मुगाच्या डाळीचे कण्ण्.(खिर)

ज्योति प्रकाश's picture
ज्योति प्रकाश in पाककृती
20 Jun 2011 - 7:29 pm


साहित्यः-अर्धी वाटी मुगाची डाळ.
एक नारळ.
खोबर्याचे काप पाव वाटी.
काजूचे तुकडे पाव वाटी.
वेलची पूड
चवीप्रमाणे गूळ.
चिमूटभर मिठ.
कृती :-मुगाची डाळ भाजून घ्यावी.एका भांड्यात पाणी उकळत ठेवून त्यात डाळ शिजत घालावी.
नारळ खवून त्याचा रस काढावा.डाळ मऊ स्जिजली कि त्यात गूळ्,खोबर्याचे काप,काजुचे तुकडे,
नारळाचा रस घालावा व मंद गॅसवर शिजू द्यावे.जरा जाडसर झाले की वेलचीपूड घालावी व खाली उतरवावे.
हे कण्ण गरमच खायला द्यावे. कोकणात हा पदार्थ गोकुळाश्ट्मीला नेवेद्याला करतात.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

20 Jun 2011 - 8:40 pm | चिरोटा

मस्तच. मनगण सुद्धा म्हणतात ना ह्याला?

ज्योति प्रकाश's picture

20 Jun 2011 - 11:40 pm | ज्योति प्रकाश

नाही.मणगणं चण्याच्या डाळीचं करतात.

चिरोटा's picture

21 Jun 2011 - 10:49 am | चिरोटा

अरे हो. विसरलोच. पण बाकीचे पदार्थ तेच आहेत. नारळ्,वेलची,गूळ वगैरे. वरील पा.कृ.त मुगाच्या डाळीऐवजी चण्याची डाळ घेतली तर मणगणच तयार होईल ना?

सानिकास्वप्निल's picture

20 Jun 2011 - 9:01 pm | सानिकास्वप्निल

मस्त :)

इरसाल's picture

20 Jun 2011 - 9:50 pm | इरसाल

अतिशय छान
खाल्लेले आहे. कोकणातले दिवस आठवले.
उगाच : फोटो जरा स्पष्ट काढता आले तर बघा.

ज्योति प्रकाश's picture

20 Jun 2011 - 11:42 pm | ज्योति प्रकाश

माझ्याकडे कॅमेरा नाही म्हणून मोबाईलने फोटो काढते.

मेघवेडा's picture

20 Jun 2011 - 10:42 pm | मेघवेडा

आहाहा! गरमागरम कांदेपोहे नि कढण.. याहून झकास न्याहारी नाही! गोव्याकडे फारच नित्यनेमातला प्रकार असावा हा. काही वर्षांपूर्वी एकदा मे महिन्यात गोव्यात होतो. लग्नामुंजींचा सीझन.. नातेवाईकांत/ओळखीतल्यांकडे एका आठवड्यात तीन कार्यं होती. दोन दोन दिवस राहणं होतंच प्रत्येकाकडे.. तेंव्हा तीनही घरांत न्याहारीस 'कढणं-फोंय' आवर्जून झालेच.. भव्य चौथा दिवस, भव्य पांचवा दिवस म्हणत सलग पांच दिवस कढणं-पोहे खात होतो!

आठवणीनंच पोटात अचानक गोळा पडल्यासारखं झालंय नि जिव्हारसाला पूर आलाय! आता करायचंच पडणार! :)

पर्नल नेने मराठे's picture

21 Jun 2011 - 10:50 am | पर्नल नेने मराठे

मग करा आणी आम्हाला बोलवा ;) न्याहारीला

पदार्थ छान आहे.
यात नेहमीचे दूध घालायचेच नाही असे दिसते.
बरेच दिवसांपूर्वी विमानातल्या जेवणात हा पदार्थ होता.
चव चांगले होती. पौष्टिक, शिवाय हलका.

ज्योति प्रकाश's picture

22 Jun 2011 - 12:06 am | ज्योति प्रकाश

यात दुध घालत नाहित. नारळाचा रसच घालतात किंवा खवलेला नारळ एकदम बारिक वाटून घालतात.

स्वाती दिनेश's picture

22 Jun 2011 - 8:07 pm | स्वाती दिनेश

आवडता पदार्थ,
आमची एक कोकणी मैत्रिण ही खीर मस्त करते, ते लोकं पायसम किवा मुगाची खीर म्हणतात.
डाळीऐवजी अख्खे मूग भिजवून, सालं काढून ही खीर ती करते कधीकधी, ती तर आणखीच मस्त लागते.
स्वाती