आजी

Primary tabs

अभिजीत राजवाडे's picture
अभिजीत राजवाडे in जे न देखे रवी...
12 Aug 2011 - 1:01 pm

आजी म्हणजे मैत्रीण असते
सगळ्या घराची वीण असते,
मेणबत्तीला उभारण्यासाठीचे
खाली वितळवलेले मेण असते.

आजी ज्ञानाचे भांडार असते
अंधारात प्रकाशाचे दार असते,
कधी मायेची हळुवार फुंकर
कधी छडीचा कडवा वार असते.

आजी आमचे होकायंत्र आहे
तीचे शब्द आम्हाला मंत्र आहे
विचारात नेहमी गुरफटतो आम्ही
ती मात्र अजुनही स्वतंत्र आहे.

आजी म्हणजे दरारा असतो
आजी म्हणजे शहारा असतो
कुठलही पाऊल चुकत नाही
नजरेचा खडा पहारा असतो.

आजी म्हणजे दडपण आहे
आजी म्हणजे प्रेम पण आहे
पाहता क्षणी डोळ्यात भरणारे
घराचे भारदस्त घरपण आहे.

स्वराज्य घडविले शिवबाने
पण लढविले बाजीने आहे
जन्म आई-वडिलांनी दिला
संस्कार दिले आजीने आहे

घरटे साजिरे बनविले तिने जे
ते आम्ही वाढवणार आहे
नसानसात वावरणारा हा
तिचाच आत्मविश्वास आहे

कविता

प्रतिक्रिया

आधीच इथे लाडू, पानग्या, पातोळ्या आणि अनेक पाकृ पाहून आजीची आठवण होत असते. त्यात ही कविता..

:(

छानच आहे पण.

गणेशा's picture

12 Aug 2011 - 3:13 pm | गणेशा

मेणबत्तीला उभारण्यासाठीचे
खाली वितळवलेले मेण असते

अरे वा ही नविन कल्पना खुप आवडली .. एकदम छान ..

म्हणजे स्वताच्याच विचारांच्या आधाराने संपुर्ण घराचे विचार तेवत ठेवणारी आजी खुप आवडली.

बाकी कविता मनातील एकदम..

शुचि's picture

12 Aug 2011 - 7:03 pm | शुचि

अगदी हेच

जाई.'s picture

12 Aug 2011 - 11:14 pm | जाई.

आजीचा खरा फायदा नातवंडानाच होतो.
कारण दुधापेक्षा दुधावरची साय प्रिय असते.

कविता आवडली.

निवेदिता-ताई's picture

14 Aug 2011 - 8:19 am | निवेदिता-ताई

असेच म्हणते....

अभिजीत राजवाडे's picture

13 Aug 2011 - 3:42 am | अभिजीत राजवाडे

तुम्हा सर्वांपर्यंत माझी कवीता पोहचली यातच सर्वकाही आले.

खुप खुप आभार!!!

काल कविता वाचायची टाळलीच जरा!
आजीच्या आठवणींमुळे गवि म्हणतात तसेच म्हणते.
कविता आवडली.
यानिमित्ताने आजकालच्या आज्ज्या इतक्या मार्गदर्शक वाटतात की नाही ते पहावेसे वाटले.

अभिजीत राजवाडे's picture

13 Aug 2011 - 9:30 pm | अभिजीत राजवाडे

.

५० फक्त's picture

14 Aug 2011 - 12:22 pm | ५० फक्त

मला आजी लाभली नाही, माझ्या लेकराला लाभतीय म्हणुन कधी कधी त्याचा हेवा वाटतो, आता आईसमोर रडता येत नाही आजी असती तर.. असो.. कवितेतुन मला न दिसलेली आजी थोडी वाचायला मिळाली, धन्यवाद.