श्री प्रशांत भुषण

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
12 Oct 2011 - 8:08 pm
गाभा: 

टीम अण्णांचे एक सदस्य श्री प्रशांत भुषण यांना केबिन मधे घुसुन मारहाण केल्याचे वृत्त पहाण्यात आले....अश्या भेकड हाणामारीचा निषेध
कश्मीर विषयी त्यांनी जे विधान केले होते त्याचा राग येवुन हे कृत्य हल्ले खोरांनी केल्याचे समजते.
काश्मिरी नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी सार्वमत घ्यावे..... सैन्य काढुन घ्यावे ..अशी मते व्यक्त केली होति श्री प्रशांत भुषण यांनी..
हल्लेखोर हे श्री भगत सिंग सेनेचे कार्य कर्ते असुन त्यांना श्री प्रशांत भुषण यांची कश्मीर विषयी ची भुमीका मंजुर नव्हती. असे समजते
सर्व मान्यवरांनी या भेकड कृत्याचा निषेध केला आहे...
खरे तर श्री अण्णा व त्यांचे साथिदार आंदोलनाला मिळालेल्या भरघोस पाठिंब्या मुळे कुठल्या हि विषयावर दणकुन मते देत असतात..
नुकतेच अरविंद केजरीवाल यांनी अण्णा संसदेपेक्षा मोठे आहेत, हे वक्तव्य केले. होते.
या मार हाणीत कदाचित हिस्सार मधल्या निवडणुकिचा पण यात संबंध आहे का? अशीहि प्रतिक्रिया ऐकण्यास मिळाली.

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

12 Oct 2011 - 8:43 pm | संदीप चित्रे

अशा प्रकारच्या मारहाणीचा मी निषेधच करतोय.

>> नुकतेच अरविंद केजरीवाल यांनी अण्णा संसदेपेक्षा मोठे आहेत, हे वक्तव्य केले. होते.>>
हे मात्र अर्धसत्य आहे! ह्या वाक्यापाठोपाठ केजरीवाल असेही म्हणाले होते की भारताचा प्रत्येक नागरिक हा संसदेपेक्षा मोठा आहे.

बाकी केजरीवालांचे वक्तव्य योग्य की अयोग्य / कायद्याला धरून आहे अथवा नाही इ. माहिती नाही परंतु अर्ध वाक्य / माहिती दिल्यास आपल्यात आणि मिडियावाल्यांमधे काय फरक राहणार?

विकास's picture

12 Oct 2011 - 9:31 pm | विकास

अशी हाणामारी अयोग्यच आहे.

पण ही भगतसिंग क्रांतीसेना कोण आहे? कधी ऐकलेले देखील नाही... जर त्यांना प्रशांत भुषण यांच्या काश्मीरविषयीच्या मताचा इतका राग आला असला तर तो इतर वेळीपण इतरांच्या बाबतीत येतो का? उ.दा. अरुंधती रॉय यांच्याबद्दल त्यांनी कधी निषेध केला आहे का? त्यांनी काही रॉय यांच्या विरोधात करावे असे सुचवायचे नाही आहे. पण असे उपटसुंभ जेंव्हा असे विशिष्ठ ठिकाणी / वेळेस राष्ट्रप्रेम दाखवत काही राडे करतात तेंव्हा "डाल मे कुछ काला है" असे म्हणावे लागते...

नुकतेच अरविंद केजरीवाल यांनी अण्णा संसदेपेक्षा मोठे आहेत, हे वक्तव्य केले. होते.

वर संदीपने उर्वरीत वक्तव्य पण सांगितले आहेच. तरी देखील असे म्हणेन की त्यांना जे काही म्हणायचे होते ते त्यांनी म्हणले. "नेहरू महाराष्ट्रापेक्षा मोठे आहेत" अथवा "इंदिरा इज इंडीया" वगैरे आपण पुर्वी ऐकलेले आहेच...

छोटा डॉन's picture

12 Oct 2011 - 9:46 pm | छोटा डॉन

जे काही झाले त्याचे फारसे वाईट वाटले नाही
( प्लीज आता ते प्रशांत भुषण यांचे वय, त्यांचे स्टेटस, टीम-अण्णा शी असलेला संबंध, आत्तापर्यंतचे योगदान इत्यादींच्या आणाभाका देऊ नका ).

भारत गेली कित्येक वर्ष सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या व सदर प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात पेंडिंग असताना व त्याचा निकाल लागुस्तोवर त्या भागात रहात असलेल्या 'भारतीय' नागरिकांचे संरक्षण सैन्य ठेऊन करत असताना ह्या भुषण साहेबांना ह्यावर 'इच्छा असल्यास सार्वमत घेतले जावे आणि त्यात वेगळे व्हावे असा कौल आल्यास वेगळे होऊ द्यावे' अशी उपटसुंभ प्रतिक्रिया देण्याचा अधिकार कोणी दिला ?
ओके, एक सामान्य नागरिक म्हणुन ही प्रतिक्रिया दिली आहे असे म्हणणे आहे ना ?
ओके, मग त्या प्रतिक्रियेचा अजुन एका सामान्य नागरिकाला राग आला व त्याने तो व्यक्त केला असे आम्ही मानतो. आता प्रथेनुसार त्याबद्दल त्या सामान्य नागरिकाला जी शिक्षा होईल तो ती भोगेलच की.

