साहित्य:
पिकलेलं केळं - १, भरड दळलेला तांदूळ किंवा तांदुळाची कणी - १/२ वाटी, दलिया - १/२ वाटी, दाण्याचं कूट - ३-४ चहाचे चमचे, नारळाचा चव - १/४ वाटी, केळीचं पान, मिरची - १ किंवा चवीनुसार, कढीपत्ता - १०-२० पाने, लिंबू १/२, तेल - १/४ वाटी, पाणी, मोहोरी, जिरे, हळद, हिंग, मीठ
कृती:
१. तांदुळाची कणी, दलिया आणि दाण्याचं कूट एकत्र करून पाण्याने धुवावे. पाणी निथळून घेतल्यावर मिश्रण एका भांड्यात झाकून ठेवावे. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लिंबाचा रस घालून पुन्हा एकत्र करून ठेवावे. ५-६ तास भिजवणे शक्य नसल्यास पाणी निथळून घेतलेल्या मिश्रणात सुरुवातीलाच मीठ, लिंबूरस घालून तासभर झाकून ठेवावे.
२. एका कढईत पाव वाटी तेल गरम करून मोहोरी, जिरे, मिरचीची फोडणी करावी, त्यात कढीपत्ता तडतडू द्यावा. त्यात केळं (३-४ मोठे तुकडे करून) परतून घ्यावे. नंतर चवीनुसार हळद, हिंग घालून त्यात क्र. १ मधील मिश्रण घालावे व मंद आचेवर ३-४ मिनिटे गरम करावे. मिश्रण सतत हलवत रहावे जेणेकरून तांदुळाची कणी किंवा दलिया जळणार नाही. कढई विस्तवावरून उतरवावी. त्यात नारळाचा चव घालावा व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून ठेवावे.
३. एका खोलगट भांड्याला आतील भागात सर्व बाजूंना आणि बुडाला केळीच्या पानांनी व्यवस्थित कव्हर करावे. भांड्याच्या तोंडापेक्षा थोडं वरपर्यंत केळीची पाने आलीत उत्तम. यात क्र. २ मधील मिश्रण घालावे व ते मिश्रण भिजेल एवढंच पाणी घालावं. गवती चहाची एक पात मिश्रणात व्यवस्थित खोचावी. वरच्या बाजूने केळीच्या पानांनी झाकून घ्यावे. हे भांडे कुकरमध्ये ठेवावे. कुकरच्या झाकणाला शिटी लावून भाताप्रमाणे शिजवून घ्यावे. (मंद आचेवर १० मिनिटे किंवा ३-४ शिट्या येईपर्यंत शिजवावे).
४. कुकरचे झाकण उघडल्यावर वाफ गरम असतानाच खावे / खाऊ घालावे. आवडीनुसार यावर कोथिंबीर, लिंबाचा रस वरून घ्यावे.
प्रतिक्रिया
31 Aug 2011 - 6:07 pm | bhaktipargaonkar
नेहमीप्रमाणेच जर ही पाककृती फोटो सकट असती तर अजून छान कळली असती....समजली असती...तेव्हा जरा फोटोच तेवढं बघा
31 Aug 2011 - 6:18 pm | निवेदिता-ताई
कुकरचे झाकण उघडल्यावर वाफ गरम असतानाच खाऊ घालावे....केव्हा येउ????
31 Aug 2011 - 6:20 pm | परिकथेतील राजकुमार
फटू हवाच होता.
एक शंका :- ह्याला बहूदा 'उबजे' म्हणतात, 'उपजे' नाही.
31 Aug 2011 - 6:36 pm | निवेदिता-ताई
:)
31 Aug 2011 - 7:02 pm | रेवती
ऐकले होते याबद्दल. फोटू हवाच नाहीतर समजणार कसे?
वेगळी आहे पाकृ!
31 Aug 2011 - 8:21 pm | सानिकास्वप्निल
वेगळी पाकृ आहे...फोटो असता तर आणखीन छान वाटली असती :)
31 Aug 2011 - 8:49 pm | मदनबाण
फोटु कुठ हाय ?
31 Aug 2011 - 9:21 pm | Mrunalini
पाकृ एकदम वेगळी आहे. त्यामुळे फोटो असता तर आजुन नीट समजली असती. :)
31 Aug 2011 - 9:52 pm | जागु
छान पाककृती. फोटो हवाच. पुन्हा कराल तेंव्हा नक्की टाका.
31 Aug 2011 - 10:45 pm | प्राजु
अरे बल्लवा.. फोटो टाक ना.
समजणार कसं काय केलं होतं नक्की. थेअरी सगळ्यांनाच येते ना.. मार्क प्रॅक्टीकल मध्ये जातात. :)
1 Sep 2011 - 11:21 am | इरसाल
मला एक प्रश्न पडला आहे.
दाण्याचे कुट धुवायचे म्हणजे ............हे कसे शक्य आहे ?
बाकी पाकृ छान आहे करावी लागेल.
2 Sep 2011 - 5:38 am | स्पंदना
मला एक प्रश्न पडला आहे.
दाण्याचे कुट धुवायचे म्हणजे ............हे कसे शक्य आहे ?
मला पण हाच प्रश्न पडला पण अतिशय वेगळी न ऐकलेली पाकृ .
फोटो काढा अन टाका भाउ.
2 Sep 2011 - 7:11 pm | प्रशांत उदय मनोहर
फोटो टाकायचा आहे. पण इथे अपलोड करायला प्रॉब्लेम येतोय. तिथे इमेज यू आर एल काय द्यायची ते कळत नाही. म्हणजे इमेज आधी इतरत्र अपलोड करून इथे फक्त लिंक द्यायची काय?
कृपया मार्गदर्शन करा.

2 Sep 2011 - 7:12 pm | प्रशांत उदय मनोहर

10 Sep 2011 - 9:29 pm | प्रशांत उदय मनोहर
चित्र टाकलंय.