घरगुती साजूक आणि रवाळ तूप

स्वरालि's picture
स्वरालि in पाककृती
13 Jun 2011 - 9:14 pm

(देशा बाहेर राहताना साजूक तूप बनवणे जमत नाही, त्यांच्या साठी)

१. LURPAK नावाचे (unsalted) बटर मिळते. (कोणत्याही SUPERMARKET मध्ये FROZEN सेक्शन मध्ये दिसेल. 250G चा एक CUBE मिळतो).
२. त्याला जाड बुडाच्या भांड्यात घेवून, GAS वर कढत ठेवा. (साधारण १५-२० मिनिटे, मध्यम आचेवर).
३. मधून मधून ढवळावे (खाली लागू नये म्हणून, पण तुम्हाला हि खाली लागलेली खरड नुसती खायला आवडत असेल तर जरूर खाली लागून द्यावे...).

त्यानांवर GAS बंद करा. आणि तूप तसेच ठेवून द्या. गोठल्या नंतर ते अगदी घरगुती तुपासारखे दिसेल (आणि चवीला, वासाला पण तसेच लागेल.)
जेवढे हवे तेवढे काढून बाकीचे फ्रीज मध्ये ठेवले तर १ ले दीड महिनाभर टिकते.

प्रतिक्रिया

बघते ग्रोसरीत.
गेल्या दोन वर्षापासून मी लँड ओ लेक चे अन् सॉल्टेड बटर तूप करायला वापरते.
कमी बेरी येते आणि रवाळ तूप होते. पण फारच पटकन होते म्हणून तिथेच उभे रहावे लागते.

तुप कढवताना त्यात चिमुटभर मिठ घालावे..म्हणजे तुप रवाळ होते.
तसेच तुप तयार झाले की गरम तुप लगेच तुपाच्या भांड्यात ओतुन ठेवावे म्हणजेही तुप रवाळ होते.

मी घरची साय साठवते आणि तिचे लोणी काढून ते लोणी शिजवते. शिजवताना त्यात ३-४ तुळशीची पाने घालते त्यामुळे तुप रवाळ होते.

स्वरालि's picture

14 Jun 2011 - 7:28 pm | स्वरालि

मी घरची साय साठवते आणि तिचे लोणी काढून ते लोणी शिजवते.

- अहो इथल्या दुधाला सायच नाही येत आणि जरी साय आली तरी दही कसे लागणार थंड वातावरणात ?....

विड्याचं पान घालून बघा तूप तयार होत आलं की. छान वास येतो तुपाला !!

चिंतामणी's picture

15 Jun 2011 - 9:10 am | चिंतामणी

कढवणे असे म्हणायचे आहे का?

मी हे तुप try केले होते. रवाळ वेगरे ठिक आहे, पण त्याची चव मला डालडा (वनस्पती तुप) सारखी लागते. :(
आणि इथे आपल्या सारखे दुधावर साय पण येत नाही, त्यामुळे लोणी नाही. म्हणुन मी भारतातुन येतानाच १ किलो तुप घेउन आले.

स्वरालि's picture

14 Jun 2011 - 7:30 pm | स्वरालि

मी हे तुप try केले होते. रवाळ वेगरे ठिक आहे, पण त्याची चव मला डालडा (वनस्पती तुप) सारखी लागते.
- अगं नाही ग, डालडा पेक्षा नक्कीच चांगले लागते की.

सानिकास्वप्निल's picture

14 Jun 2011 - 8:28 pm | सानिकास्वप्निल

मी पण घरी Lurpak, Sainsbury Basic Unsalted Butter घेऊन ट्राय केले, रवाळ झाले पण चव काही आवडली नाही, हो पण Organic बटर वापरले तर चवीत जरा फरक जाणवतो.

इथे भारतीय दुकानात खानुम ब्रांड्चे तुप मिळते ते ही चवीला डालडा सारखेच लागते :(

मीसुध्दा भारतातून घरगुती तुप आणते.

शिल्पा ब's picture

14 Jun 2011 - 2:23 am | शिल्पा ब

कोस्कोत जे बटर मिळते त्यानेसुद्धा छान तूप तयार होते. त्यापेक्षा नानक तूप मिळते तेसुद्धा चांगले असते. एकूण खर्च साधारण सारखाच.

