भरलेली भेंडी

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
3 Aug 2011 - 5:48 pm

साहित्यः
पाव किलो भेंडी, देठ काढून, मधे चिर देणे
२ छोटे कांदे पातळ उभे चिरलेले
१ चमचा हळद
१ चमचा आमचूर पावडर
२ चमचे लाल तिखट
२ चमचे धणेपूड
२ चमचे जिरेपूड
२ चमचे गरम-मसाला
२ चमचे बडीशेप-पूड
मीठ चवीनुसार
१ चमचा कलौंजी
३-४ चमचे बेसन
तेल

.

पाकृ:

प्रथम सर्व मसाले व मीठ एकत्र करून घेणे.
भेंडीला मधोमध चिर दिली आहे त्यात हा मसाला दाबून भरणे.

.

सर्व भेंडी भरून झाल्यावर त्यावर २-३ चमचे उरलेला मसाला घालणे .(बाकीचा एका घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावा पुढे वापरता येईल )

.

तयार भेंडीमध्ये २-३ टेस्पून तेल घालणे व नीट मिक्स करणे.

.

आता पातेल्यात तेल तापवून घेणे व त्यात कलौंजी घालणे.

.

कलौंजीचा सुवास आल्यावर त्यात चिरलेले कांदे घालावे व किंचित मीठ घालू परतणे.

.

कांदा पारदर्शक झाला की त्यात -थोड--थोडे बेसन घालून परतणे.

.

बेसन परतले गेले की त्यात भरलेली भेंडी घालून, झाकण लावून मंद गॅसवर शिजवणे.

.

मधे-मधे भेंडी हलक्या हाताने हलवणे, भेंडी शिजली की झाकण काढून मध्यम गॅसवर थोडे परतणे.
भरलेली भेंडी तयार आहे :)

.

ही पाकृ मी मास्टरशेफ संजीव कपूरच्या खाना खजाना मध्ये पाहीली होती, त्यात त्यांनी उभा चिरलेला कांद्याऐवजी छोटे मद्रासी कांदे मध्ये चिरून , दोन भाग करून वापरले होते.

प्रतिक्रिया

मस्त गं....तोंडाला पाणी सुटले. माझी भेंडी एकदम fav आहे... पण इथे मिळतच नाही... :(

भाजी मस्त झालेली दिसतेय, आणी फोटूही मस्त आले आहेत!

योगप्रभू's picture

3 Aug 2011 - 6:23 pm | योगप्रभू

अज्ञान दूर करावे. कलौंजी म्हणजे काय?

कांद्याच्या बिया. काळ्या तिळासारख्या असतात.

योगप्रभू's picture

3 Aug 2011 - 6:32 pm | योगप्रभू

ताई, धन्यवाद,
हे कधी वापरण्यात आले नव्हते. कुठे मिळते ते बघितले पाहिजे.

सानिकास्वप्निल's picture

3 Aug 2011 - 8:03 pm | सानिकास्वप्निल

कलौंजी म्हण्जे कांद्याच्या बिया
रेवती म्हणाली तसं काळ्या तिळासारख्या दिसतात.
मुंबई मध्ये किराणामालाच्या दुकानात, मॉलमध्ये सहज उपलब्ध आहेत.
मीसुध्दा मुंबईवरूनच आणल्या आहेत.

विशाखा राऊत's picture

3 Aug 2011 - 6:29 pm | विशाखा राऊत

अरे वाह.. मी कधी बेसन घालुन नाही बनवली.. आता एकदा करुन बघते अशी

अगदी हीच पाकृ करून पाहिली होती.
भाजी छान लागते.
संजीव कपूरने मद्रासी कांदे अर्धे चिरून घातले होते तसेच मीही घातले आणि भाजीला म्हणावा तसा ओलसरपण नाही आला. (कांदे शिजले तरी भेंडी शिजत नव्हती म्हणून जास्तवेळ आचेवर ठेवावी लागली) तू घातलेस तसे उभे चिरून घातल्याने भाजी अगदी कोरडी होणार नाही असे वाटते आहे. शिवाय माझ्याकडून बेसन किंचित जास्त घातले गेले आणि भाजी खाताना ते जाणवत होते.
फोटू नेहमीप्रमाणे चांगले आलेत.

श्रावण मोडक's picture

3 Aug 2011 - 6:35 pm | श्रावण मोडक

कॉलिंग परा. ;)

चांगली, कोवळी भेंडी कुठे मिळते ते बघायला गेलाय.
पुन्हा कलौंजीसाठी वणवण करावी लागणार ती वेगळीच!;)

श्रावण मोडक's picture

3 Aug 2011 - 7:45 pm | श्रावण मोडक

चांगली, कोवळी भेंडी कुठे मिळते ते बघायला गेलाय.

प्रतिसादाची वेळ पाहता, अगदी खरंय. ;)

चिंतामणी's picture

4 Aug 2011 - 6:20 pm | चिंतामणी

घरातुन बाहेर पडला की आजूबाजूला भरपूर भाजीवाले/वाल्या असतात.

करून खायला घालणारी शोधायला निघाला असे म्हणले असते तर एकवेळ ठिक.

(अवांतर- ध.मु. झाला. परा झाला. पुढचा कोणाचा नंबर. श्रामो की बिका);)

कुंदन's picture

3 Aug 2011 - 6:58 pm | कुंदन

रमजानच्या काळात असे फोटो वाल्या पा कृ पाहुन पोटात कालवा कालव होते.

गणपा's picture

3 Aug 2011 - 7:01 pm | गणपा

घ्या पानं वाढायला.. आलोच हात धुवुन. :)

स्मिता.'s picture

3 Aug 2011 - 7:54 pm | स्मिता.

भरलेली भेंडी आवडते, मीसुद्धा याच पद्धतीने बनवली होती. एकदम मस्त लागते.

