चिकन टिक्का मसाला
माझ्या एक पंजाबी मैत्रीणीने पाकृ सांगितलेल्या प्रमाणे बनवली आहे.तीच येथे देत आहे, अतिशय चवदार अशी पाकृ आहे :)
साहित्यः
५०० ग्राम साफ करून ठवलेले चिकन
चिकनला १ टेस्पून आले+लसूण्+पुदिना पेस्ट, २ टेस्पून दही, २ टीस्पून तंदूरी मसाला, १ टीस्पून गरम-मसाला, मीठ लावून फ्रिजमधे ७-८ तास ठेवावे.
३ मध्यम कांदे बारीक चिरून
३ मध्यम टोमॅटो बारीक चिरून
२ टेस्पून आले+लसूण पेस्ट
३-४ टेस्पून काजु-पेस्ट
१ टेस्पून लाल तिखट
१ टेस्पून गरम-मसाला
१/४ टीस्पून हळद
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून काळीमिरीपूड
मीठ चवीनुसार
तेल
२ टेस्पून अख्खे धणे
१ टेस्पून जीरे
२-३ तमालपत्र
३-४ दालचिनी
९-१० काळीमिरी
२ मसाला वेलची
४-५ लवंगा
वरील सर्व खडा मसाला कोरडाच भाजून त्याची पूड करून घेणे.
पाकृ:
मॅरीनेट केलेले चिकन बेकिंग ट्रे मध्ये ठेवावे, चिकन पीसेसवर थोडे तेल सोडून २०० डिग्री वर १० मिनिटे शिजवून घेणे.
एका जाड बुडाच्या भांडयात तेल तापवून त्यात कांदा, आले+लसूण पेस्ट घालून चांगले परतून घेणे.
कांदा चांगला परतला गेल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो घालून परतणे.
टोमॅटो चांगले गळून गेले की त्यात सर्व मसाले, मीठ व वर सांगितलेल्या खडा-मसाल्याची पूड २-३ टीस्पून घालून तेल सुटेपर्यंत परतणे.
परतलेल्या मसाल्यात काजु-पेस्ट घालून परतणे.
त्यात शिजवलेले चिकनचे तुकडे, थोडे पाणी घालून, झाकून शिजवणे.
वरून थोडा गरम-मसाला, कोथिंबीर घालणे व गरमा-गरम सर्व्ह करणे.
(मी ह्या डिशला थोडा स्मोक्ड फ्लेवर दिला, कोळसा गॅसवर पेटवणे, निखारा वाटीत ठेवून ती वाटी ग्रेव्हीमधे ठेवावी व त्यावर तेल सोडावे व लगेच झाकण बंद करणे.)
वाचन
10286
प्रतिक्रिया
0