मासे ३१) कोलंबी

जागु's picture
जागु in पाककृती
24 Aug 2011 - 12:40 pm

कोलंबी म्हणजे सगळ्यांच्याच परिचयाची. लहान मुलांसाठी तर अगदी आवडीचीच. कोलंबी आवडत नाही अशी मांसाहार करणार्‍या व्यक्तिमध्ये फार क्वचीत व्यक्ती आढळतील.

कोलंबीमध्येही काही प्रकार असतात. लाल कोलंबी, पांढरी कोलंबी, करपाली नावाने ओळखल्या जाणार्‍या कोलंब्या. ह्या काळ्या रंगाच्या असतात.
लाल कोलंबी


सफेद कोलंबी

कोलंबीचे सुके

कोलंबी
२ मोठे कांदे
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
२ चमचे आल्,लसुण,मिरची, कोथिंबीर पेस्ट
हिंग, हळद
मसाला
मिठ
तेल
कोकम किंवा टोमॅटो किंवा कैरी

पाककृती:
१)जर कोलंबी सुकी करायची असेल आणि कोलंबी एकदम ताजी असेल तर तिला न सोलता फक्त शेपटी आणि टोक्याचा थोडा भाग काढुन मधले पाय काढायचे व कोलंबी स्वच्छ धुवुन घ्या.

२) धुतलेल्या कोलंबीला आल-लसुण्-मिरची-कोथिंबिरच वाटण चोळा. थोडी मुरवलीत तर अजुन छान.

३) भांड्यात तेल करम करुन लसुण पाकळ्यांची फोडणी देउन त्यावर कांदा गुलाबी रंग येईपर्यंत तळा.

४) कांदा बदामी रंगाचा झाला की त्यावर हिंग, हळद, मसाला टाकुन थोडे परतवा.

५) आता ह्यावर कोलंबी घालुन ती परतवा.

६) नंतर भांड्यावर झाकण ठेउन झाकणावर पाणी ठेउन मिडीयम गॅसवर कोलंबी शिजु द्या. मधुन मधुन ढवळा.

७) थोड्या वेळाने झाकण काढून त्यात कैरी/कोकम व मिठ टाका आणि परतवा.

८) परत झाकण ठेउन वाफ येउ द्या. ५ मिनीटांत कोलंबी तयार. कशी दिसतेय ? घाबरु नका लाल रंग दिसतोय तेवढी ती तिखट नाही.

तळलेली कोलंबी:
साहित्यः
कोलंबी
मसाला
मिठ,
हळद
आल-लसुण पेस्ट (ऑप्शनल किंवा जर साल काढली असतील तर तेंव्हा चांगली लागते)
तेल

पाककृती:
१) कोलंबीची साले काढा किंवा वरील प्रमाणे ठेवा.

२) सोललेल्या कोलंबीला मिठ, मसाला, हळद, आल-लसुण पेस्ट लावा वेळ असेल तर थोडी मुरु द्या.

३) तवा गरम करुन त्यावर तेल सोडून कोलंबी शॅलो फ्राय करण्यासाठी ठेवा.

४) कोलंबी शिजायला थोडा वेळ लागतो म्हणुन गॅस मिडीयम पेक्षा कमी ठेउन चांगली शिजु द्या. ७-८ मिनीटांनी पलटुन गरज वाटल्यास थोड तेल टाकुन परत शिजवुन गॅस बंद करा.


ही लहान मुलांच्या हाताला लागली तर तुमच्या वाट्याला येण्याचे चान्सेस कमी आहेत.

अधिक टिपा:
करपाली मिळाल्या की त्यांची वेगळी रेसिपी टाकेन.

कोलंबीचे कालवणही टेस्टी होते. त्यातही कांदा घालावा लागतो. वाटण ऑप्शनल असते. पुरवढ्यासाठि कालवणात बटाटा, दुधी,लाल भोपळा, सुरण, शेवग्याच्या शेंगा टाकतात.

कोलंबीची भजी, मसाला कोलंबी, कोलंबीचे दबदबीत, कोलंबीचे पॅटीस, कोलंबी पुलाव आणि अजुन बरेच प्रकार कोलंबी पासुन करता येतात.

जर कोलंबी जास्त जाड असेल आणि सोलली असेल तर त्यातील काळा धागाही काढतात. साला सकट कोलंबी जास्त रुचकर लागते. खाताना तिचे साल चावण्यात मजा येते.

कोलंबी जास्त प्रमाणातही खाउ नये बाधण्याची शक्यता असते. पथ्यात कोलंबी वर्ज असते.

प्रतिक्रिया

नको नको. वाचवा.
किती किती जीव घेणार श्रावणात.

स्वैर परी's picture

24 Aug 2011 - 12:55 pm | स्वैर परी

म्हात्रे बाई, कोलंबीची पा़कृ देउन तुम्ही आमचा जीव घ्यायचा ठरवले आहे अस दिस्तेय!
खुप च कातिल आहे . यम्मीईईई!!! :)

अवांतर : तुमचे माहेर्/सासर नायगाव ते बोरडी दरम्यान वगैरे आहे का? :)

जाई.'s picture

24 Aug 2011 - 5:16 pm | जाई.

जागुते श्रावण अजून संपायचा आहे. आता हे सगळे देउन का अजून मन चाळवतेस.

