साहित्यः-१)मटन चॉप्स, २)आले ३)लसूण ४)तमालपत्र ५)जायपत्री ६)मसाला वेलची ७)लाल तिखट
८)कांदा ९)डालडा १०)मिठ ११)दही १२)थोडे सुके खोबरे १३)हळद १४)कोथिंबीर
कृती :-प्रथम कांदा उभा चिरून घ्यावा.कढईत डालडा घेऊन त्यात चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतावा.
त्यातच तमालपत्र घालावे.आलं,लसूण्,जायपत्री,मसाला वेलची एकत्र वातून त्यात घालून चांगले परतावे.
नंतर चॉप्स घालून थोडे परतावे.त्यात लाल तिखट,हळद घालून पुन्हा निट परतून घ्यावे.पाणी घालून
शिजत ठेवावे.अर्धे शिजले कि त्यात दही व मिठ घालावे.पाणी आटल्यावर जे तुप सुटेल त्यात चॉप्स
परतत रहावे.थोड्यावेळाने गॅस बंद करून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
प्रतिक्रिया
21 Jul 2011 - 3:22 am | पंगा
... जरा बरा काढला असतात तर?
प्रस्तुत फोटो 'बशीतला राडा' या शीर्षकाखाली सहज खपून जावा. अतिशय निस्तेज, धूसर आणि क्षुधामारक फोटो. एखाद्या 'ब' दर्जाच्या रेस्तराँच्या मेनूकार्डावर शोभून दिसण्यासारखा. 'मटन चॉप्स' वगैरे शीर्षक वाचून मोठ्या उत्साहाने धागा उघडावा, आणि फोटो बघून इच्छा मरावी (वाचण्याची. खाण्याची तर सोडाच.), याहून वाईट ते काय?
(प्रामाणिक प्रतिक्रिया. राग नसावा. किंवा असला, तरी माझे काय बिघडतेय म्हणा!)
21 Jul 2011 - 12:52 pm | विसोबा खेचर
सहमत आहे. पाकृ चांगली असेलही परंतु फोटो अग्दीच आवडू नये असाच आला आहे.. असो.
तात्या.
21 Jul 2011 - 12:58 pm | पाषाणभेद
सहमतीला सहमती.
पुलं च्या इतिहासाच्या पुस्तकात कुतूबमिनारचे चित्र आडवे करून मुठा नदीवरील पुलाचे चित्र आहे असे होते.
सदर फोटो बहू भाज्यांसाठी बहूउपयोगी आहे. (भेंडी, भरीत, मुरलेले लोणचे, काळा मसाला आदी.)
बाकी मेहनतीची पाकृ आहे.
21 Jul 2011 - 12:45 pm | खादाड
५
21 Jul 2011 - 1:53 pm | शाहिर
आता हि काय फोटो ग्राफी ची स्पर्धा नाही ..
फोटो ही सोय आहे . गरज किन्वा मुल्य मापना ची दांडी नव्हे !!
21 Jul 2011 - 5:14 pm | सोत्रि
शाहिर मान्य आहे, पण सजावट, प्रेझेंटेशन नावाची पण काहीतरी चीज आहे की नाही ?
- (मुल्यमापन 'दांडी'कर) सोकाजी
21 Jul 2011 - 2:41 pm | सुनील
बोकड बहुधा षंढ असावा म्हणून असा फोटो आला आहे.
बाकी मटण चॉप ही आमची अत्यंत आवडती पाकृ (चखण्यासाठी). डालड्याला तेवढा पर्याय सांगा बॉ!
21 Jul 2011 - 3:29 pm | प्यारे१
>>>>बोकड बहुधा षंढ असावा म्हणून असा फोटो आला आहे.
तुमचा 'प्रयत्न फसला' म्हणून बोकड षंढ का? अन्यथा बोकड नक्की 'कसा' ते आपणास कसे ठाऊक ते कळेल काय?
21 Jul 2011 - 5:08 pm | सोत्रि
म्हणूनच ही म्हण जन्माला आली असावी, "शेळी जाते जिवानीशी आणि खाणारा म्हणतो वातड"
- (ऐतखाउ) सोकाजी
21 Jul 2011 - 3:42 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>डालड्याला तेवढा पर्याय सांगा बॉ!
तुप
21 Jul 2011 - 4:29 pm | परिकथेतील राजकुमार
रंगाचा डबा किंवा दगड.
21 Jul 2011 - 4:28 pm | परिकथेतील राजकुमार
हा फोटो वांग्याचे भरीत किंवा काळा मसाला घालून केलेली पावभाजी म्हणून देखील खपून जाईल.
बोकडखाऊ
21 Jul 2011 - 4:39 pm | गवि
मला बिघडल्याने मऊ पडलेली आणि चक्राकारता गेलेली अळूवडी वाटली फोटोनुसार.
पण बाकीची पाकृ वाचून तो प्रकार टेस्टी असेल हे नक्की..
21 Jul 2011 - 8:06 pm | इरसाल
21 Jul 2011 - 10:20 pm | नावातकायआहे
डाल्ड्यात्ले मटन चॉप्??....आ गा गा....
कॉलिंग गणपाशेट. कॉलिंग गणपाशेट
13 Jun 2012 - 5:22 pm | अन्तर्यामी
फोटो पाहुन वाट्ले कि बोकड बहुदा दुश्काळतुन आला असावा..... :)
13 Jun 2012 - 5:22 pm | अन्तर्यामी
फोटो पाहुन वाट्ले कि बोकद बहुदा दुश्काळतुन आला असावा..... :)