मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आलू पराठे

स्वाती दिनेश · · पाककृती
स्टफ्ड आलू पराठे आपण नेहमी करतो पण ते जरा वेळखाऊ आणि किचकट काम असते.सारण न भरताही आलूपराठे चांगले होतात.वेळ थोडा कमी लागतो आणि कमी किचकट काम ! साहित्य - ४/५ मध्यम आकाराचे बटाटे,एका पेराएवढं आलं,२/३ लसूण पाकळ्या,२/३ हिरव्या मिरच्या,मीठ चवीनुसार,तेल, मावेल तेवढी कणिक. कृती - बटाटे उकडून घ्या,साले काढून कुस्करा, आले लसूण मिरचीचे वाटण करुन त्यात घाला.मीठ व चमचाभर तेल घाला.मावेल तेवढी कणिक घाला.पाणी अजिबात घालू नका.जरा घट्टसर मळा, गोळा जास्त वेळ न ठेवता लगेचच मध्यम आकाराचे पराठे लाटा. लाटताना पिठी जरा जास्त लागते नाहीतर ते पोळपाटाला चिकटतात. भाजताना दोन्ही बाजूंनी तेल सोडा. दही+चाट मसाला+तिखट+ मीठ याबरोबर हे पराठे छान लागतात.जोडीला टोमॅटो केचप किवा नारळाची चटणीही झकासच !

वाचन 19430 प्रतिक्रिया 0