मस्त झालीय कोलंबी. अप्रतीम.:smile:

ही लहान मुलांच्या हाताला लागली तर तुमच्या वाट्याला येण्याचे चान्सेस कमी आहेत.

अगदी खरे १००% :tongue:

पाकृ अत्यंत आवडली आहे. आणि श्रावण वगैरे पाळत नसल्याने त्रास झालेला नाही. धन्यवाद..

कोळंबी सर्वोत्तम चविष्ट प्रकारांपैकी एक.. पण साली ठेवण्याचा ऑप्शन अजिबात आवडत नाही. खाताखाता सारखी कवचे काढत बसणे अजिबात मानवत नाही. काही भारी हॉटेलांत तर शेपट्याबिपट्यासकट कडक कवचवाल्या कोळंबी सर्व करतात. तिथे मागवतच नाही.

शिवाय एक दुर्दैवाची गोष्ट अशी की सर्वात आवडत्या समुद्री जिवांपैकी एक असूनही मला तरी कोळंबी खाल्ल्यावर ती मागून घशात लागते (तोंड आणि गळ्यात खाज किंवा कापल्यासारखे). हे सेन्सेशन वाईट आहे, तरीही चव प्रचंड आवडत असल्यामुळे कोळंबी खाणे थांबत नाही. अळूसारखे हे खाजरेपण घालवण्याचीही युक्ती असती तर किती बहार..

पल्लवी's picture

24 Aug 2011 - 1:02 pm | पल्लवी

नाही..कुठेही जाउन फेड, पण जाताना सांग. मी पण येईन बापुडी मागे मागे.
कोलंबी खाने के लिये हम कहींभी जा सकते है |

जाई.'s picture

24 Aug 2011 - 1:06 pm | जाई.

पल्लवी मी पण.
सकाळीच तू कबूल केलस ते.

पल्लवी's picture

24 Aug 2011 - 1:15 pm | पल्लवी

ते म्हनतील तसे.
आमाला पावर नाय !

जाई.'s picture

24 Aug 2011 - 1:17 pm | जाई.

ओके

ह्या फोटुच्या पुढे जाउच शकलो नाही.
जीव तिथेच टांगला गेलाय अजुन. :(

Mrunalini's picture

24 Aug 2011 - 2:19 pm | Mrunalini

खुपच छान.. तों. पा. सु. :)

विजुभाऊ's picture

24 Aug 2011 - 2:26 pm | विजुभाऊ

कोळंबीची साले कशी काढायची याचे मार्गदर्शन मिळेल का?
....अनभिज्ञ मत्स्याहारी.

पप्पु अंकल's picture

24 Aug 2011 - 8:34 pm | पप्पु अंकल

जागु ताई,
कोलंबी अतिशय आवडली.
४ वर्षापुर्विपर्यंत स्वतः पागायला जात होतो.
आता खाडी पण गेली आणि पाग पण गेला.
.....गेले........ ते दिन गेले......
सदर पाकृ चुलिवर केलेल्या आहेत काय ?

सानिकास्वप्निल's picture

24 Aug 2011 - 8:07 pm | सानिकास्वप्निल

छानच दिसत आहे...मी तळलेली कोळंबीसाठी ज्वारीचे पीठ वापरते...छान चुरचुरीत होतात :)

धनंजय's picture

24 Aug 2011 - 10:02 pm | धनंजय

न सोलता कुरकुरीत खायची?

बहुधा फक्त छोटी कोलंबी अशी खाता येईल असे वाटते. (बारीक सुकी कोलंबी मी अशीच सालासकट चुरचुरीत तळलेली खाल्लेली आहे.)

मोठी कोलंबी सोलल्यानंतर चुकून राहिलेले सालपट दातात येते तेव्हा बरे नाही वाटत.

जागु's picture

24 Aug 2011 - 11:50 pm | जागु

सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.

स्वैर परी माझे माहेर आणि सासर दोन्ही उरण.

विजुभाऊ पांढर्‍या कोलंबीची साले पटकन निघतात. पण लाल कोलंबीची कडक असतात. ती आधी थोडा वेळ फ्रिजरमध्ये ठेवायची मग साले काढायची पटकन निघतात.

पप्पु अंकल कुठे जायचात तुम्ही पागायला ? आता अशि माणस खुप कमी मिळतात. वेळच कुठे असतो कोणाकडे.

स्पंदना's picture

25 Aug 2011 - 7:56 am | स्पंदना

मस्त म्हणाव की मस्त्य म्हणाव?

पण साल ठेवण काही जमल नाही, मी तर कोळंबी सोलायला बसले की अक्षरशः दोन तास लागतात सार सोलुन त्यात्ले काळे धागे काढुन साफ करायला.