साहित्यः-१)२०-२५ बोटपेडवे.
२)खवलेलं खोबरं.
३)हळद.
४)लाल तिखट.
५)एक चमचा धणे.
६)चिंच.
७)२-३ हिरव्या मिरच्या.
८)एक चमचा बारीक चिरलेलं आलं.(आवडत असल्यास जास्त घतलं तरी चालेल)
९)३-४ हळदीची पाने.
१०)१०-१५ तिरफळं.
११)मिठ.
कृती :-प्रथम बोटपेडवे साफ करून त्याला मिठ लाऊन ठेवावे.मिक्सरच्या भांड्यात खवलेलं खोबरे घेऊन त्यात
हळद्,लाल तिखट,धणे,चिंच व थोडे पाणी घालून जाडसर वाटून घ्यावे.नंतर त्यातच तिरफळं घालून एक
फेरा फिरवावा.एका भांड्यात हळदीची पाने पसरून लावावी व त्यावर धुतलेले बोटपेडवे पसरून ठेवावे. त्यावर
चिरलेल्या हिरव्या मिरच्या,वाटलेले वाटण,मिठ्,बारीक चिरलेलं आलं घालून हलक्या हाताने ढवळून घ्यावे.
त्यावर परत दोन हळदीची पाने ठेवून मंद गॅसवर १० मिनिटांसाठी शिजत ठेवावे.
प्रतिक्रिया
29 Oct 2011 - 12:06 am | प्राजु
बोटपेडवा... माश्याचा प्रकार असावा!
मोटला म्हणजे रस्सा किंवा तत्सम!
29 Oct 2011 - 12:34 am | ज्योति प्रकाश
बोटपेडवे म्हणजे लहान पेडवे.व मोटला म्हणजे हळदीच्या पानात गुंडाळलेला असतो.व सुकं असतं.मी चपातीबरोबर खायला मिळावा म्हणुन जरा पातळं केलं होतं.
29 Oct 2011 - 12:38 am | चित्रा
मस्तच.
पण तुमच्या पाककृती फोटोंमध्ये (प्रेझेंटेशनमध्ये) थोड्या कमी पडतात असे सांगावेसे वाटते.
तुम्ही फोटो जरा अधिक स्पष्ट, मोठे काढत जा असे सुचवेन.
घरातल्या दुधी प्रकाशातही फोटो अधिक आकर्षक काढता येतील असे वाटते.
(जिज्ञासूंनी माश्यांच्या इंग्रजी नावासाठी http://www.misalpav.com/node/6120 सुनील यांचे मत्स्यपुराण बघावे).
29 Oct 2011 - 11:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पोळी चुरुन खायला थोडा रस्सा पाहिजेच. :)
-दिलीप बिरुटे
29 Oct 2011 - 6:01 pm | इंटरनेटस्नेही
सह्ही... मस्त पाकृ!