मासे २९) माकुळ/माखुल

जागु's picture
जागु in पाककृती
5 Aug 2011 - 4:43 pm

साहित्यः
माखली

लसुण ४-५ पाकळ्या ठेचुन
आल-लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट
हिंग, हळद
मसाला
सुके खोबरे व कांदा भाजुन केलेले वाटण
मिठ
गरम मसाला अर्धा चमचा
तेल
लिंबु किंवा चिंच (ऑप्शनल)

पाककृती
माकुल साफ करणे म्हणजे थोडे कठीणच काम असते. माखली दोन प्रकारच्या असतात नळ माखली आणि सर्‍या किंवा मणेर माखली. ही आहे नळ माखली. हिच्या वरती पातळशी साल असते ती काढून टाकायची म्हणजे लवकर शिजण्यास मदत होते. ही साल काढल्यावर अगदी शहाळ्यासारखी माखले दिसु लागतात.

ह्याचे डोके आणि शरीर हाताने सहज वेगळे होते. ते वेगळे करुन घ्यायचे. मग त्याच्या डोक्याच्या भागाला चिकटून काळसर भाग येतो तो काढुन टाकायचा आणि बाकीचा डोक्याचा चांगला भाग म्हणजे शेपट्या आणि मांसल भाग कापुन घ्यायचा.

आता माकुलचा दुसरा भाग नळी सारखाच असतो म्हणुनच त्याला नळ माखुल म्हणत असतील. तो मधुन चिरुन घ्यायचा. चिरल्यावर त्यात एक प्लास्टीकच्या तुकड्यासारखा सरळ भाग निघतो. ते बहुतेक त्याचे हाड असेल. ते काढुन टाकायचे. उजव्या बाजुच्या माखलीत तो भाग मध्ये आहे.

माखलीचे तुम्हाला आवडतील त्या शेपचे तुकडे करुन घ्या. अगदी फुला पानांच्या, कार्टूनच्या आकाराची कापलीत तरी चालेल. मी बाबा चौकोनी तुकडे केलेत.

वातताहेत ना शहाळ्याचे तुकडे ? खाताना खोबर्‍यासारखी वाटते.

ह्या तुकड्यांना आता आल,लसुण्,मिरची, कोथिंबिरच वाटण लावा. हवा असल्यास लिंबु पिळा थोडा. मी पिळते नेहमी त्यामुळे वईसपणा कमी होतो असे मला वाटते.

आता झाले सोप्पे काम, करा सुरुवात कुकर घेतलेत तर अजुनच सोप्पी होते माखलीची रेसिपी. ही शिजायला वेळ लागतो मटणासारखा म्हणुन मी नेहमी कुकरलाच लावते.

कुकरमध्ये तेलावर लसुणाची खमंग फोडणी द्या व त्यावर कांदा गुलाबी रंगावर तळा मग त्यात हिंग, हळद, मसाला घाला.
कुकरमध्ये काढलेला फोटो. फोटो वर जाउ नका रंग कसा दिसतो ते सांगा.

त्या मिश्रणावर आता बाकीचे जिन्नस म्हणजे माखलीचे तुकडे, कांदा-खोबर्‍याचे वाटण, गरम मसाला, मिठ, हवा असल्यास चिंचेचा कोळ (लिंबु घातला असेल तर गरज नाही ह्याची घातलाच तर अगदी थोडा घाला नाहीतर चव जाईल माखलीची) जर रस्सा करायचा असेल तर थोडेसे पाणी घाला जास्त घालु नका कारण माखलीचे पाणी निघते शिजल्यावर. आता हे सगळे मिश्रण ढवळून घ्या.

कुकरचे झाकण लावुन ४ ते ५ शिट्ट्या घ्या व गॅस बंद करा. झाली माखली.

कशी झालेय ? नविन मसाल्याची केलेय.

अधिक टिपा:
माखुल शक्यतो कोळणीकडूनच साफ करुन घ्या. खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी घरी आणुन साफ केलेय.

कडक असतील अश्याच माखुल घ्या. त्या ताज्या असतात.

प्रतिक्रिया

जाम भारी जागुताई......
माकुल म्हणजे छोटा ऑक्टोपस म्हणायला हरकत नाय.
सुक्का/तळून जाम भारी लागतो.

अहिराणी लोकेस करता : शेवटला दोन फोटो कसा पाटोयास्ना बट्ट वाटी ऱ्हायान्न.

