बालपणीचे निसर्ग सवंगडी

जागु's picture
जागु in कलादालन
28 Sep 2011 - 1:02 pm

बालपणी तुम्हीही धावला असाल ह्यांच्या पाठी. त्यांच सौंदर्य न्याहाळायला कधी गंमत म्हणून कधी हातात धरलेही असाल.

चतुर पकडायचा त्याला दोरा लावुन ठेवायचा किंवा त्याचे पंख धरुन त्याच्या पायाने त्याला एखादा छोटा खडा उचलायला लावायचा. तो लगेच उचलायचा. टाचणीलाही दोरा लावायचा मग ती मंद गतीने उडताना पहायचे. चतुर मला तेंव्हा हेलिकॅप्टर सारखाच वाटायचा. त्याच ते डोक हेलमेट घातल्या सारख वाटायच. फुलपाखराला पकडले की त्याचा रंग बोटांना लागायचा. बर्‍याच वेळा पिवळ्या पंखावर ऑरेंज ठिपके असलेले फुलपाखरू सापडायचे. परवा दिसला होता पण फोटो काढायला थांबला नाही तो. अजुन एक दिसला होता. काळा पुर्ण आणि हिरव्या कलरचे ठिपके. तोही कॅमेरा पर्स मधुन काढेपर्यंत पळाला. ती दफनक्रियाही माझी भावंडे करायची माती वरुन टाकुन. पण आता हे सगळ नाही करवणार. आता पकडून त्याला इजा होउ नये असच वाटत.

आता मी ह्यांच्या मागे फोटो काढण्यासाठी लागले होते. कुठे कुठे धावडवल ह्यांनी मला. एका जागेवर पोझ द्यायला तयारच नसतात. विश्रांतीसाठी बसले की पटकन पोझ देऊन परत उडायचे. अजुन बरेच राहीलेत फोटो काढायचे वेगवेगळे रंगित कारण ते पोझच देत नाहीत. राहावल नाही म्हणुन आता फोटो देतेच. पुन्हा वेगळे मिळाले हे सवंगडी की परत दाखवेन.

१)फुल पाखरु छान किती दिसते.

२)

३) विधात्याने काही भाग ह्यांच्यासाठीच राखुन ठेवला आहे. त्यांचा हक्कच आहे त्याच्यावर.

५)

६)

७)

८) छोटूकलीचा फ्रॉकच वाटतो ना ह्याची डिझाईन.

९)आमची डिझाईन, शेप सगळच न्यार.

१०)

११)

१२) चतुर आम्ही तरी तुमच्या हातात येतोच.

१३)

१४) टाचणी, सुई, पिन काहीही म्हणा

१५)

१६)

१७)

छायाचित्रण

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Sep 2011 - 1:19 pm | प्रचेतस

जागुतै फोटो खूपच सुरेख.
तुझी निसर्ग निरिक्षणशक्ती खूपच जबरदस्त आहे.

मदनबाण's picture

28 Sep 2011 - 1:24 pm | मदनबाण

मस्त फोटु... :)
टाचणी बर्‍याच वर्षांनी पाहिली ! :)

नमन, तुमच्या निरिक्षणशक्ती आणि संयमाला, आणि तुमचा हेवा वाटतोय, तुम्ही या सगळ्यांच्या जवळ राहताय त्याला.

गणेशा's picture

28 Sep 2011 - 4:08 pm | गणेशा

असेच म्हणतो आहे

दीप्स's picture

28 Sep 2011 - 1:59 pm | दीप्स

सुरेख आहेत फोटो. आणि सुक्श्म निरिक्शन.

जागु's picture

28 Sep 2011 - 2:02 pm | जागु

वल्ली, मदनबाण, फक्त ५० धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2011 - 2:17 pm | प्रभाकर पेठकर

सर्व छायाचित्रे सुंदर आहेत.

कॅमेरात सुविधा असेल तर फास्ट शटर स्पीड (१/८००....?), मल्टीपल एक्स्पोजर आणि आय्. एस्. ओ. २०० वर जास्त चांगली छायाचित्रे येतील असे वाटाते.

