मदतः अ‍ॅन्ड आय ड्रॉईड :)

धमाल मुलगा's picture
धमाल मुलगा in काथ्याकूट
29 Oct 2011 - 2:35 pm
गाभा: 

राम राम मंडळी!
काय मग? कशी काय झाली दिवाळी? झाले का फटाके उडवून? फराळाचं चापून गंडलेली पोटं आली का जागेवर? :D

मंडळी, हा धागा मी काढलात तो आहे मदत मागण्यासाठी. मोबाईलजगतात अगदी क्रांती म्हणता येईल अशी परिस्थिती निर्माण करणार्‍या अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीवर आमचा नुकताच जीव जडलाय बघा. :) पण...आम्ही पडलो एकतर विंडोज मोबाईलवाले गरीब वापरकर्ते, आणि एकुणच तंत्रज्ञान, प्रणाली(Operating System) ह्या विषयातले तद्दन ढढ्ढोबा!
गेला आठवडाभर झाला, सॅमसंगच्या अ‍ॅन्ड्रॉईड फोनशी खेळतोय खरा, पण त्यातल्या सोयी आणि एकुणच अ‍ॅन्ड्रॉईडबद्दलचं कुतुहल काही गप्प बसू देईना बॉ! मग म्हणलं, करावं तरी काय? तर ध्यानात आलं, आपले मिपाकर आहेत की. निरनिराळ्या क्षेत्रातली तज्ज्ञमंडळी इथं येत असतात, त्यांची काही मदत मिळते का ते पहावं म्हणलं. म्हणजे, आपल्यालाही मदत होईल अन आणखी कोणी असाच अडला असेल तर त्यांचीही सोय होईल. काय म्हणता? :)

मी सध्या वापरत असलेल्या अ‍ॅन्ड्रॉईड २.३ (जिंजरब्रेड) वर काही अ‍ॅप्लिकेशन्स टाकली आहेत (अर्थातच, फुकट असलेली हेवेसांनल ;) ). त्यापैकी
अ‍ॅन्ड्रॉईड असिस्टन्ट हे मेन्टेनन्स अ‍ॅप मला बरं वाटलं. (अर्थातच, चकटफू असलेल्या गोष्टीत जितकं जास्तीत जास्त सोयीसुविधा मिळतील तितकं छानच. :) हे अ‍ॅप त्यातलंच. )

अ‍ॅस्ट्रो फाईल मॅनेजर ह्या अ‍ॅप्लिकेशनचा वापर मी मुख्यतः कॉम्प्युटरवर उतरवून घेतलेल्या .apk फायली फोनमध्ये भरण्यासाठी आणि तिथून वापरण्यासाठी करतो.

ऑडिओबूक्स अ‍ॅप्लिकेशनच्या कृपेने फुकटात शेरेलॉक होम्सच्या गोष्टी ऐकतोय. ह्या अ‍ॅपच्या लायब्ररीमध्ये बरीच ऑडिओबूक्स आहेत, गलिव्हर्स ट्रॅव्हल, टॉम सॉयर वगैरे लहानपणी मराठीत वाचलेल्या गोष्टी हल्ली इंग्रजीत ऐकायला मिळतायत :)
पण, खरं सांगू का? स्वतः हातात पुस्तक घेऊन ते वाचण्याची मजा ह्या ऑडिओबुकात आज्याबात नाही. अगदीच वेळ नसलेल्यांसाठीची एक सोय. घरुन नोकरीच्या ठिकाणी जाताना उशीर होतो म्हणून पोळीभाजी केंद्रातून पार्सल उचलल्यासारखी. घरच्या पोळीभाजीची मजा त्यात नाही! ते असो.

बाकी मग, QR Scanner, App2SD ह्यासारखे टूल्सही वापरून पाहतो आहे.

हे सगळं झालं वरवरच्या गोष्टींबद्दल. मला आणखी माहिती हवी आहे
१.ती आणखी कोणती चांगली अ‍ॅप्लिकेशन्स (अर्थातच शक्यतो चकटफू!) आहेत, ज्यांचा वापर करुन फोनची प्रॉडक्टिव्हिटी, फंक्षनॅलिटी वाढवता येईल?
ह्यासोबत तुमच्या आवडीची कोणती विशेष अ‍ॅप्लिकेशन्स आहेत त्याबद्दल सांगितलं तर माहिती नसतील तर ती वापरुन पाहता येतील. :)

२.महत्वाचा मुद्दा: अ‍ॅन्ड्रॉईड रूटिंग!
आयफोन्समध्ये जसं जेलब्रेक केलं जातं, तसंच अ‍ॅन्ड्रॉईडमध्ये फोन रूट (root) करुन सिस्टिम्स अ‍ॅक्सेस मिळवण्यासाठी सुपरयुजरचे अधिकार मिळवता येतात असं ऐकून्/वाचून/पाहून आहे.(जय गुगलबाबा! ) )
ह्या रुटिंगमुळे म्हणे फोनची वॉरंटी अवैध ठरते. पण रुटिंग करण्याचे बरेच फायदेही असतात. जसे खूपसे अ‍ॅप्लिकेशन्स आहेत, जे एरवी ज्या फोनवर चालणार नाहीत, त्यांना चालवण्याचा प्रयत्न बर्‍याचदा रुटिंगमुळे यशस्वी ठरतो. तसेच अ‍ॅडव्हान्स बॅकअप, रॉम अपग्रेड वगैरे किचकट आणि लै भारी टेक्निकल गोष्टी करता येतात म्हणे.
तर ह्या रुटिंगचे फायदे-तोटे, ते केल्यावर काय काय करता येऊ शकेल, त्याचे धोके काय इत्यादी माहिती मिळाली तर मंडळ आपले अत्यंत आभारी असेल :)

तर मित्रहो, कराल का मला ह्याविषयात थोडी मदत? :)

आपला,
धमालॅन्ड्रॉईड :)

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

29 Oct 2011 - 2:59 pm | योगी९००

माझा आवडीचा विषय...

