डाळीचे तोय व कारल्याच्या काचर्या.

ज्योति प्रकाश's picture
ज्योति प्रकाश in पाककृती
23 Jul 2011 - 5:32 pm

आज शनिवार घरात दोघांचेही उपास. घरात भाजीही नव्हती.पाऊसामुळे बाजारात जायचा कंटाळा आला
होता.मग भाजीला फाटा देऊन घरात एक कारलं होतं त्याच्या काचर्या(कचर्या काय हवं ते म्हणा) करायच्या
ठरवल्या.
१)डाळीचे तोय.
साहित्यः-एक वाटी तुरीची डाळ.
४-५ हिरव्या मिरच्या.
अर्धा इंच आले(आवडत असल्यास थोडं जास्त घातलं तरी चालेल).
मिठ.
एक टेबलस्पून तूप.
मोहरी,हिंग व १०-१२ कडिपत्त्याची पाने फोडणीसाठी.
२-३ सुक्या लाल मिरच्या तुकडे केलेल्या.
अर्धा चमचा हळद.
कृती :-तुरीच्या डाळी थोडे जास्त पाणी घालून त्यात हिरवी मिरची.बारीक चिरलेले आले(तोंडात आलेले आवडत
नसल्यास ठेचून घातले तरी चालेल) कुकरला लावावे.डाळ शिजली की भांड्यात काढून त्यात मिठ घालावे.
पाच मिनिटांनी उकळी आली की खाली काढावी.पळीत किंवा छोट्या कढईत तूप घालून तापले की त्यात
मोहरी,हिंग,कडिपत्ताची पने,सुक्या लाल मिरच्याची फोडणी करावी व ती शिजलेल्या डाळीत घालावी व
झाकून ठेवावे्ए तोय जरा पातळसरच असते.गरम तूप-भाताबरोबर लिंबू पिळून तोय वाढावे.

2)कारल्याच्या काचर्या.
साहित्यः- कारली.
हळद
लाल तिखट
मिठ
रवा व कणिक (ओपास नसल्यास तांदळाची पिठी घेतली तरी चालेल)
तेल
कृती :-कारली उभी चिरून आतील बिया काढून टाकव्या.चिरलेल्या कारल्याला धुवून मिठ लावून अर्धा तास ठेवावे.
कारल्याला सुटलेले पाणी काढून टाकावे.यामुळे कारल्याचा कडवटपणा निघून जाईल. नंतर त्याला हळद व
तिखट लावावे.रव्यात एक चमचा कणिक घालावी व त्यात घोळवून तेलात चुरचुरीत तळावे.

प्रतिक्रिया

निवेदिता-ताई's picture

23 Jul 2011 - 6:09 pm | निवेदिता-ताई

मस्त ग ...दुसरे काय सोलकढी आहे काय वाटीत???

सोलकढीचीही कॄती येउद्यात.

ज्योति प्रकाश's picture

23 Jul 2011 - 7:35 pm | ज्योति प्रकाश

सोलकढीची कृती मुडदुश्याची आमटी बरोबर दिली आहे.फक्त यात उपास असल्याने लसूण घातला नाही.

सहज's picture

23 Jul 2011 - 6:38 pm | सहज

बेत आवडला.

यकु's picture

23 Jul 2011 - 9:32 pm | यकु

झक्कास्स दिसतायत वड्या..
कारले भारी आवडते बुवा आपल्याला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jul 2011 - 9:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> झक्कास्स दिसतायत वड्या..
असेच म्हणतो. मला अळुच्या पानाच्या वड्या तळलेल्याच आवडतात.

>>> कारले भारी आवडते बुवा आपल्याला.
धत तेरे की, कारले काय खाण्याची वस्तू आहे. :)

-दिलीप बिरुटे

सानिकास्वप्निल's picture

24 Jul 2011 - 12:26 am | सानिकास्वप्निल

कारले मला खुप आवडतं, नक्की करून पाहीन :)

कारल आहे हे सांगीतल म्हणुन.. नाही तर मी चित्र पाहुन ते मस्त तळलेले बोंबील समजलो होतो. :)

''मग भाजीला फाटा देऊन घरात एक कारलं होतं त्याच्या काचर्या(कचर्या काय हवं ते म्हणा)'' -

कारलं ही भाजी नाही का काय, आणि काच-या असं म्हणायचंय का तुम्हाला ? पण फोटोत तर कारल्याचे उभे काप दिसत आहेत. काच-या शक्यतो आडव्या कापांना म्हणतात.

''रवा व कणिक (ओपास नसल्यास तांदळाची पिठी घेतली तरी चालेल)'' - उपासाला रवा आणि कणिक चालत असेल तर तांदळाच्या पिठिनं काय बिघडणार आहे, असे ही वरण भात आहेच की.

अति अवांतर - बघा पटतंय का -

एखादी खास, वेगळी, विशिष्ट पद्धतीनं केलेली रेसिपि वैग्रे असेल तरच इथं देण्यात आणि सांगण्यात जास्त मजा आहे असं माझं मत आहे. बाकी आधीच्या एक दोन धाग्यावर फोटोंबद्दल चर्चा झालेल्याच आहेत.

प्रचेतस's picture

24 Jul 2011 - 1:31 pm | प्रचेतस

पूर्णपणे सहमत

कारल्याच्या काचर्‍याची कृती आवडली...