पुष्करिणी's picture

14 Jun 2011 - 2:45 am | पुष्करिणी

१. कोणतही अनसॉल्टेड बटर घ्या, अगदी मंद उष्णतेवर गोल्डन बाउन आणि पारदर्शक होइपर्यंत ठेवा. रवाळ हवं असेल तर विड्याचं १ पान टाका लोणी कढवताना.

२. हाय फॅट दही मिक्सरमधे ५-६ मि. फिरवा, २ बर्फाचे क्यूब्ज टाका आणि २० मि. वाट पहा, लोणी तयार, हे कढवा, तूप तयार...:)

365 Unsalted Butter हे Whole Foods मार्केट मध्ये मिळणारे लोणी कढवून आतापर्यंत सर्वात उत्तम प्रकारचं तूप मिळतं असा अनुभव आहे. (याच ब्रँडचं ऑर्गॅनिक लोणीही मिळतं, ते महाग असलं तरी तुपाची प्रत कमीच वाटली.)

स्वरालि's picture

14 Jun 2011 - 7:32 pm | स्वरालि

इकडे मिळते का, ते शोधावे लागेल. जर मिळाले तर करून बघीन.

स्मिता.'s picture

14 Jun 2011 - 7:34 pm | स्मिता.

युरोपातल्या इंडियन स्टोअरमध्ये जे 'देसी घी' मिळते ते सुद्धा असेच बटर शिजवून बनवले असते का? तसे असेल तर त्या तूपाऐवजी घरीच बनवलेले बरे पडेल.

स्वरालि's picture

14 Jun 2011 - 7:50 pm | स्वरालि

hmmm काही कल्पना नाही......

अविनाशकुलकर्णी's picture

14 Jun 2011 - 9:32 pm | अविनाशकुलकर्णी

धन्स..लेकिला कळवले

कोणत्याही अनसॉल्टेड बटर च तूप असंच होतं असा माझा अनुभव आहे. मला आवडतं ते.
मी क्राफ्ट, लॅन्ड ओ लेक, बिग वाय, वेलस्ली फार्स.. स्टॉप न शॉप, शॉप राईट.. या सगळ्या ब्रँड्स च अन्सॉल्टेड बटर आणून त्याचं तूप केलं आहे. त्यात थोडंसं मीठ टाकलं की चांगली कणी येते. त्यातून तुमच्याकडे जर खडे मीठ असेल तर तूपाची चव आणि कणी खूप छान येते.

स्मिता.'s picture

14 Jun 2011 - 10:20 pm | स्मिता.

माझा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहिला आहे.

अमेरिकेत किंवा राणीच्या देशात राहणार्‍यांना इंडियन स्टोअरमध्ये मिळणारे 'देसी घी' हा सोपा विकल्प असूनही बरेच जण बटर आणून त्याचे घरी तूप बनवतात असे वरच्या प्रतिक्रियांवरून दिसतेय.

त्याचे कारण काय?
बटर शिजवून बनवलेले तूप 'देसी घी' पेक्षा चांगले असते का?

हाच प्रश्न अमिताच्या धाग्यावर विचारून बघते.

बर्‍याच वेळा विकतच्या तुपाला बरणी उघडल्या नंतर काही दिवसांनी वास येतो. शिवाय तेव्हढ्याच किमतीमधे दुपटीपेक्षा जास्तं तुप होते. आणि स्वतः केलेले असल्याने भेसळ वगेरे प्रश्न पडत नाहीत. मला तरी लोणी तापवून बनवलेले तुप हे विकतच्या (नानक, स्वाद, ई.) तुपापेक्षा आवडते.

रेवती's picture

15 Jun 2011 - 12:18 am | रेवती

अगदी अगदी!
मी फक्त एकदा विकतचे तूप आणले होते.
छोटा डबा होता म्हणून बरे. भयंकर वास येत होता देसी घी ला.
शिवाय ते तुपकट, ओशट असे न लागता मेणचट लागते म्हणून शुद्धतेविषयी शंका येते.
नंतर वेल्स्ली फार्मच्या बटरचे बरीच वर्षे करत होते.
दोन वर्षांपूर्वी मात्र लँड ओ लेक बटर वापरायला लागले आणि आता दुसरे कोणतेही बरे वाटत नाही.
रवाळ, खमंग तूप तयार होते.

हो ते मात्र खरंय!! पटेल मधून आणलेल्या देसी घी ला वास येतो.
त्यापेक्षा बीजे'स मधून ४ बॉक्सचं बटर पॅक आणावं आणि भरपूर तूप करावं. छान होतं एकदम.

