boiled veg : मटार , फ्लावर , ब्रोकोली, फरसबी, गाजर - सर्व भाज्या चिरुन पाण्यामधे boil करुन घेणे.
पाण्यात boil करताना थोडा सोडा घाला. भाज्यांचा रंग चांगला राहतो.
french Fries : बटाटे सोलुन लांब लांब कापुन तेलात तळुन घेणे. नंतर त्याला थोडे मीठ लावणे.
पनीर चे तुकडे पण तळुन घेणे.
राईसः प्रथम भात मोकळा शिजवुन घेणे. मिक्सर मधे एक tomato , अर्धा कांदा , २ /३ लसुण पाकळ्या, थोडे आलं यांची पेस्ट करणे. एका pan मधे तेल गरम करुन त्यात हि तयार केलेली पेस्ट परतुन घेणे . चवीपुरते मीठ व थोडे तिखट घालणे.
नंतर त्यात चीझ किसुन घालणे. चीझ मेल्ट झाले की गार झालेला राईस घालुन परतुन घेणे.
Sauce ची तयारी : बारीक चिरलेला लसुण , आल, कांदा, मशरुम ,सिमला मिर्चि लांब कापलेली,सोया Sauce, व्हीनेगर, तिखट , cornflour ची पेस्ट.
Sauce तयार करायच्या आधी सिझलर प्लेट gas वर गरम करायला ठेवावी.
दुसर्या gas वर pan मधे प्रथम तेलावर आधी बारीक चिरलेला लसुण , आल परतुन घेणे. नंतर कांदा,सिमला मिर्चि व मशरुम घालुन परतणे. मग त्यात सोया Sauce, व्हीनेगर व थोडे तिखट,चवीपुरते मीठ घालणे.
आता त्यात पाणी घालुन एक उकळी आली की पनीर चे तुकडे घालणे, मग cornflour ची पेस्ट घालणे. थोडा दाटपणा आला की gas बंद करा.
आता तोपर्यंत सिझलर प्लेट चांगलीच गरम झालेली असेल. ति wooden base वर ठेवणे.
त्यावर किंचित गरम पाण्यातुन काढ्लेली कोबीची पाने ठेवावीत. मग पहिजे त्याप्रमाणे सिझलर प्लेट वर भाताची मुद, boiled veg, french Fries आणी पनीर with Sauce arrange करावा.
sizzeling सिझलर तयार.
प्रतिक्रिया
31 Oct 2011 - 9:40 pm | निवेदिता-ताई
हा प्रकार मी पाहिला आहे हॉटेलमध्ये..खाल्ला नाही अजुन.
अहाहा.....फोटो मस्तच........
31 Oct 2011 - 10:11 pm | जाई.
मस्त
तोँपासू
31 Oct 2011 - 10:18 pm | Mrunalini
मस्त. तोंपासु :)
31 Oct 2011 - 10:19 pm | इंटरनेटस्नेही
मस्त पाकृ. या पाकृची वाट बघत होतो मी.
अधिक माहिती:
हे रेडीमेड सुद्धा मिळतात... बाय गोदरेज.
1 Nov 2011 - 2:38 am | सुहास झेले
मस्त.. मला हा प्रकार खूप आवडतो :) :)
1 Nov 2011 - 7:07 am | रेवती
मला एकही फोटू दिसत नाहिये.
ही खरी प्रतिक्रिया आहे.
काय बिघाड आहे कोणास ठावूक!
1 Nov 2011 - 2:01 pm | पिंगू
आयआय.. मेलो बघूनच.. आता कुठे मिळणार हे खायला?
- पिंगू
1 Nov 2011 - 3:49 pm | सोत्रि
पुण्यात:
औन्ध :कोबे सिझलर्स
एफ सी रोड : यानाज
कल्याणी नगर : बाउंटी सिझलर्स
आणि बर्याच ठिकाणी :)
- (सिझलिंग) सोकाजी
2 Nov 2011 - 1:10 pm | मालोजीराव
योको सिझलर्स, ढोले पाटील रस्ता .....
मराठीत 'शिजलर्स' पण म्हणतो ! ;)
- मालोजीराव
1 Nov 2011 - 2:36 pm | किसन शिंदे
फोटॉ दिसत नाहीयेत.
1 Nov 2011 - 3:57 pm | कच्ची कैरी
व्वा पनीर सिझलर खायला तर मस्त मजा येइल ,करुन बघेल.
1 Nov 2011 - 5:12 pm | मोहनराव
एकही फोटू दिसत नाहिये.
1 Nov 2011 - 5:30 pm | स्मिता.
सहीच... माझा अत्यंत आवडता प्रकार आहे! व्हेज, नॉन व्हेज, कसंही आवडतं.
मस्त गरमागरम सिझलर आणि सोबत एखादं कॉकटेल किंवा आईस टी.... झकास कॉम्बिनेशन.
बंगलोरला नंदिदुर्ग रोडवर 'फाईव्ह एलिमेंट्स' नावाच्या रेस्टॉरंटात मिळणारे सिझलर्स/स्टेक आणि तिथलं कीवी ज्युस माझं पर्सनल फेवरेट!
1 Nov 2011 - 7:11 pm | सौ सेहरी एक संगमनेरी
हि पाकृ पनीर विरहित कशी करता येईल ..