ह्या बाबतीत श्री. सर्वसाक्षी ह्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांनी मार्गदर्शन करावे ही ह्या प्रतिसादाद्वारे त्यांना विनंती.

सर्वसाक्षी's picture

28 Sep 2011 - 11:21 pm | सर्वसाक्षी

प्रभाकरशेठ,

दिलेल्या सन्मानाबद्दल आभार! शटर स्पीड अधिक असणे उत्तमच. आय एस ओ २०० वर नेल्याने ते शक्य होते आणि प्रतिमेच्या दर्जावरही परिणाम होत नाही. मात्र मॅक्रो ने टिपायची असली तर शटर स्पीड वर तडजोड करावी लागते कारण त्याचे व अ‍ॅपरचर चे प्रमाण व्यस्त आहे. जर अधिकाधिक भाग सुस्पष्ट टिपायचा असेल तर अ‍ॅपरचर वाढवावे लागते. टेली लेन्सला जितकी फोकल लेंग्थ तितका शटर स्पीड असावा असा एक अलिखित नियम आहे, त्यामुळे हाताचा कंप/ थरथर यांचा परिणाम कमीत कमी होतो. जर सूर्यप्रकाश उत्तम असेल तर हे सहज शक्य आहे. नपेक्षा आय एस ओ वाढविणे हा मार्ग आहे. कॅमेरा जितका चांगला तितकी त्याची आय एस ओ हाताळणी अधिक प्रभावी, म्हणजे ४०० ला देखिल उत्तम प्रतिमा येतात.

फुलपाखरांचे चित्रण करायचे असेल तर शक्यतो सकाळी सूर्योदयाच्या सुमारास सज्ज व्हावे. श्री. ओवळेकर यांनी असे सांगितले होते की त्या वेळेस फुलपाखरे बराच वेळ एका जागी बसतात, पंख पसरुनही बसतात. मात्र अनेक जातीच्या फुलपाखरांच्या पंखावर सूर्यप्रकाश पडल्याने काही उर्जापेशी कार्यरत होतात व मग उन पडल्यावर फुलपाखरे एका जागी न बसता भिरभिरु लागतात.

परत आलात की एकदा सकुसप या, आपण फुलपाखरे टिपायाला जाउ. आता उत्तम मोसम आहे, इतक्यात जमविता आले तर पाहा.

प्रभाकर पेठकर's picture

29 Sep 2011 - 1:51 am | प्रभाकर पेठकर

नाईलाज आहे. दिवाळीपर्यंत इथून हलणे मुश्किल आहे.

प्रभाकर पेठकर's picture

29 Sep 2011 - 1:51 am | प्रभाकर पेठकर

नाईलाज आहे. दिवाळीपर्यंत इथून हलणे मुश्किल आहे.

धन्यवाद प्रभाकरजी. सेटिंग बदलून पाहते.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Sep 2011 - 2:42 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त्यकन्या ते वनदेवी हा प्रवास आवडला ;)

फटू सगळेच अप्रतिम आले आहेत. बाणा म्हणल्याप्रमाणे टाचणी खूप दिवसांनी पाहिली.

श्यामल's picture

28 Sep 2011 - 3:00 pm | श्यामल

जागु, खुप सुरेख फोटो ! :smile:

जागु's picture

28 Sep 2011 - 3:49 pm | जागु

श्यामल, पर्‍या धन्स.

छान फोटो आलेत जागुतै
तुझ्या निरीक्षणशक्तीला_/\_

चित्रा's picture

28 Sep 2011 - 6:14 pm | चित्रा

जागु यांच्या लेखनाबद्दल दरवेळी काय नवे लिहू? त्यांची निरीक्षणशक्ती आणि त्याहीपेक्षा आजूबाजूच्या जगाकडे पहायची नजर, कुतुहल किती विविध प्रकारे दिसून येते!

खूप छान.

जागु's picture

28 Sep 2011 - 6:56 pm | जागु

जाई, चित्रा धन्यवाद.