सानिकास्वप्निल's picture

14 Jun 2011 - 11:26 pm | सानिकास्वप्निल

मी माझ्या प्रतिसादात हे म्हणटलं होतं...कदाचित तूझे वाचायचे राहून गेले असावे...

राणीच्या देशात भारतीय दुकानात खानुम ब्रांड्चे तुप मिळते ते ही चवीला डालडा सारखेच लागते :(

म्हणून मीसुधदा भारतातूनच घरगुती तुप आणते.

स्मिता.'s picture

15 Jun 2011 - 4:42 pm | स्मिता.

सनिकाताई, तुमची प्रतिक्रिया मी वाचली होती.

खरं तर इकडे पॅरिसमध्ये जे देसी घी मिळतं तेसुद्धा घरगुती साजूक तूपासारखं नक्कीच नसतं. जरी डालडा सारखं नसलं तरी त्याची चव आणि वासही वेगळाच असतो. इकडे बहुदा सगळं राणीच्या देशातूनच आयात केलेलं असतं.

पण भेसळ या कारणाने जर आपण तूप विकत घेत नसू तर बटरमध्ये भेसळ नाही याला काय प्रमाण? की कुठे खात्रीने भेसळ नसलेले बटर मिळते?

स्वाती दिनेश's picture

15 Jun 2011 - 5:57 pm | स्वाती दिनेश

आमच्याइथे मिळणार्‍या देसी दुकानातील तुपालाही वास येतो त्यामुळे मीसुध्दा अन सॉल्टेड बटर कढवून तूप करते.
स्वाती

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jun 2011 - 6:58 pm | परिकथेतील राजकुमार

छानच पाकृ.

LURPAK नावाचे (unsalted) बटर मिळते.

हे इकडे सदाशिव पेठेत किंवा मंडईत कुठे मिळते का बघायला पाहिजे.
हे न मिळल्यास दुसरा काही पर्याय आहे का?

प्राजु's picture

15 Jun 2011 - 7:57 pm | प्राजु

>>>हे न मिळल्यास दुसरा काही पर्याय आहे का?

मग घरचे पांढरे शुभ्र लोणी वापरू शकता. त्याने तूपाची चव जास्त चांगली येते. :-P

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jun 2011 - 5:00 pm | परिकथेतील राजकुमार

मग घरचे पांढरे शुभ्र लोणी वापरू शकता. त्याने तूपाची चव जास्त चांगली येते.

पाशवी शक्तींच्या कंपुशी पंगा घेणे सध्या परवडणारे नसल्याने गप्प बसल्या गेले आहे. :P

पुष्करिणी's picture

15 Jun 2011 - 8:02 pm | पुष्करिणी

ग्राहकपेठेत मिळतं :)

स्वरालि's picture

15 Jun 2011 - 8:11 pm | स्वरालि

हे इकडे सदाशिव पेठेत किंवा मंडईत कुठे मिळते का बघायला पाहिजे.
सुरुवातीलाच लिहिले आहे कि,
(देशा बाहेर राहताना साजूक तूप बनवणे जमत नाही, त्यांच्या साठी)

मला विचाराल तर भारतात असेन तर मी, घरीच सायीसकट दही लावून, लोणी काढून काढ्वेन.
भारतात दुधाला साय पण चांगली येते आणि दही पण छान लागते हो....मग कशाला हवेय हे बटर ??

बहुगुणी's picture

15 Jun 2011 - 8:46 pm | बहुगुणी

त्यामुळे उपहासाची 'परा'कोटी करताहेत, इतकं seriously घेउ नका ;-) !

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jun 2011 - 4:56 pm | परिकथेतील राजकुमार

सुरुवातीलाच लिहिले आहे कि,
(देशा बाहेर राहताना साजूक तूप बनवणे जमत नाही, त्यांच्या साठी)

अहो मी तुमच्या देशाबाहेरच राहात नाही का?

रमताराम's picture

15 Jun 2011 - 8:50 pm | रमताराम

अरे काका हलवाई किंवा तत्सम दुकानात गुजराती पद्धतीची मिठाई मिळेल ती आण. गॅसवर एका खोलगट भांड्यात मायक्रोवेव बरोबर आलेले ग्रिल असेल ते ठेव, त्यावर ही मिठाई ठेव. आता मंद आचेवर थोडावेळ गॅस चालू ठेव. सारे तूप सुटून खाली भांड्यात जमा होईल. आता गॅस बंद कर. भांडे थंड झाले... आणि हो ग्रिल देखील.. की ग्रिल त्यावरच्या मिठाईसकट वरच्यावर उचलून बाहेर काढ नि तूप बाटलीत वा योग्य त्या मापाच्या भांड्यात भरून ठेव.

