साहित्यः
दीड वाटी बासमती तांदुळ स्वच्छ धुवून, निथळून ठेवणे
दीड वाटी स्वच्छ केलेली कोळंबी (किंचित मीठ, हळद व लिंबाचा रस लावून ठेवावी)
३ वाटया नारळाचे दुध
२-३ टेस्पून आले+लसुण+मिरची+पुदीना पेस्ट
१ टेस्पून लाल तिखट
१/२ टेस्पून गरम मसाला
१/२ टेस्पून धणेपुड
१/४ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
१ टीस्पून शाहीजिरे किंवा साधे जिरे
४-५ लवंग
२-३ दालचिनीच्या काडया
२-३ तमालपत्र
२-३ हिरवी वेलची
तेल
पाकृ:
जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून शाहीजिरे व खडा-मसाला घालावा.
छान तडतडले की त्यात आले+लसुण+मिरची+पुदीना पेस्ट घालून परतणे.
परतून झाले की त्यात हळद, मीठ लावून ठेवलेली कोळंबी घालावी व परत चांगले परतणे.
त्यात सर्व मसाले, मीठ घालून परतणे.
आता भिजवून, निथळत ठेवलेला तांदुळ घालून हलक्या हाताने एकत्र करावे.
छान परतले की त्यात ३ वाटया नारळाचे दुध घालावे. (नारळाच्या दुधात शिजवल्याने चव छान लागते)
दुसरा पर्याय म्हणजे २ वाटया नारळाचे दुध +१ वाटी पाणी घालावे व उकळी आणून मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवावे.
कोथिंबीर घालून सजवावे व लगेच गरमा-गरम खायला सुरुवात करावी :)
प्रतिक्रिया
20 Jun 2011 - 9:43 pm | इरसाल
जबरदस्त पाकृ. फोटो तर असे कि समोर कोलंबी ठेवल्या सारखी वाटतेय.
कोलंबी म्हणजे जीव कि प्राण.
का ...का असा जीव घेताय.इथे मिळत नाही हो कोलंबी.
20 Jun 2011 - 10:51 pm | ५० फक्त
मासे खात नाही पण मला तुमच्या कडचे चमचे जाम आवडले बुवा. मस्त आहेत, आणि फोटो पण मस्त जमतात तुम्हाला.
20 Jun 2011 - 11:15 pm | गणपा
चविष्ट दिसतय.
टोमॅटो नाही वापरलात?
21 Jun 2011 - 3:30 am | सानिकास्वप्निल
टोमॅटो मी कधीच घालून बघितला नाही, बनवून बघते नक्की :)
20 Jun 2011 - 11:42 pm | स्वाती२
मस्त फोटो!
20 Jun 2011 - 11:43 pm | सविता
खतर्नाक दिसतोय... लगेच उचलून खायला सुरूवात करावी असं वाटतंय!!!
20 Jun 2011 - 11:50 pm | Mrunalini
मस्त्च गं... :)
खरच, जीव अगदी जळतोय. इथे काही फ्रेश फिश मिळत नाही. आणि कोळंबी तर दुरची गोष्ट. ते frozen फिशला अजिबात चव नसते. :(
21 Jun 2011 - 3:32 am | सानिकास्वप्निल
इथे काही ठिकाणी ताजी कोळंबी मिळते, खरं आहे फ्रोझन फिशला चव नसते पण काही वेळेला त्यावरच समाधान मानावं लागतं :(
21 Jun 2011 - 3:45 am | कौशी
फोटो बघुनच भुक लागली....
21 Jun 2011 - 3:36 pm | दीविरा
खावेसे वाटतेय लगेचच :)
आवडले :)
21 Jun 2011 - 4:00 pm | शाहिर
या क्षेत्रा मधे नवीन असल्यामुळे नारळाचे दुध कसे बनवायचे माहित नाही ..कृपया माहिती सांगावी
..पाकृ छान आहे ...येत्या रविवार चा मेनु असेल..
अवान्तर : काही जण आमसुले/ तिरफले घाल्तात ...त्याचा काही अनुभव आहे का ?
21 Jun 2011 - 5:36 pm | सानिकास्वप्निल
नारळ खवून त्यात थोडे कोमट पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घेणे, मग वाटलेला नारळाचा चव गाळणीतून किंवा स्वच्छ सुती कापडातून गाळून घेणे...दाट नारळाचे दुध निघेल.
पुन्हा त्याच नारळाच्या चवात पाणी घालून, वाटून, गाळून घेणे, आता थोडे पातळ दुध निघेल.
हे नारळाचे दुध तुम्ही कुठल्याही नॉन्-व्हेज पदार्थात, सोलकढी, खीरी साठी वापरू शकता.
आमसुले/ तिरफळं घालून बनवायचा अनुभव नाही हो :(
23 Jun 2011 - 11:44 am | जागु
मस्त तोपासु.
ह्यात थोडी टोमॅटो प्युरी टाकल्यावरही छान लागते.
25 Jun 2011 - 9:38 pm | विसोबा खेचर
शब्दच संपले..!
28 Jun 2011 - 9:33 pm | इंटरनेटस्नेही
तोंडाला पाणी सुटले!
20 Jul 2011 - 12:13 pm | अभिजा
फारच छान! :-)
20 Jul 2011 - 12:22 pm | सुमो
सुंदर. सुरेख. अप्रतिम. ( पाकृ फोटो डीटेलिंग या क्रमाने ) :)
20 Jul 2011 - 5:46 pm | इरसाल
पुन्हा एकदा प्रतिसाद देत आहे
कारण................
मागच्याच आठवड्यात बेन्ग्लुरुला प्रोन गस्सी आणि नीर दोसा खाल्ला (मलबारी/मेंगलोरी) पद्धतीने बनवलेला. लई भारी अजून चव रेंगाळत आहे आणि तोडला पाणी सुटत आहे.