लवकरच.. :)

सुहास झेले's picture

3 Nov 2011 - 2:18 am | सुहास झेले

वाह वाह... तोंडाला पाणी सुटले :) :)

वा... मस्त आहे पाकॄ.... एकद नक्की करुन बघते.

मोहनराव's picture

3 Nov 2011 - 12:30 pm | मोहनराव

या विकांतला हेच करावे म्हणतो!!

गणपा's picture

3 Nov 2011 - 1:05 pm | गणपा

माताय! रामप्रहरी धागा उघडुन उगा भुक चाळवली.

कच्चा पापड पक्का पापड's picture

4 Nov 2011 - 9:56 am | कच्चा पापड पक्क...

मस्त !!! करायला पण सोपी वाटत आहे.

कारभारी's picture

11 Nov 2011 - 3:47 pm | कारभारी

नाद खुळा..... आवडत पेय......

tanvi_javkar's picture

30 Nov 2011 - 2:26 pm | tanvi_javkar

khup chan recipe ahe