नारळीभात

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
13 Aug 2011 - 8:06 pm

.

साहित्यः
२ वाटया बासमती तांदुळ स्वच्छ धुवून अर्धा तास निथळत ठेवावे.
३ वाटया चिरलेला गुळ (आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे)
३ वाटया खवलेले ओले खोबरे
५-६ लवंगा
४-५ दालचिनीच्या काड्या
३-४ टेस्पून साजूक तुप
२ टीस्पून वेलचीपूड
सुकामेवा आपल्या आवडीप्रमाणे.

.

पाकृ:

भांड्यात १ टेस्पून तुप गरम करुन लवंगा व दालचिनी परतून घेणे.

.

मग त्यात निथळत ठेवलेले तांदुळ घालून चांगले परतणे व पाणी घालून भात शिजवून घेणे.

.

शिजवलेला भात ताटात काढून गार होऊ दयावा.
गुळ व ओले खोबरे एकत्र करुन घेणे.

.
जाड बुडाच्या भांड्यात २ टेस्पून तुप गरम करुन शिजवलेला भात व गुळ-खोबरे थोडे-थोडे करुन घालावे व हल़क्या हाताने एकत्र करावे.

.

एक- दोन वाफा आणाव्यात. त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा, वेलचीपूड घालून, झाकून गुळ वितळेपर्यंत शिजवावे.

.

आवडत असल्यास वरून एक चमचा साजूक तुप सोडावे.
गरमा-गरम खायला सुरुवात करावी.

.

प्रतिक्रिया

माझीही शॅम्पेन's picture

13 Aug 2011 - 8:39 pm | माझीही शॅम्पेन

एकदम कातील दिसतोय

असा सुरेख भात चापून दुपारी वामकुक्शी म्हणजे नारळी पोर्णिमा अगादी अंगावर येते :)

शुचि's picture

14 Aug 2011 - 1:19 am | शुचि

वा! सुरेख!

जाई.'s picture

14 Aug 2011 - 11:08 pm | जाई.

+1

अविनाशकुलकर्णी's picture

14 Aug 2011 - 2:14 am | अविनाशकुलकर्णी

केशरेी रंग हवा भाताचा.....त्या शिवाय मजा नाहि...............

सानिकास्वप्निल's picture

14 Aug 2011 - 2:58 am | सानिकास्वप्निल

आम्ही नारळीभातात केशरी रंग घालत नाही...केशरीभात किंवा साखरभात बनवताना त्यात केशर किंवा केशरी रंग घालतो.

निमिष ध.'s picture

14 Aug 2011 - 6:22 am | निमिष ध.

ऑफिस मध्ये गेलो आणि तुमची पाककृती वाचली .. संध्याकाळी मित्राला फोन केला म्हणालो आज करूच नारळी भात.
मग काय मारली एशियन स्टोर ची चक्कर आणि समान आणले आणि हा पहा ...

From pics

सानिकास्वप्निल's picture

14 Aug 2011 - 3:48 pm | सानिकास्वप्निल

तुम्ही तर लगेच करुन बघीतला नारळीभात, क्या बात आहे छानच दिसत आहे :)
धन्यवाद :)

निवेदिता-ताई's picture

14 Aug 2011 - 7:24 am | निवेदिता-ताई

अहाहा......................सुंदर....

मीही आज केला होता.
फोटो मस्त आले आहेत. :)

कच्ची कैरी's picture

14 Aug 2011 - 11:16 am | कच्ची कैरी

रेसेपी तर छानच !!पण फोटो तर अत्यंत सुरेख !!

मस्तच.
शेवटचा कधी चाखला होता आता आठवत पण नाही.

मीही केला होता.
यावेळी तुझ्या पाकृत लिहिल्याप्रमाणे दालचिनी घातली होती.
थोड्या लवंगा तुपात तळून पूड करून घातल्या आणि थोड्या तशाच ठेवल्या.
बाकी कृती सेम आहे.
रंग बरोबर आलाय.
पराने हा भात कसा केला हे वाचायला आवडेल.
फारच गुणी आणि बल्लव मुलगा आहे हा!;)

चतुरंग's picture

14 Aug 2011 - 10:22 pm | चतुरंग

अनुमोदन दिल्या गेले आहे!!

-रंगा नारळीकर ;)