साहित्यः
१/२ कपपेक्शा किंचित जास्त किंवा ४ आऊंस बेकिंग चॉकलेट
१/२ कपपेक्शा किंचित जास्त किंवा ४ आऊंस अनसॉलटेड बटर
१/३ कप साखर
२ अंडी
१/४ कप मैदा
पाकृ:
बेकिंग चॉकलेटचे बारीक तुकडे करून डबल बॉयलर वापरून वितळवून घेणे .( डबल बॉयलर म्हण्जे एका मोठया भांड्यात पाणी घेऊन उकळ्णे व त्यावर दुसरे भांडे ठेवून त्यात चॉकलेट घालणे म्हण्जे गरम पाण्याच्या उष्णतेने ते वितळेल .)
चॉकलेट पूर्ण वितळले की भांडे खाली उतरवून त्यात बटर घालून चांगले एकजीव करावे.
दुसर्या भांडयात अंडी व साखर हलके होईपर्यंत फेटावे. अंडयाचे मिश्रण व मैदा हळु-हळु चॉकलेटच्या मिश्रणात घालून नीट एकत्र करुन घ्या.
रॅमॅकिन पॉट ला बटरने ग्रीज करुन घ्या. (रॅमॅकिन पॉट नसतील तर सिरॅमिक, पोरसेलिन किंवा ओव्हन सेफ मफिन चे साचे वापरले तरी चालतील.)
रॅमॅकिनमध्ये मिश्रण ओतून प्री-हिट केलेल्या ओव्हन मध्ये १८० डीग्रीवर १०-१२ मिनिटे बेक करा.
बेक झाल्यावर दोनच मिनिटे बाहेर ठेवून लगेच सर्व्हींग प्लेट मध्ये काढा व थंडगार आईस्क्रिम बरोबर खायला सुरुवात करा.
जसा तुम्ही केकेचा चमच्याने घास घ्याल तेव्हा तुम्हला आतुन चॉकलेटचा लावा बाहेर येताना दिसेल, म्हणुन ह्याला मोल्टन लावा केक असे म्हणतात :)
प्रतिक्रिया
13 Jun 2011 - 9:53 pm | रेवती
छान पाकृ!
फोटू पाहूनच वजन वाढले.
आपल्याकडेही बर्याच वर्षांपूर्वी गरम आणि गार एकत्र खाण्याची फ्याशन आली.
जसे गाजर हलवा आणि आईस्क्रीम.........
मला आवडते तसे.
13 Jun 2011 - 10:10 pm | आत्मशून्य
.
15 Jun 2011 - 2:25 pm | टारझन
लावा केक आणि लावा मोबाईल , हे आमचे अत्यंत आवडते प्रॉडक्ट आहेत असे ह्या 'भुकेल्या' क्षणी णमुद करावेसे वाटते.
- लावाझन
13 Jun 2011 - 10:49 pm | निवेदिता-ताई
मस्त
14 Jun 2011 - 12:03 am | ५० फक्त
जाम भारी, डाएटचा विचार काही दिवस पुढे ढकलतो आता.
14 Jun 2011 - 12:07 am | स्वाती२
मस्त! मस्त! मस्त!
14 Jun 2011 - 1:10 am | Mrunalini
वाव, तोंडाला पाणी सुटले ग...
15 Jun 2011 - 5:17 am | प्राजु
तुफ्फान!! कसल जबरी दिसतंय गं हे!!
15 Jun 2011 - 6:05 am | अभिज्ञ
रॅमॅकिनमध्ये मिश्रण ओतून प्री-हिट केलेल्या ओव्हन मध्ये १८० डीग्रीवर १०-१२ मिनिटे बेक करा.
इतक्या वेळ ओव्हन मध्ये ठेवल्यावर लावा देखील सॉलिड/घट्ट बनतो असा अनुभव आहे.
ह्यावर काही उपाय?
अभिज्ञ.
15 Jun 2011 - 2:16 pm | सानिकास्वप्निल
रॅमॅकिनमध्ये मिश्रण ओतून प्री-हिट केलेल्या ओव्हन मध्ये १८० डीग्रीवर १०-१२ मिनिटे बेक करा
माझा केक १० मिनिटात बेक झाला अगदी हवे तसा...खरं तर ह्याला १० मिनिटेच बेक करायचा कारण हा केक थोडासा चिकट (Gooey) असतो आणी आतील लावा त्यामुळे घट्ट होत नाही. (तसा मी दिलेल्या फोटोत ही दिसत आहे :) )
तुम्ही केलेला केक किती वेळ बेक केला?
बेक झाल्यावर त्याला बाहेर खुप वेळ गार होऊ द्यायचा नाही २ मिनिटे पुरेसे आहेत आणी लगेच सर्व्ह करणे.
15 Jun 2011 - 4:23 pm | प्राजक्ता पवार
मस्तं !
15 Jun 2011 - 6:24 pm | स्वाती दिनेश
एकदम टेम्प्टिंग फोटो!
स्वाती
20 Jun 2011 - 11:55 am | पियुशा
यम्मि यम्मि !
तुझ्या रेसेपि म्हणजे एक पर्वणीच असते मि पा करासाठी :)
20 Jun 2011 - 1:12 pm | गणपा
शेवट्चा फोटु खुणावतोय कधी पासुन. "कधी येतोयस.. कधी येतोयस..." :)
20 Jun 2011 - 3:25 pm | सानिकास्वप्निल
गणपा तुम्ही कधीही येऊ शकता , बोला कधी येत आहात :)
@ पियुशा धन्स :)
28 Jun 2011 - 9:31 pm | इंटरनेटस्नेही
तोंडाला पाणी सुटले!