आज मित्राकडे गणपतीची पूजा आहे आणि फ्रीज उघडून पहिला तर ओले खोबरे हाताशी होते मग म्हणालो व्हा सुरु आणि बनवा मोदक.
आता पहिलाच प्रयत्न होता त्यामुळे काही उकडीचे मोदक करून चौका मारायचा प्रयत्न नव्हता फक्त आपले साधे तळलेले मोदक केले. मि पा च्या सगळ्या बल्लवाचार्य आणि सुगरणीना नमस्कार करून पाककृती टाकतो.
पहिल्यांदा एका मित्राला सकाळी सकाळी फोन करून उठाव आणि लवकर मदत करायला ये असे सांगा .. मग तो येण्याची वाट पहा, तो पर्यंत ओले खोबरे फ्रीज मधून काढून ठेवा. जर नारळ वापरणार असाल तर तो फोडून आणि खोवून घ्या.
मी तरी मोदक कणकेचे साधे केले होते. मस्त कडकडीत होईपर्यंत तेल तापवले आणि ते कणकेत मोहन म्हणून घातले. थोडे थोडे पाही घालून कणिक मळून घेतली. छोटे छोटे गोळे पण करून घ्या.
From Modak
आता सारण तयार करायला घ्या. एव्हाना मित्र आलाच असेल. त्याला गूळ फोडायल लावा.(मित्राला नेहमी असे चांगले काम द्यावे! ) एका कढई मध्ये थोडे तूप गरम करा आणि त्यात खोबरे भाजून घ्या. त्यात वेलची आणि बदामाची पूड घाला. आधी तुपावर २ ३ लवंग टाकल्या तर मस्त चव येईल सारणाला. गूळ पण घाला आणि जरा तेल सुटायला लागले की काढून घ्या आणि थंड करायला ठेवा.
From Modak
आता एका कधी मध्ये तूप गरम करायला घ्या. गरम झाले की मग आच मध्यम करा. आणि मित्राला सांगा मोदक लाटायला आणि तुम्ही झार्या घ्या तळायला. मोदक सोनेरी लाल झाली की काढून घ्या.
From Modak
From Modak
देवा समोर ठेवा .. आणि घ्या बाप्पाचे नाव
From Modak
गणपती बाप्पा मोरया !!!
प्रतिक्रिया
4 Sep 2011 - 1:15 am | ज्योति प्रकाश
मोदकाचे फोटो कुठे गेले?
4 Sep 2011 - 1:26 am | प्राजु
फोटो दिसत नाहीयेत.
>>मित्राला सांगा मोदक लाटायला आणि तुम्ही झार्या घ्या तळायला. मोदक सोनेरी लाल झाली की काढून घ्या.<<
मग सारणाचं काय करायचं? लाटलेली कणिक तळून सारणाला लावून खायचि??
मला वाटलं कणकेची पारी लाटून त्यात सारण भरून मग मोदकाचा आकार देऊन मग तळायचे.
असो.. रेसिपी छान.
4 Sep 2011 - 3:13 am | निमिष ध.
आता दिसत आहेत का ? मला माझ्या सन्गणकावर दिसत आहेत ...
मग सारणाचं काय करायचं? लाटलेली कणिक तळून सारणाला लावून खायचि??
लाटुन झाले कि सारण पण भरुन टाकाय्ला सान्गा ..
आपली सुचना चान्गली आहे .. पण आता ती परत लेखात कशी टाकू ?
4 Sep 2011 - 5:48 am | मदनबाण
मस्त...
नुसत सारण देखील मस्त लागत खायला. :)
(मोदक प्रेमी) :)
5 Sep 2011 - 7:39 am | सूड
पहिल्याच प्रयत्न असला तरी स्तुत्य आहे हो !! आजकालच्या मुलींची मोदक म्हटलं की, "शी बै कोण घालणार एवढा घाट" अशी रिअॅक्शन असते. तुम्ही एवढा घाट घालून त्याचा सक्सेसफुल शेवट केलात त्याबद्दल अभिनंदन.
स्वगतः आता पाशवी शक्ती इथं यायच्या आत पळायला हवं !!
5 Sep 2011 - 4:49 pm | निवेदिता-ताई
मस्त.....:)
10 Sep 2011 - 4:06 am | नव-वधू
चवीला मोदका सारखे लागले ना? झाल मग!!
बाप्पा प्रयत्नावरच खुश झाले असतिल!!