चिकन पिटा सँडविच

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
22 Aug 2011 - 5:53 pm

साहित्यः

५०० ग्राम चिकन ब्रेस्ट
२ टेस्पून लिंबाचा रस
२ टेस्पून आले+लसुण्+पुदिना पेस्ट
१ टेस्पून तंदूरी मसाला
दीड टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टीस्पून काळीमिरीपूड
१ टीस्पून गरम-मसाला
मीठ चवीनुसार
पिटा ब्रेड
आपल्या आवडीचे क्रंची सॅलॅड
पुदीना चटणी किंवा टोमॅटो सॉस

साहित्य व पाकृ लेमन विनीग्रेट (सॅलॅड ड्रेसींग)

१/४ कप ऑलिव्ह ऑईल
२ टेस्पून / अर्धा लिंबाचा रस
१/२ टीस्पून मस्टर्ड पावडर
१ टीस्पून काळीमिरीपूड
१ टीस्पून ड्राईड हर्ब्स
मीठ चवीपुरतं

.

सर्व एकत्र करून चांगले फेटा व सॅलॅड वर ओतून चांगले मिक्स करा.

.

तुम्हाला आवडत असेल तर ह्यात तुम्ही चिली फ्लेक्स , गार्लीक पावडर ही घालू शकता.

पाकृ:

चिकन ब्रेस्टला लिंबाचा रस, आले+लसुण्+पुदिना पेस्ट, तंदूरी मसाला, लाल तिखट, काळीमिरीपूड, गरम-मसाला व मीठ लावून ६-७ तास मॅरिनेट करा.

.

पॅन्मध्ये थोडे तेल घालून चिकन ब्रेस्ट शॅलो-फ्राय करा.(हवे असल्यास ग्रील, ओव्हन्मध्ये ही चिकन बेक करू शकता)

.

.

पिटा ब्रेड तव्यावर शेकून किंवा टोस्टरम्ध्ये टोस्ट करून घेणे.
पिटा ब्रेडच्या पॉकेट मध्ये ड्रेसींग घातलेले सॅलॅड, फ्राईड चिकन ब्रेस्ट, पुदीनाची चटणी / टोमॅटो सॉस
घालून सर्व्ह करणे.

.

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

22 Aug 2011 - 6:06 pm | प्रियाली

ए-१ फक्त मला लेट्युस सॅलडपेक्षा कोबी, भोपळी मिरची, टोमॅटो असं सॅलड आवडतं आणि थोडं वेरिएशन करून मेडिटेरेनिअन (हामुस, ताहिनी, पिकल वगैरे) पाककृतीही चांगली लागते.

प्रचेतस's picture

22 Aug 2011 - 6:43 pm | प्रचेतस

पाकृ आणि फोटोज नेहमीप्रमाणेच जबरदस्त.

अवांतरः तुमचा तो चमचा ५०फक्त यांना पाठवून दिला की काय? दिसला नाही म्हणून म्हणतो. :)

५० फक्त's picture

22 Aug 2011 - 11:23 pm | ५० फक्त

@ वल्ली, नाही तो चमचा हल्ली सानिकातै नी ठेवुन दिलाय शोकेस मध्ये, असं एक पत्र छापुन आलंय लंटनच्या द सॉन या दुरदर्शन मालिकेत, नेटवर लागते ती.

सानिकास्वप्निल's picture

23 Aug 2011 - 2:00 am | सानिकास्वप्निल

ओ नाही ओ मी त्याला कुणाची दृष्ट लागु नये म्हणून तीट लावून कपाटाच्या तिजोरीत सांभाळून ठेवला आहे ;)
पत्ता पाठवून द्या येत्या दिवाळी ला भेट म्हणून घरपोच आणून देईन म्हण्तेय :)

सनिकास्वप्निल,

तुमच्याकडे 2 जास्तीचे चमचे आहेत म्हणे त्या तिजोरीत ठेवलेले? :)

- (चमचा) सोकाजी

एकदम भारी.
प्रयाली म्हणते तस वेरिएशन करून पण भन्नाट लागतं.
थोडक्यात घरगुती शोवर्मा. :)

मस्तच.... आणि तुझा चमचा खुपच famous झालाय. ;)

जबर्दस्त पाकृ.
मुलाला नक्कि आवडेल माझ्या,
जय हो सानिका ताई!

पहिल्या फोटोत व्हिल साबणाचा लिंबु दिसतोय, जाम भारी,

काल गणपागुरुंच्या धाग्यावर लिहिला तोच प्रतिसाद पुन्हा रिपिट मारतो,

मांसाहारी नसल्याने छान सुंदर असा प्रतिसाद देणे शक्य नाहि,

पण विषय आवडत नसला तरि सर / बाई आवडतात तसं क्लासला हजेरी लावतात कालेजात म्हणुन हा प्रतिसाद. बाकि प्रेझेंटेशन आणि कढईतली वाफ लेन्सवर येउ न देता फोटो काढण्याचे कसब उपयुक्त आत्मसात केले पाहिजे.

आणि तो च...... भेटी लागी जीवा लागलीसे आस.

अवांतर - पत्ता देउ का तुम्हाला माझा ?

पल्लवी's picture

23 Aug 2011 - 9:40 am | पल्लवी

कौतुक करायला कुठले नवीन शब्द वापरावेत ह्या विचारातच लै वेळ गेला , पण वेगळं कै सुचलं नै !
साधंसुध "अ-प्र-ति-म" म्हणते ! :)

खादाड's picture

23 Aug 2011 - 12:58 pm | खादाड

एका सँडविच मध्ये जेवण होइल !!

छान.. नेहमीच्यापेक्षा वेगळा पदार्थ. धन्यवाद.