नम्स्कार लोकहो,
बर्याच दिवसांनी आले इथे पण म्हटलं काहीतरी चांगलं बनवल्या शिवाय काय जाणार आणि बनवलं तरी फोटो पण काढल्याशिवाय कसं टंकणार म्हणून फार वेळ लागला?
आंबा बर्फी
साहीत्यः
४ वाट्या आंब्याचा रस
२ छोटे चमचे साखर (आंब्याच्या रसावर अवलंबून) मी मेक्सिकन आंबे घेतले होते ते बरेच गोड असल्याने साखर नाही घातली.
१/२ वाटी खवा
१ छोटा चमचा तूप
वेळ तसा बराच लागतो पण कष्ट कमी आहेत. मी खवा घरीच बनवल्याने माझ्या वड्या थोड्या मऊ लागत होत्या पण दुधाच्या किंवा काजूच्या पावडरीने छान जमतील. तसा एकदा आंब्याचा गोळा बनवला तर कसाही वापरता येतो.
कृती:
एका जाड बुडाच्या पसरट पॅन मध्ये आंब्याचा रस आणि साखर मिक्स करून घ्यावी आणि ते मंद आंचेवर ठेवून द्यावे. याला अख्खा दिवस लागला तरी फार लक्ष द्यावे लागत नाही. एकीकडे हा रस ठेवून दुसरीकडे स्वतः ची कामं करावीत. अधनं-मधनं हलवत रहावे.
आंब्याचा रस अगदी घट्ट झाला की त्यात खवा किंवा दूधाची पावडर टाकावी आणि मग सतत हलवत रहावे.
हे खवा टाकण्याचे काम दुसर्या दिवशीही करता येते.
मग तुप टाकून हा गोळा घट्ट होइपर्यंत हलवावे, हे मिश्रण घट्ट झालंय हे हातांना बरोबर जाणवतं. नंतर हे मिश्रण थोडा वेळ थंड करून मग वड्या थापाव्या. एव्ढ्या प्रमाणात २०-२५ वड्या होतात. बाकी काही वेलची-जायफळ टाकू नये, आंब्याचीच चव छान लागते.
करून बघा आणि सांगा
दिपाली
प्रतिक्रिया
21 Jul 2011 - 8:42 am | निवेदिता-ताई
आहा............सकाळी सकाळी मेजवानी !!!!!!!!!
21 Jul 2011 - 8:45 am | पंगा
सकाळीसकाळी बचकभर मिठाया?
(फोटू छान आहेत.)
21 Jul 2011 - 8:44 am | रेवती
माझ्या मुलाला ही बर्फी फार आवडते.
मी करणारच.
फोटू आणि पाकृ आवडले.
खवा करायला किती वेळ लागला?
विकतच्या खव्याचे काही अनुभव कोणाला आहेत काय?
माझ्याकडे नॉन फॅट ड्राय मिल्कचा बॉक्स आहे तो वापरला तर?
21 Jul 2011 - 8:48 am | दिपाली पाटिल
रेवतीताई,
विकतच्या खव्याने आणि फॅट फ्रि मिल्क पावडरने छान बनेल बर्फी. मी २%, १/४ गॅलन दुधाचा खवा बनवला त्याला २-३ तास लागले असतील.
21 Jul 2011 - 8:55 am | पंगा
स्वतःला अनुभव नाही, आणि खात्रीही नाही, पण अनेक भगिनी खव्याऐवजी रिकोत्ता चीज़ वापरतात, अशी उडतउडत कानांवर आलेली ऐकीव बातमी आहे. (चूभूद्याघ्या.)
आंबाबर्फीत रिकोत्ता कसे लागेल याची कल्पना नाही. (पाहायचा झाल्यास) स्वतःच्या जबाबदारीवर प्रयोग करून पहावा.
21 Jul 2011 - 9:45 am | सूड
भयंकर आवडल्या गेले आहे. थोडी आधी टाकायचीत ना, इकडे आंबे मिळणार नाहीत आता करावी तर.
21 Jul 2011 - 9:48 am | प्रचेतस
इकडे आहेत रे. तोतापुरी आणि दशहरा मिळतो अजूनपण.
21 Jul 2011 - 9:52 am | सूड
ठीकै, हापूस मिळतो का बघ ना !! ;)
21 Jul 2011 - 9:54 am | प्रचेतस
हापूस नाय मिळत रे आता. :(
21 Jul 2011 - 9:58 am | सूड
त्यादिवशी मोदकाच्या सारणात दशहर्याचा रस घातला होता, कळतच नव्हतं की त्यात रस घातलाय. तोतापूरी म्हणशील तर साखरेत शिजवून साठवून ठेवायला बरा, बर्फीला नको.
