झटपट ब्रेकफास्ट (चीज ऑम्लेट )
साहित्य : ३-४ अंडी , चीज क्यूब किसून , कांदा बारीक चिरलेला /किसलेला , ३-४ हिरव्या किंवा लाल मिरच्या ,३-४ लसून पाकळ्या बारीक चॉप्स केलेल्या,तेल २ चमचे ,कोथिंबीर , मीठ , काळी मिरे ( पावडर) एक चुटकी ,( तुम्ही आवडत असेल तर टोम्याटो हि घालू शकता )
कृती :-एका बावूल मध्ये अंडे फोडून त्यात वरील सर्व साहित्य घालून छान फेटून घ्या ,पॅनमध्ये तेल घाला ,फेटलेल मिश्रण टाकून स्पून ने पसरवून घ्या . दोन्ही साईडने मस्त भाजून घ्या गरमागरम चीज ऑम्लेट खाण्यासाठी तय्यार आहे
प्रतिक्रिया
20 May 2011 - 6:27 am | सविता
मला वाटते....
१. कांदा आणि ज्या काही भाज्या घालायच्या त्या....तेलावर परतून घ्यायचे....
२. अंडे आणि मीठ एकत्र फेटून तव्यावर टाकायचे
३. ते थोडेसे होत आले की ऑम्लेट च्या अर्ध्या भागावर घालणे....
४. भरपूर किसलेले चीज या अर्ध्या भागात पसरलेल्या कांद्यावर टाकुन मग घडी घालणे
५. वाटल्यास झाकण ठेवून चीज वितळे पर्यंत ऑम्लेट तव्यावर ठेवणे...
ही खर्या चीज ऑम्लेट ची कॄती आहे... तुम्ही केले ते नेहमीचे ऑम्लेट!... फक्त मिश्रणात थोडे चीज टाकले हाच काय तो फरक
हा पाहा फोटो...(जालावरून साभार)

20 May 2011 - 7:07 am | पियुशा
भाज्या नक्कि कोनत्या वापरायच्या ते नाहि सान्गितले :)
आनि भाज्या घालुन केलेल ओम्लेट घरात कुनि खात नाहि
असो मि त्या आंमलेट मध्ये खुप सार चिइझ किसुन घातलय ,त्यामुळ चिझचि चव बर्यापैकि छान होति
म्हनुन च चिझ ओम्लेट म्हट्ल हो मि ;)
23 May 2011 - 4:51 pm | पंगा
भाज्याच काय, बरेच कायकाय टाकता येते.
कांदे, टमाटू, ढबू मिरचीचे तुकडे, अळंबी (मश्रूम्स), पालक, ऑलिव, ब्रॉकली, झालेच तर ह्यामचे तुकडे, बेकनचे तुकडे, चुरडलेल्या सॉसेजचे तुकडे, कोंबडीचे तुकडे, ष्टेकचे तुकडे, तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला हवे तसे.
इथे पहा.
23 May 2011 - 5:25 pm | पियुशा
धन्यवाद पन्गा
भाज्या वापरुनच बनवेन नक्कि
नोन्व्हेज नको ,भाजि अन चिझ च बरे :)
20 May 2011 - 9:25 am | सानिकास्वप्निल
सविताशी १००% सहमत आहे चीज ऑम्लेटची खरी पाककॄती तिने वर दिल्याप्रमाणे आहे :)
तरी ही तु केलेले चीज ऑम्लेट मस्त दिसत आहे..फोटो छान आहे :)
22 May 2011 - 8:24 am | अलख निरंजन
तुम्ही दिलेल्या आम्लेटात डुक्कर आहे.
23 May 2011 - 11:22 am | पियुशा
तुम्ही दिलेल्या आम्लेटात डुक्कर आहे.
शिव शिव शिव
काहि पन काय बोलतोस रे ;)
23 May 2011 - 4:26 pm | पंगा
... माझ्या कल्पनेप्रमाणे त्यांनी दिलेली पाकृ ही देशी चीज़ ऑम्लेटची पाकृ असावी.
म्हणजे असे बघा, खर्या फ्रेंच टोस्टमध्ये नाही का, पिठीसाखर घालायची असते, पण आपल्या हिंदुस्थानी फ्रेंच टोस्टमध्ये (याला 'पॉंडेचरी टोस्ट' का म्हणू नये?) हमखास तिखटमीठ (झालेच तर कांदेसुद्धा) घालतात, तसेच.
