साहित्य : सिज़नल फळांचे तुकडे 2 वाट्या , ब्रेड स्लाइस - 4, ग्लुकोज़ आणि मारी बिस्किटांचे तुकडे 2 वाट्या, तयार केलेले कस्टर्ड, साखर घालुन घोटुन घेतलेली साय.
कृती - एका ताटलीत ब्रेड च्या स्लाइस ठेवा. त्यावर कस्टर्ड घाला. त्यावर बिस्किटांच्या तुकड्यांचा थर करावा आणि त्यावर कस्टर्ड घालावे.त्यावर फळांच्या तुकड्यांचा थर करावा आणि त्यावर कस्टर्ड. असे च उरलेल्या फळांच्या व बिस्किटांच्या तुकड्यांचे थर करावेत. उरलेले कस्टर्ड घालाव त्यावर साय घालावी आणि ही डिश फ्रिझर मधे 4-6 तास ठेवावी. नंतर बाहेर काढुन स्लाइस कराव्यात.
प्रतिक्रिया
20 Jun 2011 - 5:51 pm | पर्नल नेने मराठे
सुरेख दिस्तेय हो गुलतोरा ताई ... चव कशी होती पण कोण जाणे ;)
20 Jun 2011 - 7:48 pm | गुलतोरा
धन्यवाद चुचुताइ .... :प
20 Jun 2011 - 5:52 pm | परिकथेतील राजकुमार
वाह भारीच की.
वरुन जरा चेरी वैग्रे लावुन सजवले असते तर अजुन छान दिसले असते.
आधी ते तूप घालुन ठेवलेले गुळाचे तुकडेच वाटले.
20 Jun 2011 - 7:55 pm | गुलतोरा
धन्यवाद प रा जी ..... चेरी लावुन ते चेरी नी सजवलेले तुप गुळा चे तुकडे वाटले असते ना
20 Jun 2011 - 5:54 pm | प्रीत-मोहर
मस्तच हो गुल तै ...
20 Jun 2011 - 7:56 pm | गुलतोरा
थेन्क यु प्रि मो .....
20 Jun 2011 - 5:56 pm | पिंगू
वाह बघूनच आत्मा सुखावला.. आता खायला कधी बोलवताय?
- पिंगू
20 Jun 2011 - 7:59 pm | गुलतोरा
धन्यवाद ... आज तयार च आहे ... आज च या ...
20 Jun 2011 - 9:00 pm | सानिकास्वप्निल
नक्की करून बघेन :)
20 Jun 2011 - 9:38 pm | इरसाल
आयला जाम भारी.
पण खरं सांगू का फोटो बघून अगोदर हाफ फ्राइड ओम्लेट वाटले.
28 Jun 2011 - 9:31 pm | इंटरनेटस्नेही
तोंडाला पाणी सुटले!