मग प्रोब्लेम कुठे आहे ?
एकदम सिंपल मॅटर आहे हा ....

बाकी प्रशांत भुषण किंवा समर्थकांचे ते दिलेले मत हे एका सामान्य नागरिकाचे नसुन एका संस्थेचे, गटाचे किंवा अन्य कुठल्या समुदायाचे प्रातिनिधीक मत आहे असे म्हणणे आहे काय ?
तसे असल्यास हा तिथल्या ' भारतीय लोकशाहीवर विश्वास असणार्‍या भारतीयांचा आणि त्यांचे संरक्षण करणार्‍या सैनिकांचा अपमान' मानु नये काय ?

आमेन !!!

- छोटा डॉन

माझीही शॅम्पेन's picture

12 Oct 2011 - 9:58 pm | माझीही शॅम्पेन

डॉनराव आपल्या पैकी प्रत्येक जण काहीना काही (किवा काही बाही ) बोलत असतो , उद्या तुमच्या एखाद्या जाहीर मत प्रदर्शनाबद्दल तुम्हाला कोणी सॉलिड धुतला तर केवळ शिंपल म्हणून सोडून द्यायच का प्रथेनुसार त्याबद्दल त्या सामान्य नागरिकाला जी शिक्षा होईल तो ती भोगेलच की अस म्हणून दुर्लक्ष करायाच ? :)

अर्थात झालेल्या प्रकारचा जाहीर निषेध व्यक्त केल्या गेल्या आहे !

छोटा डॉन's picture

12 Oct 2011 - 10:08 pm | छोटा डॉन

झालेली बेदम मारहाण बरोबर आहे असे नाही, ते चूकच आहे, त्याचाही निषेध व्हायलाच हवा.
माझे म्हणणे इतकेच आहे की भुषण साहेबांनी असे टोकाचे विधान करायला नको होते.
त्या प्रकारानंतर जे आरोप प्रत्यारोपाचे राजकारण चालू झाले आहे त्यामुळे चूकीचा मेसेज जात आहे असे वाटते.

बाकी माझी मारहाणीचे समर्थन करण्याची इच्छा नाही. तसे वाटत असल्यास क्षमस्व.
फक्त भुषण साहेबांसारख्या जबाबदार आणि मोठ्ठ्या व्यक्तीने अशी विधाने टाळली असती तर बरे झाले असते असे अजुनही वाटते.

मुक्तसुनीत's picture

12 Oct 2011 - 10:57 pm | मुक्तसुनीत

श्री. भूषण यांनी केलेलं एक राजकीय विधान आणि त्यांना झालेली मारहाण या दोन्ही गोष्टी "तत्वतः सारख्याच" आहेत का ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Oct 2011 - 12:35 am | निनाद मुक्काम प...

भूषण साहेबांचे हेच मत समस्त पाकिस्तानी ( सरकार ,लष्कर ,आय एस आय , जिहादी ग्रुप ) एकमुखाने व्यक्त करीत आहेत .त्यांच्या प्रतिनिधीने नुकतेच संयुक्त राष्ट्र संघात काश्मीर हा भारताचा भाग कधीच नव्हता अशी गरळ ओकली आहे .त्याचवेळी असा टोकाचे मत व्यक्त करणे म्हणजे ...
मला एकदम खिलाफत चळवळीला पाठिंबा दिल्याची घटना आठवली .
मुळात हाती जे कार्य दिले त्यावर त्यानी लक्ष केंद्रित केले तर देशावर मोठे उपकार होतील .

मितभाषी's picture

12 Oct 2011 - 10:05 pm | मितभाषी

डॉनरावांशी सहमत आहे.

खळ्ळ खटॅक भावश्या.

कुठलेही मत देण्यापूर्वी असे काही घडले आहे का हे पाहण्याचा आमचा शिरस्ता आहे

असे काही घडलेले नाही.

काल्पनिक गोष्टींवर चर्चा घडवण्या मागचा हेतू आधी स्पष्ट करावा

चिंतामणी's picture

13 Oct 2011 - 12:21 am | चिंतामणी

हल्लेखोर हे श्री राम सेनेचे कार्यकर्ते की श्री भगत सिंग सेनेचे कार्यकर्ते????

असो.

(काका खुलासा करणार नाहीत आणि केला तरी घटनेत बदल होत नाही.)

श्री. प्रशांत भुषण यांचे विधान नक्कीच आक्षेपार्ह आहे. डॉन्रावांच्या "भुषण साहेबांनी असे टोकाचे विधान करायला नको होते" या विधानाशी सहमत.

त्याच बरोबर कायदा हातात घेणा-यांचा निषेध.