मी pulse आणि pressreader वापरतो. बातम्यांसाठी एकदम छान...

pressreader मध्ये India Today,प्रहार पेपर वाचता येतो.. pulse तुमच्या आवडीप्रमाणे सेट करता येते. हे दोन्ही टॅबलेट मध्ये छान वाटतात.

Androidguys एकदम मस्त - अ‍ॅन्ड्रॉईड च्या विषयी बातम्या साठी उपयुक्त..

गेम्स : रागावलेले पक्षी (angry birds), फळ फळावळ आणि बरेचसे...

अजुन प्रॉडक्टिव्हिटीसाठी (म्हणजे फोन/टॅबलेटच्या) एक सुद्धा अ‍ॅप वापरलेले नाही..

श्री गावसेना प्रमुख's picture

29 Oct 2011 - 3:23 pm | श्री गावसेना प्रमुख

अँड्रॉईड वर तुम्हाला साप्ताहीक चित्रलेखा सुध्धा वाचता येइल बघा,(संदर्भासाठी चित्रलेखा चे पान.न,२ )त्यात अँड्रॉईड अप्लीकेशन मॅनेजर मधुन चित्रलेखा चे अप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल,
(कळावे,त्यात व्हाईरस जास्त जातात बाकि मोबाईल पेक्षा त्यामुळे सावधान.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2011 - 4:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्हाला तूम्हाला कै मदत नै करता येणार. आम्ही सिंबियन अ‍ॅप्लीकेशन्सची चर्चा केली तर चालेल का या धाग्यात. s60 v3 आणि v5 चे कोणी काही खास आणि मोफत अ‍ॅप्लीकेशन्स सांगितली तर मला उतरवून घ्यायला आवडतील. माझ्याकडे panorama, (वर्तूळाकार क्यामेरा फिरवून एकच फोटो घेणे) न्यूज हंट, आयबीन लोकमत, (मराठी बातम्या, हिंदी बातम्या पाहता येतात) nexgTv च्या अ‍ॅप्लीकेशन्सने (स्टार वन, स्टार प्रवाह, स्टार माझा, व्ही, अशा वाहिन्या पाहता येतात) , IM+ ने चॅट, MagicBrUsh ने टाईम पास चित्र रेखाटने, इ.इ. असो, अजून कोणाकडे काही खास अ‍ॅप्लीकेशन्स असतील तर आपल्याला कळवा राव.......!

मोबाईलच्या सायटीची नावे बहूदा सर्वांना माहिती असतीलच. जसे, Mobile9, http://www.nokias60v5.com/ इ.इ.

-दिलीप बिरुटे

विनायक प्रभू's picture

29 Oct 2011 - 4:24 pm | विनायक प्रभू

डेक्कन एक्स्प्रेस मधे एकाला दैनिक "चित्रलेखा' आस्वाद घेताना बघितले.

मन१'s picture

29 Oct 2011 - 5:55 pm | मन१

जर्मन भाषेचा क्लास आवडला.
पक्षी:- लेख व प्रतिसादातले काहीही समजले नाही.

आयुष्यात केवळ नोकिया ६०३० हा गावठी हँडसेटच वापरलेला,
ढढ्ढोबा मनोबा.
.
.
.
.
(धागा वाचून काही शिकता येइल अशी आशा आहे.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2011 - 8:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नोकिया साठतीस लवकर बदला.
भ्रमनध्वनीवरुन केवळ ऐकणे आणि बोलणे याचा जमाना केव्हाच गेला आहे. :)

-दिलीप बिरुटे

इंटरनेटस्नेही's picture

30 Oct 2011 - 1:56 am | इंटरनेटस्नेही

मस्त!
-
नॉकिया E5 सिंबायन ओएस ६० वापरकर्ता. इंट्या नॉकिया.

विकास's picture

29 Oct 2011 - 6:44 pm | विकास

एकदम आवडता विषय! अँड्रॉईड मध्ये भरपूर अ‍ॅप्स टाकता येतात. आता माझा अनुभव देण्याआधी एक डिसक्लेमरः जर भारतात आणि अमेरीकेत वेगवेगळे असले तर माहिती नाही. उ.दा. आम्हाला अँड्रॉईडवर मराठी सहजासहजी वाचता येत नसल्याने आम्ही तो हट्ट सोडून दिला आहे. :( तसेच यातील कुठलेही अ‍ॅप्स करणार्‍याशी माझे आर्थिक हितसंबंध गुंतलेले नाहीत. :-)

लहान यादी:

evernote - टंकून,बोलून, प्रकाशचित्रे टाकून नोंदी करता येतात. त्या जालावर अथवा नंतर संगणकावर बघता येतात अथवा त्यात अजून पुढचे घालता येते,

गुगल अ‍ॅप्स - जीमेल वगैरे सर्व. त्यातील जीपीएस तुम्हाला उपयोगी ठरणार नाही कदाचीत पण मॅप्स चालू शकतीलच.

