आलू पराठे

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
18 May 2008 - 12:46 pm


स्टफ्ड आलू पराठे आपण नेहमी करतो पण ते जरा वेळखाऊ आणि किचकट काम असते.सारण न भरताही आलूपराठे चांगले होतात.वेळ थोडा कमी लागतो आणि कमी किचकट काम !
साहित्य - ४/५ मध्यम आकाराचे बटाटे,एका पेराएवढं आलं,२/३ लसूण पाकळ्या,२/३ हिरव्या मिरच्या,मीठ चवीनुसार,तेल,
मावेल तेवढी कणिक.
कृती - बटाटे उकडून घ्या,साले काढून कुस्करा, आले लसूण मिरचीचे वाटण करुन त्यात घाला.मीठ व चमचाभर तेल घाला.मावेल तेवढी कणिक घाला.पाणी अजिबात घालू नका.जरा घट्टसर मळा, गोळा जास्त वेळ न ठेवता लगेचच मध्यम आकाराचे पराठे लाटा.
लाटताना पिठी जरा जास्त लागते नाहीतर ते पोळपाटाला चिकटतात.
भाजताना दोन्ही बाजूंनी तेल सोडा.
दही+चाट मसाला+तिखट+ मीठ याबरोबर हे पराठे छान लागतात.जोडीला टोमॅटो केचप किवा नारळाची चटणीही झकासच !

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

18 May 2008 - 12:53 pm | विसोबा खेचर

स्वाती, केवळ सुरेख पाकृ! आलूपरोठा हा प्रकार माझा अशक्त बिंदू आहे! :)

फोटू जीवघेणा आहे! आज संध्याकाळपर्यंत जर्मनीचं विमान पकडतो आहे! :)

तूर्तास इतकेच! :)

आपला,
(आलूपराठ्यांचा फोटू पाहून खलास झालेला!) तात्या.

विसोबा खेचर's picture

18 May 2008 - 12:54 pm | विसोबा खेचर

आलूपरोठ्यासोबत कुठली वाईन ठेवली आहेस बरं? :)

आपला,
(बाईबाटलीचा प्रेमी!) तात्या.

केशवसुमार's picture

18 May 2008 - 1:13 pm | केशवसुमार

स्वातीताई,
तिकडे जर्मनीमधे एक रेस्टरॉ काढून टाका बघू फस्टक्लास..
सगळे जर्मन त्यांचे खाणे विसरतील..
फोटो बघून तो.पा.सु.. :P
(हवरट)केशवसुमार
स्वगतः आजच केईमच्या पाशी शाजी'ज पराठा हाऊसला भेट द्यायला हवी.. :\

यशोधरा's picture

18 May 2008 - 1:16 pm | यशोधरा

स्वातीताई, मी पण असेच करते पराठे :) मला सारण वगैरे करत बसायचा कंटाळा येतो म्हणून ;) फोटू मस्तच!!

प्रभाकर पेठकर's picture

18 May 2008 - 1:17 pm | प्रभाकर पेठकर

डुप्लीकेट आलूपराठ्याची पाककृती झटपट बनणारी दिसते आहे. करून पाहीली पाहिजे.

आजच केईमच्या पाशी शाजी'ज पराठा हाऊसला भेट द्यायला हवी.. :\

हे कुठेशीक आलं बुवा? पुण्यात की मुंबईत?

केशवसुमार's picture

18 May 2008 - 4:56 pm | केशवसुमार

चला येताय का? फोन करा..
४ परठे खाल्ले तर यायचा जायचा खर्च आणि पराठे फुकट अशी स्किम आहे..
मी २.५ च्या पुढे नाही जाऊ शकलो..
केशवसुमार

देवदत्त's picture

18 May 2008 - 10:53 pm | देवदत्त

ओह पुण्यात...
आधी माहित असते तर नक्की प्रयत्न केला असता तेथे जाण्याचा. खर्च बहुधा वसूल केला असता मी ;)
(स्वगतः
एक मन- जास्त तर नाही बोललो ना मी?
दुसरे मन - आता बोलला आहेस तर खा की.)

छोटा डॉन's picture

19 May 2008 - 12:31 pm | छोटा डॉन

कोणे एके काळी आम्ही पुण्यातल्या "एफ सी रोडवरच्या चैतन्यचे" एका बैठकीत "३ आलू पराठे" खात होतो ...
आता पैजेवर "चौथा" ट्राय करायला हरकत नाही ...

फक्त खर्चाच बघा भौ !!!