इतकी 'फुलकाफुलू' पाहुन खरच बालपण आठवले. :)
जागुताईकडे 'अंगठ्या' तरी किती आहेत म्हणायच्या?

अत्रुप्त आत्मा's picture

28 Sep 2011 - 11:29 pm | अत्रुप्त आत्मा

फोटु येकदम खटाखट हायती... ११नंबरचा फोटु बघुन हवेत उडतांनाची बेटमेनची झुल आठवली... :-)

चतुर 'उडवण्या' बद्दलच्या सगळ्या अठवणी अगदी सेम आहेत,आमची त्यातली एडीशन म्हणजे आंम्ही चतुरांना एरंडाच्या पानांचा चिक पाजायचो...आणी अर्ध्या मिनटानी सोडलं,की हा 'चतुर' अगदी 'भोळसट' व्हायचा,,,तिरमिरी आल्यासारखा उडायचा...मंजे येकदम टांगा पलटी... या सगळ्या अठवणी आज जाग्या झाल्या...जागुतै धन्यवाद...

अवांतर--- कुठे कुठे धावडवल. ह्यांनी मला.... '' धावडवल'' हा शब्द मंजे खास एम एच-०६...ची निर्मिती...जसं पुढे पुढे कोकणात सरकायला लागतो,तस तस याचं रुप-धावडवलन,,,धावडवलनीत ...असं वाढत जातं...

तसेच काही खास रायगडी शब्द प्रयोग- ''पाकट काढणे'',''पोहाणी-(असणे)''

पल्लवी's picture

29 Sep 2011 - 12:01 am | पल्लवी

श्रीमंत आहेस तू जागुताई :)

शिल्पा ब's picture

29 Sep 2011 - 12:15 am | शिल्पा ब

मस्त फोटो.

प्राजु's picture

29 Sep 2011 - 12:36 am | प्राजु

क्लास!

सर्वसाक्षी मार्गदर्शना बद्दल खुप खुप धन्यवाद.

पराग काय हे ? म्हणजे तो झिंगत असेल पुर्ण.

पल्लवी, शिल्पा, प्राजु धन्स.

सुधांशुनूलकर's picture

29 Sep 2011 - 5:26 pm | सुधांशुनूलकर

फोटो फारच सुंदर आलेत.

या सवंगड्यांची नावं जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल ना ?

फोटो क्र. १,२ : थ्री स्पॉट ग्रास यलो
फोटो क्र. ३,४,५ : (५ मधे पंख पसरलेले) चॉकलेट पँझी
फोटो क्र. ६,७,१० : पामफ्लाय
फोटो क्र. ८ : पियरो ची एक जात (नक्की नाव शोधून सांगेन, बहुतेक `बँडेड पियरो')
फोटो क्र. ९ : (बहुतेक) कॉमन रोझ / ( रेड हेलन ?)
फोटो क्र. ११ : ग्रेट एग फ्लाय नर
फुलपाखरांचे फोटो काढायला धारावीच्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानात चला, तुम्हाला हवं तर मीही जरुर येईन तुमच्याबरोबर.

सुधांशु नूलकर

निवेदिता-ताई's picture

30 Sep 2011 - 4:12 pm | निवेदिता-ताई

मस्तच....अप्रतिम

प्रास's picture

30 Sep 2011 - 11:16 pm | प्रास

मस्त!

फोटो आवडले आणि लिखाणही.

:-)

मर्द मराठा's picture

2 Oct 2011 - 10:36 am | मर्द मराठा

मस्त आहेत छायाचित्रे... शिर्षकांमागचा कल्पनाविस्तार आणि आपली निरिक्षणक्षमताही...

मॅक्रो छायाचित्रे म्हणजे सहनशक्तीची परिक्षा.. मी टिपलेली फुलपाखरेही आपल्याला नक्की आवडतील..

वरील छायाचित्रे मॅक्रो लेन्स वापरून शक्य तितके मोठे अ‍ॅपर्चर वापरून काढली आहेत.