आज सकाळी सकाळीच मंडईत गेले होते...कोवळी लुसलुशित कोथिंबीर पाहुन लगेचच घेतली.
पाच-सहा पेंड्या- आता एवढ्या घेतल्या खर्या पण काय करावे..मनात विचार आल्या..
कोथिंबीर वड्या करुयात...
मग झाली लगेच सुरुवात इतर साहित्य जमवायला..
कामवाल्या बाईकडून कोथिंबीर निवडून घेतली, लसूण सोलून घेतला...
मग उठलेच- लसूण भरपुर जिरे घालून मिक्सरमधुन फ़िरवुन घेतला,
तोपर्यंत कोथिंबीर निवडून झालीच होती, ती चिरुन , धुवुन घेतली,
त्यात थोडे बेसन पिठ, लसूण-जिरे पेस्ट, मिरची पावडर- जरा बेतानेच, मीठ चवीनुसार, थोडीशी साखर,
हे सर्व एकत्र करुन घेतले, व त्याच्या लांबट वळ्य़ा केल्या, व एका चाळणीला तेल लावुन त्यात ठेवल्या,
व गॅसवर पातेल्यात पाणी ठेवुन त्यावर ती चाळण ठेवली व दहा-पंधरा मिनिटे वाफवुन घेतल्या.
नंतर गॅस बंद केला, त्यानंतर त्या वड्या कोमट असतानाच कापुन घेतल्या व नंतर तळून घेतल्या.
ह्या पहा --
प्रतिक्रिया
22 Jul 2011 - 7:45 pm | रेवती
यावेळी पाकृ सांगण्याची वेगळी पद्धत आवडली.
कोथिंबीर वड्या तर आवडतातच पण मीही अशीच भरपूर कोथिंबीर आणली असताना केल्या होता.
दोन दिवस झाले तरी संपेनात्.....मग कानाला खडा!
परवाही तीन जुड्या कोथिंबीर आणली पण नेहमीच्या वापरातच निम्मी संपली म्हणून नाही केल्या.
फोटू चांगले आलेत.
22 Jul 2011 - 9:25 pm | सानिकास्वप्निल
रेवतीशी मी ही सहमत आहे पाकृ व फोटो छान आहेत :)
22 Jul 2011 - 10:25 pm | amirohi
उत्तम झाले .....मी करुन पहिले वा ....
23 Jul 2011 - 12:57 pm | निवेदिता-ताई
धन्यवाद ह
23 Jul 2011 - 1:03 pm | परिकथेतील राजकुमार
झ का स !! अप्रतिमच.
बेसन घरी कसे बनवता येईल कोणी सांगेल काय ?
आणि ही पाकृ कोथिंबीर न घालता कशी करता येईल?
आणि मुख्य म्हणजे घरी कामवाली नसल्यास सासुला कोथिंबीर निवडायला बसवता येईल काय? आणि तेवढाच चांगला रिझल्ट मिळेल काय?
25 Jul 2011 - 11:28 am | सविता
कोथिंबीरीऐवजी गवती चहा किंवा दुर्वा (गणपतीला वाहायच्या!) मस्त मिक्सर मधून वाटून घ्या ....
23 Jul 2011 - 1:13 pm | निवेदिता-ताई
येईल ना सासुला कोथिंबीर निवडायला बसवता येईल -- सासू टी.व्ही. बघत बसली की तिच्यापुढे
नेउन ठेवायची...त्यांचे हात चालू राहतिल, (मालीका- चार दिवस सासुचे !!!!बाकीचे सगळे सुनेचे)
तेवढाच चांगला रिझल्ट मिळेल काय?........चांगलाच मिळेल रिझल्ट...;)
परा - तुला कसा अपेक्षित आहे ते सांग आधी.????
26 Jul 2011 - 5:05 pm | इरसाल
नि-ता
कोथिंबीर वड्या म्हणजे जीव कि प्राण. ३ पेंड्यांच्या एकटाच फस्त करतो.
तिकडे (म्हणजे कुठे असे विचारायचे आहे ) कोथिंबीर स्वस्त आहे काय ?इथे कोथिंबिरीला आग लागलीय. बाजारात भाजीला टाकायला मिळत नाहीये सध्या.
26 Jul 2011 - 5:32 pm | गवि
क्या बात..क्या बात.. क्या बात.. अत्यंत खमंग आणि अॅडिक्टिव्ह पदार्थ.
मस्त पाकृ.. कथनाची स्टाईलही.. :)