अमेरिकेच्या रिसेशन ने घाबरलेला छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

केशवसुमार's picture

19 May 2008 - 1:02 pm | केशवसुमार

कधी येताय..
७- ८ इंच व्यास आणि ४-५ मीमी जाडीचे हे पराठे ४ खाणारे आज पर्यत फक्त ३-४ जणच भेटले आहेत..
आपण प्रयत्न करू शकता.. 8} :>

फक्त खर्चाच बघा भौ !!!
आहो चार खालेत खर्च कसला उलट जायचे यायचे भाडे मिळेल.. :B
(कालच दोन पराठे खाल्लेला) केशवसुमार
स्वगतः नंतर डॉक्टरचा खर्च कोण देणार अस तर विचारत नसतील ना डॉनराव? :W

छोटा डॉन's picture

19 May 2008 - 1:42 pm | छोटा डॉन

"७- ८ इंच व्यास आणि ४-५ मीमी जाडीचे हे पराठे ४ खाणारे आज पर्यत फक्त ३-४ जणच भेटले आहेत..
आपण प्रयत्न करू शकता..""

करू की , त्यात काय ? 8} 8} 8}
स्वगत : देवा, वाचव रे आता !!!

बाकी डाक्टराचं काय टेन्शन नाय ...

स्वगत : च्यायला, शेठनी चांगलाच धोतराला हात घातला की ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

केशवसुमार's picture

19 May 2008 - 1:58 pm | केशवसुमार

करू ह्या शनिवारच टेबल बूक.. :W
(बुकी)केशवसुमार
स्वगतः डॉनराव हल्लीच्या काळात पण धोतर नेसत असतील वाटल नव्हतं :O :$

छोटा डॉन's picture

19 May 2008 - 2:14 pm | छोटा डॉन

माझी जरा "विजय मल्ल्या" बरोबर त्याची पुढच्या वर्षीची "आय पी एल टीम" ठरवण्यासाठी व त्यानंतर "किंगफिशर एअरलाईन्सच्या नव्या हवाईसुंदर्‍याच्या भरतीच्या मुलाखतीसाठी मिटिंग " आहे ...
त्यानंतर पुढच्या आठवड्यात मला "बराक ओबामा" च्या प्रचरासाठी प्रथम न्युयॉर्क व त्यानंतर कर्नाटकातला "भाजपाचा विजय" साजरा करण्यासाठी दिल्ली ला जायचे आहे ...

आपण "जुनमध्ये " नक्की "बसू " ....

स्वगत : आयला, शेठ एवढं इरेला पेटतील असं वाटलं नव्हतं ....

टीम व एअरहोस्टेस सिलेक्टर छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रभाकर पेठकर's picture

19 May 2008 - 12:39 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद श्री. केशवसुमार,

४ परोठ्यांची 'ऑफर' २० वर्षे उशीरा आली आहे. नाहीतर विचार केला असता. असो. सध्या पोट बाहेरून दिसते तेवढे आतून 'मोठे' नसते ह्या विचारांप्रत येऊन ठेपलो आहे.

पण चवीसाठी नक्कीच एक दिवस भेट देईन ह्या परोठे सम्राटाला.

केशवसुमार's picture

19 May 2008 - 1:04 pm | केशवसुमार

जायचे बोला..
बाकी सध्या पोट बाहेरून दिसते तेवढे आतून 'मोठे' नसते ह्या विचारांप्रत येऊन ठेपलो आहे हे मात्र खर..
(सहमत)केशवसुमार

लिखाळ's picture

18 May 2008 - 3:08 pm | लिखाळ

वा !!
पाकृ आणि चित्र मस्त आहे.. पाराठ्या सोबत वाईन ???
वा वा ... हा प्रयोग करुन पाहिला पाहिजे :)
-लिखाळ.

शितल's picture

18 May 2008 - 6:00 pm | शितल

सारण भरून पराठा बनविण्यात वेळ जातो, ही एकदम झटपट होणारी कृती आहे, नविन टिप्स छान आहेत .

सहज's picture

18 May 2008 - 7:53 pm | सहज

आजच करून खाल्ले.

वाईनच्या जागी तश्याच रंगाचा डाळींबाचा रस. :-)

बहोत बहोत शुक्रिया!!!!

ईश्वरी's picture

18 May 2008 - 10:31 pm | ईश्वरी

कल्पना छान आहे. मी नेहमी सारण भरून करते. आता तुझ्या रेसिपी प्रमाणे करून पाहीन. फोटो छान आलाय.

ईश्वरी

देवदत्त's picture

18 May 2008 - 10:55 pm | देवदत्त

सोपी वाटतेय कृती. प्रयत्न केला पाहिजे :)

वरदा's picture

18 May 2008 - 11:56 pm | वरदा

तसे माझे सारण भरुनही होतात पटापट पण हे त्याहून लवकर होतील असं वाट्टंय....
फोटो सुरेख आलाय...

