दिवाळी जवळ आली की बायकांची फराळ बनवण्याची लगबग चालू होते. ह्या वर्षी
काहीतरी नविन बनवू असा संकल्प सुरुवातीला आपण करतो. काही वेळा नेहमीचे
प्रकार करण्यातच सगळा वेळ निघुन जातो तर कधी कधी एखादा नविन प्रकार केला
जातो. पण हे नविन प्रकार करण्याच्या उत्साहात आपण जुने पदार्थ मात्र
कालबाह्य करतो. अश्याच जुन्या प्रकारातून मला माहीत असलेला एक प्रकार
म्हणजे बोरं.
बोरं हा जुना व हटके प्रकार मी पहिल्यांदा सासरी पाहीला. ह्या बोरांच्या
रेसिपीच्या आमच्या घरातील स्पेशालिस्ट आहेत माझ्या सासूबाई सौ. शालिनी
दत्तात्रेय म्हात्रे. सासूबाईंनी केलेली ही बोरं ज्या घरात आमची दिवाळी
जाईल तिथे जुना व हटके प्रकार म्हणून कौतूकाचे स्थान मिळवतात. मला
पाकशास्त्राची पहिल्या पासूनच आवड आहे. माझी आई सौ. शामला शशिकांत घरत
हिच्या हाताखाली मी सगळे
दिवाळीचे फराळ शिकले. लग्नानंतर दुसर्या वर्षापासून मी दिवाळीच्या
फराळांची जबाबदारी स्वीकारली. सासूबाईंनी सगळे प्रकार माझ्या आवडीनुसार
करण्यास परवानगी दिली पण बोर मात्र मिच करणार हे त्यांनी आवर्जुन
सांगितले. अजुनही ही बोरे त्याच करतात. आम्ही फक्त बोरे वळायला मदत करतो.
सासूबाईंच्या मते बोर ही कडकच चांगली लागतात. नरम बोरांना तेवढी चव लागत
नाही. अगदी सासूबाईंनी
केलेली ही बोरे चावत चावत खाताना ह्यांची गोडी अधीक वाढते. तर आता पाहूया
ही बोर कशी करतात.
लागणारे साहित्य :
एक मोठी वाटी भरून तांदळाचे पिठ
पाऊण मोठी वाटी गव्हाचे पिठ
१ मोठी वाटी गुळ
२ चमचे तिळ
२ चमचे गोड तेल
तळण्यासाठी तेल
पाककृती:
तांदळाचे पिठ, गव्हाचे पिठ व तिळ एकत्र मिसळून घ्यावे. २ चमचे कच्चे
गोडेतेल (गरम न केलेले) वरून टाकावे. गुळ बारीक चिरून किंवा किसुन
घ्यावा. एका भांड्यात पाणी कोमट करावे. हे कोमट पाणी हळू हळू त्या
मिश्रणात टाकुन पिठ घट्ट मळून घ्यावे. मग लगेच त्या पिठाचे बोरांच्या
आकारा एवढे गोळे वळायचे.
कढईत तेल चांगले कडकडीत तापवायचे आणि मंद आचेवर
मधून मधून हलवत ही बोरे तळायची.
प्रतिक्रिया
22 Oct 2011 - 3:14 pm | प्रचेतस
मस्त ग जागुतै.
पाकृ भारी दिसतीय. अगदी नुकत्याच तळलेल्या पाक न दाखवलेल्या गुलाबजामांसारखेच दिसताहेत.
25 Oct 2011 - 7:36 am | स्वानन्द
असेच म्हणतो.
करायला एकदम सोपी आणि सुटसुटीत पाककृती आहे!
22 Oct 2011 - 3:16 pm | मदनबाण
अरे वा ! नविन पदार्थ कळला. :)
ही शेवटच्या फोटुतली बोरे मला तर तीळ लावले गुलाबजाम वाटत आहेत ! ;)
(फराळ प्रेमी) :)
22 Oct 2011 - 3:32 pm | जाई.
मस्त आहेत बोरे
गुलाबजामसारखी दिसतायत
तोँपासु
22 Oct 2011 - 3:40 pm | निवेदिता-ताई
मस्तच ग....:)
22 Oct 2011 - 3:50 pm | गणपा
नवीनच पदार्थ. कधी ऐकला नव्हता
22 Oct 2011 - 3:57 pm | चिरोटा
नविन पाकृ कळली. चहाबरोबर मस्त लागतील्.
22 Oct 2011 - 4:25 pm | आत्मशून्य
.
22 Oct 2011 - 5:06 pm | मेघवेडा
चतुरंग मध्ये सकाळीच पाहिली. 'हरवलेले पदार्थ' या सदरात.
