चिकन टिक्का मसाला

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
27 Jul 2011 - 10:09 pm

माझ्या एक पंजाबी मैत्रीणीने पाकृ सांगितलेल्या प्रमाणे बनवली आहे.तीच येथे देत आहे, अतिशय चवदार अशी पाकृ आहे :)

साहित्यः

५०० ग्राम साफ करून ठवलेले चिकन
चिकनला १ टेस्पून आले+लसूण्+पुदिना पेस्ट, २ टेस्पून दही, २ टीस्पून तंदूरी मसाला, १ टीस्पून गरम-मसाला, मीठ लावून फ्रिजमधे ७-८ तास ठेवावे.

.

३ मध्यम कांदे बारीक चिरून
३ मध्यम टोमॅटो बारीक चिरून
२ टेस्पून आले+लसूण पेस्ट
३-४ टेस्पून काजु-पेस्ट
१ टेस्पून लाल तिखट
१ टेस्पून गरम-मसाला
१/४ टीस्पून हळद
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून काळीमिरीपूड
मीठ चवीनुसार
तेल

.

२ टेस्पून अख्खे धणे
१ टेस्पून जीरे
२-३ तमालपत्र
३-४ दालचिनी
९-१० काळीमिरी
२ मसाला वेलची
४-५ लवंगा

.

वरील सर्व खडा मसाला कोरडाच भाजून त्याची पूड करून घेणे.

पाकृ:

मॅरीनेट केलेले चिकन बेकिंग ट्रे मध्ये ठेवावे, चिकन पीसेसवर थोडे तेल सोडून २०० डिग्री वर १० मिनिटे शिजवून घेणे.

एका जाड बुडाच्या भांडयात तेल तापवून त्यात कांदा, आले+लसूण पेस्ट घालून चांगले परतून घेणे.

.

कांदा चांगला परतला गेल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो घालून परतणे.

.

टोमॅटो चांगले गळून गेले की त्यात सर्व मसाले, मीठ व वर सांगितलेल्या खडा-मसाल्याची पूड २-३ टीस्पून घालून तेल सुटेपर्यंत परतणे.

.

परतलेल्या मसाल्यात काजु-पेस्ट घालून परतणे.

.

त्यात शिजवलेले चिकनचे तुकडे, थोडे पाणी घालून, झाकून शिजवणे.

.

वरून थोडा गरम-मसाला, कोथिंबीर घालणे व गरमा-गरम सर्व्ह करणे.

.

(मी ह्या डिशला थोडा स्मोक्ड फ्लेवर दिला, कोळसा गॅसवर पेटवणे, निखारा वाटीत ठेवून ती वाटी ग्रेव्हीमधे ठेवावी व त्यावर तेल सोडावे व लगेच झाकण बंद करणे.)

प्रतिक्रिया

शाकाहारींसाठी पर्याय द्यावा ही विनंती.
लगेच चिकनऐवजी पनीर वापरा हे न सांगता काही दिवसांनी ती पाकृ दिली तरी चालेल.;)
फोटू नेहमीप्रमाणेच भारी.

मस्त फोटोज आणि +१ रेवती ताई, पनीर पेक्षा बटाटे अर्धे उकडुन मधुन पोकळ करुन त्यात चिज + पनिर भरायचे, आणि हीच भाजी करायचि, जाम भारी लागेल.

जाम भारी पर्याय दिला की वो.. :)

बाकी पाककृती आणि फोटो दोन्ही दिलखेचक..

- पिंगू

शाहिर's picture

28 Jul 2011 - 8:55 am | शाहिर

गटारी ची सोय झाली !!

सहज's picture

28 Jul 2011 - 9:44 am | सहज

मॅरीनेट केलेले चिकन बेकिंग ट्रे मध्ये ठेवावे, चिकन पीसेसवर थोडे तेल सोडून २०० डिग्री वर १० मिनिटे शिजवून घेणे.

आता ओव्हन ज्यांच्याकडे नाही त्यांनी जरासे शॅलो फ्राय करुन घेतले तर चालेल ना? म्हणजे त्या पायरीला पर्याय सांगा.

बाकी तुमच्या पाकृ नेहमीच नयनरम्य असतात हे नोंदवायचे होते.

सानिकास्वप्निल's picture

29 Jul 2011 - 5:09 pm | सानिकास्वप्निल

हो शॅलो फ्राय करुन घेतले तरी चालेल :)

स्वाती दिनेश's picture

28 Jul 2011 - 9:49 am | स्वाती दिनेश

चिकन टिक्का मसाला आवडला.
स्वाती

कच्ची कैरी's picture

28 Jul 2011 - 12:56 pm | कच्ची कैरी

इस चिकन टिक्कीने तो हाय मार डाला !

प्यारे१'s picture

28 Jul 2011 - 1:09 pm | प्यारे१

एक मस्त पीजे

लग्न झालेली कोंबडी जेव्हा कपाळावर कुंकू लावते तेव्हा त्याला काय म्हणतात?

.....

चिकन टिक्का.

खुपच मस्त गं... आणि त्या smoked flavour मुळे चव मस्त लगत असेल त्याची... तोंपासु :)

सानिकास्वप्निल's picture

29 Jul 2011 - 5:09 pm | सानिकास्वप्निल

सगळ्यांना धन्यवाद :)