गुगल स्कॅयः हे एक मस्त अ‍ॅप आहे. परत भारतात चालते का माहित नाही. पण ते चालू केले की आकाशातील ग्रहतारे दिसू लागतात, दिवसापण! ;) मग तुम्ही घरात अथवा घराबाहेर ज्या दिशेने फोन धराल तेथे त्या वेळेस कुठले ग्रहतारे आहेत ते आणि त्यांची मांडणी दिसते. जर जमिनीकडे धरले तर दक्षिण गोलार्धात काय आहे (त्या वेळेस) ते दिसते!

अँग्री बर्ड्स - जर तुम्हाला विडीओ गेम्स वगैरे आवडत नाही, मला व्यसन लागू शकत नाही असा अहंकार असला तर हे अतिशय, खरं म्हणजे, non sense अ‍ॅप्स वापरून बघा. ;)

अनब्लॉक मी: हे एक छान अ‍ॅप आहे. खेळच आहे पण डोके वापरून खेळायचा

YuppTV - भारतीय टिव्ही, बातम्या, मॅच वगैरे दिसू शकते,

Pandora - ऑन लाईन रेडीओ. तुम्हाला हवे असलेले कलाकार घाला आणि रँडम गाणी ऐकायला लागा!

Indian Musical Instruments - खूप माहितीपूर्ण सुंदर अ‍ॅप, त्यात भारतातील अनेक माहीती असलेल्या नसलेल्या वाद्यांची चित्रे आणि आवाज ऐकायला मिळतात.

Flute: हे अ‍ॅप डाउनलोड करून त्यावर (स्क्रीनला समांतर) फुंकर घालत स्क्रीनवरील डॉटवर बोटे टंका, बासरी/फ्लूट ऐकायला मिळेल!

Shazam - हे डाउनलोड करा. एखादे गाणे रेडीओ, टेप वगैरेवर लावा, आणि या अ‍ॅपच्या S सारख्या चिन्हावर क्लिक करा. ते काही सेकंद ऐकेल आणि कुठले गाणे आहे ते सांगेल!

शिवाय टाईम्स ऑफ इंडीया वगैरेची अ‍ॅप्स आहेतच...

हे सर्व बघून झाले की कळवा, अजून अनुभव सांगेन! :-)

दादा कोंडके's picture

30 Oct 2011 - 3:30 pm | दादा कोंडके

हे सगळं वाचुन वाटलं की कुठुन माती खाल्ली आणि विंडोज-७ फोन घेतला! :(
युनिकोद फाँट वापरता येत नाही हे सर्वात मोठ्ठं दुखणं.

मी स्वतः फारसे अ‍ॅप्स वापरत नाही. मला सॉफ्टवेरमधलं कष्प* कळत नाही. पण हार्डवेअर संबंधीत काम करत असल्याने, नवीन अ‍ॅप्स काय करू शकतात हे बघत असतो.

मोबाईल कुठलाही (स्मार्ट, टॅब वगैरे) आणि कोणत्याही कंपनीचा असला तरी पेरिफेरल्स तेच असतात. म्हणजे कॅमेरा, (कपॅसिटीव्ह) टच स्क्रीन, गायरोंमिटर, माईक, स्पिकर, वायफाय मोड्युल वगैरे. पण लोकं एव्ह्ड्या भांडवलावर हजारो एप्स तयार करत असतात तेंव्हा कौतुक वाटतं. समजा वाद्यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर, मी बटणं आणि तारा वगैरे असलेली वाद्यं म्हणजे पियानो, गिटार, ड्रम पॅड अ‍ॅप्स बघितलेले आहेत. पण वरती विकास यांनी उदाहरण दिलेलं फ्लुट हे खरच माइल, टचस्क्रीन आणि स्पिकर वापरुन केलेलं इनोवेटीव अ‍ॅप आहे.

*श्रेय अव्हेर: धनंजय

प्राची's picture

31 Oct 2011 - 6:38 pm | प्राची

WhatsApp : हे अ‍ॅप्लिकेशन online chatting सारखं आहे. यामध्ये WhatsApp युजर्स एकमेकांना मेसेज,इमेज,व्हिडीयो,ऑडियो पाठवू शकतात.
compass : मोबाईलवरचा दिशादर्शक.

मर्द मराठा's picture

1 Nov 2011 - 8:12 am | मर्द मराठा

<<< आम्हाला अँड्रॉईडवर मराठी सहजासहजी वाचता येत नसल्याने आम्ही तो हट्ट सोडून दिला आहे >>

हे तितके कठिण नाहिये..

१. ऑपेरा ब्राऊजर उतरवून घ्या ...
२. ते ब्राऊजर उघडुन "opera:config" या संकेतस्थळावर जा
३. “Use bitmap fonts for complex scripts” या वाक्यासमोरील "No" ला "Yes" मध्ये बदला. बदल "save" करा

मी लोकसत्ता, लोकप्रभा वगैरे ऑपेरा मधे वाचतो ..

किसन शिंदे's picture

1 Nov 2011 - 12:30 pm | किसन शिंदे

हे फक्त अँड्रॉईड असलेल्या फोनमध्येच होतं कि बाकिच्याही फोनमध्ये होऊ शकतं.

माझ्या मोबाईलमधील ऑपेरामध्ये हे ट्राय करून पाहिलं पण जमलं नाही.

व्हर्जन कुठेले आहे?

मी ६.१.२ वापरतो आहे. त्यावर दिसते मराठी मस्त.
फक्त मराठी टाइप करता येत नाही :(

- ( अँड्रॉईड वर युनिकोड सपोर्टची वाट बघणारा ) सोकाजी

मर्द मराठा's picture

1 Nov 2011 - 9:58 pm | मर्द मराठा

फक्त अँड्रॉईड ...