ते तुमचे काय म्हणतात ना ते, 'ग्लोकलायज़ेशन' की कायसेसे, त्यातलाच प्रकार! (थोडक्यात, 'चलता है, हिन्दुस्तान है|')
(अवांतर: तुम्ही दिलेल्या चीज़ ऑम्लेटच्या फोटूमधून ह्यामचे तुकडे डोकावताहेत. डुकराचा हा एक प्रकार आमच्या फारशा वैयक्तिक आवडीतला नसल्यामुळे, पास.)
20 May 2011 - 6:28 am | प्यारे१
ए, कुठे फेडशील ही पापे? आज संकष्टी चतुर्थी आहे ना?
आज प्रतिक्रिया मिळणार नाही. मी ऑम्लेट पाहिले नाही, मी प्रतिक्रिया देणार नाही. ;)
20 May 2011 - 7:56 am | अन्या दातार
सुगरण होणे नाही. ;)
लग्नाळूपणाची नोंद घेतल्या गेली आहे :)
20 May 2011 - 10:27 am | स्पा
पियुषा तै,
आवरा हो या पाक्रु,
बस ना आता :(
सध्या दिवसाला ४ पाक्रु आणि ४ कवितांचा रतीब पडतोय
20 May 2011 - 10:47 am | प्रचेतस
हा ना, मग रतीबामुळे उगाच त्यांचे चीज होत नाही.
20 May 2011 - 10:56 am | रामदास
एक चुटकी मिरेकी आमलेटकी जिंदगी बना देती है .
20 May 2011 - 3:54 pm | अविनाशकुलकर्णी
लसून पाकळ्या
कधि ट्राय नाहि केल्या व कुठे खाल्या हि नाहि..
ट्राय करायला हव्या...
20 May 2011 - 4:48 pm | पक्या
आमलेट मध्ये चीझ अर्ध्या भागात घाला नाहितर पुर्ण आमलेट वर घाला. छानच लागते.. मी पुर्ण आमलेट करुन ताटात वाढून घेतल्यावर गरम असतानाच त्यावर किसलेले चोझ पसरवतो आणि मग घडी घालतो. आमलेट गरम असल्याने घडीच्या आत चीझ लगेच वितळते. रामदासकाकांनी म्हटल्याप्रमाणे मिरीपूड हवी स्वादासाठी. फोटो छान आहेत
20 May 2011 - 10:45 pm | ५० फक्त
+१०० टु सविता धन्यवाद,
चिंच गुळाची आमटी आणि कटाची आमटी यात जो फरक आहे ना तोच, पियुषाज चिज ऑमलेट आणि ओरिजनल चीज ऑमलेट मध्ये आहे.
तुरीच्या वरणात चिंच गुळ घालुन त्याची कटाची आमटी नाही होत. या पद्धतीनं किसलेले चीज बावुल मध्ये फेटलेल्या अंड्यात टाकुन स्पुनने पसरले तर ते चीज वितळ्णार नाही आणि एक्जीव पण होणार नाही. हे म्हणजे कच्छी दाबेली वर चीज खिसुन टाकायचे आणि त्याला चीज कच्छी दाबेली म्हणायचे असे झाले.
बाकी फोटो छान आलेत, इथं कोणी चीज चटणी ऑमलेट ची पाक्रु टाकेल काय, पुण्यात दुर्गा कॉफिच्या अलिकडे वन वे च्या कॉर्नरला एक फक्त अंड्याचे पदार्थ मिळणारं हॉटेल होतं, बहुदा 'अंडे का फडा' असं नाव होतं, आता बंद झालं तिथं मि़ळायचा हा प्रकार- म्रुणालिनीला आठवत असेल.
21 May 2011 - 5:51 am | Mrunalini
हो रे, मला ते होटेल आठवतय... अंडे का फंडा हेच नाव होत.. पण कधी गेले नव्हते तिथे.. त्यामुळे हे चटणी ऑमलेट कधी खाल्ले नाहीये.
बहुतेक ते सगळ्या भाज्या टाकुन नेहमीसारखे ऑमलेट करत असतील, आणि ते दुमडताना त्याला पहिले हिरवी चटणी लावुन, त्यावर चीज टाकत असतील.
मी खाल्लेले नाही, पण नावावरुन असे वाटले. :)
22 May 2011 - 7:39 am | पिंगू
पियुषा जरा भेसळपण जपून करायला शिका.... ;)
ह. घे.
- पिंगू
22 May 2011 - 8:25 am | अलख निरंजन
सगळेजण असेच आम्लेट करतात. त्यात नविन ते काय? उगा सर्ववर ताण. त्यापेक्षा मिपाच्या स्वयपाकघराला काही दिवस कुलुप घालावे.
15 Jun 2011 - 6:19 pm | पर्नल नेने मराठे
चील मॅन..
23 May 2011 - 3:53 pm | विसोबा खेचर
मस्त..!