साहित्यः-एक वाटी शिंगाड्याचे पिठ.
एक वाटी साबुदाण्याचे पिठ.
तिन ते चार उकडलेले बटाटे.
दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट.
आलं व हिरवी मिरची पेस्ट्(आपल्या तब्येतीप्रमाणे)
अर्धा चमचा लिंबाचा रस.
मिठ व साखर चवीप्रमाणे.
तेल्,जिरे फोडणीसाठी.
कोथिंबीर.
कृती :-प्रथम बटाटे कुस्करून घ्यावे.त्यात मिठ व साखर घालावे.एका कढईत तेल घालावे.तेल तापले कि त्यात
जिरे फोडणीला घालावे. नंतर त्यात हिरवे मिरची व आलं पेस्ट घालून ढवळावे.त्यात कुस्करलेला बटाटा,
लिंबाचा रस्,शेंगदाण्याचा कूट घालून व्यवस्थित परतून घ्यावे..शेवटी त्यात कोथिंबीर घालावी व त्याचे गोळे
करून घ्यावे. एका भांड्यात शिंगाड्याचे पिठ व साबुदाण्याचे पिठ घेऊन त्यात मिठ व पाणी घालून
जाडसर पिठ तयार करावे.त्यात बटाट्याचे घोळवून तेलात लालसर तळून घ्यावे.चटणीबरोबर खायला
द्यावे.
टिपः- कढईत वडे तळायला सोडतांना दोन्-दोनच वडे घाला.तेल आधी चांगले तापवून घेऊन मग गॅस मंद
करून वडे तळा म्हणजे वडे फूटणार नाहित.
प्रतिक्रिया
20 Jun 2011 - 7:16 pm | पर्नल नेने मराठे
ज्योती ताई वडे सुरेख !!!
20 Jun 2011 - 7:30 pm | प्रास
अशाने एखाद्या (माझ्यासारख्या, जन्माच्या भुकेल्या) चा जीव घ्याल हो..... ;-)
पाकृ आवडली हे वेसांन....
येत्या एकादशीला जरूर ट्राय करू......
केल्यास झकास फोटो वगैरे टाकून लोकांना इनो प्यायला लावू ;-)
20 Jun 2011 - 9:46 pm | इरसाल
गुरुवारी नक्की. बास अजून काय सांगू/लिहू ?
21 Jun 2011 - 10:36 am | अब् क
जिरे फोडणीला घालावे. नंतर त्यात हिरवे मिरची व आलं पेस्ट घालून ढवळावे????
21 Jun 2011 - 9:02 pm | निवेदिता-ताई
पुढे????