धमाल मुलगा's picture

3 Nov 2011 - 8:09 pm | धमाल मुलगा

विन्डोज मोबाईलवरही ऑपेरा मिनीच्या 'about:config' मध्ये जाऊन BMP for complext scripts हा पर्याय निवडता येतो आणि मराठी वाचता येते.

अ‍ॅन्ड्रॉईडवर मराठी टंकायला काही धड मिळतंय ते पाहतो आहे अजून.

पैसा's picture

3 Nov 2011 - 8:15 pm | पैसा

http://boltbrowser.com/dnld.html वापरून बघा. त्याच्याबरोबर त्याचे भारतीय फॉण्ट्स पण येतात. आणखी काहीच नको.

वाचता येत असावे. पण टंकता येत असेल तर उत्तम.

धमाल मुलगा's picture

4 Nov 2011 - 4:05 pm | धमाल मुलगा

तुम्हाला जर बरहामध्ये मराठी टंकन करायची सवय असेल तर एनिसॉफ्ट किबोर्ड+देवनागरी भाषा संच हे अ‍ॅप्स उत्तम आहेत.

त्यांचे दुवे :
एनिसॉफ्ट किबोर्ड
देवनागरी लँग्वेज पॅक

हे दोन्ही इन्स्टॉल केले की मराठी टंकनही जमेल.

पुर्वअट : तुमचा फोन भारतीय भाषा ओळखत असला पाहिजे.
देवनागरी पॅकच्या पानावरची पहिलीच ओळ आहे : "install only if you can read "मेरा भारत महान"."
फोन जर भारतातूनच घेतला असेल तर बहुतेक अ‍ॅन्ड्रॉईड फोन्स हे इंडिक सपोर्ट करतात.
जर इंडिक सपोर्ट नसेल तर मात्र फोन रुट करावा लागेल.

विसुनाना's picture

4 Nov 2011 - 4:15 pm | विसुनाना

हे सग्गळे करून झाले. ऑपेरा मिनीतून मिपा वाचून झाले. पण आमच्या फोनवर अजून 'मेरा भारत महान' हे वाक्य □□ □□□ □□□ असे दिसते. ;) २८ नोव्हेंबरला काही चमत्कार झाला तर, आमचे नशीब २.३ पटीने उजळले तर मग आम्हीही आमच्या काळ्या ऑटोबॉटवरून मिपावर लॉगिन करू.

विकास's picture

3 Nov 2011 - 8:10 pm | विकास

ते मला जमले होते हो! पण टंकता येत नव्हते. आता काहीसे पाणीनी किपॅड वगैरे सरपंचांनी सांगितलेत... ते वापरून पाहीन असे म्हणतो. :-)

मेघवेडा's picture

1 Nov 2011 - 3:38 pm | मेघवेडा

जर तुम्हाला विडीओ गेम्स वगैरे आवडत नाही, मला व्यसन लागू शकत नाही असा अहंकार असला तर हे अतिशय, खरं म्हणजे, non sense अ‍ॅप्स वापरून बघा.

अगदी खरंय. फोनवर झालं एकदा खेळून तरी पुन्हा गूगल क्रोम वर हे अ‍ॅप लाँच झाल्यावर पुन्हा खेळावंसं वाटलंच!

बाकी गूगलची बहुतेक सगळीच अ‍ॅप्स मस्त आहेत.

धमालराव,
या धाग्याने आम्हीही अंमळ लाभान्वित होणार आहोत.
अर्थात त्यासाठी तुम्हाला धन्यवाद देण्याचे मनात येते आहे पण तूर्तास टाळतो.
स्पावड्याने आज सकाळीच दिलेल्या गुरुमंत्राप्रमाणे मी ४ - ८ दिवसात सॅमसंगसंग घरोबा करणार आहे.
लोकहो, पटापट तुम्हाला माहित असलेले वापर सांगा बरं.. :)

निखिल देशपांडे's picture

29 Oct 2011 - 8:57 pm | निखिल देशपांडे

मराठी किपॅड वापरायला जरा अवघड जातोय..

धमाल मुलगा's picture

3 Nov 2011 - 8:11 pm | धमाल मुलगा

कलरनोट्स छान आहे. आमच्यासारख्या विसरभोळ्यांना एकदम उपयुक्त!
बाकी यादीही झकास आहे राव. :)

जोशी &#039;ले&#039;'s picture

29 Oct 2011 - 9:22 pm | जोशी 'ले'

जर तुम्हि India तुन mobile घेतला असेल तर त्यात Marathi,devnagari font जरुर असेल...only in Samsung जर नसेल तर expert कडुन rooting करुन त्यात Unicode Droid font install करुन मराठी वाचु type करु शकता... हुश्य जोशी बुवा दमले:-), he sarve mi majhya LG optimus p500 madhe type Keley, agodar tyat he font navhate pan navin 2.3 upgrade Madhe diley , Marathi type marathi type karayala tumhi anysoftkeybord kiva panini keybord vaparu shakata
tasech fast browsing sathi ucweb he chan allocation Aahe.

धमाल मुलगा's picture

4 Nov 2011 - 2:16 pm | धमाल मुलगा

anysoft keyboard + devnagari language pack घेतले. टंकायला जरा वेळ लागतोय खरा, पण सवयीने जमेल सहज :-)

सदध्या ऒपेरा मिनीसोबत एनिसॊफ्ट किबोर्ड वापरुन हा प्रतिसाद टंकला आहे. लई मजा आली.
मंडळ आपले जोरात आभारी आहे.

प्रचेतस's picture

4 Nov 2011 - 2:18 pm | प्रचेतस

फोन कुठला घेतलास बे धम्या?