फोटो काढायला तुमचे यजमान तुम्हाला फारच सहकार्य करतात हे दिसून येतंय. त्यामुळे त्यांचंही अभिनंदन!

सानिकास्वप्निल's picture

3 Aug 2011 - 8:06 pm | सानिकास्वप्निल

पाकृ बनवणे व पाकृचे फोटो काढणे दोन्ही माझेच छंद आहेत बरं का...
यजमानांना कसलं अभिनंदन ;)

पंगा's picture

3 Aug 2011 - 8:12 pm | पंगा

दुसर्‍या, तिसर्‍या आणि पाचव्या (विशेषतः पाचव्या) फटूतील 'लेडीज़-फिंगर्स'चे फटू आपण स्वतः काढलेले असणे अशक्य नसले तरी शक्यता कमी वाटते (आणि दुसर्‍या फटूच्या बाबतीत तर बहुधा अशक्य आहे), असा आमचा दावा आहे.

काय म्हणता?

सानिकास्वप्निल's picture

3 Aug 2011 - 8:22 pm | सानिकास्वप्निल

ट्रायपॉड चा ही वापर होऊ शकतो म्हण्टल पंगासाहेब :)
आणी फोटो काढायचे तर थोडी तसदी ही घ्यावीच लागते नाही का..

ट्रायपॉड चा ही वापर होऊ शकतो म्हण्टल पंगासाहेब

आणि शटर?

(दातांचा असाही उपयोग होऊ शकतो म्हणा... ;))

+१ टु पंगा, पण एकुण फोटो आणि प्रेझेंटेशन खतरनाक असतं हे नक्की,

अजुन एक, तुमची बोटं लांब आहेत, असं असणं हे कलाकार असल्याचं लक्षण मानलं जातं,

तसं तर हि भाजी अतिशय साधी आहे, पण प्रेझेंटेशन मात्र भारि, तुमचा तो नेहमिचा पुढं प्लॅस्टिक लावलेला चमचा नाही वापरला यावेळी, गरम भांड्यात वापरुन खराब झाला नाही ना ?

अशी भाजी पोळीबरोबर खाण्यापेक्षा नुसती खाण्यातच जास्त मजा येते, पोळीच्या एका घासाबरोबर भेंडी तोडायला अवघड होतं.

स्पा's picture

4 Aug 2011 - 9:36 am | स्पा

खतरनाक... फटू

आणि "लेडीज फिंगर" चा फोटू पण आवडला :)

पंगा's picture

4 Aug 2011 - 10:48 pm | पंगा

अजुन एक, तुमची बोटं लांब आहेत, असं असणं हे कलाकार असल्याचं लक्षण मानलं जातं,

अगदी अगदी! 'इन्हें ज़मीं पे मत रखिएगा, मैले हो जाएंगे' वगैरे वगैरे टाइप्स... ;)

स्मिता.'s picture

4 Aug 2011 - 1:51 pm | स्मिता.

एक वेळ तिसरा आणि पाचवा फोटो डाव्या हाताने कसरत करून काढला असे मानू शकतो पण दुसरा फोटो ट्रायपॉड वरूनही कसा शक्य आहे? फारच काटेकोर टायमिंग आणि कॅमेराचं स्पेसिंग करावं लागत असलं पाहिजे.

फोटो काढताना 'टायमर' पण लावता येतो. १० सेकन्ड पासून १ मिनिटापर्यंत.

बाकी रेसिपी आणि मांडणी दोन्ही मस्त.

प्राजु's picture

3 Aug 2011 - 8:37 pm | प्राजु

खल्लास!!
काय सॉल्लिड आहे रेशिपी.. आणि फोटू सुद्धा!

मयुरा गुप्ते's picture

4 Aug 2011 - 2:47 am | मयुरा गुप्ते

लवकरच करुन बघावी लागणार असं दिसतयं. फोटु क्लास...भेंडी न आवडणार्‍याला सुद्धा आवडुन जाइल असा.

मेघवेडा's picture

4 Aug 2011 - 3:26 am | मेघवेडा

खल्लास! अतिशय खमंग.. कधी येऊ जेवायला? :D

सहज's picture

4 Aug 2011 - 7:06 am | सहज

सानिकातैंच्या पाकृ प्रेसेन्टेशन करता बघाव्याच लागतात भले कुठला पदार्थ आवडीचा असो वा नसो!

पांथस्थ, गणपा व आता सानिकातै

बाकी श्री. पंगा यांच्या समाधानाकरता पाककृतीत साहीत्य म्हणुन एक फोटोग्राफर असेही लिहा बॉ! :-)

निवेदिता-ताई's picture

4 Aug 2011 - 7:21 am | निवेदिता-ताई

मस्तच......................:)

किसन शिंदे's picture

4 Aug 2011 - 10:19 am | किसन शिंदे

मस्तच!! भरलेल्या भेंडीसोबत प्रेसेंटेशन पण जबरदस्त आहे.

अतिशय छान. बेसन/कांदा घालून बनवलेले कधी खाल्ले नाहीत. घरी सांगावे लागेल.
माझी सौ. शेंगदाण्याचे कुट भरून बनवते.

स्वाती दिनेश's picture

4 Aug 2011 - 11:34 am | स्वाती दिनेश

मस्त दिसते आहे भरली भेंडी..
स्वाती

पल्लवी's picture

4 Aug 2011 - 1:06 pm | पल्लवी

:)

कच्ची कैरी's picture

4 Aug 2011 - 7:59 pm | कच्ची कैरी

झक्कास्!!!!!!!!!!!!!माझी एकदम फेवरिट डीश आहे ही .