पल्लवी's picture

5 Aug 2011 - 4:51 pm | पल्लवी

अजुन श्रावणाचा पहिलाच आठ्वडा चाल्लाय. ;)
आणि ते माशांचे सुरुवातीचे फटू नाय आवड्ले :(
फायनल प्रॉडक्ट छान दिसतंय पण.

आणि मोदकांचे फटू कुठेत ?

नवीन ओळख करुन दिल्यबद्दल धन्यवाद ..
माशा सन्दर्भात अधिक माहिती दिल्यास आनंद होइल !!

रेसिपी छान आहे !!

गणपा's picture

5 Aug 2011 - 4:56 pm | गणपा

माकुळ/माखुल/माकल्या म्हणजेच स्क्विड्सचं कालवण कधी खाल्लं नाही.

(स्क्विड चीली चापणारा ) गणा

स्क्विड कालवण लहान असताना खाल्ले होते. आता कायम श्रावण पाळतो.

- (भूतपूर्व मत्स्याहारी) पिंगू

परिकथेतील राजकुमार's picture

5 Aug 2011 - 5:13 pm | परिकथेतील राजकुमार

शेवटचा फटू कातीलच.

प्रियाली's picture

5 Aug 2011 - 5:20 pm | प्रियाली

स्क्विड एकदाच खाऊन पाहिला होता (इथे अमेरिकेत). फारसा आवडला नाही. असाच एकदा ऑक्टोपसही खाल्ला होता. :(

Mrunalini's picture

5 Aug 2011 - 5:28 pm | Mrunalini

आई गं.... वाचवा मला कोणीतरी..... काय मस्त दिसतय ते कालवण.... भुकेनी पोटात गोळा पडलाय...
कधी खाल्ल नाहीये हे कालवण, पण fied squids खाल्लेत... मला तर ते खुप आवडतात. मग हे कालवण पण नक्कीच आवडेल. धन्यवाद पाकृसाठी . एकदा नक्की करुन बघेल. :)

सहज's picture

5 Aug 2011 - 5:31 pm | सहज

स्क्वीड, कटल फिश नावाने माहीत होते, माखुल आज कळले. :-)

बाकी आम्हाला भजीच जास्त आवडते. पण रंग पाहून कालवण खायची इच्छा होते आहे :-)

एकदम ताज्या, कोवळ्या माखुलाची भजी कोण्याही शाकहार्‍याला खोबर्‍याची किंवा पांढर्‍या कांद्याची भजी म्हणुन बिन्धास्त खपवू शकता! (पक्षी : चवीत, वासात कोणाही शाकहार्‍याला कळण्या / मळमळण्याजोगे काही नसते)

मुलूखावेगळी's picture

5 Aug 2011 - 5:37 pm | मुलूखावेगळी

हे रिंगा रिंगा १ नंबर आहे

खादाड's picture

5 Aug 2011 - 6:40 pm | खादाड

मस्त पा.क्रु

नगरीनिरंजन's picture

5 Aug 2011 - 7:58 pm | नगरीनिरंजन

स्क्वीडला माकुळ म्हणतात हे माहित नव्हते!
कालवण एकदम किलर दिसतेय (कोणत्याही अर्थाने)!

कच्ची कैरी's picture

6 Aug 2011 - 7:39 am | कच्ची कैरी

जागु माकुळ फार भयानक दिसत असले तरी शेवटी तु त्यांना एकदम यम्मी स्वरुप दिले ,खूप छान.

अहाहा..

गोव्याच्या गतट्रिपमधे सिंकेरीच्या किनार्‍यावर झावळ्यांच्या झोपडीत बसून समुद्राकडे पहात वोडकेसोबत चापलेले म्हाकुळ आठवले.

पाकृबद्दल धन्यवाद. आम्हास फक्त पापलेट तळून करण्याची कृति माहीत होती. ही माश्यांवरची आणि जलचरांवरची सीरीज देऊन खूप मोठा खजिना खुला करुन दिला आहेत जागुताई.

आई ग! मी आजवर अगदी शंभर टक्के आपण स्क्विड खात नाही (आपण म्हणजे भारतिय ) अस समजत होते, पण त्याच म्हाकुळ हे नाव अन अगदी गावरान सांबारं ..., चला आता आणुन पाहिन.

गगनविहारी, अपर्णा धन्यवाद.

धनंजय's picture

13 Aug 2011 - 2:41 am | धनंजय

अजून हे कधी साफ केलेले नाही. आणि भजी/रसाचे कालवण पाश्चिमात्य पद्धतीचेच खाल्लेले आहे.
बाजारात मिळते का बघायला पाहिजे.