आमचं हे चकट-फू डेमो अ‍ॅप उपयोगी पडतय का बघा -
https://market.android.com/details?id=com.orisyssoft.switchez
बाकी माहिती तज्ञ लोक देतीलच, आम्हाला काय कळते त्यातले! :-)

जोशी's picture

30 Oct 2011 - 6:45 pm | जोशी

सायकलींग, रनिंग साठी iMapMyRun हे ऐक सुंदर अ‍ॅपलिकेशन आजच डाउनलोड करुन वापरल.

https://market.android.com/details?id=com.mapmyrun.android2&feature=more...

जोशी

सर्वात पहिल्यांदा अन्द्रोइद चा फोन घेतल्या बद्दल अभिनंदन
गूगल चे अन्द्रोइद हे ओस open source असल्याने याचे भरपूर फायदे आहेत
येथे सगळे फायदे लिहित बसलो तर एक पूर्ण निबंध तयार होईल, मग मीपा वाले १० पैकी ८ / ७ /९ असे मार्क्स पण देतील
पण तुम्ही रूतिंग चे फायदे विचारात आहात म्हणून तेवढेच सांगतो
१) रूट म्हणजे mobile चा admin , तुम्ही तुमच्या mobile चे खर्या अर्थाने मालक बनता
२) mobile चा screenshot घेता येतो
३) पूर्ण mobile चा backup घेता येतो
४) कोणतेही application काढता किवा install करता येते
५) custom recovery install करता येते
६) custom recovery टाकल्या नंतर , तुम्हाला पाहिजे ते OS version install करता येते.
७) अर्थात तुम्हाला जा mobile वर किडे करायचे असतील तर rooting गरजेचे आहे .
आणि हो root ला unroot पण करता येते, त्यामुळे warrany void चा प्रोब्लेम नाही .
rooting चे आजून बरेच फायदे आहेत पण आता एवढे पुरे , असे समजून माझे २ सब्द येथेच संपवतो

धमाल मुलगा's picture

3 Nov 2011 - 8:26 pm | धमाल मुलगा

हितुशेठ,
धन्यवाद! बराच धीर आला मला. :)

>येथे सगळे फायदे लिहित बसलो तर एक पूर्ण निबंध तयार होईल, मग मीपा वाले १० पैकी ८ / ७ /९ असे मार्क्स पण देतील
:D हा हा हा!!!
जरूर लिहा राव. बघा की कितीजणं तरी आहेत अ‍ॅन्ड्रॉईडवाले. सगळ्यांनाच फायदा होईल. आणि फायद्यांसोबत काय काळजी घ्यावी, नक्की कुठे किडे करु नयेत, फोन फ्राय होऊ नये म्हणून कुठे काड्या करु नयेत वगैरे सांगाल तर खूपच बरं. :)

मैत्र's picture

31 Oct 2011 - 10:47 am | मैत्र

तर पोहर्‍यात कुठून येणार.
आधी कोणी तरी (धम्या सह) भारतात जरा परवडणारा चांगला अँड्रॉईड सांगा (आमची ज्ञान पातळी म्हणजे दर वेळी अँड्रॉईड म्हटलं की आधी ती खूप पूर्वी वाचलेली अँड्रोमिडा गॅलॅक्सीच आठवते. -- मराठीत देवयानी दीर्घिका.)

आणि हो सांगा म्हणजे थेट आय फोन एस४ किंवा गॅलॅक्सी एस२ नव्हे. जरा टप्प्यात येतील असे सांगा...

असं बिरुद मिरवणारा सॅमसंग गॅलेक्सी वाय (GT-S5360) .
अ‍ॅन्ड्रॉईडची ट्रायल एरर खेळण्यासाठी सर्वात कमी किंमत (६५०० ते ७०००/- ) असलेलं पावरबाज (832 MHz ) मॉडेल है भो.
नेटवर कुठेही स्पेसिफिकेशन्स तपास. फोनचा रिपोर्ट चांगला आहे. फक्त एवढंच की :२mpचा कॅमेरा आणि डिस्प्ले डिटेलिंग थोडं कमी आहे. अन्यथा, बाकी झकास आहे.

किसन शिंदे's picture

31 Oct 2011 - 10:55 am | किसन शिंदे

२/३ मिंत्राकडनं कळालयं, येत्या २ वर्षात अ‍ॅंड्राईड हि टेक्नॉलॉजी बंद होणारे.

खरं काय नि खोटं काय?

विनीत संखे's picture

31 Oct 2011 - 12:06 pm | विनीत संखे

नाही हो! स्मार्टफोन मार्केट मध्ये आजही अ‍ॅन्ड्रॉईड, ब्लॅकबेरी, विंडोज फोन आणि आयफोन मध्ये निरोगी चुरस चालू आहे आणि इतक्या वेगवेगळ्या वेंडरनी केलेले निरनिराळे अ‍ॅन्ड्रॉईड फोन पाहिले की त्या ऑपरेटींग सिस्टीमची महानता स्पष्ट होते.

अ‍ॅन्ड्रॉईड आधीच एक लेजेंड झाले आहे. ते जाणे शक्यच नाही.

माझे आवडते अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप्प्स..

१. बारकोड स्कॅनर - इंटरनेट (जीपीआरएस किंवा थ्रीजी) असेल तर हे अतिशय उत्तम साधन आहे. मॉल मध्ये अव्वच्या सव्वा पैसे लावणार्‍या वस्तूवरील बारकोड कॅमेर्‍याने स्कॅन करून सर्च केला तर त्याची इतर ठिकाणी असलेली कींमत कळते. भारतात तसं कमी चालतं पण मी सिंगापूरला वापरले तेव्हा त्याच वस्तूच्या इतर मॉलसम्ध्ये असलेल्या अतिशय प्रभावी डील्स तर सापडल्या.

