पालक बेसन पोळा (धिरडं)

जागु's picture
जागु in पाककृती
23 Jun 2011 - 4:33 pm

साहित्य :
१ जुडी पालक (थोडे पाणी घालुन वाफवुन पेस्ट करुन घ्या)
गरजेपुरते बेसन
१ चिरलेला कांदा
थोडी चिरलेली कोथिंबिर
२-३ चिरलेल्या मिरच्या
हिंग
हळ्द
मिठ
थोडा गोडा किंवा गरम मसाला (ऑप्शनल)
तेल

पाककृती :
वरील साहित्यातील तेल सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्या. चांगले ढवळा.

आता तव्यावर थोडे तेल पसरवुन ह्याचे पोळे, धिरडे काय म्हणाल ते तुमच्या आवडीच्या साईझ मध्ये टाका. एकदम पण मोठा नको नाहीतर उलटताना त्रास होईल.

गॅस मिडीयम ठेवा ४-५ मिनीटांनी उलथा. थोडेसे तेल परत सोडा (जर तव्याला असेल तर नाही टाकलेत तरी चालेल)परत ५-६ मिनीटे ठेउन दाबुन शिजला आहे का ते पहा. जर दाबल्यावर त्यातुन ओला रस येत असेल तर गॅस मंद करुन थोडावेळ दोन्ही बाजुने शिजु द्या. आहे की नाही एकदम सोप्पी रेसिपी. आता हा पोळा नुसता खा नाहीतर जेवणावर साईड डिश म्हणुन वापरा.

अधिक टिपा :
पौष्टीकतेसाठी तसेच लहान मुले पालकची भाजी नुसती खात नाहीत म्हणून पालक टाकला आहे. ह्या अजुन किसलेला गाजर, बिट, कोबी तसेच आवडीच्या भाज्याही टाकु शकतो.

प्रतिक्रिया

विशाखा राऊत's picture

23 Jun 2011 - 6:15 pm | विशाखा राऊत

एकदम मस्त :)

चित्रा's picture

23 Jun 2011 - 7:14 pm | चित्रा

छान पाककृती.

मिसळपाव's picture

23 Jun 2011 - 7:27 pm | मिसळपाव

Finally, मला खाता येण्याजोगा पदार्थ टाकलास :-)

पाकृ छान आहे बदल म्हणून!
आजच मी तांदूळ पिठी आणि बेसन मिश्र पिठांची धिरडी केली होती.
त्यात कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, हळद, मिरची घातली होती.

शिल्पा ब's picture

23 Jun 2011 - 10:08 pm | शिल्पा ब

सोप्पं आणि छान.

इष्टुर फाकडा's picture

24 Jun 2011 - 2:47 am | इष्टुर फाकडा

वेगळी आणि सुन्दर पाक्रु :)

सानिकास्वप्निल's picture

24 Jun 2011 - 3:47 am | सानिकास्वप्निल

अगदी सोप्पी अशी पाकृ नक्की करून बघणार :)

मिसळपाव नाही नाही मासे नाही संपले. पण व्हेजींसाठी पण काहीतरी हवे ना म्हणून हे.

विशाखा, चित्रा, रवती, शिल्पा,सागर, सानिका धन्यवाद.

गवि's picture

24 Jun 2011 - 12:06 pm | गवि

मस्त आयडिया.. :)

परिकथेतील राजकुमार's picture

24 Jun 2011 - 1:05 pm | परिकथेतील राजकुमार

हायला !

लैच जबर्‍या दिस्तया.

निवेदिता-ताई's picture

24 Jun 2011 - 6:19 pm | निवेदिता-ताई

मस्तच...

प्राजक्ता पवार's picture

25 Jun 2011 - 2:42 pm | प्राजक्ता पवार

मस्तं !

आत्मशून्य's picture

27 Jun 2011 - 6:39 am | आत्मशून्य

आता हा पोळा नुसता खा नाहीतर जेवणावर साईड डिश म्हणुन वापरा.

साइड डीश ? सकाळ दूपार संध्याकाळ अख्खा दीवस जाइल यावर :)

इंटरनेटस्नेही's picture

28 Jun 2011 - 9:33 pm | इंटरनेटस्नेही

तोंडाला पाणी सुटले!

प्राजु's picture

28 Jun 2011 - 11:52 pm | प्राजु

मी पालक चिरून २ मिनिटे मायक्रोवेव करते म्हणजे तो थोडासा मऊ होतो. मग पेस्ट न करताच बेसन आणि तांदुळाच्या पीठाच्या मिश्रणात घालते.
आता असेही करून बघेन.
मस्त पाकृ.