21 Jul 2011 - 4:09 pm | ज्योति प्रकाश
आंबा बर्फीत घालायला आता हापूस आंबे नाही मिळाले तरी Alfanso mango pulp मिळतो त्याची करून बघा.
22 Jul 2011 - 8:42 am | सूड
बघेन, केलीच तर फटू टाकेन.
21 Jul 2011 - 10:25 am | स्वाती दिनेश
मस्तच ग..
आंबा बर्फी.......... अम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म...
स्वाती
21 Jul 2011 - 11:27 am | मदनबाण
शॉलिट्ट... :)
ए दिप्स ताय इकडे एक डबा भरुन पाठवण्याची व्यवस्था कर ना... ;)
(अंजीर बर्फी प्रेमी) ;)
21 Jul 2011 - 12:23 pm | परिकथेतील राजकुमार
झ क्क्क्क्क्क्क्का स !
स्टेप बय स्टेप फटू टाकुन काळजात अजून सुरे न भोसकल्याबद्दल धन्यवाद.
चला आता ह्या विकांताला चांगला खवा शोधत फिरणे आले. इकडे काही ठिकाणी मिळतो खवा पण भारतातल्या सारखा खमंग नसतो आणि त्याला थोडासा खराब वास देखील असतो.
21 Jul 2011 - 12:29 pm | पंगा
;)
21 Jul 2011 - 2:39 pm | प्यारे१
नामदेव ढसाळांनी म्हटल्याप्रमाणे, खरे चित्पावन ग्येले सिलिकॉन व्हॅलीत.......
आपण नक्की कुठे असता?
इफ नॉट रॉन्ग यु इन 'सॅडॅशिपिथ' ? विच्च लेन सSSSर?
21 Jul 2011 - 6:16 pm | रेवती
इकडे काही ठिकाणी मिळतो खवा पण भारतातल्या सारखा खमंग नसतो आणि त्याला थोडासा खराब वास देखील असतो.
अस्सं का? अग्गबै!
होणार्या बायकोची स्वयंपाकाची अटच असेल म्हणून करतोय हे सगळं.
21 Jul 2011 - 12:31 pm | विसोबा खेचर
.....!!!!!!!!!!!!!!!
21 Jul 2011 - 12:59 pm | गणपा
वेल्कम ब्यॅक. :)
बर्फी बद्दल म्या पामराने काय बोलावे ?
नैनसुख घेतोय झालं.
21 Jul 2011 - 1:45 pm | शाहिर
मस्त आहे आंबा बर्फी..!!
मे महिन्यात टकली असतिस तर बरा झाला असता !! आ ता आम्बे शोधावे लगतिल
इतर : आमची कोकणा मधील आजी ..बर्फी मधे खोबरा बारिक खिसुन घालायची ...छान असते ती वडी !!
21 Jul 2011 - 2:04 pm | स्मिता.
दिपाली, आंबा बर्फी माझा वीक पॉईंट आहे. फोटु पाहून तर उचलूनच घ्याविशी वाटली.
खवा घरी कसा करायचा? कोणीतरी पाकृ टाका ना. आपल्याकडे खव्यात भेसळ असते त्यामुळे घरीच बनवलेला बरा.
22 Jul 2011 - 12:58 am | बहुगुणी
दोन पाककृती: दुधापासून आणि रिकोटा चीज पासून .
22 Jul 2011 - 2:11 pm | स्मिता.
खव्याच्या पाकृ येथे दिल्याबद्दल धन्यवाद!
21 Jul 2011 - 2:31 pm | मेघवेडा
21 Jul 2011 - 7:22 pm | प्रभो
भारी!!
21 Jul 2011 - 7:41 pm | सानिकास्वप्निल
झकास :)
21 Jul 2011 - 9:03 pm | इरसाल
लंगडा आंबा चालेल काय ?
बाकी उत्तरेत खवा फार उत्तम मिळतो.टिराय मारेंगे
21 Jul 2011 - 11:47 pm | बिपिन कार्यकर्ते
अरेरे! असो.
22 Jul 2011 - 1:40 am | चतुरंग
फोटू पाहून लाळ गाळल्या गेली आहे! ;)
-लाळरंग