२. बंप - दोन अँड्रॉईड किंवा आयफोन मध्ये डेटा ट्रांसफर करणारे अतिशय उत्तम अ‍ॅप. आयफोनचं नीलदंत अ‍ॅपलशिवाय इतर कुठल्याही डिवाईसमध्ये चालत नसल्याने बंप वापरून डेटा ट्रांस्फर मस्त होतो.

३. म्युजिक कीबोर्ड - कळा दाबून संगीतसाधना सोपे करणारे आणखीन एक करमणूकीचे साधन.

४. रेप्लिका आयलँड - अँड्रॉईडचा रोबोट आणि त्याच्या साहसी कथा साकारणारा मस्त मोबाईलवरील खेळ.

४. रीवर्सी - बुद्धीबळाचा छोटा भाऊ. चायनीज चेकर्सचा चुलत भाऊ.

५. स्पीच रेकग्निशन एडविन - आयफोन ४एस च्या सिरीला अँड्रॉईडचे उत्तर.

युरोप आणि यूएस मध्ये ब्लॅकबेरी आणि आयफोनच्या मागोमाग अ‍ॅन्ड्रॉईड असलं तरी २०१० मधल्या कंज्युमर सर्वे मध्ये हे जाणवलं की आधी वेगळी ओपरेटींग सिस्टीम वापरणारे एकदा अ‍ॅन्ड्रॉईड कडे वळले की खूप कमी दुसर्‍या फोनकडे (आयफोन वगेरे) वळतात

आणि वळणार्‍या बहुधा मुलीच असतात.

:p

अवांतर...

स्मार्टफोन वापरणार्‍या ग्राहकांमधल्या स्पर्धेबद्दल हे आंतर्जालावरचे चित्र आठवले.

निरिक्षण केल्यास हे जाणवेल की आयफोन वापरणारी मुलगी आहे. ;-)

छोटा डॉन's picture

31 Oct 2011 - 11:07 am | छोटा डॉन

बरं का धमालराव, फुकट ते पौष्टिक ह्या न्यायाने जे काही फुकट अव्हेलेबल आहे ते उतरवुन घ्या.
आम्ही कितीही भारी अ‍ॅप्लिकेशन्स सांगितली आणि ती समजा पेड असली तर तुम्ही घेणार आहात का ? ;)

असो.
काही चिल्लर माहिती देतो.

१. न्युजहंट :
भारतातली सर्व भाषातली वृत्तपत्रे ह्यावर उपलब्ध आहेत.
मराठीमधली ५ वृत्तपत्रे वाचायला मिळतील.

२. ईएसपीएन स्कोअरसेंटर

३. NDTV & IBN ची सर्व चॅनेल्स लाईव्ह स्ट्रिमिंग

४. Air Control Lite नावाची मस्त गेम

तुर्तास इतकेच आम्ही वापरतो.
बाकी इतर हाय-फाय अ‍ॅप्सची गरज वाटली नाही.

- छोटा डॉन

मदनबाण's picture

31 Oct 2011 - 11:35 am | मदनबाण

सध्या हा वापरतोय... :)

(चित्र जालावरुन घेण्यात आलेले आहे.)
तुमचे आवडते एसएमएस रिंगटोन आणि फोन रिंगटोन तुम्हाला नव्या अ‍ॅन्ड्रॉइड फोन मधे वापरायचे असतील तर डेटा कार्ड (एसडी कार्ड) मधे खालील प्रमाणे फॉल्डर तयार करा...
System=>Media=>Audio=>Ringtones
System=>Media=>Audio=>Notifications

गवि's picture

31 Oct 2011 - 11:49 am | गवि

अँग्री बर्डस..अँग्री बर्डस....अँग्री बर्डस.......

बाकी मराठी टाईपण्यासाठी या अँड्रॉईडचा कायपण उपयोग नाही. मिपा किंवा तत्सम टेक्स्टबॉक्समधे टाईपताना मधेच शब्द एकत्र होऊ लागतात. इकडची वेलांटी तिकडे. डिलीट केलेले शब्द पुढील टाईपिंगसोबत भुताटकीप्रमाणे पुन्हा प्रकटणे आणि त्यांनी आधी लिहिलेल्या आणि नंतर लिहिलेल्याचा घास घेणे. असं होऊन शेवटी सगळा मजकूर डीलीट करावा लागतो.. किंवा प्रत्येक चुकीनंतर चार पाच स्पेसेस मारुन या भुताटकीतून तात्पुरती सुटका मिळवावी लागते.

प्रचेतस's picture

31 Oct 2011 - 11:52 am | प्रचेतस

गूगल क्रोम मध्ये मराठी टंकताना पण अगदी असेच होते.

>>डिलीट केलेले शब्द पुढील टाईपिंगसोबत भुताटकीप्रमाणे पुन्हा प्रकटणे आणि त्यांनी आधी लिहिलेल्या आणि नंतर लिहिलेल्याचा घास घेणे.<<<

याला पण स्पाचं "ग्रहण" लागलं का.... ??

अवांतर: गवि, तुम्हाला ४ काळी मांजरं वगैरे दिसली का टाईप करताना.........

धोक्याची कल्पना घ्येण्यासाठी विडोज मशिनवर जावे "सी" कोलनला जाऊन विंडोज फोल्डर मधील कोणतीही फाइल हवी तशी एडीट्/डेलीट/ रिनेम करत जावे वा मनास येइल त्याप्रमाणे रजिस्ट्री एडीट करून बघावी. ;)
.