मिठाईचे काय करायचे ते तुझे तू ठरव, ज्याच्याकडून आणलीस त्याच्याकडे बायबॅक ऑफर असेल तर पहा किंवा लो-फॅट मिठाई म्हणून एखाद्या आमच्यासारख्या नोज-अप (इंग्लिशमधे नाय ऐकणार कोणाला) आयटीवाल्याला दुप्पट किंमतीत विकून टाक.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jun 2011 - 4:59 pm | परिकथेतील राजकुमार

रारा तुम्हाला काका हलवाई अथवा तत्सम दुकानदार साजूक तूपातच मिठाई करतात असे म्हणायचे आहे का?

पुरावा द्या. ;)

रमताराम's picture

17 Jun 2011 - 8:09 pm | रमताराम

एक म्हणजे साजुक तुपात ती मिठाई बनवतात की नाहीत हे ब्रह्मदेवाच्या बापालाही सांगता येणार नाही, हां पण 'साजुक तुपातील मिठाई' या नावाखाली काहीतरी मिठाई मिळते ब्वॉ.

विवेक मोडक's picture

17 Jun 2011 - 11:33 am | विवेक मोडक

आय्टीतल्या हमालांना इतर हमालांपेक्षा जास्त पगार मिळतो हे सांगण्याचा प्रयत्न अभिनंदनीय आहे

परिकथेतील राजकुमार's picture

17 Jun 2011 - 2:22 pm | परिकथेतील राजकुमार

अगागागाग्गागग !

कॉलिंग धम्या.....

तिमा's picture

17 Jun 2011 - 9:01 pm | तिमा

कित्ती कित्ती गहन प्रश्न आहे हा (तुपाचा)!

एक झुरळ एकदा तुपाच्या डब्याजवळ गेलं
इश्य! 'डालडा', म्हणून परत आलं!!!
( ऐकीव)

रमताराम's picture

17 Jun 2011 - 8:19 pm | रमताराम

मेक्यानिकल मोडक, इथेही जातीयवाद आणला का तुम्ही, जोर्दार णिशेद तुमचा. असो.
आमचा पगार तेवढा दिसतो (बादवे, आम्ही रोजंदारीवर काम करतो बरका, काम नाय तर पगार नाय तत्त्वावर) सगल्यांना. यात प्रतिसादातील अन्य काही महत्त्वाचे मुद्दे कसे विसरता.

१. तूप काढून घेतलेली मिठाई असल्याने हेल्थ कॉन्शस आयटीवाला/वाली जास्त दाम मोजून विकत घेईल. त्या तिथे पलिकडे आम्रिकेत लोक ऑरगॅनिक नावाने येणार्‍या रंगीबेरंगी भाज्या विकत घेतात तसे. यात तो/ती आपल्या आरोग्याबाबत किती कॉन्शस आहे ते समजते.

२. आणखी एक शक्यता म्हणजे तो आयटीवाला/वाली येवडा/डी मोरू असेल की ही 'सेकंड हॅन्ड' मिठाई सहज त्याच्या/तिच्या गळ्यात मारता येईल.

३. आयटीवाले भन्नाट इंग्रजी बोलतात (आमचे क्लाएंट बहुधा आमच्याशी एखादा कॉल झाला की लगेच फ्रेंच, जर्मन किंवा स्पॅनिशचे क्लासेस लावतात, आम्ही नक्की कोणती भाषा बोलतो हे शोधण्यासाठी.)

असो, सध्या इतके पुरे. आता जरा इकडे कुठे ऑरगॅनिक भाजीपाला मिळतो का ते शोधायला जायचे आहे. त्यामुळे पळतो.

कुंदन's picture

16 Jun 2011 - 3:59 pm | कुंदन

तुपातले लाडु तुम्ही.
काय जिम बिम लावली का काय ?

अविनाशकुलकर्णी's picture

18 Jun 2011 - 11:52 pm | अविनाशकुलकर्णी

मेक्यानिकल मोडक

दादा ..भिवु नकोस..मी पाठीशी आहे....
मेक्यानिकल काका