पण ती झाली याची खंत वाटली नाही कारण कंफर्ट झोन मधे असताना वाटेल ते बरळणे हा तर गाढवपणाचकी , मग वरती आपल्या कर्माची फळे भोगावी लागली तर कशाला जगाला नावं ठेवायची म्हणतो मी ? आधी स्वतःच खोड्या काढायच्या आणी नंतर........ असो, थोडक्यात काय आधी कश्मीरी विस्थापीतांना तिथे परतवा... नंतरचं काय ते जनमत वगैरेबाबत मूद्यावर विचारकरायला वेळ देऊ...

चिंतामणी's picture

13 Oct 2011 - 12:52 am | चिंतामणी

थोडक्यात काय आधी कश्मीरी विस्थापीतांना तिथे परतवा... नंतरचं काय ते जनमत वगैरेबाबत मूद्यावर विचारकरायला वेळ देऊ...

तिथुन विस्थापीत केलेल्या काश्मिरी पंडीतांबद्दल या असल्या लोकांना कधी सहानभुती वाटली आहे का? त्यांचे काश्मीरातच पुनर्वसन करा असे कधी हे म्हणाले आहेत का?

असल्या बेजबाबदार वकव्यानंतर मारलं ते काय चुकीचं? पण असे परिणाम अरुंधती रॉय सारख्या किंवा मुलायम यादवसारख्या लोकांना का सोसावे लागत नाहीत?

नाईलाजानं डानरावांशी सहमती आहे. तसंच आत्मशुन्य आणि चिंतामण यांच्याशीसुद्धा सहमत आहे.

क्लिंटन's picture

13 Oct 2011 - 7:15 am | क्लिंटन

प्रशांत भूषण यांना झालेल्या मारहाणीचे समर्थन नाही.

प्रशांत भूषणने काश्मीरातून सैन्य मागे घेऊन सार्वमत घ्या असे म्हणणे आणि हुर्रियतच्या गिलानीची मागणी यात फरक काय? जर गिलानीवर अशा वक्तव्यांसाठी खटला भरला जाऊ शकतो मग प्रशांत भूषण वर असाच खटला का भरला जाऊ नये?

अण्णांच्या आंदोलनाला लोकांचे समर्थन मिळाले म्हणून वाटेल ते बोलायचा परवाना प्रशांत भूषणना दिला आहे का?आणि हो, भगवान श्रीकृष्णाचे अवतार असलेल्या अण्णांनी प्रशांत भूषण यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध केला आहे असे वाचनात आले नाही . मी या बाबतीत चुकीचा असेन तर मला आनंदच होईल.असले बेजबाबदार सहकारी अण्णांना कसे चालतात? की त्यांनी अण्णांचा गुळाचा गणपती बनवून टाकला आहे की अण्णांचेही त्यापुढे काही चालत नाही?

मागे कुठल्यातरी संघटनेने गिलानीच्या तोंडाला काळे फासले होते त्याचे अनेकांनी समर्थन केले होते. अशा मंडळींची प्रशांत भूषणवरील हल्ल्यावर भूमिका काय असेल हे समजून घेणे इंटरेस्टिंग ठरेल.

विकास's picture

13 Oct 2011 - 4:51 pm | विकास

प्रशांत भूषण यांना झालेल्या मारहाणीचे समर्थन नाही.

सहमत

प्रशांत भूषण यांचे वक्तव्य बेजबाबदार आहे असे जर शिर्षकातून म्हणले आहे असेल तर त्याच्याशी आणि "असले बेजबाबदार सहकारी अण्णांना कसे चालतात?" या प्रश्नाशी देखील सहमतच आहे. (विशेष करून त्यांच्या विधानाची चित्रफीत बघितल्यावर).

गिलानीवर अशा वक्तव्यांसाठी खटला भरला जाऊ शकतो मग प्रशांत भूषण वर असाच खटला का भरला जाऊ नये?

मला वाटते त्यात फरक आहे. भूषण यांनी जे काही मागितले आहे ते भारतसरकारच्या ४८ सालच्या सार्वमत आणि संयुक्त राष्ट्रसंघाकडे नेण्याच्या निर्णयाअंतर्गत आहे. त्यांनी काश्मीर हा भारताचा आत्ता भाग नाही अथवा पाकव्याप्त काश्मीरला (ज्याला दहशतवादी आझाद काश्मीर म्हणतात) पाठींबा दाखवलेला नाही. गिलानींचे तसे नव्हते...

क्लिंटन's picture

13 Oct 2011 - 6:14 pm | क्लिंटन

भूषण यांनी जे काही मागितले आहे ते भारतसरकारच्या ४८ सालच्या सार्वमत आणि संयुक्त राष्ट्रसंघाकडे नेण्याच्या निर्णयाअंतर्गत आहे. त्यांनी काश्मीर हा भारताचा आत्ता भाग नाही अथवा पाकव्याप्त काश्मीरला (ज्याला दहशतवादी आझाद काश्मीर म्हणतात) पाठींबा दाखवलेला नाही. गिलानींचे तसे नव्हते..

