उपवासाचा ढोकळा -

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
11 Jul 2011 - 9:58 am

खास आषाढी एकादशीनिमित्त--
उपवासाचा ढोकळा -

साहित्य:
एक कप वर्याचे तांदूळ पिठ.
दोन चमचे शाबूदाणा पिठ
एक कप पातळ ताक
दोन लहान चमचे साखर
अर्धा चमचा मिरची पेस्ट
अर्धा चमचा आले पेस्ट
दोन लहान चमचे इनो
एक चमचा लिंबाचा रस
एक चमचा तेल रिफ़ाइंड
चवीपुरते मिठ

फोडणीसाठी:
दोन चमचा तेल, जिरे, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून,
एक चमचा लिंबाचा रस
एक लहान चमचा साखर
दोन चमचे पाणी

कृती:
वर्याचे तांदूळ पिठ , शाबूदाणा पिठ साखर, चमचा मिरची पेस्ट, चमचा आले पेस्ट, लिंबाचा रस, चमचा तेल, चवीपुरते मिठ हे सर्व साहित्य एकत्र करावे. त्यात एक ते सव्वा कप ताक घालावे. वरील मिश्रण तयार झाले कि मिश्रणाचे दोन वेगवेगळे भाग करावे व वेगवेगळ्या भांड्यत ठेवावे.
एक भाग मिश्रणात एक टिस्पून इनो घालून पटापट एकाच दिशेने अंदाजे पंधरा सेकंद ढवळावे. मिश्रण थोडे फसफसायला लागते. लगेच कूकर गैसवर ठेउन कूकरच्याच एक छोट्या भांड्याला तेलाचा हात लाउन त्यात तयार पीठ ओतावे. मध्यम आचेवर पंधरा ते विस मिनीटे वाफ काढावी. शिट्टी लाउ नये.

जोवर ढोकळा तयार होतोय तोवर फोडणी तयार करू घ्यावी. लहानश्या लोखंडी पळीत दोन चमचे तेल गरम करावे. त्यात जिरे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून फोडणी तयार करावी. फोडणी किंचीत कोमट होवू द्यावी. एका वाटीत दोन चमचे पाणी, एक चमचा लिंबाचा रस, एक लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण फोडणीत घालावे.

पंधरा ते विस मिनीटांनी गॅस बंद करावा. थोड़े थांबुन एक दोन मिनीटांनी भांडे बाहेर काढावे. ढोकळा जरा गार झाला कि चाकुने
कापून घ्यावा. त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी. ढोकळयाच्या मिश्रणाचा उरलेला भागही वरील प्रमाणेच वाफवून घ्यावा.
अवश्य करुन पहा- खुप छान स्पॊजी होतो.

प्रतिक्रिया

चिंतामणी's picture

11 Jul 2011 - 10:23 am | चिंतामणी

लहानश्या लोखंडी पळीत दोन चमचे तेल गरम करावे. त्यात जिरे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून फोडणी तयार करावी.

तेला ऐवजी फोडणी साजुक तुपाची फोडणी जास्त चांगली लागेल असे मला वाटते.

बाय द वे. उपासाला कुठले तेल चालते? करडई नक्की चालत नाही. फक्त शेंगदाणा तेल चालत असावे. बरोबर.?

गवि's picture

11 Jul 2011 - 11:53 am | गवि

आयडिया मस्त आहे.. :)

महेश काळे's picture

11 Jul 2011 - 11:58 am | महेश काळे

निवेदिता-ताई
खुपच छान लिहीले आहे..
करुन पहायला हवे...
पण फोटु क नाय डकवला??

नावातकायआहे's picture

11 Jul 2011 - 5:13 pm | नावातकायआहे

उपासाला ईनो चाल्तय का?

उपवसाचे ईनो आणि आले कुठे मिळेल ?

उपवसाचे ईनो आणि आले कुठे मिळेल ?

कच्ची कैरी's picture

12 Jul 2011 - 8:40 pm | कच्ची कैरी

आणि फोटो कुठे आहे ????

श्रीयुत संतोष जोशी's picture

14 Jul 2011 - 1:00 pm | श्रीयुत संतोष जोशी

माझ्या मते उपासाला आलं नाही चालत.
जाण्कार लोक जास्त सांगतील.

निवेदिता-ताई's picture

14 Jul 2011 - 6:59 pm | निवेदिता-ताई

का नाही चालत आल.????...........उपवासाला आपण आले घातलेला चहा पितोच की?????