महात्वाची सूचना :- सदरील कृती अत्यंत धोकादायक असून , मिपाकर अथवा इतर कोणत्याही व्यक्तीने स्वजबाबदारीवर परंतू तज्ञाच्या देख्रेखी खालीच करावी, होणार्‍या फायद्या-तोट्याला मी जबाबदार असणार नाही. व असे केल्याने होणारे नूकसान भरून काढायला इथे रा-वन, जि-वन, क्रिश अथवा शक्तीमान मद्त करू शकणार नाहीत याचीही नोंद ठेवावी

मृत्युन्जय's picture

31 Oct 2011 - 8:37 pm | मृत्युन्जय

ते अँड्रोइड चे सोडा, एवढा मोठा धागा टंकण्याची सुपारी कोणाला दिली होती ते सांगा आधी.

धमाल मुलगा's picture

3 Nov 2011 - 8:36 pm | धमाल मुलगा

सुपारी घेणं देणं ही भाडोत्री गुंडांची कामं भौ!
आम्ही मानाचे आणि पैजेचे विडे घेतो. ;)

मर्द मराठा's picture

1 Nov 2011 - 8:15 am | मर्द मराठा

माझ्यासारख्या छंदीष्ट छायाचित्रकारासाठी ...

Photo Tools by hcpl: विविध छायाचित्रणासंबंधी गणकयंत्रे
PhotoFunia: छायाचित्रणासाठी व नंतर प्रोसेसिंग साठी लागणार्‍या करामती...
PhotFluent: छायाचित्रणासाठी नवनव्या कल्पना आणि मार्गदर्शन देणारी माहीती.

गाडी आणि भटक्यांसाठी..

aCar by Armond Avanes
गाडीची देखभालीच्या नोंदी आणि आठवण करण्यासाठीचे स्मरण सूचना , पेट्रोल भरल्याची नोंद, सफरीची नोंद वगैरे साठी

My Car Locator
गाडी कूठे पार्क केली ते लक्षात ठेवते आणि नंतर नकाशा मार्फत आणून सोडते... (जीपीएस वापरते)

Latitude
फोन बाळगणारी व्यक्ती शोधण्यासाठी ... (जीपीएस वापरते)

Google Sky Map
वर उल्लेख आला आहे.. पण मी ही ह्या अ‍ॅप वर फीदा आहे ..

जीपीएस तर बरेच आहेत... Navigation आणि TeleNav मी प्रामुख्याने वापरतो ...
Places वापरुन Google Map वापरता येतात म्हणजे प्रवासाची आखणी लॅपटॉप वर करून नकाशे तयार करायचे आणि प्रवासादरम्यान फोनवर वापरायचे

GasBuddy: अमेरिकेत उपयुक्त .. जवळपास स्वस्त इंधनासाठी

Trippo Mondo: भाषांतरासाठी .. भारतीय शिव्या ऐकुन घ्याव्यात ... ;-)

SimpleMoonPhase Widget: चंद्राच्या कला तारखेवार जाणण्यासाठी

ह्या सर्वांव्यतिरीक्त...

CamScanner: स्कॅन करण्यासाठी आणि पीडीएफ म्हणून वापरण्यासाठी...

Hide Record Free: महत्वाचे काहीही रेकॉर्ड करण्यासाठी..

How to tie a tie : वेगवेगळ्या पध्दतीने कंठ लंगोट कशी बांधावी .. ;-)

Key Ring: बार कोड असलेली/नसलेली दुकानांची कार्डे एकत्र ठेवण्यासाठी.. भारतात Planet M चे कार्ड वापरात आहे तसे. अमेरीकेत Kroger, YMCA, Dicks, CVS, सार्वजनिक वाचनालय इत्यादी साठी उपयुक्त...

My Bills : वेगवेगळी बीले लक्षात ठेवण्यासाठी... अमेरिकेत आपोआप साइट ला जोडून घेतो आणि अद्यावत बीले दाखवतो

Ring Scheduler: वेळेनुसांर फोनचा रिंगटोन चालू/बंद, थरथराट करण्यासाठी

SleepTimer: झोपताना संगीत ऐकताना ठराविक वेळाने Winamp, MusicFX, Listen आपोआप बंद होण्यासाठी

MP3 Cutter: आवडत्या MP3 ची काट्छाट करून हवा तेव्हढाच भाग वापरता येण्यासाठी

WidgetSoid: आपल्या महत्वाची आणि प्रामुख्याने वापरात येणारी १० अ‍ॅप्स एका लांब आयतामध्ये ठेवण्यासाठी (जागा वाचते स्क्रिन वर)

EboBirthDay - वाढदिवस लग्नाचे, जन्माचे, साखरपुड्याचे वगैरे..

Talking Tom/Gina - लहान मुलांसाठी गंमत

FREEdi YouTube Downloader - यू ट्यूब वरील व्हीडिओ, व्हीडिओ म्हणुन किंवा MP3 म्हणून डाऊनलोड करण्यासाठी..

ccDialer - पीन वापरून फोन करण्यासाठी उत्तम ... प्रत्येक वेळी पीन टंकावी लागत नाही.. कॉलींग कार्ड, व्होनेज वापरून परदेशातून भारतात फोन करण्यासाठी अत्यूत्तम ...

Unit Conversion By S&J Studio Work - वेगवेगळी परिणामे (वजन, लांबी, तपमान, वेग, क्षेत्रफळ वगैरे) त्यांच्या वेगवेगळ्या मापन घटकांमध्ये रूपांतरीत करण्यासाठी..

