शंकरपाळे

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
21 May 2008 - 1:06 pm


शंकरपाळे खूप प्रकारांनी करता येतात,म्हणजे पाक करुनकरतात,रवा +मैदा घालून करतात.
खुसखशीत शंकरपाळ्यांची ही एक अगदी सोपी कृती..
साहित्य-१ वाटी दूध,१ वाटी पिठीसाखर,३/४ वाटी तूप,१/२ चमचा मीठ,१ ते २ टे-स्पून कणीक,मावेल तेवढा मैदा,
तळणीसाठी तूप/तेल
कृती-तूप,साखर,मीठ एकत्र करून फेसून घ्या.त्यात कणीक,दूध आणि मावेल तितका मैदा घालून भिजवा.तो गोळा ३०-३५ मिनीटे झाकून ठेवा. नंतर लाटून शंकरपाळे कापा व तळा.

प्रतिक्रिया

आर्य's picture

21 May 2008 - 2:04 pm | आर्य

स्वाती ताई,
पाक कृती छानच आहे पण..........

स्वाती ताई (दोन्ही), वरदा ताई आणि सर्व सुगरीणी / बल्लवाचारी

सर्वांना नम्र विनंती, आपण देत असलेल्या पाककृती, नवशिक्या / होतकरु / प्रयोगशील गृहिणीही वाचत असतात आणि प्रयोग करु शकतात हे ध्यानात ठेवावे. किंबहुना अनेक मि-पाव कर अशा घातक प्रयोगांना बळी पडलेले आहेत.
हि धोक्याची सुचना लक्षात धेऊन प्रयोगातीत (पाककृतीतील) खाचाखोचा / ऊप सुचना / वि.सु. / ता.क्./ टिपा/वैधानिक ईशारा यांचा जरुर ऊपयोग करावा.
यातून कोणत्याही सुगरीणीचा अथवा बल्लवाचार्‍याचा ऊपमर्द अथवा खच्चीकरण करण्याचा हेतू नाही.

(अहो काय सांगु- आमच्या हिने ऐक पाककृती मिपावार वाचुन बनवली आणी विचारले ओळख काय आहे बरं? - काय झाली असेल माझी अवस्था हे माझे मिपा.करांना वेगळे सांगावे न लागे. लवकरच किस्सा सांगतो)

आपला (प्रयोगाचा ऊंदीर आर्य ) O:)

प्रभाकर पेठकर's picture

21 May 2008 - 2:29 pm | प्रभाकर पेठकर

(पाककृतीतील) खाचाखोचा / ऊप सुचना / वि.सु. / ता.क्./ टिपा/वैधानिक ईशारा यांचा जरुर ऊपयोग करावा.

सहमत आहे. बहुतेक सदस्य तशी काळजी घेतातही. सुचना/उपसुचना/टिपा वगैरे दिलेल्या असतात. तसेच सगळे प्रतिसाद वाचले तर त्यातुनही अनेक प्रश्नांना दिलेली उत्तरे आणि इतर सदस्यांचे अनुभव, त्याच्या सुचवण्याही विचारात घेता येतात.
आपल्या सदस्यांना बेसिक स्वयंपाक येतोच असे गृहीत धरलेले असते. पाककृती तंतोतंत (पहिल्यांदा तरी) करण्याचा प्रयत्न करावा, दिलेल्या छायाचित्राचा फायनल प्रॉडक्ट म्हणून तुलना करण्यासाठी वापर करावा. तुमची पाककृती त्याच्या जवळपास होते. त्यात मग तुमच्या कौशल्याने (नंतरच्या प्रयोगांमध्ये..) आवश्यक तो बदल करावा आणि तीच पाककृती अधिक चांगली बनवावी.
पहिल्या प्रयोगात पाककृती जमली नाही म्हणून नाऊमेद होऊ नये. पहिल्या प्रयोगातील चुका दुसर्‍या प्रयोगात टाळाव्यात. 'युरेका..युरेका' ओरडण्याची वेळ तुमच्यावरही येईल.

तुमच्या सौं.ची पाककृती बिघडली असेल तर हिणवू नका. पुढील प्रयोगांसाठी धीर, प्रोत्साहन द्या.

एखादी पाककृती कधी कधी कधीच जमत नाही. सोडून द्या. पाकशास्त्रात अनेकविध पदार्थ आहेत. एखादी पाककृती जमली नाही म्हणून विशेष फरक पडत नाही. (रसगुल्ले, जिलेबी मलाही अजून जमत नाही, तयार आणून खायचे. वाईट कशाकरीता वाटून घ्यावे?)

स्वाती दिनेश's picture

23 May 2008 - 6:55 pm | स्वाती दिनेश

पेठकरांशी सहमत!

चकली's picture

24 May 2008 - 12:02 am | चकली

>>> तुमच्या सौं.ची पाककृती बिघडली असेल तर हिणवू नका. पुढील प्रयोगांसाठी धीर, प्रोत्साहन द्या.

हे एकदम बरोबर ..सगळे प्रयोग सहन केले आणि सुधारणा करत गेले कि मग तुम्हाला "masterpiece" चाखायला मिळेल

चकली
http://chakali.blogspot.com

मनस्वी's picture

21 May 2008 - 2:21 pm | मनस्वी

मस्त स्वातीताई..
करून बघीन आता. मीठ टाकल्याने काय फरक पडतो?

स्वाती दिनेश's picture

23 May 2008 - 6:54 pm | स्वाती दिनेश

मीठ टाकले की चवीत फरक पडतो. नुसतेच गोड गुळमट लागत नाहीत.

प्राजु's picture

21 May 2008 - 3:08 pm | प्राजु

एकतर रवा आणि मैदा भिजवून ती कुटाकुटी नाही करावी लागत. आणि पटकन होतात. आणि एक वाटी साखर आणि एक वाटी दूध या प्रमाणात भरपूर होतात.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वरदा's picture

21 May 2008 - 5:47 pm | वरदा

अगदी अस्संच करते मी....त्यामुळे कुटायला लागत नाही....आणि मैदा जरा तळला की छान खुसखुशीत होतो...ओल्या नारळाच्या करंज्याही अशा करुन पाहिल्यात मी झक्कास होतात्...काही कळत नाही नुसता मैदा आहे ते....

विसोबा खेचर's picture

24 May 2008 - 5:44 am | विसोबा खेचर

वा स्वाती,

सदाबहार पाकृ! :)

आपला,
(चहा-शंकरपाळे प्रेमी) तात्या.

मदनबाण's picture

24 May 2008 - 11:34 am | मदनबाण

हा पदार्थ समोर दिसताच त्याचा अगदी तोबरा भरतो मी.....

(हवरट)
मदनबाण.....

मॄदुला देसाई's picture

18 Jun 2012 - 11:20 am | मॄदुला देसाई

मस्त! पाकृ वाचून आणि फोटो बघून तर मस्तच दिसतेय. नक्की करुन बघनार :)