आता हा मनुष्य स्वतः नामांकित वकिल असल्यामुळे आपल्या वकिलीचा वापर करून असल्या पळवाटा काढून सुटून जाऊ शकेलही. पण तो म्हणतो की काश्मीरात सार्वमत घ्या याचाच अर्थ काश्मीर हा भारताचा नि:संदिग्धपणे भाग आहे असे त्याला वाटत नाही असे म्हटले तर काय चुकले?

विकास's picture

13 Oct 2011 - 8:09 pm | विकास

आता हा मनुष्य स्वतः नामांकित वकिल असल्यामुळे आपल्या वकिलीचा वापर करून असल्या पळवाटा काढून सुटून जाऊ शकेलही.

सहमत

पण तो म्हणतो की काश्मीरात सार्वमत घ्या याचाच अर्थ काश्मीर हा भारताचा नि:संदिग्धपणे भाग आहे असे त्याला वाटत नाही असे म्हटले तर काय चुकले?

मला तसे वाटत नाही, जरी माझा भूषण यांच्या विधानास आक्षेप असला तरी... कधीकाळी सरकारने सार्वमत घेण्यास मान्यता दिली असे अनेक जणांचे जे मत आहे त्याला अनुसरून भूषण यांनी म्हणलेले आहे. या शांतीप्रिय समाजसेवकांना वाटते की जर काश्मीरची समस्या (का त्यांच्या दृष्टीने ब्याद?) संपली तर भारत-पाक मधील प्रश्नाचे मूळ संपेल आणि मग भारतीय उपखंडात शांती येईल, विकास होईल वगैरे... माझ्या दृष्टीने, "हसके लिया पाकीस्तान, लढके लेंगे हिंदूस्थान" अशा घोषणा करणार्‍यांना तसेच पाकीस्तान आजतागायत कसे वागत आले आहे, हे विसरून असले शांतीप्रिय विचार करणे हे भाबडेपणाचे लक्षण वाटते.

मात्र त्यात एकजण असे शांतीप्रिय सोयिस्करपणे विसरतात की त्याच करारात आठवणीप्रमाणे असे देखील म्हणलेले आहे, की "असे सार्वमत घेण्याआधी पाकव्याप्त काश्मीरसकट संपूर्ण काश्नीर हे भारताच्या अधिपत्याखाली आले पाहीजे, जसे ते १९४८ च्या घुसखोर युद्धाआधी होते. तसेच सर्व विस्थापित काश्मीरी पंडीत हे परत काश्मीरमध्ये प्रस्थापित झाले पाहीजेत." असो.

क्लिंटन's picture

13 Oct 2011 - 8:27 pm | क्लिंटन

मात्र त्यात एकजण असे शांतीप्रिय सोयिस्करपणे विसरतात की त्याच करारात आठवणीप्रमाणे असे देखील म्हणलेले आहे, की "असे सार्वमत घेण्याआधी पाकव्याप्त काश्मीरसकट संपूर्ण काश्नीर हे भारताच्या अधिपत्याखाली आले पाहीजे, जसे ते १९४८ च्या घुसखोर युद्धाआधी होते. तसेच सर्व विस्थापित काश्मीरी पंडीत हे परत काश्मीरमध्ये प्रस्थापित झाले पाहीजेत.

आणि म्हणूनच या प्रशांत भूषणसारखे अनेक लोक जी लेक्चरबाजी करतात ती त्यांनी पाकिस्तानात जाऊन करावी आणि पाकिस्तानला सांगावे की तुम्ही POK भारताच्या हवाली करा, POK मध्ये मुळच्या काश्मीरी नसलेल्या लोकांना स्थायिक केले आहे त्यांना तिथून काढा, POK चा काही भाग चीनला दिला आहे तो भारताला परत करा इत्यादी इत्यादी आणि मगच सार्वमताचे नाव काढा. ते तसे करताना आढळत नाहीत कारण त्यांना माहित आहे की असे काही सांगायला गेले तर त्यांना जिवंतच ठेवले जाणार नाही!आपला एक प्रॉब्लेम आहे की आपला समाज अशा वाळव्यांवर पाहिजे तितका संतापत नाही आणि म्हणूनच यांचे सगळे नखरे चालतात. तेव्हा माझे म्हणणे नुसते प्रशांत भूषणविषयीच नाही तर अशी लेक्चरबाजी जे कोणी करतात त्या सगळ्यांविषयी आहे.

५० फक्त's picture

13 Oct 2011 - 9:18 am | ५० फक्त

मारलं बरं केलं, इथं भारतीय सैनिक जीव घालवुन लढताहेत अन ह्यांना नको ते धंदे सुचतात, ज्यांनि या काश्मिर मधुन विस्थापित झालेल्या हिंदुच काय पण मुसलमान कुटुंबाची एकदा तरी प्रत्यक्ष भेट घेतलि आहे ना त्यांनाच या मागची भावना कळु शकते.

बाकी अजुन लिहिण्यापेक्षा छोटा डॉन आणि आत्मशुन्य यांच्याशी सहमत.