मी येणारा/जाणारा फोन कॉल रे़कॉर्ड करण्यासाठी अ‍ॅप शोधतोय (रूट न करता..) कोणाला माहिती असल्यास कळवावे..
बरीच ट्राय केली पण बहुतेक स्पीकर चालू करून वापरायची आहेत..

चिगो's picture

1 Nov 2011 - 2:22 pm | चिगो

धन्यवाद रे धमुभौ.. मी पण अँड्रो घेतलाय, पण कसा वापरावा हे ज्येमत नाही बरोबर.. कळेल हळूहळू..
पण ह्या धाग्याने भरपुर फायदा होणार हे दिसतंकर..
खुद के साथ बांता : च्यायला आधी साधं नेटवर्क मिळू दे, चिन्म्या.. मग अँड्रॉईडच्या गमजा कर..

पछी आ लो -
१) http://www.maayboli.com/node/29059
२) http://www.maayboli.com/node/29633

आता ह्या संकेतस्थळावर इतर सं.स्थळांच्या लिंक द्यायच्या म्हणजे भारीच पण तिथे बरीच चर्चा आधी झालेली आहे, सो वाचून बघा. बाकी काही मदत लागली तर आम्ही आहोतच.

रूट करुन टाका बुवा लगेच, म्हणजे देवनागरी फाँट्स स्थापित करता येतिल.

विकास's picture

3 Nov 2011 - 8:18 pm | विकास

Fake a call नावाचे एक मजेशीर अ‍ॅप आहे. त्यात आपल्याला कधी फोन वाजायला हवे ते अलार्म प्रमाणे लावून ठेवता येते. तो कुणाकडून असेल हे देखील सांगता येते. मग जर तुम्ही नको असलेल्या मिटींगमधे असाल तर अचानक फोन वाजेल. दुसरीकडून आवाज येईल... कधी मित्र-मैत्रिण, तर कधी तुरूंगातला मित्र स्वतःच्या सुटकेसाठी जामीनाला लागणरे पैसे मागणारा... ;)

विकास's picture

3 Nov 2011 - 8:24 pm | विकास

मोबाईलसाठी बार कोड सारखेच क्यूआर कोड चालू झाले आहे. ते तुम्हाला विविध ठिकाणी दिसेल. ते वाचण्यासाठी क्यू आर ड्रॉईड अ‍ॅप डाउनलोड करा. नंतर फोनचा कॅमेरा आणि हे अ‍ॅप वापरून खालील कोड स्कॅन करा:

qrcode

आणि मिपा फोनवर वाचा. :-)

क्यू आर कोड म्हणजे नेमकं काय आणि त्याचा उपयोग काय? स्पेसिफिकली ते स्कॅन करायचं म्हणजे काय? आणि स्कॅन केल्यावर काय जादू दिसते ? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी विकीपान पूर्ण वाचले पण वाटमारी काही डोक्यात शिरले नाही.

बुद्धीवाटप चालू असताना आम्ही जंगलात गेलो होतो बहुतेक.

विसुनाना's picture

4 Nov 2011 - 3:48 pm | विसुनाना

इथे तयार केले का?
माझ्या 'बारकोड स्कॅनर आवृत्ती ३.६' अ‍ॅप्लिकेशनमध्ये हे 'झेब्रा क्रॉसिंग' चित्र व्यवस्थित स्कॅन झाले आणि मिसळपावची लिंक मिळाली.

अँड्रॉईड ओएस हा ओपन सोर्स आणि फ्री सॉफ्टवेअर यांचा अद्भुत संगम आहे. असे काही होईल हे विंडोज मोबाइल/आयोएस कर्त्यांच्या स्वप्नातही आले नसेल.

आणि सिंबियन तर आता मरणपंथाला लागली असेच म्हणावे लागेल.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Nov 2011 - 2:34 pm | परिकथेतील राजकुमार

आपण नवा फोन घेतल्याची जाहीरात करण्यासाठी काढलेला धागा.

ह्या अशा प्रदर्शनात वेळ घालवण्याऐवजी आपले जुने लिखाण पूर्ण केल्यास मंडळाला आनंदच वाटेल.

असो...

दसर्‍याला आमच्याकडे यायला निघालेले आपण अजून पोचतच आहात.

हे ही असो...

निदान आता येताना पिझ्झाची ऑर्डर देऊनच यावे अशी विनंती.

पुष्करिणी's picture

4 Nov 2011 - 2:59 pm | पुष्करिणी

अभिनंदन नविन फोन बद्दल..

प्रतिसादातून बरीच माहिती मिळाली

अँड्रॉईड उत्तम आहे हो. पौष्टिक अ‍ॅप्लिकेशनेही भरपूर आहेत. फोन म्हणजे आता केवळ "हालू, हालू" राहिला नाही. पण निदान भारतात तरी अजून ३जी स्वस्त नाही. (आणि तिला अगोदरच 'प्रिमियम सर्विस' चा दर्जा [२जी प्रकरणामुळे] मिळाल्यामुळे ) कदाचित स्वस्त होणारही नाही. म्हणजे एकूण काय? फोन स्वस्त, ओएस फुकट, अ‍ॅप्लिकेशन फुकट पण बँडविद्थ महाग.
मार्ग काय? घरात वायर्ड मोडेम 'वायफाय' असलेले घेणे किंवा वायफाय फुकट असलेल्या रेस्ट्रो-बिस्ट्रोमध्ये जाऊन 'एक चा, थंड पाणी आणि एसी'ची ऑर्डर देणे... ;)