2 Nov 2011 - 7:28 am | जयंत कुलकर्णी
पुण्यात वेस्टएंड शेजारी हे हॉटेल आहे. आता जी इराणी स्त्री हे हॉटेल चालवते तिच्या वडीलांपासून आम्ही येथे जात होतो. म्हणजे बघा साधरण्तः १९७० सालापासून. अजूनही कधीकधी जातो पण मला असे वाटते त्याची प्रत आता घसरली आहे. असो या बाईच्या वडीलांनी आम्हाला सिझलरची जी गोष्ट सांगितली ती अशी. या माणसाचे ( नाव आठवत नाही) मुंबईला हॉटेल होते आणि त्यात बर्यापैकी गर्दी होत असे. पण वाढून झाल्यावर अन्न कसे गरम ठेवावे याचा विचार करताना सिझलरचा जन्म झाला. हे कुटूंब नंतर पुण्यात आले व ब्रिटीशांच्या सेवेत कँपमधे रुजू झाले. त्यांच्या मेनू कार्डावरही अशीच काहीतरी हकीकत लिहिली आहे आता....पण जे सिझलर आम्ही तेथे खाल्ले तसे शप्पथ सांगतो, कुठेही खाल्ले नाहीत.
आपण दाखवलेल्या पाककृतीत सिझलींगसाठी जर बटर टाकले (घरचे पांढरे ताजे लोणी) तर सुवास आणि त्याची वाफ उडताना मस्त दिसते. तसेच आपल्याकडे बीडाचे जे तवे मिळतात ते वापरले तर सिझलर अजून मस्त होतो. पण हे करताना काळजी घेणे कारण ते फार गरम होतात. सिझलर बरोबर जी मोहरीच्या डाळीची चटणी देतात, ज्याचा झटका कधी कधी मेंदू पर्यंत जातो, ती पाहिजेच....भात थोडासा पसरून टाकावा जास्तीत जास्त भात तव्याला टेकला पाहिजे. वर थोडेसे ऑलीव्ह ऑईल पाहिजेच.....
आणि तोंड भाजल्यावर जिभेला मलमपट्टी करायला काय लागणार हे तज्ञांना सांगायला नकोच :-)
चला, आता कूठे जावे बर सिझलर खायला.................................?
3 Nov 2011 - 2:32 pm | कच्चा पापड पक्क...
कुलकर्णीसाहेब मी पण तिथे एकदा चिकन पिरीपिरी सिझलर खाल्ला होता. मस्तच होता.
पुढच्या वेळेला तुम्ही दिलेल्या टिप्स ल़क्षात ठेवेन.
2 Nov 2011 - 10:17 am | मदनबाण
मस्तच ! :)
(पनीर प्रेमी) :)
2 Nov 2011 - 7:03 pm | स्वाती२
मस्त!
3 Nov 2011 - 2:43 pm | कच्चा पापड पक्क...
प्रतिक्रियांबद्द्ल सर्वांना धन्यवाद!!!!
मी मिपा वरील दोन बल्लवांची fan आहे. १) गणपा २) सानिकास्वप्निल
पण दोघानीहि प्रतिक्रिया दिल्या नाहीत. :(
असो.
4 Nov 2011 - 12:20 am | प्राजु
जाऊदे गं.. सगळेच सेलिब्रिटीज असं करतात. त्यांना त्यांच्या फॅन्स च्या मनाची आय कल्पना येणार! ..
मस्त आहे ही पाक्रू.
:)
4 Nov 2011 - 9:36 am | कच्चा पापड पक्क...
अगदी बरोबर ............प्राजु
6 Nov 2011 - 10:16 am | पूनम ब
फोटो बघून तोंडाला पाणी सुटले..नक्की करून बघेन..:)
10 Nov 2011 - 3:33 pm | गणपा
पनीर बद्दल आमच मत काहीस राजकुमारा सारखंच आहे.
तस्मात शिर्षकात 'पनीर' पाहुन कदाचीत काणा डोळा झाला असणाची शक्यता नाकारता येत नाही. ;)
मुळात घासफुस आवडत नसल्याने कोंबडी, मासे यांचा वापर करुन पहायला हरकत नाही.
पण शेवटचा फोटोपाहुन तो च्चुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज थेट कानात रुंजी घालुन गेला.
चला आता या विकांताला सिझलर प्लेट शोधणं आलं. :)
प्रतिसाद देण्यास झालेल्या विलंबाबद्दल मंडळ अंमळ स्वारी आहे.
10 Nov 2011 - 4:21 pm | धमाल मुलगा
पनीर/भाज्या/चिकन/मटण्/हत्ती/गेंडा/माणूस...... काहीही चालेल. हे असं झक्क सिझलर असल्याशी आम्हाला मतलब. :)
कधी येऊ हादडायला? :D
10 Nov 2011 - 4:26 pm | मदनबाण
पनीर/भाज्या/चिकन/मटण्/हत्ती/गेंडा/माणूस...... काहीही चालेल.
काय रे नरभक्षक झालास इतक्या लवकर ? ;) पहिल रक्त कुठे चाखलंस बरं ? ;)
10 Nov 2011 - 7:58 pm | धमाल मुलगा
'आता' तुला ह्या गोष्टी इस्काटून सांगायच्या का राव? :D