२५ तारखेला केलेल्या प्रशांत यांच्या विधानाचे पडसाद इतक्या उशिराने उमटण्याचे कारण काय ?हा पण संशोधनाचाच विषय नव्हे काय्?मुळात आपण म्ह्णजेच तेव्हढे विचारवंत अशी हवा डोक्यात गेलेल्यांचा प्रशांत भुषण न झाला तरच नवल?तो दिगविजयसिंग नावाचा माणूस असच काहिस बरळत असतो नेहमी त्याला कधी तुडवताय याची वाट बघत आहेत बरेच हिंदुस्थानी.......या सगळ्याचा संबध भाजपाशी जोडण्यात काँग्रेस गुंतली आहे.....मुळात जनलोकपालाच्या संदर्भात झालेल्या अण्णांच्या उपोषणापश्चात देशात निर्माण झालेली काँग्रेसविरोधी परिस्थिती पाहता सद्यपरिस्थितीत असे काही करुन भाजपाला स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेण्याचा मुर्खपणा करण्याची गरज काय?जुलै महिन्यात सुब्रमण्यम स्वामी यांनी डिएनए या वृत्तपत्रात इस्लामी दहशतावादासंदर्भात एक लेख लिहिला होता.पुर्ण लेख इथे वाचता येईल. http://gregoryfegel.sulekha.com/blog/post/2011/07/dr-subramanian-swamy-s...
या लेखाच्या विरोधात दिल्लीपोलिसांनी मागिल आठवड्यात तक्रार दाखल करुन घेतली याआधी दोनदा पोलिसांनी यासंदर्भात तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला होता .....डॉ स्वामी यांनी काँग्रेसच्या पवित्र घराण्याच्या जावयाचे आर्थिक हितसंबध २जी मधे असल्याचे सांगत यापुढे रॉबर्ट वाढरा यांच्या संदर्भातली कागदपत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणले जातील असे जाहिर केले तक्रार दाखल करुन घेण्याची कारवाई या स्वामी यांच्या जाहिर वक्तव्यापश्चातच झाली...या विधानानंतर दिल्लीतील डॉ स्वामी यांच्या निवासस्थानावर काहि अज्ञातांनी हल्ला केला .व नासधुस केली .
http://www.youtube.com/watch?v=diq-7uGi3JA&feature=share.
हि बातमी माध्यमांनी दाखवली का?तर नाही ...प्रशांत भुषण यांना झालेली मारहाण हि खचितच निषेधार्ह(?) आहे पण ज्रर त्या घट्नेचे माध्यमांतील एका वाहिनीने चित्रण केले व त्याचे प्रसारण दिवसभर केले गेले तर मग स्वामी यांच्या घरावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा किमान उल्लेख देखिल माध्यमांनी का केला नाही?
.माध्यमांचे सर्वेसर्वा कोण आहेत हे सर्वश्रुत आहेच....त्यामुळे प्रशांत भुषण यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा खरा सुत्रधार कोण आहे .हे सहज लक्षात येऊ शकेल.....इतकाच जर प्रशांत भुषण यांच्या काश्मिर संदर्भात केलेल्या विधानाचा भगसिंग क्रांती सेनेला राग तत्सम आला होता तर मग हाच राग गिलानी,यासिन मलिक,मिरवाईज उमर फारुख,अरुंधती रॉय, फारुख अब्दुल्ला यांच्या नेहमी येणार्‍या काश्मिर संदर्भातल्या विवादास्पद विधांनाबद्दल दाखवताना कुठे गुडुप झालेला असतो....?
डॉनराव,आत्मशुन्य,निनाद क्लिंटन,चिंतामणी,शिल्पा. यांच्याशी सहमत..
मुळात हाती जे कार्य दिले त्यावर त्यानी लक्ष केंद्रित केले तर देशावर मोठे उपकार होतील .

हे सगळ्यात महत्वाचे......

पण काहीही म्हणा जर खरच हे भगतसिंग क्रांतीसेनेने केले असेल तर त्यांचे टायमिंग अंमळ चुकलेच म्हणायचे......

प्रशांत भूषण यांना झालेली मारहाण समर्थनीय नाही हे परत एकदा सांगतो. पण त्यापेक्षाही प्रशांत भूषण यांचे काश्मीरातून सैन्य मागे घेऊन सार्वमत घ्यायचे मत अधिक निंदनीय आहे. यावर अण्णा समर्थकांचे म्हणणे काय याच्या प्रतिक्षेत आहे. टिम अण्णांच्या नावाने दोन महिन्यापूर्वी जयघोष करत असलेल्यांनी प्रशांत भूषण यांची भूमिका तुम्हाला पटली आहे की नाही हे स्पष्ट केल्यास बरे होईल.