स्वाती दिनेश's picture

19 May 2008 - 12:18 pm | स्वाती दिनेश

सर्व खवय्यांना धन्यवाद.
तात्या,लिखाळ पेल्यामध्ये ऍपल+चेरी चा ज्यूस आहे.
सहजराव,तुमचा डाळिंब ज्यूस आमचा चेरीऍपल,:)
पेठकरसाहेब,डुप्लिकेटपराठे हे नाव मस्त आहे.
केसु, आमच्या आकिमाअजोबांची खुल्ली ऑफर आहे गॅरेजमध्ये वडापावची गाडी टाकण्याची,गल्ला ते सांभाळणार आणि आजी प्रपोगांडा करणार,:)
यशोधरा,देवदत्त,शीतल,ईश्वरी,वरदा
सर्वांना धन्यवाद!

लिखाळ's picture

19 May 2008 - 5:24 pm | लिखाळ

स्वातीताई,
कालच पराठे करुन पाहिले..फार छान झाले होते..पाकृसाठी आभार.
दह्यातली चटणी सुद्धा छान होती..आम्ही सोबत फ्रुक्खट टे प्यायला :)
--लिखाळ.

स्वाती राजेश's picture

19 May 2008 - 6:19 pm | स्वाती राजेश

मस्त झटपट पराठा....
असाच मी कोबीचा करते....बटाट्याच्या ऐवजी कोबी किसून टाकते.
बाकी फोटो मस्त..मला पण प्रथम ती वाईन वाटली.:)

चतुरंग's picture

19 May 2008 - 8:18 pm | चतुरंग

आमच्या सौं. ना कृती वाचून बघायची फर्माइश झाली. मस्तच दिसताहेत चित्रात!
सोबत तोंडीलावण्यात हिरवीगार मिरची, टोमॅटो केचअप, स्ट्रॉबेरीज, लाल द्राक्षे आणि वाईन ओळखली पण ते वाडग्यातले दही आहे की आणखी काही?

(स्वगत - आता लवकरच खायला मिळतील हो चतुरंगा!) :P

चतुरंग

स्वाती दिनेश's picture

19 May 2008 - 8:25 pm | स्वाती दिनेश

वाडग्यात दही त्यावर चाट मसाला,मीठ,तिखट भुरभुरले आहे आणि रेड वाइनच्या पेल्यात चेरी +ऍपलचा ज्यूस आहे.:)
स्वगत- कैसे फसाया? सबको रेडवाइनही लग रही है!

पण चेरी + ऍपल ज्यूस?!?! ने मात्र दांडी गुल्ल केली, "मनी वसे ते वाईनरुपात दिसे", दुसरं काय!

चतुरंग

प्रगती's picture

20 May 2008 - 1:51 pm | प्रगती

मी पण सारण भरुन परोठे बनविते आता एकदा असे बनवून बघते. (स्वगत: हिचा नवरा जाम खुश असेल हिच्यावर, नेहमी काय
छान छान पदार्थ बनवते.) :$

छोटा डॉन's picture

20 May 2008 - 2:01 pm | छोटा डॉन

नवर्‍याचं उघड : अरे वा, काय मस्त जमला आहे. कुठुन शिकलीस हे असले [ नसते ] उद्योग ?

नवर्‍याच स्वगत : च्यायला कुठुन काय काय वाचुन येती ही ? शेवटी प्रयोग करायला मीच सापडतो हिला.
ते नेट कनेक्शन बंदच करायला पाहिजे ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

स्वाती दिनेश's picture

20 May 2008 - 9:34 pm | स्वाती दिनेश

स्वयंपाकात प्रयोग करत रहावे रे डॉन्या..
माझ्या नवर्‍याच्या मनातलं स्वगत आणि ओपन कमेंट्स प्रत्यक्षच ऐक ना,येतो आहेस ना हिटलरच्या देशा? :)
स्वाती

चतुरंग's picture

20 May 2008 - 9:39 pm | चतुरंग

नेमक्या कोणत्या 'हिटलर' बद्दल बोलताय?! :> :?

चतुरंग

स्वाती दिनेश's picture

20 May 2008 - 9:45 pm | स्वाती दिनेश

आता समजून घ्या की राव.. ;)

मदनबाण's picture

21 May 2008 - 5:33 am | मदनबाण

पराठा हे माझे आवडीचे खाद्य आहे..... आमच्या मातोश्री मेथीचे पराठे अगदी A क्लास बनवतात.....

(छुंद्या बरोबर पराठा खाणारा)
मदनबाण.....