हिरवा चाफा

जागु's picture
जागु in कलादालन
23 Jun 2011 - 4:10 pm

हिरवी पालवी, हिरवी राई, हिरवागार परिसर, हिरवी पाने, गवत हेच ऐकायची आपल्याला सवय असते. पण हिरवे फुल म्हणजे जरा हटकेच. अगदी लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. हिरवा चाफा ह्या नावकडे लक्ष केंद्रित केल की वेगळच फिल होत. लहानपणी मोठे झाड होते आमच्या घरी. फुल कधी दिसायचे नाही पण वास आला की समजायचे चाफा फुलला मग शोधायला जायचे. कुठल्यातरी पानाआई हे दिसायचे. मग काढून घरी आणुन त्याचा वास घेत बसायच. तसा त्याचा वास घेण्याची गरज लागत नाही. ज्या जागी ठेउ त्या परीसरावर हे फुल आपला सुगंध दरवळून आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देतो. हिरव्या रंगामुळे झाडावर हे हिरव फुल लपाछुपीच खेळत असत. एका नजरेत सहसा फुल दिसत नाही. हिरव्या चाफ्याचे झाड नावाप्रमाणे हिरवे गडद असते. ह्या झाडाच्या फांद्याच्या शेवटी हुकाच्या आकारात शेवटचे देठ वळते.

माझ्या माहेरी हे झाड आहे. मी माहेरी गेले की पहीला पाठी जाते कॅमेरा घेउन आणि झाडावर फुल आहे का पाहते. मागे गेले तेंव्हा अगदीच जन्मलेल्या बाळाप्रमाणे कळी आली होती.

थोड्या दिवसांत ही अवस्था होती फुलाची.

अजुन ४-५ दिवसांनी गेल्यावर पाहील तर पुर्ण होत आलेल्या फुलाचे सौदर्य न्याहाळण्यासाठी एक पाखरू त्या फुलाला साथ देत होत. तेही सुंदर होत. मी फोटो साठी फांदीला सरकवुन पोझ देत होते तरी ते त्याची साथ सोडायला तयार नव्हते. उलट त्यानेच फोटोसाठी पोझ दिल्या.

ह्याची कळी आल्यापासुन साधारण १०-१२ दिवस लागतात हे पुर्ण फुल व्हायला. दुसर्‍या दिवशी सकाळी हे फुल पुर्ण झाल होत. फुल तयार झाले की त्याच्या पाकळ्या फाकतात. अगदी वाटी दिसायला लागते. ते पाखरू अजुन हलल नव्हत.

ज्या दिवशी फुल तयार होते त्यादिवशी ह्याचा सुगंध परिसरात दरवळायला लागतो. हिरव्या चाफ्याचा सुगंध मात्र पिवळा झाल्यावर जास्त दरवळतो. ह्याच्या सुगंधामुळे साप ह्या झाडाखाली येतात असेही म्हणतात.
आता दुसर्‍या दिवशी मला येता येणार नव्हत म्हणुन हे फुल मी काढुन घरी घेउन गेले. त्याच्या दुसर्‍या दिवशी हा हिरवा चाफा स्वत:वर पिवळा रंग रंगवु लागला. घरात सर्वत्र सुगंधही पसरला होता.

(फोटो क्लियर नसल्या बद्दल क्षमस्व).

हिरव्या चाफ्याच्या झाडाला फळेही हिरवीगार लागतात. लंबगोलाकार टोकाला निमुळती आणि घडात ही फळे लागतात. त्याच्या बी पासुन रोप तयार करता येते.


असा आहे महिमा हिरव्या चाफ्याचा

छायाचित्रण

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

23 Jun 2011 - 4:19 pm | स्वाती दिनेश

लपविलास तू हिरवा चाफा..
फार धुंद सुगंध असतो नाही ह्या हिरव्या चाफ्याचा...
किती दिवसांनी बघते आहे, नुसता फोटो बघूनच आला बघ सुवास त्याचा मला..
जागु, धन्यु..
स्वाती

चित्रा's picture

24 Jun 2011 - 1:06 am | चित्रा

>>फार धुंद सुगंध असतो नाही ह्या हिरव्या चाफ्याचा...

+१. मादक सुवास. थेट मस्तकात जाणारा :)

छान माहिती, जागु.

छान. कोकणातले दिवस आठवले. खासकरून अलिबाग मधले.

सूड's picture

23 Jun 2011 - 6:39 pm | सूड

लपविलास तू हिरवा चाफा किंवा अगदी आत्ताआत्ताचं मुंबई-पुणे-मुंबई मधलं कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात अशा गाण्यांच्या ओळीतूनच हिरवा चाफा नावाचं काहीतरी फूल असतं एवढंच माहित होतं. जागुतै, तुझ्यामुळे त्याचं दर्शनही घडलं.

स्मिता.'s picture

23 Jun 2011 - 8:35 pm | स्मिता.

हिरवा चाफा आजवर फक्त ऐकलं होतं पण कधीच बघायचा योग आला नव्हता.
छानच आहे फूल.

मदनबाण's picture

24 Jun 2011 - 8:17 am | मदनबाण

वा... परत एकदा नविन माहिती आणि फोटु पहायला मिळाले. तुझे धागे याच कारणास्तव मला फार आवडतात. :)

(सोनचाफा प्रेमी)

प्रचेतस's picture

24 Jun 2011 - 8:30 am | प्रचेतस

सुरेख फोटो आणि माहिती.

धन्यवाद, फोटो एकदम मस्त आले आहेत. माझ्या घरी मी हे झाड देवचाफा म्हणुन लावलेलं आहे,

परिकथेतील राजकुमार's picture

24 Jun 2011 - 12:24 pm | परिकथेतील राजकुमार

जागुतै रॉक्स !

तुझ्यामुळे अनेक नव्या पदार्थांची , फळांची, भाज्यांची ओळख होतच असते कायम. आज त्यात ही नविन भर.

तुझे आभार गो.

माझ्यासाठी हे नविन आहे फुल.. मस्त वाटले वाचुन...

आणि ते पाखरु/किटक पण खुप छान आहे.. ते ही मी अश्या कलर मध्ये कधी पाहिलेले नाहि ..

वा.... फुल बघुनच मला अगदी सुवास आला. खुपच छान... माझ्या माहेरी पण सोनचाफ्याचे झाड आहे. झाडाला फुले एवढी येतात, पण एकही हाताला लागत नाही. मग खिडकीत उभ राहिले तरी त्याचा मस्त वास येतो. माझे सगळ्यात आवडते फुल आहे हे.. खरच खुप खुप धन्स.. :)

यातल्या इमेजेस मिळतील असं कोणी बघेल का? हिरव्या चाफ्याच्या नावाखाली सुर्यफुलं नाचवणार्‍या झी मराठीला पाठवायची आहे लिन्क!