काश्मीरात सार्वमत घ्या किंवा आजादी द्या असा घोषा लावून स्वतःला पुरोगामी सिध्द करायचा प्रयत्न करणे म्हणजे काश्मीर भारतात राहावे म्हणून १९४७ पासून आजपर्यंत ज्या सैनिकांनी बलिदान केले त्याचा ढळढळीत अपमान आहे असे म्हटले तर काय चुकले? असे म्हणणे म्हणजे नेसत्या वस्त्रानिशी काश्मीरातून हाकलवून लावले गेलेल्यांच्या जखमांवर मीठ चोळणे असे म्हटले तर काय चुकले? जर अरूंधती राय intellectual राखी सावंत असेल तर जवळपास तसेच मत मांडत असलेल्या प्रशांत भूषणला काय म्हणावे?

या प्रश्नी एकेकाळी सैन्यात असलेल्या अण्णांनीही प्रशांत भूषणच्या वक्तव्याचा निषेध केल्याचे अजून ऐकिवात आलेले नाही. मग इथले टिम अण्णा समर्थकही अशीच बोटचेपी भूमिका घेणार का?

तिमा's picture

13 Oct 2011 - 6:26 pm | तिमा

जर अरूंधती राय intellectual राखी सावंत असेल तर जवळपास तसेच मत मांडत असलेल्या प्रशांत भूषणला काय म्हणावे

इंटलेक्च्युअल 'गोविंदा' !

>> अण्णा समर्थकांचे म्हणणे काय याच्या प्रतिक्षेत आहे.

अण्णा समर्थक म्हणजे काय? प्रशांतभुषण यांना मारहाण करणार्‍यांचासुध्दा भ्रष्टाचाराविरुध्दच्या मोहिमेला पांठीबा असल्याचे ऐकिवात आहे.

काश्मीरातून सैन्य मागे घेऊन सार्वमत घ्यायचे मत नक्किच निंदनीय आहे.

प्रशांतभुषण यांना काही व्यक्तिगत मते असु शकत नाहित का? आणि प्रत्येकवेळी अण्णांनी प्रतिक्रिया दिलिच पाहिजे असे आहे का?
हे म्हणजे अरुंधती रॉयने अण्णांना विरोध करताना जे लिहले ते आठवले (अण्णांनी मनसेला विरोध केला नव्हता म्हणे)

प्रशांत भूषणला intellectual दिग्विजयसिंह म्हणु शकतो

चेतन

अविनाशकुलकर्णी's picture

13 Oct 2011 - 6:05 pm | अविनाशकुलकर्णी

नवी दिल्ली - प्रशांत भूषण यांच्यावर हल्ला करणा-या तेजिंदर पाल सिंह बग्गाला आपल्या कृत्याचा कोणताही खेद नसल्याचे त्याने म्हटले आहे. यापुढेही भूषण यांच्यावर हल्ला करण्याची धमकी त्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखतीत दिली.

तो म्हणाला, भूषण यांच्या वक्तव्यावर आम्ही तीव्र नाराज आहोत. जे कोणी जम्मू काश्मिरला भारतापासून वेगळे करण्याची भाषा बोलतील, त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल. आमचा अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे मात्र, अफजल गुरु आणि अजमल कसाबचे समर्थन कधीही खपवून घेतले जाणार नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Oct 2011 - 9:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> भेकड हाणामारीचा निषेध
हाणामारीचा मीही तीव्र निषेध व्यक्त करतो.

विद्वान लोक पूर्वी काही बोलले असतील, अजूनही बोलत असतील तेव्हा आपणही असेच काही बोललो तर खपून जाईल, असेच काही नसते असे प्र.भूषण यांच्या उदाहरणावरुन वाटले.

भारताचा कोणताही भाग अन्य कोणत्या देशाला देण्याबाबतची कितीही उच्च कोटीची वैचारिक भुमिका कोणत्याही भारतीयांना दुखावणारी आहे. भावनेला हात घालणारी आहे. क्रांतीसेना आणि श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी आपला राग व्यक्त केला मात्र त्यांची राग व्यक्त करण्याची पद्धत चुकीचीच आहे हेही मान्य करावेच लागेल.

-दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत's picture

13 Oct 2011 - 10:28 pm | मुक्तसुनीत

प्रश्न : प्रशांत भूषण यांनी काश्मीरबद्दल एक राजकीय विधान केलेले आहे. अशी विधाने करण्यामधे त्यांनी कुठल्या कायद्याचा भंग केला आहे का ?

उत्तर : नाही. प्रस्तुत विधानामध्ये सकृद्दर्शनी तरी कायदा मोडल्याचे जाणवत नाही. राजकीय विधाने करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वाना असते तसे त्याना आहे ; त्यांनी ते वापरले.

प्रश्न : त्यांच्या या विधानाबद्दल झालेली मारहाण निंदनीय आहे काय ?
प्रश्नच नाही. राजकीय मते कुठलीही असली तरी प्रत्येकाने या गोष्टीचा निषेधच नोंदवला आहे.