कोकणात 'बाम' नामक एक पदार्थ बनवला जातो, असाच. हेच असावेत ते.
टपाटप फोडून चहात बुडवून खायचे! नाश्त्याला किमान २५-३० सहज!
एकूण प्रकार सोप्पा दिसतोय! बेष्ट. उद्याच करून बघावं म्हणतो! धन्यु जागुतै!
22 Oct 2011 - 5:28 pm | धन्या
वा !!!
रायगड जिल्ह्यामधील दिवाळी च्या फराळामधील एक महत्वाचा गोड पदार्थ. पण शंकरपाळ्या, चकल्या, करंज्या यांच्या तुलनेत काहीसा "लो स्टँडर्ड" असलेला पदार्थ. :)
22 Oct 2011 - 6:18 pm | विसोबा खेचर
जियो..!
22 Oct 2011 - 6:55 pm | जागु
सगळ्यान्चे मनापासून धन्यवाद.
22 Oct 2011 - 9:34 pm | रेवती
अगबाई! हा पदार्थच माहित नव्हता.
खरच बोरांसारखा दिसतोय.
22 Oct 2011 - 10:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा पदार्थच माहित नव्हता.
-दिलीप बिरुटे
22 Oct 2011 - 10:10 pm | सुधांशुनूलकर
नक्की करून बघणार आहोत.
सुधांशु
22 Oct 2011 - 11:25 pm | जागु
रेवती, डॉ., सुधांशू धन्यवाद आणि नक्की करुन बघा साधा पण छान प्रकार आहे.
22 Oct 2011 - 11:39 pm | सुहास झेले
मस्त... शेवटच्या फोटोतून २५-३० उचलता आली असती तर अजुन मज्जा आली असती ;-)
23 Oct 2011 - 4:43 am | Mrunalini
मस्तच पाकृ.. मी पण सासरी आल्यावरच पहिल्यांदा खाल्ले. मस्त लागतात. ही बोरे थोडी गुळ आणि गव्हाच्या कापण्या करतात, त्या सारखेच वाटतात. :)
23 Oct 2011 - 11:18 am | नरेश_
जाता जाता.. आता गावठी कोंबरीचा काला मटान आनं चांदलाची भाकर + ....ची शिफारस करतय.
23 Oct 2011 - 1:53 pm | जागु
नरेश ते पण आगरी पद्धतीचेच ना ? करेन आणि फोटो टाकेन.
24 Oct 2011 - 3:12 pm | एशितल
मस्तच
24 Oct 2011 - 4:21 pm | गणेशा
अप्रतिम
नविन माहिती मिळाली... आवडली
25 Oct 2011 - 4:54 am | नेत्रेश
एवढ्या लोकांना बोरं हा पदार्थ माहीत नव्हता ही नविन माहिती मिळाली.
25 Oct 2011 - 10:46 am | जागु
नेत्रेश तुम्ही रायगड जिल्हातील आहात का ? कारण हा प्रकार तिथेच जास्त प्रचलित होता. तोही आता काळाच्य पडद्याआड गेला आहे. पण माझ्या सासरी दर वर्षी होतो हा प्रकार.
स्वानंद धन्यवाद.
27 Oct 2011 - 6:56 pm | आशिष सुर्वे
जागु ताई, अक्षरशः डोळ्यात पाणी तरारलेय.
माझी आजी (आईची आई) दर दिवाळीत आवर्जून आमच्यासाठी ही बोरं करायची आणि आम्ही नातवं मिट्क्या मारत खाताना पाहून पदराने डोळे पुसायची अन् म्हणायची.. ''माझ्या पिलांना 'चावदस' खाताना बगून माझं पोट भरतय'' (बोरांना कोकणात 'चावदस' / 'चावदशी' पण म्हनतात)..
आता ती आमच्यात नाही.. अन् बोरंपण.. ती जाताना बोरं खाण्याची इच्छासुध्दा हिरावून घेऊन गेली..
असो,
भन्नाट पाकृ..
फोटोत बोरं अगदी जिवंत झालीयत बघा.. अन आठवणी सुध्दा..
मन:पूर्वक शुभेच्छा..
27 Oct 2011 - 10:50 pm | जागु
आशिष धन्यवाद. ह्या बोरांच्या निमित्ताने तुम्हाला पुर्वीचे दिवस आठवले ह्याबद्दलही चांगले वाटले.
27 Oct 2011 - 10:54 pm | इंटरनेटस्नेही
खल्लास पाकृ!
27 Oct 2011 - 10:55 pm | इंटरनेटस्नेही
खल्लास पाकृ!