साहित्यः-सरंग्याचे तुकडे.
खवलेले खोबरे.
हळद
तिखट.(तब्येतीप्रमाणे)
मिठ.
एक चमचा धणे.
९-१० काळी मिरी.
५-६ लसूण पाकळ्या.
कांदा.(अर्धा उभा चिरलेला वाटपासाठी व अर्धा बारीक चिरलेला फोडणीसाठी).
चिंच.
पाव चमचा तांदळाची पिठी किंवा कणिक.
खोबरेल तेल फोडणीसाठी.
कृती :-सरंग्याच्या तुकड्यांना अर्धा तास मिठ लावून ठेवावे.
खोबर्यात बाकी साहित्य घालून बारीक वाटून घ्यावे. भांड्यात प्रथम खोबरेल तेल घालून तापले कि
बारीक चिरलेला कांदा घालावा.कांदा लालसर झाला की त्यात थोडे पाणी घालावे. व त्यात धुतलेले
सरंग्याचे तुकडे घालावे.वरून वाटण घालावे.मिठ घालून चांगली उकळी आणावी. गॅस मंद करून तुकडे
शिजले की गॅस बंद करावा.
२)तळलेले तारले.
साहित्यः-तारले.
हळद्,
तिखट्,
मिठ्.
तांदळाचा बारीक रवा.
तेल.
कृती :-तारले साफ करून त्यांना अर्धा तास मिठ लावून ठेवावेंअंतर धुवून त्यांना हळद्,तिखट व किंचित
मिठ लावावे. तांदळाच्या रव्यात घोळवून तेलात चुरचुरीत तळावे.फोटो काढेपर्यंत कोणाला धीर न
धरवल्यामुळे सरळ वाढलेल्या ताटाचाच फोटो काढला.आज तारल्या बरोबर कोलंबी व सरंग्याचे
तुकडे पण तळले होते.तर मारा आता ताव.
प्रतिक्रिया
4 Sep 2011 - 4:58 pm | Mrunalini
आई गं..... जीव गेला माझा भुकेनी...
4 Sep 2011 - 10:58 pm | ५० फक्त
आणि माझा फोटो बघुनी.
मी मासे खात नाही पण एक निश्चित की या तार्ले तळायच्या पद्धतीनं जगातल्या कोण्त्याही गार, गरम, गोड, आंबट, खारट, तुरट आणि इत्यादी इत्यादी पाण्यात सापडणारा आणि पकडला जाउ शकणारा मासा तळता येईल अन खाता येईल.
आणि अजुन एक शंका आहे, असा इस्ट वेस्ट ताटभर भात प्रेझेंटेशन म्हणुन वाढलाय का ?
5 Sep 2011 - 2:46 pm | ज्योति प्रकाश
नाही हो,नवर्याला जेवायला वाढ्लं होतं,म्हणून त्याच ताटाचा फोटो काढला.
4 Sep 2011 - 10:01 pm | जाई.
मस्तच
तोँडाला पाणी सुटले
4 Sep 2011 - 11:13 pm | daredevils99
कृती :-सरंग्याच्या तुकड्यांना अर्धा तास मिठ लावून ठेवावे
अर्धा तास मीठ लावत बसणे म्हणजे फार झाले. शिवाय पदार्थ खारट होईल ते वेगळेच.
तुम्हाला कृती :-सरंग्याच्या तुकड्यांना मिठ लावून अर्धा तास ठेवावे असे म्हणायचे आहे काय?
काही शंका -
१) सरंगा हा पापलेटचाच एक प्रकार आहे काय?
२) तारल्यात काटे फार असतात हे खरे काय?
5 Sep 2011 - 3:08 am | nishant
सरंगा म्हणजे हलवा..हे माहित होत पण तारल काय असत?
फोटो बघुन तोंडाला पाणि सुट्ले......
5 Sep 2011 - 10:58 am | गवि
हेच म्हणतो.
हलव्याला सरंगा म्हणतात हेही माहीत नव्हते.
तारले म्हणजे काय?
पाकृ झक्कास हे वेसांनल.
5 Sep 2011 - 2:11 pm | गणपा
तारल = सार्डिन.
हलवा ब्येस्ट. :)
5 Sep 2011 - 2:52 pm | ज्योति प्रकाश
कुठलेही मासे आणले तरी त्याला मिठ लावून अर्धा तास ठेवायला लागतात,खारट होत नाहीत.
सरंगा म्हणजे पापलेटचा भाऊ म्हटलं तरी चालेल.
तारल्यात काटे जास्त असतात,पण मासा टेस्टी असतो.
5 Sep 2011 - 11:23 am | सुहास झेले
झक्कास... तोंपासु !!
5 Sep 2011 - 7:33 pm | स्वाती२
तोंडाला पाणी सुटलं!
5 Sep 2011 - 8:10 pm | सानिकास्वप्निल
तोंपासू :)