प्रश्न : "टीम अण्णा" या नावाने ओळखल्या जाणार्‍या गटाने भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन छेडले आणि गेले काही महिने हे आंदोलन दिल्लीमधे चालवले गेले ; हा सर्व इतिहास सर्वज्ञात आहे. तर मग आंदोलनातल्या एका व्यक्तीने काश्मीर प्रश्नाबद्दल केलेल्या भाष्याची जबाबदारी संपूर्ण आंदोलनकर्त्या गटाची , त्यांच्या समर्थकाची आहे असे म्हणता येईल काय ?

उत्तर : नाही. तसे म्हणता येणार नाही. प्रशांत भूषण यांनी आंदोलनासंबंधित मुद्द्याबद्दल भाष्य केले असते तर त्याचे समर्थन/विरोध/स्पष्टीकरण इत्यादि संदर्भात आंदोलनाच्या धुरिणांनी पुढे येणे आवश्यक ठरले असते. प्रस्तुत संदर्भात प्रशांत भूषण यांनी आपली एका निराळ्या विषयावरची राजकीय भूमिका मांडली आहे.

प्रश्न : काही लोकांनी गिलानी यांच्या विरुद्धच्या हिंसेचे समर्थन केलेले होते. अशा मंडळींची प्रशांत भूषण यांच्या मारहाणीच्या संदर्भातली मते महत्त्वाची ठरतील असे मानण्यास जागा आहे काय ?

उत्तर : नाही.

प्रश्न : प्रस्तुत व्यासपीठावर "प्रशांत भूषण यांना मारले; उत्तम झाले" अशा स्वरूपाची मते नोंदली गेली आहेत. त्यांचे काय ?

उत्तर : माझ्यापुरते बोलायचे तर मी या अशा मतांचा निषेध नोंदवतो.

प्रशांत भूषण यांनी मत व्यक्त केले म्हणजे काही उद्याच काश्मिर भारतापासून वेगळे झाले असे नाही.
एरव्ही यापेक्षा कितीतरी आगलाऊ विधानं काश्मिरातले राज्यकर्ते करतात... तिथं जाऊन साधा निषेध करीत नाहीत.. भूषण असतील दिल्लीत.. सापडले की केला हात साफ.

विकास's picture

13 Oct 2011 - 11:09 pm | विकास

तिथं जाऊन साधा निषेध करीत नाहीत

म्हणूनच येथे म्हणल्याप्रमाणे, जरी हल्ला सर्वार्थाने अयोग्यच असला तरी "डाल मे कुछ काला है" असे वाटते.

या हल्ल्यामुळे सगळी चर्चा लोकपाल विधेयक, काँग्रेस वगैरेपासून दूर गेली...

प्रदीप's picture

14 Oct 2011 - 5:12 pm | प्रदीप

या हल्ल्यामुळे सगळी चर्चा लोकपाल विधेयक, काँग्रेस वगैरेपासून दूर गेली...

सदैव कुठल्या ना कुठल्या तरी छोट्या- मोठ्या स्कँडलच्या शोधात असलेल्या भारतीय जनतेस हे नवे चघळायला मिळाले, तेव्हा आता तूर्तास लोकपाल विधेयक वगैरे सर्व मागे पडणार.

ह्यामागे कसलेही षडयंत्र होते असे सकृतदर्शनी वाटत नाही, पण जे झाले आहे ते काँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे. तूर्तास त्यांनाही सेनेची जरूर पडणार नाही.

प्रदीप's picture

14 Oct 2011 - 6:22 pm | प्रदीप

.

प्रदीप's picture

14 Oct 2011 - 6:21 pm | प्रदीप

.

आनंदी गोपाळ's picture

3 Nov 2011 - 9:36 pm | आनंदी गोपाळ

पण,
ते टीम अण्णा चे सदस्य आहेत म्हणून भूषण यांना झालेल्या मारहाणीबद्दल इतकी बोंबाबोंब आहे. त्यांनी केलेली विधाने टीम अण्णा ची अधिकृत भूमीका दाखवितात काय? ते टीम अण्णा मधे नसते अन असे बोलले असते, तर त्याला काही किम्मत राहीली असती काय? मारहाण झाली असती काय? अन झाली असती तरी पेप्रात आली अस्ती काय? अन आली अस्ती तरी मिपावर चघळली गेली अस्ती काय??
शेवटी,
कोणत्या तरी कारणाने अण्णा टीम मधील एकेकास खच्ची करण्याचे हे वैश्विक कारस्थाण आहे काय??

(मुद्या ऐवजी गुद्दे वापरलेले पाहून दु:खी झालेला)
आनंदी गोपाळ

तो दिग्विजयचा माणूस होता असे कळते.

टीम अण्णाला धडा शिकवण्याचा विचार होता.

आतल्या गोटातल्या माहीतीबद्द्ल धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

14 Oct 2011 - 3:30 pm | प्रभाकर पेठकर

श्री. प्रशांत भूषण ह्यांचे मत हे त्यांचे वैयक्तिक मत असून 'टिम अण्णांचा' त्या वक्तव्याशी काहीही संबंध नाही. 'टिम अण्णा' ही फक्त जनलोकपाल आंदोलनासाठी निर्माण करण्यात आली आहे आणि त्या बाहेरील कुठल्याही वक्तव्याशी 'टिम अण्णांचा' संबंध नाही. असे मत श्री. अण्णा हजारे ह्यांनी व्यक्त केले आहे.

तसेच, काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो तसाच राहणार आहे. असे स्वतःचे वैयक्तिक मतहि श्री. अण्णांनी व्यक्त केले आहे.

श्री. प्रशांत भूषण ह्यांना 'टिम अण्णांच्या' टिम मधून दूर केले जावे ह्या शिवसेनेच्या मागणीवर बोलताना, 'टिम अण्णांच्या' प्रवक्त्याने ''टिम अण्णा' मध्ये कुणाला ठेवायचे आणि कुणाला काढायचे हे 'कोअर कमिटी' ठरवते' असे उद्गार काढले आहेत.

विकास's picture

14 Oct 2011 - 5:04 pm | विकास

(साधारण ३० सेकंदांनंतर)

तिमा's picture

14 Oct 2011 - 5:55 pm | तिमा

कुठल्याही संघाला टीम असे संबोधू नये. तसे केले तर लवकरच त्यांचा दारूण पराभव होतो. जसे, टीम इंडिया !!! (क्रिकेटची),
अशी माझी अंधश्रद्धा आहे.

क्लिंटन's picture

14 Oct 2011 - 6:26 pm | क्लिंटन

हा हा हा!!

स्वामी अग्निवेश प्रकरण भर अण्णांचे उपोषण सुरू असतानाच झाले. नंतर प्रशांत भूषण बेताल सुटले. आता संतोष हेगडे म्हणतात की टीम अण्णाचा Congress पक्षाविरूध्दचा (हिसार पोटनिवडणुकीत) अयोग्य होता!! एकूणच टीम अण्णामध्ये सर्वकाही आलबेल आहे असे वाटत नाही. आता टीम म्हणायचे नाही मग म्हणावे तरी काय? संघ अण्णा पण म्हणता येणार नाही!! :)

स्वतः अण्णांनी प्रशांत भूषणच्या वक्तव्याला विरोध केला हे थोड्या वेळापूर्वी वाचले. ते चांगलेच झाले.

अण्णांच्या आंदोलनाच्या मार्गाला (उपोषणाला) मी वैयक्तिक पातळीवर पाठिंबा देत नाही हे मी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. तरीही अण्णा हे एक निस्पृह आणि प्रामाणिक समाजसेवक आहेत हे मान्य केलेच पाहिजे..पण अण्णांच्या भोवती जे गोतावळे आहे त्याविषयी असे म्हणता येईल असे वाटत नाही.

भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले त्यापूर्वी काही महिने सामनामध्ये एक व्यंगचित्र आले होते. त्यात गाढवावर एक प्रसिध्द व्यक्ती बसली होती आणि लोक फुलांचा वर्षाव त्या व्यक्तीवर करत होते. पण गाढवाला पुष्पवृष्टी आपल्यावर चालू आहे वाटत होते. (या व्यंगचित्रातील गाढव म्हणजे आपल्याला उद्देशून आहे असे भुजबळांना वाटले असे वाटते :) ) लोकांचा अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला तो आपल्यामुळे मिळाला असे प्रशांत भूषण सारख्यांना वाटत असेल तर या व्यंगचित्रातील गाढवापेक्षा यांची अवस्था फार वेगळी नसेल.

अविनाशकुलकर्णी's picture

14 Oct 2011 - 8:38 pm | अविनाशकुलकर्णी

नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर (वृत्तसंस्था) - श्री. अण्णा हजारे यांचे सहकारी अधिवक्ता प्रशांत भूषण यांच्या कश्मीरच्या संदर्भातील देशद्रोही वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांच्यावर आक्रमण करणार्‍या भगतसिंग क्रांती
सेनेने देशविरोधी आणि धर्मविरोधी विधाने करून हिंदूंचा मानभंग करणार्‍या तथाकथिक सामाजिक कार्यकर्त्यां अरुंधती रॉय, हुरियतचे नेते सय्यद अली शाह गिलानी, मिरवाईज उमर फारूख, यासिन मलिक, तसेच एम्.ए.आर्. गिलानी यांचे कार्यक्रम देशभरात कोठेही झाल्यास उधळण्याची चेतावणी दिली आहे.
भगतसिंग क्रांती सेनेचे कार्यकर्ते तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली. बग्गा यांनी पुढे सांगितले की, देशद्रोही अथवा फुटीरतावादी नेत्यांना याआधीही सेनेने ‘सळो कि पळो’ करून सोडले आहे. देशप्रेमी युवकांना संघटित करून देशद्रोह्यांना धडा शिकवणे, हे आमच्या संघटनेचे प्रमुख कार्य आहे

आंबोळी's picture

14 Oct 2011 - 8:43 pm | आंबोळी

आयला...
हे भक्रासेचे लोक मिपाचे धागे वाचतात कि काय?
आपण तर फॅन झालोय या भक्रासेचा.